न्यूटनचा सिद्धांत शौर्यनं केला सिद्ध!
मटा ऑनलाइन वृत्त । लंडन
गणितातील जी थिअरी सोडवताना साक्षात आयझॅक न्यूटन यांनाही घाम फुटला होता, गेल्या ३५० वर्षांत ज्या सिद्धांताची उकल भल्या-भल्या गणितज्ज्ञांना करता आली नाही, असं अत्यंत किचकट कोडं भारतीय वंशाच्या एका तरुणानं अगदी चुटकीसरशी सोडवून सगळ्यांनाच थक्क केलंय. शौर्य रे असं या पठ्ठ्याचं नाव असून तो जर्मनीतल्या शाळेत शिकतोय. त्याचं वय आहे, १६ वर्षं...
सर आयझॅक न्यूटन या थोर शास्त्रज्ञानं फंडामेन्टल पार्टिकल डायनॅमिक थिअरी मांडली खरी, पण अणूंच्या गतीचं गणित सोडवणं त्यांना काही जमलं नव्हतं. त्यानंतर या सिद्धांतावर कितीतरी चर्चासत्रं झाली, तर्कवितर्क लढवले गेले, विज्ञान आणि गणितातल्या रथी-महारथींच्या मेंदूचा भुगा पडला, पण त्याची उकल झाली झाली नाही. अगदी कॉम्प्युटरनंही या कोड्यापुढे हात टेकले. पण ड्रेसडेन इथं राहणा-या शौर्यनं भौतिकशास्त्रातला, ' द ग्रेट ' न्यूटन यांचा हा सिद्धांत अगदी ' खडे-खडे ' सिद्ध केला. अणुगतीच्या दोन सिद्धांतांमधील गुंता इतक्या सहजतेनं सोडवून त्यांना भल्या-भल्यांना बोटं तोंडात घालायला लावली आहेत.
शौर्यनं लावलेल्या शोधामुळे शास्त्रज्ञांना फेकलेल्या चेंडूचा टप्पा आणि मार्ग याचा अचूक अंदाज बांधता येईल. तसंच, हा चेंडू भिंतीवर आदळल्यानंतर कसा उसळेल, हेही ते नेमकं सांगू शकतील. शौर्य आपल्या शाळेच्या ट्रिपसोबत ड्रेसडेन विद्यापीठात गेला होता. त्यावेळी तिथल्या प्राध्यापकांनी सर्वच विद्यार्थ्यांना हे कोडं घातलं आणि त्याची उकल होत नसल्याचं सांगितलं. पण, ही थिअरी आपल्याला सोडवता आलंच पाहिजे, असा चंग शौर्यनं मनाशी बांधला आणि बघता-बघता त्यानं चमत्कारच करून दाखवला.
शौर्य रे हा मूळचा कोलकात्याचा असून तो चार वर्षांपूर्वीच जर्मनीला स्थायिक झालाय. त्याची विद्वत्ता पाहून शाळेनं त्याला थेट दोन इयत्ता पुढे नेऊन बसवलंय. वयाच्या सहाव्या वर्षापासून अशी किचकट गणितं, थिअरीज् सोडवण्याचा छंदच शौर्यला आहे. तो चार वर्षांपूर्वी जर्मनीला गेला, तेव्हा त्याला जर्मन भाषा अजिबात येत नव्हती. पण आता तो अस्खलित जर्मन बोलतो. त्याच्या या अफाट बुद्धिमत्तेला सलामच करायला हवा, नाही का ?
अरेरेरे... त्या बळीचा बकरा
अरेरेरे... त्या बळीचा बकरा बनवणार्या गुरुने त्या कोकणातल्या पोराऐवजी या शौर्यला बकरा का नाही केलं?/ तो मतोमंद मुलगा इतका हुशार नसता का झाला? तबडतोब त्या गुरुला शौर्यला गाठायला सांगा-- दुसर्या मतिमंद मुलासाठी..
( http://www.maayboli.com/node/35224 )
शौर्य रे चे अभिनंदन.
शौर्य रे चे अभिनंदन.
छोटाभीम, >> सर आयझॅक न्यूटन
छोटाभीम,
>> सर आयझॅक न्यूटन या थोर शास्त्रज्ञानं फंडामेन्टल पार्टिकल डायनॅमिक थिअरी मांडली खरी,
हो? अस्सं? केव्हा मांडली बरे? तुमच्या स्वप्नात की काय?
आ.न.,
-गा.पै.
न्युटनची असली कोणतीही थेअरी
न्युटनची असली कोणतीही थेअरी ऐकिवात नाही
http://techyyouth.com/indian-
http://techyyouth.com/indian-boy-solves-350-year-old-newtons-math-puzzle/
http://vsagar.com/2012/05/27/350-years-puzzle-newton-solved-shaurya-ray-...
भरत मयेकर, कसला न्यूटन आणि
भरत मयेकर,
कसला न्यूटन आणि कसलं काय! तुम्ही दिलेल्या दुसर्या दुव्यावर
http://vsagar.com/2012/05/27/350-years-puzzle-newton-solved-shaurya-ray-...
खाली तीन संदर्भ पुस्तके दिली आहेत. त्यातलं तिसरं पुस्तक हे आहे :
http://www.springerlink.com/content/v7653r3m15128545/
हे पुस्तक चक्क सापेक्षतावादाशी संबंधित आहे. न्यूटनच्या काळी सापेक्षतावाद होता?
बहुतेक लेखकाने कालप्रवास केलेला दिसतोय!
आ.न.,
-गा.पै.
गाम्या ,आजकाल जरा तु ट्रकवर
गाम्या ,आजकाल जरा तु ट्रकवर येताना दिसतोयस ब्रायटनला हवा चांगली असावी .
ही बातमी खरी असेल तर छानच आहे
ही बातमी खरी असेल तर छानच आहे पण मी साशंक आहे. न्यूटन चा न सोडवलेला काही सिद्धांत ऐकिवात नाही. काही वर्षांपूर्वी पाण्याचे पेट्रोल करणार्या माणसाची अशीच प्रसिद्धी झाली होती.
मला वाटते ही बातमी मटा मध्ये
मला वाटते ही बातमी मटा मध्ये आली होती, त्यामुळे विश्वासार्ह असावी , लेखक लिंक द्यायला असावेत @ छोताभीम जी
डेली मेलने पण शौर्याचा बेवडा
डेली मेलने पण शौर्याचा बेवडा झोकला!
-गा.पै.
>> न्यूटनच्या काळी
>> न्यूटनच्या काळी सापेक्षतावाद होता?
सापेक्षतावाद होता, तो आईनस्टाईनने मांडलेल्या सापेक्षतेपेक्षा साधा सोपा सरळ होता. त्याला गॅलिलिअन रिलेटिव्हिटी म्हणत असत. इथे पहा -- http://en.wikipedia.org/wiki/Galilean_invariance
ही बातमी खरी आहे. मी कालच इथल्या संडे टाइम्स मधे पण वाचली. पण मला त्यानं नक्की काय सोडवलंय ते समजलं नाही अजून.
चिमण, >> पण मला त्यानं नक्की
चिमण,
>> पण मला त्यानं नक्की काय सोडवलंय ते समजलं नाही अजून.
काय सोडवलंय ते कोणालाही माहीत नाहीये! ग्यानबाची मेख इथेच आहे. डेली मेलच्या बातमीखाली वाचकांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यांतल्या सर्वात लोकप्रिय प्रतिसादात हाच सूर दिसतो.
हे म्हणजे कसलंसं पिल्लू उगीच सोडल्यासारखं आहे.
आ.न.,
-गा.पै.
भरत सकाळी ही थिअरी पाहिली.
भरत
सकाळी ही थिअरी पाहिली. काहीच डोक्यात शिरलं नाही. लो रेनॉल्डस नंबर असणा-या पदार्थांबद्दल आहे का हे ? दोन तीन सायन्स पोर्टलवर मुलभूत संशोधन डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. पण त्यात न्यूटनचा केवळ उल्लेख आहे.
न्यूटनने न सोडवलेलं समीकरण सोडवण्याचा प्रयत्न पाहणे अल्प बुद्धीमुळे शक्य झाले नाही. खरं तर अल्जेब्रा मधलं ते लँगरँग का काय ते समीकरण त्याच वेळी विसरलो. न्यूटनने न सोडवलेलं असल्याने असेल कदाचित आजवर कधी याबद्दल माहीती नव्हती.
कुणीतरी सोप्या भाषेत समजावून सांगा आता..
अजुन डिटेल्स असल्याशिवाय अशा
अजुन डिटेल्स असल्याशिवाय अशा गोष्टींबद्दल फार विचार करण्यात अर्थ नाही ...
किरण, त्या बातमीची लिंक
किरण,
त्या बातमीची लिंक देण्यामागचा माझा उद्देश फक्त 'ही लोणकढीच असेल असे नाही' हे सांगण्याचा होता.
शौर्यचे नाव न देता teenage boy solve's Newton's puzzle असा शोध घेतला तर युरोपातल्या अनेक वृत्तसंस्थांच्या संकेतस्थळावरील त्याच आशयाच्या बातम्या पहायला मिळतात.
http://www.montrealgazette.com/technology/Teen+solves+Newton+year+riddle...
शाळेत असतानाही मी फिजिक्सला जुलुमाचा रामराम करीत असे, त्यामुळे नक्की काय कोडे आणि त्याचे उत्तर काय यामागे डोके खपवायचा उत्साह नाही. तरीपण वर फेकलेल्या चेंडूला खाली येताना होणार्या हवेच्या अडथळ्यामुळे त्याच्या मार्गात होणारा बदल आणि लागणारा वेळ यांचे अनुमान काढण्यासंबंधी काही आहे इतके मज पामरास कळले. अश्चिग, बातमीबद्दल नाही तरी या त्या समीकरणांबद्दल लिहिणार का?
http://www.rttnews.com/1894769/sir-isaac-newton-posed-and-german-teen-so...
त्याने काहीतरी भारी केले आहे
त्याने काहीतरी भारी केले आहे हे नक्की दिसते. फक्त काय केले आहे ते समजावून घेणे जिकीरीचे काम दिसते
शौर्यनं लावलेल्या शोधामुळे शास्त्रज्ञांना फेकलेल्या चेंडूचा टप्पा आणि मार्ग याचा अचूक अंदाज बांधता येईल. >> शोएब अख्तर फॉर्मात होता तेव्हातरी लावायचा होता हा शोध
शोएब अख्तर फॉर्मात होता
शोएब अख्तर फॉर्मात होता तेव्हातरी लावायचा होता हा शोध >> पण सचीन शास्त्रज्ञ नाहीये ना
लोकहो, हे कोडं फारसं प्रसिद्ध
लोकहो,
हे कोडं फारसं प्रसिद्ध नसावं असा अंदाज आहे. तसं असतं तर त्याला विशिष्ट नाव मिळालं असतं. मग गुग्गुळाचार्य अथवा विकीपादाचार्यांना विचारून खात्री करून घेता आली असती.
या घडीला या प्रकरणाबद्दल अचूक माहितीपेक्षा संदिग्धता जास्त आहे.
आ.न.,
-गा.पै.
http://arxiv.org/pdf/physics/
http://arxiv.org/pdf/physics/0001027.pdf
Well-known to specialists but little-known to the wider audience is that
Newtonian gravity can be understood as geodesic motion in space-time,
where time is absolute and space is Euclidean.
http://phys.org/news/2012-05-teenager-reportedly-solution-year-math.html
Ray’s story has generated a lot of press around the world, highlighting the young lad’s ability to come up with a math formula that not even the great Isaac Newton could find, despite the fact that no one other than a few local people have seen the formulas he’s created; thus, in the math and physics world there remains a great deal of skepticism regarding what he’s actually accomplished and most are holding off judgment until the formulas are published and reviewed.
वरील दुव्यांबद्दल धन्यवाद,
वरील दुव्यांबद्दल धन्यवाद, भरत मयेकर!
शौर्याचा शोध म्हणजे काय सेलेब्रिटी शो नाही हे कोणी ध्यानात घेत नाही. हल्ली प्रथितयश वृत्तपत्रेही वैज्ञानिक बातमी वलयांकित व्यक्तींच्या गौणकृत्यांसारखी (celebrity trash) छापतात. डेली मेल सारख्या वृत्तपत्रास विज्ञानगणितासंबंधी वार्तेची शहानिशा करायला तत्ज्ञ मिळू नयेत!
आ.न.,
-गा.पै.
इथे हे मिळालं. भरत मयेकरांना
इथे हे मिळालं. भरत मयेकरांना +१
http://tu-dresden.de/die_tu_dresden/fakultaeten/fakultaet_mathematik_und...
आणि मला नेमकं काय आहे, हे अजिबात नाही कळलं.