पालकाची एक जुडी
४ मोठे बटाटे
पुदिना
कोथिम्बीर
हिरव्या मिरच्या
एक वाटी मूग डाळ, भिजवून
आले लसूण पेस्ट
धणे जीरे पावडर
गरम मसाला
मीठ
चवीपुरती साखर
काजू
-बटाटे उकडून किसून घ्यावेत.
-पालक धुवून मिक्सर मधे २ चमचे पाणी घालून बारीक वाटून घ्यावा.
- पुदिना, कोथिम्बीर, मिरच्या बारीक चिरावे.
- भिजवलेली डाळ वाटावी व सगळे मिक्स करावे.
- या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावेत व थोडे चपटे करावेत.
- प्रत्येक काजूचे उभे २ तुकडे करावेत. एक तुकडा प्रत्येक कबाबच्या मधे बसवावा म्हणजे शोभा येते.
हे तयार करुन अर्धा तास फ़्रीज मधे ठेवावे . नंतर आयत्या वेळी तळावेत. (शॅलो फ्राय केले तरी चालतात, वरुन रवा - ब्रेडकम्स असे काही लावावे लागत नाही.) पालकाचा हिरवा रंग आणि वरुन लावलेले काजू यामुळे हे कबाब छान दिसतात आणि लागतात पण. कांदा व लिंबू याबरोबर सर्व्ह करावे व वरुन थोडा गरम मसाला भुरभुरावा.
पालक चिरुन, किंवा चॉपरमधून कापून-
मुगाची वाटलेली डाळ, याहून जास्त पातळ नको.
बटाटा, पालक, इतर जिन्नस मिक्स केलेले-
गोळा करुन फ्रीजमध्ये ठेवले (कबाब बनवूनच फ्रीजमध्ये ठेवू शकता)
मग कबाब बनवून ग्रिडलवर शॅलो फ्राय केले. पॅनवरही तेल टाकून करता येतील. प्रत्येक कबाब पॅनच्या बाजूला टेकवून किंवा उभा फिरवून बाजूला थोडी आच लागू द्यावी.
पालक पाणी न घालता chopper मधे बारीक करुन घेता येतो. मुगाची डाळ पटकन भिजते. गरम पाण्यात टाकली तर अगदी १५ मिनिटात. ती पण फार बारीक वाटू नये. पुदिना ऐवजी मी चाट मसाला घातला २ लहान चमचे. मग वरुन गरम मसाला टाकला नाही. खरपूस शॅलो फ्राय करावेत. कान्दा, लिम्बू तसंच आंबटगोड चटणीबरोबरही छान लागले.
चालतील. पण सगळं साहित्य कच्चं
चालतील. पण सगळं साहित्य कच्चं आहे हे लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे वेळ, तापमान ठरव. ब्रॉइल केलेस तर वरुन थोडे ब्राऊन होतील.
मायक्रोवेवमधून काढून मग बेक केले तरी चालतील.
ओक्के धन्यवाद हं
ओक्के
धन्यवाद हं
मि शनीवारि केले होते.. काजु
मि शनीवारि केले होते.. काजु एवजि तीळ वापरले...
सृष्टी, चांगली आयडिया आहे.
सृष्टी, चांगली आयडिया आहे. हिरव्यावर वरुन पांढरे तीळ चांगले दिसतायत.
वॉव्.मस्त आणी सोपी रेस्पी
वॉव्.मस्त आणी सोपी रेस्पी ..
शुगोल, सृष्टीचे ही कबाब छान आहेत
आज पुन्हा केले हे कबाब, पण
आज पुन्हा केले हे कबाब, पण थोडं व्हेरिएशन करून. बटाट्याच्या ऐवजी मॅश पोटॅटोची पावडर/फ्लेक्स वापरले. डाळ व पालक ब्लेंडरमधून काढून मसाले वगैरे टाकून त्या मिश्रणात मावतील एवढे पो.फ्लेक्स घातले. चवीत अजिबात फरक जाणवला नाही.( हे फ्लेक्स अॅडीटीव्ह्ज् फ्री आणि प्रिझर्व्हेटीव्ह फ्री आहेत. कॉस्टकोत मिळाले.) मात्र ताज्या बटाट्याचा फ्लेवर आणि टेक्स्चर मिस झाले. पुढच्या वेळेला ताजे बटाटे आणि पातळपणा जाण्यापुरते फ्लेक्स असं करून पाहणार आहे.
एकदा फोटो टाकला आहे, म्हणून परत टाकत नाही.
लोला, मला पूढ्च्या रविवारी २५
लोला, मला पूढ्च्या रविवारी २५ जणांसाठी हे कबाब करायचे आहेत. मावे मधे ग्रिल ओप्शन मधे होतील का, की गॅस वरच शॅलो फ्राय करावे लागतील?
सामी, ह्याच पानावरती सगळ्यात
सामी, ह्याच पानावरती सगळ्यात वर लोलाची पोस्ट आहे तुझ्या प्रश्नासंदर्भात.
शुगोल मी वाचली ती पण
शुगोल मी वाचली ती पण 'मायक्रोवेवमधून काढून मग बेक केले तरी चालतील'' याचा अर्थ नाही कळला.
ग्रिल आणि बेक वेगळे वेगळे ना?
सामी, ग्रिल आणि बेक वेगळेच.
सामी, ग्रिल आणि बेक वेगळेच. या कबाबांमधे एक बटाटा सोड्ला तर सगळे पदार्थ कच्चेच वापरतोय. तेव्हा ते नीट शिजणे महत्वाचे आहे. म्हणून ग्रिल. ओव्हनमधे ठेवायचे तर बेक पेक्षा तपमान जास्त ( पण ब्रॉईल पेक्षा कमी) ठेवावे लागेल असे वाट्ते. पुढच्या वेळी मी हा प्रयोग नक्की करुन पाहीन.
लोला , recipe साठी धन्यवाद
लोला , recipe साठी धन्यवाद !
कालच केले. छान झाले होते .
मस्त.... करून पाहणारच आता...
मस्त.... करून पाहणारच आता... मूग डाळ कितीवेळ भिजवायची?
मी पण फार फार पुर्वी माबो
मी पण फार फार पुर्वी माबो जुन्या रुपात होती तेव्हा केले होते आता परत करायला हवे..
Convection मध्ये बेक करायचे
Convection मध्ये बेक करायचे असल्यास किती वेल व तापमान निवडावे?
Pages