Submitted by मंजूताई on 1 June, 2012 - 05:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१/२ वाटी तेलात परतलेल्या मूगवड्या, २ कांदे बारीक चिरुन, २ लाल मिरच्या, १ चमचा कैरीकीस, पाव चमचा गूळ, पाव चमचा मेथी पावडर, २ लसणाच्या पाकळ्या, फोडणीचे साहित्य, चवीनुसार मीठ, तिखट, सजावटीकरता कोथिंबीर.
क्रमवार पाककृती:
२ मोठे चमचे तेल कढईत तापले की फोडणीचे साहित्य टाकून त्यात लाल मिरची, लसूण, कांदा परतून घ्यावा. त्यात मूगवड्या टाकाव्या. पाणी टाकून झाकण ठेवावे. अर्धवट शिजल्यावर त्यात मीठ, तिखट, कैरीकीस व गूळ टाकून मूगवड्या शिजू द्याव्या. शिजल्यावर मेथीपूड टाकावी. कोथिंबीर घालून भाकरी बरोबर खावी.
वाढणी/प्रमाण:
दोन व्यक्तिंसाठी
अधिक टिपा:
मेथीपूड टाकून झाकण ठेवावे. मेथी स्वाद छान लागतो.
माहितीचा स्रोत:
मैत्रीण
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मूगवड्याची भाजी आणि गरम भाकरी
मूगवड्याची भाजी आणि गरम भाकरी सोबत कच्चा कांदा मुठी ने ठेचलेला..आवडता मेनु.
बरे झाले ... आता गावी
बरे झाले ... आता गावी गेली तेव्हा मूगवड्या बनवल्या आहेत ....का य करायचे विचार करत होते ..आता क रुन बघेन ...
वाढणीचे प्रमाण : मैत्रीण..?
वाढणीचे प्रमाण : मैत्रीण..?
माझी खुप खुप आवडती भाजी..
मी या भाजीत थोडा दाण्याचा कुट घालते, कैरी कधी वापरली नाही, आता वापरुन बघेन..
भाजी एकदम झकास..!!
मी बाजारातुन तयार मुगवड्या
मी बाजारातुन तयार मुगवड्या आणल्या पण त्याचे करायचे काय हा प्रश्न होता? तो सोडवल्याबद्द्ल धन्यवाद!
१/२ वाटी तेलात परतलेल्या मूगवड्या>>>> तेल १/२ वाटी की मुगवड्या???
तेलात परतल्यावर परत वाफवून
तेलात परतल्यावर परत वाफवून नाही का घ्यायच्या?
@ विनार्च १/२ वाटी मूगवड्या
@ विनार्च १/२ वाटी मूगवड्या तेलात परतलेल्या
@प्राची भरपूर पाणी टाकून शिजवायच्या. शिजायला वेळ लागतो अन वड्या पाणी शोषून घेतात.
मस्त भाजी. हि भाजी जरा वेळ
मस्त भाजी. हि भाजी जरा वेळ तशीच ठेवायची, म्हणजे वड्या सगळा रस शोषून घेतात. मग त्या मस्तच लागतात.
ही भाजी मी कालच ट्राय केली.
ही भाजी मी कालच ट्राय केली. चवीला मस्तच लागली पण पाऊण तास पाणी घालून नीट शिजवून पण मूगवड्या मऊसर नाही झाल्या. थोड्या चावायला लागत होत्या.
मा काचु?
मुगवड्यान च्या ऐवजी बाजरीचे
मुगवड्यान च्या ऐवजी बाजरीचे साण्डगे वापरुन करता येईल का ही पाककृती?
शूम्पी, ही भाजी अगदी गाळ नाही
शूम्पी, ही भाजी अगदी गाळ नाही शिजत; कारण मुगवड्या तेलात परतलेल्या असतात.
ओह, मग तेलात परतल्याच नाहीत
ओह, मग तेलात परतल्याच नाहीत तर? चालतं का?
शुम्पी! तेलात नाही परतल्या तर
शुम्पी! तेलात नाही परतल्या तर भाजी गिच्च गोळा होईल आणी ती चव येणार नाही, मुगवड्या अगदी थोड्या तेलावर लालसर परतुन भरड ठेचुन घ्याव्या मग भाजीही पटकन शिजते आणी मिळुन येते.
२ महिन्यांपूर्वी हे करून
२ महिन्यांपूर्वी हे करून बघितलं, आवडलं. सांगायचं रहात होतं थॅक्यू..