टोमॅटोच्या रश्यातील मटण

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 May, 2012 - 02:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो मटण
३ ते ४ टोमॅटो
४ कांदे
लसुण पाकळ्या ५-६
वाटण : आल एक इंच, लसुण पाकळ्या १ गड्डा, मुठभर कोथिंबीर, पुदीना, २ मिरच्या.
हिंग अर्धा चमचा
हळद १ ते दिड चमचा
मसाला ३ चमचे (तिखटाच्या आवडीवर कमी जास्त करू शकता)
गरम मसाला १ चमचा
मिठ २ चमचे
२ मोठे बटाटे
२ ते ३ पळ्या तेल

क्रमवार पाककृती: 

मटण स्वच्छ धुवून त्याला वरील वाटण चोळून मुरवत ठेवा.

तोपर्यंत कांदा चिरुन घ्या, लसूण पाकळ्या ठेचुन घ्या.

बटाट्याच्या मोठ्या फोडी करा.

टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्या.

आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यात प्रथम लसुण पाकळ्यांची फोडणी द्या व लगेच कांदा घालून तो बदामी रंगाचा होईपर्यंत शिजवा.

शिजलेल्या कांद्यावर टोमॅटोचा रस टाकुन परतवा २-३ मिनीटे शिजूद्या.

नंतर हिंग, हळद, मसाला, गरम मसाला घालून ढवळा.

ह्या मिश्रणावर मटण व बटाट्याच्या फोडी टाका.

परतून त्यावर मिठ टाका व परत एकजीव करा.

रस्सा किती हवा त्याच्या जरा कमीच पाणी टाका. नंतर मटणाचे थोडे पाणी सुटते.

कुकरचे झाकण लावुन १५ मिनीटे शिजवत ठेवा.

वाफ गेली कि झाकण काढा. (हा फोटो अर्धे मटण संपल्यावर काढलेला आहे. वासाने आणि भुकेने विसरले होते.:हाहा:)

ही अशी तयार मटणाची वाटी.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकास १ किंवा दोन वाट्या :स्मित:
अधिक टिपा: 

टोमॅटोच्या प्युरीमुळे दाटपणा येतो. त्यामुळे सुके खोबरे घालण्याची गरज लागत नाही. कमी कटकटीचा हा प्रकार आहे.

बटाटे आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतात. पण आमच्याकडे बटाट्याशिवाय मटण कोणाला रुचत नाही Lol

हेच मटण पाणी न घालता सुके बनवू शकता.

काहींना मटण टोपातच करायला आवडते. पण कुकरमध्ये लवकर शिजते त्यामुळे वेळेची व गॅसचीही बचत होते.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू Lol
मटण स्वच्छ धुवून त्याला वरील वाटण चोळून मुरवत ठेवा. >> यानंतर जो फोटो टाकला आहेस तो बघून असं वाटतंय की मटण मुरवत ठेवल्यावर 'सृष्टीसौंदर्य बघायला जा' असं सुचवते आहेस Lol

मस्त आहे पाकृ! नुसता रस्सा करून बघणार.

व्वा व्वा

करा करा, मटणं करा आणि चिकनं करा... आणि द्या इथे फोटो... लोक काय, बघून हळहळतातच

पाककृतीचे धागे नवीन लेखनात दिसणार नाहीत असा एक मेकॅनिझम तयार केला पाहिजे

जागू, यावर मी प्रतिसाद लिहिणे म्हणजे....

पण एकदा बटाट्याच्या ऐवजी, अलकोलचे तूकडे घालून बघ. ते शिजून मऊगाळ होत नाहीत, पण चवीला
छान लागतात असे माझे गोव्यातील मित्र म्हणायचे.

पण एकदा बटाट्याच्या ऐवजी, अलकोलचे तूकडे घालून बघ>> सॉरीच दिनेशदा, पण मी ते चुकुन अलकोलचे ऐवजी अलकहोल अस वाचल. Proud Lol

मामे झिंगा आठवला की काय ? धन्स.

अम्मी धन्स.

दिनेशदा अलकोलची चव थोडी गोडट असते. रश्यात चांगला लागत असेल एकदा टाकून नक्की बघेन. काही जण शेवग्याच्या शेंगाही टाकतात.

दुष्ट दुष्ट दुष्ट. :_( कशी नेमकी भूकेची वेळ गाठते ही.
जागू आता येतेच थांब. काय फोटो आहे! जबरी भूक लागली. छे आता ती मटकीची उसळ कशी खाणार मी Uhoh
मस्त गं जागू Happy

भारी !
मी मटण बाहेर कधी खात नाही कारण ते रबरी रबरी लागतं.. कोणाच्या तरी घरी केलेलं खाऊन बघायचं आहे.. लालूकडे किंवा तुमच्याकडे टपकायला हवं.. Happy
बरोबर मासेपण मिळतील ना ?? .. Proud

पराग नक्कीच मिळतील मासे पण.

अवल, साधना Lol

दक्षिणा, गिरीकंद, मनी, सृष्टी, आबासाहेब, नुतन, आशु धन्यवाद.

ते मटण बिट्ण काही नाही वाचलं बर्का! फक्त "जागू" नाव वाचून जरा भराभरच पाहिली रेसिली!
(घासफूस खाणारी मी!)
पण छानच असणार!

मला तर खुप भुक लागली...बुधवारी आता ह्याच पदधतीने मटण करणार.. Happy

मी घरी मटणात टॉमेटो घालत नाही ...ही नॉर्थची पद्धत आहे का?
एक आहे ही पद्धत वापरून स्लो कुकरमध्ये करून पाहायला हवं ...:)
एकदम अस्सल फोटु.. स्लर्र्र्र्र्र्र्र्र्प्स...;)

जागु बटाटे शिजुन अगदी गाळ होत नाहीत का ?
एकदम तोंपासु अशी रेसिपी !
दक्शी मांसाहाराच्या अगदी जवळ पोहोचलीय , फक्त एक शेवटचा धक्का देण बाकी आहे. Proud

Pages