मटण स्वच्छ धुवून त्याला वरील वाटण चोळून मुरवत ठेवा.
तोपर्यंत कांदा चिरुन घ्या, लसूण पाकळ्या ठेचुन घ्या.
बटाट्याच्या मोठ्या फोडी करा.
टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्या.
आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यात प्रथम लसुण पाकळ्यांची फोडणी द्या व लगेच कांदा घालून तो बदामी रंगाचा होईपर्यंत शिजवा.
शिजलेल्या कांद्यावर टोमॅटोचा रस टाकुन परतवा २-३ मिनीटे शिजूद्या.
नंतर हिंग, हळद, मसाला, गरम मसाला घालून ढवळा.
ह्या मिश्रणावर मटण व बटाट्याच्या फोडी टाका.
परतून त्यावर मिठ टाका व परत एकजीव करा.
रस्सा किती हवा त्याच्या जरा कमीच पाणी टाका. नंतर मटणाचे थोडे पाणी सुटते.
कुकरचे झाकण लावुन १५ मिनीटे शिजवत ठेवा.
वाफ गेली कि झाकण काढा. (हा फोटो अर्धे मटण संपल्यावर काढलेला आहे. वासाने आणि भुकेने विसरले होते.:हाहा:)
टोमॅटोच्या प्युरीमुळे दाटपणा येतो. त्यामुळे सुके खोबरे घालण्याची गरज लागत नाही. कमी कटकटीचा हा प्रकार आहे.
बटाटे आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतात. पण आमच्याकडे बटाट्याशिवाय मटण कोणाला रुचत नाही
हेच मटण पाणी न घालता सुके बनवू शकता.
काहींना मटण टोपातच करायला आवडते. पण कुकरमध्ये लवकर शिजते त्यामुळे वेळेची व गॅसचीही बचत होते.
जागू मटण स्वच्छ धुवून त्याला
जागू
मटण स्वच्छ धुवून त्याला वरील वाटण चोळून मुरवत ठेवा. >> यानंतर जो फोटो टाकला आहेस तो बघून असं वाटतंय की मटण मुरवत ठेवल्यावर 'सृष्टीसौंदर्य बघायला जा' असं सुचवते आहेस
मस्त आहे पाकृ! नुसता रस्सा करून बघणार.
व्वा व्वा करा करा, मटणं करा
व्वा व्वा
करा करा, मटणं करा आणि चिकनं करा... आणि द्या इथे फोटो... लोक काय, बघून हळहळतातच
पाककृतीचे धागे नवीन लेखनात दिसणार नाहीत असा एक मेकॅनिझम तयार केला पाहिजे
जागू, अमेझिंग झिंग झिंग झिंग
जागू, अमेझिंग झिंग झिंग झिंग झिंग ............!!!!!
मंजूडी अग चुकून फोटो टाकला
मंजूडी अग चुकून फोटो टाकला होता. आता दुरुस्ती केली आहे.
बेफी
छान.. वेगळं आहे.. टोमॅटो
छान.. वेगळं आहे.. टोमॅटो रस्या मधे..
जागू, यावर मी प्रतिसाद लिहिणे
जागू, यावर मी प्रतिसाद लिहिणे म्हणजे....
पण एकदा बटाट्याच्या ऐवजी, अलकोलचे तूकडे घालून बघ. ते शिजून मऊगाळ होत नाहीत, पण चवीला
छान लागतात असे माझे गोव्यातील मित्र म्हणायचे.
पण एकदा बटाट्याच्या ऐवजी,
पण एकदा बटाट्याच्या ऐवजी, अलकोलचे तूकडे घालून बघ>> सॉरीच दिनेशदा, पण मी ते चुकुन अलकोलचे ऐवजी अलकहोल अस वाचल.
मामे झिंगा आठवला की काय ?
मामे झिंगा आठवला की काय ? धन्स.
अम्मी धन्स.
दिनेशदा अलकोलची चव थोडी गोडट असते. रश्यात चांगला लागत असेल एकदा टाकून नक्की बघेन. काही जण शेवग्याच्या शेंगाही टाकतात.
जागु भूक लागली पाहून.. पण मी
जागु भूक लागली पाहून.. पण मी मटण नाही खात.
जागु, धन्यवाद. एकदम भारीय.
जागु, धन्यवाद. एकदम भारीय.
अल्कोल म्हणजे? एक्दम भारी
अल्कोल म्हणजे? एक्दम भारी पाकॄ....
मस्त आहे पाकृ..............
मस्त आहे पाकृ.............. फोटो पण मस्त......
मस्तच रेसीपी!
मस्तच रेसीपी!
जागू मस्तच !!!!!!!
जागू मस्तच !!!!!!!
दुष्ट दुष्ट दुष्ट. :_( कशी
दुष्ट दुष्ट दुष्ट. :_( कशी नेमकी भूकेची वेळ गाठते ही.
जागू आता येतेच थांब. काय फोटो आहे! जबरी भूक लागली. छे आता ती मटकीची उसळ कशी खाणार मी
मस्त गं जागू
आयाया... कसली भुक लागली गं
आयाया... कसली भुक लागली गं फोटो पाहुन.....
भारी ! मी मटण बाहेर कधी खात
भारी !
मी मटण बाहेर कधी खात नाही कारण ते रबरी रबरी लागतं.. कोणाच्या तरी घरी केलेलं खाऊन बघायचं आहे.. लालूकडे किंवा तुमच्याकडे टपकायला हवं..
बरोबर मासेपण मिळतील ना ?? ..
लाळ गळाली बादलीभर ..........
लाळ गळाली बादलीभर ..........
पराग नक्कीच मिळतील मासे
पराग नक्कीच मिळतील मासे पण.
अवल, साधना
दक्षिणा, गिरीकंद, मनी, सृष्टी, आबासाहेब, नुतन, आशु धन्यवाद.
जागु काय सुर्रेख कलर
जागु काय सुर्रेख कलर आलाय.......... तोंपासू!!!!!!!!!!!!
मस्तं मस्तं मस्तं...
मस्तच !
मस्तच !
ते मटण बिट्ण काही नाही वाचलं
ते मटण बिट्ण काही नाही वाचलं बर्का! फक्त "जागू" नाव वाचून जरा भराभरच पाहिली रेसिली!
(घासफूस खाणारी मी!)
पण छानच असणार!
मला तर खुप भुक
मला तर खुप भुक लागली...बुधवारी आता ह्याच पदधतीने मटण करणार..
जागु असल्या रेस्प्या टाकून
जागु असल्या रेस्प्या टाकून टाकून एक दिवस मला मांसाहारी करून टाकणार बहुतेक.
दक्षे मलाही तुझ्या मागच्या
दक्षे मलाही तुझ्या मागच्या फोन वरून तसच वाटल.
वर्षू, स्वाती, मानुषी, अनुसया धन्यवाद.
जागु, शिट्या किती काढल्यास?
जागु, शिट्या किती काढल्यास? कुकरच्या म्हणतेय मी
मी घरी मटणात टॉमेटो घालत नाही
मी घरी मटणात टॉमेटो घालत नाही ...ही नॉर्थची पद्धत आहे का?
एक आहे ही पद्धत वापरून स्लो कुकरमध्ये करून पाहायला हवं ...:)
एकदम अस्सल फोटु.. स्लर्र्र्र्र्र्र्र्र्प्स...;)
जागु बटाटे शिजुन अगदी गाळ होत
जागु बटाटे शिजुन अगदी गाळ होत नाहीत का ?
एकदम तोंपासु अशी रेसिपी !
दक्शी मांसाहाराच्या अगदी जवळ पोहोचलीय , फक्त एक शेवटचा धक्का देण बाकी आहे.
काय झ्याक लागत आसन गं जागुतै
काय झ्याक लागत आसन गं जागुतै ह्ये मटान!
लय पानी सुटलया बगा त्वांडाला
ती वाटी बघून वाट्टय की उचलून
ती वाटी बघून वाट्टय की उचलून लावावी तोंडाला सरळ अन भुरका मारून मारून रस्सा प्यावा.
Pages