भाग एक http://www.maayboli.com/node/35007 या लिंक वरून पूढे सुरु
---------------------------------------------------------------------------------
जास्तवेळ नाही थांबावलागल कारण लगेच एक पोलिस व्हॅन जिला चारी बाजून जाळी असल्यान पिंजरा म्हणतात ती येताना दिसली. गाडी समोर येउन थांबली आणि त्यातून राऊत बाहेर आला राऊत हा पोलीस नाईक स्पेशल टिमचा. वयान तिस पस्तीसचा अंगकाठी शिडशीडीत पण भक्कमपणा जाणवणारी. चेहेरा साधारण पण रापलेला, मिश्या, कडक वागणे. "जय हिंद साहेब" म्हणत त्याने मला गाडीत बसण्यासाठी इशारा केला. मि विचारल "किती स्टाफ आहे बरोबर?" तुम्ही मिळून चारजण आहोत चेहेर्यावरचे भाव न बदलता तो बोलला. मी आणी राऊत पुढे ड्रायव्हर शेजारी बसलो गाडी सुरु झाली तसे राऊतने " तो माग आहे. हे त्याचे रेकोर्ड" म्हण्त मला एक फाईल हतात दीली.
ति त्याची फाईल होती ज्याला आज मला एन्कांऊटर करायचे होते. आज पर्यंत चौकीवर गुन्हेगारांना थर्डडीग्री खुपदा दिली खास करून पोलीसांचा खास बेल्ट ज्याला मेरी आवाज सुनो आणि पोलीसांची स्पेशल काठी ज्याला दंडूका म्हणतात त्याने तर खुपदा चोपलाय आणी गडचीरोलीत एकदा जिवावरच आल म्हणून गोळीबार केला. अस करताना एकदाही काहीवाटल नाही कारण साले एक जात गुन्हेगार कोणी बलात्कारी, कोणी खूनी ,कोणी दरोडेखोर. अक्षरशा रांगत्या बाळा पासून ते म्हातार्या माणसापर्यंत कोणावर ही हल्ला करणारे एकशे एक अट्टल गुन्हेगार. सामांन्य माणस स्वप्नातही ज्याचा विचार करणार नाहीत आशी माणसाच कातड पांघरलेली जनावर. त्यांना पकडून आपल्यापरीन
चौकशी करायची चोपचोप चोपायच आणि न्यायालयात उभ करायच आज पर्यंत एवढच काम होत माझ.
पण आज मात्र मी एका खर्या कामगीरीवर होतो. मला ही ऑर्डर मिळाली तेंव्हा काहीच डोक्यात न्हवत पण आता ज्याला मी मारणार आहे त्याची अधीक माहीती घ्यावी अस वाटू लागल.
कारण त्याचा माझा पर्सनली असा कोणताच दावा न्हवता. तो कोण आहे. काय आहे हे जाणून घेण्यासाठी मि फाईल पाहू लागलो. नाव सुनील गोटाणे उर्फ डायमंड उर्फ सुन्या राहाणार नागपाडा वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने पहीला गुन्हा केला होता. जबरीचोरीचा पुढचा ईतीहास बलात्कार, दरोडे, स्मगलींग, ड्रज्ग, खुन असा होत होत अपहरण गॅंगवार, सुपारी किलींग असा होता. एकूण दिडशे दोनशे गुन्ह्यान मध्ये याचा सक्रीय सहभाग होता.
मला त्याला न मारता बॅकफूट घेण म्हणजे वरीष्टांची मर्जी खप्पा करून घेण आणि जर का ऑर्डर पाळली तेर मग मात्र वरीष्टांची मर्जी प्लस प्रमोशंन हा साधा सरळ हीशेब, पण मन कूठतरी माती खात होत डोक्याची जास्त मंडई न करता मी गाडी बाजूला घेऊन पींजर्यात माग जाऊन बसलो आणी गाडी सरळ हायवेकडे न्ह्यायला सांगीतली.
तो हातात बेड्या घातलेल्या अवस्थेत होता.अंगात शर्ट पॅन्ट असा पोषाख होता. त्याच्या शेजारी एक हवालदार बसला होता. तो मला बघुन हसला आणि "सलाम साहेब" म्हणाला मी पण त्याच्या कडे बघून हसलो आणि मी सिगारेट काढून पेटवली तसा "साहेब मेरेको भी एक दोना?" त्यान विचारल तस मला त्याच्या बद्दल माहीती हवीच होती म्हणुन मि त्याच्या पुढ सिगारेट ठेवली आणि स्वतःलाईट केली तसा तो प्रसंन्न हसला. तो गव्हाळ रंगाचा अंगान खप्पड, गालफड बसलेली पण डोळे मात्र फार चोखट. असला चिपाड माणूस एका झापडीचा वाटणार नाही. पण आता पर्यंतचा अनूभवानी त्याला पहील्या नजरेत मी ओळखला की हा पोहचलेला गुन्हेगार आहे.
थोडावेळ असाच गेला मग मी खास मैत्री असल्या सारख्या गप्पा मारायला सुर्वात केली तो कोण कुठला या क्षेत्रात कसा आला अशा साधारण गप्पा मारत मारत त्याच्या कडुन माहीती काढत राहीलो तो सुर्वातीला एक दम मोकळा होईना म्हणून गाडी एका ढाब्यावर घ्यायला लावली आम्ही सर्वजण खाली ऊतरलो तो बांधलेलाच होता पण जरा बाहेर आल्या मुळ त्याला मोकळ वाटत होता.
बाकी सर्वजण बसलो मी डायरेक्ट त्याला विचारल "काय सुन्या बियर पीणार का?" तो फक्त होकारार्थी हसला. मि ऑर्डर "दीली एक बियर लाना थंडा और एक हाफ तंदूरी " बरोबरचे हवालदार थोड लांब बसुन हाफ हंडी आणी रोटी ऑर्डर करत होते. मी फक्त माझ्यासाठी एक कप कॉफी मागवली.
माझ्या आनी सुनीलच्या परत गप्प सुरु झाल्या. दोन बियर पोटात गेल्यावर हळू हळु तो त्याच्या लायकी वर यायला लागला आणी एक एक करत त्याने केलेल्या गून्ह्यांच वर्णन खुप मोठा तीर मारल्या सारख करायला लागला. मी पण खुपच इंटरेस्टींग असल्या सारख ऐकत बसलो. त्याला मग मी बिर्याणी पण चारली एकदम खुश झाला सुन्या. तसा मद्दड डोक्याचा पण एक गोष्ट कंनर्फम झाल की तो प्रोपर पोहचलेला गुन्हेगार होता आणी त्याला मोकाट सोडला तर तो बाहेर येऊन पून्हा निरपराध लोकांच्या जिवावर ऊठणार त्या मूळ वरुन आदेश आला होता की त्याला अशा पध्दतीन ऊडवायचा की त्याची गॅंग आणी रायव्हल गॅंग यांच्यात वितुश्ट येऊन ते एक मेकांना संपवतील जे उरतील त्यांना एटीस बघुन घेईल.
मला त्या अधीकार्यांच हुशारीच कौतुक वाटल जे असा निर्णय घेऊ शकतात.
सुन्याच पिऊन खाऊन झाल तस आम्ही पुन्हा गाडीत बसलो मी राऊतला कामाठीपुर्यात एका बंद पडलेल्या साईट कडे गाडी घ्यायला सांगीतली साडेतीन वाजता आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. मि तो पर्यंत सुन्याशी गप्पा मारतच होतो. तिथ पोहोचल्यावर मि खाली ऊतरलो त्याच्याकडे बघून लघवीला यायच का असा करंगळी वर करून ईशारा केला. त्याला पण बियरमुळ जायचच होत दोन हवालदार आणि तो खाली उतरले समोरची बंद पडलेली साईट पाहून तो एकदम शांत झाला. त्याला थोडा पुढ नेला. तसा मी राऊतांना ऑर्डर दिली "राऊत हात खोला त्याचे" राऊतांनी त्याच्या बेड्या काढल्या. मी त्याच्याकडे पाहात म्हणालो त्याला आता कुठ अंदाज येत होता की काय होणार आहे. मि त्याच्या चेहेर्यावरचे बदलणारे भाव पाहात होतो.
आता खरी वेळ आली होती माझी कामगीरी बजावायची"सुन्या ही बिंल्डींग आठवतीये का" तसा तो चमकला माझ्याकडे घाबरुन पहायला लागला. "कारे भाडकाव जुना अड्डाना हा तुझा. त्या राठी बिल्डरला ईथच मारल होत नारे आयघाल्या." खाडकन कानफडात ओढली मी त्याच्या. तस पोलीसांनी त्याला खुपदा मारहाण शिवीगाळ केला असेल पण दारु, तंदुरी, बिर्यानी चारुन शिव्या देनारा पहीला मिच भेटलो होतो.
राऊतनी घाप कन बुक्की घातली त्याच्या पोटात तसा तो पोटधरुन खाली पडला राकट मारल होत. आम्ही सर्वांनी त्याला तिथेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरवात केली गरजेच होत ते असा सिन क्रिएट करण्या साठी. रायव्हल गँगन खलास केरण्या पुर्वी मारहाण केल्याच दाखवण्यासाठी. दहा पंधरा मिनट मारहाण केल्या वर तो बधीर होऊन विव्हळत पडला. त्याला मोकळा सोडला आणी मि त्याच्या पासुन थोड लांब जाऊन गन काढली आणी ट्रीगर खेचला. त्याला पाच गोळ्या घातल्या त्या शांततेत आवाज जरासा घुमला त्याला ओरडायची ही संधी मिळाली नाही. तसा दोन गोळ्यातच तो संपला होता पण तिन गोळ्या हा दिखावा पुर्ण करण्या साठी आवश्यक होता.
मि खाली वाकून पाहील त्याच्या चेहेर्यावर भीती ठेऊन मरण त्याला घेऊन गेल होत. आम्ही गाडीत बसलो. राऊतांनी माझ्या कडून गन परत घेतली आणी मला गाडी सरळ मुम्बईपुणे हायवेला माझ्या बाईक जवळ सोडून निघून गेली. काही मिनट मी काही विचार न करता तिथच रस्त्यावर उभा होतो मग गाडीला किक मारुन सरळ घरी आलो तो पर्यंत पाच वाजत आले होते. घरी बायको पोरगी दोघी झोपल्या होत्या शांतपणे मि चहा बनवुन घेतला आणी गॅलरीत बसून राहीलो. फोन वाजला चौधरी साहेबांचा फोन नकळत परत शरीर कडक झाल फोन रिसीव्ह केला.
"जय हिंद सर,"काम झाल"
"वेलडन! आता आराम करा आणी उद्या दुपारी येऊन भेटा"कमिशनर साहेबांनी ऑर्डर दीली
"ओके सर" मि होकार देताच फोन कट झाला
सकाळी सहा वाजे पर्यंत ऊगाचच बसुन राहीलो गॅलरी मध्ये मग हॉलमध्येच झोपुन गेलो.
साधारण दोन वाजता आनघान आवाज देऊन ऊठवल ऊठून स्वछ आंघोळ केली थोड काही खाल्ल आणी युनिफॉर्म चढवून निघालो तशी अनघान विचारलच "हे काय गन कुठेय"
"जमा केली मेंनटेनन्सला"मी उगाच उत्तर दिल
"काल तर होती रात्री घेऊन गेला होतास ना?" अनघा अश्चर्यान माझ्या कडे बघत विचारल.
मि काही न बोलता शुज घातले आणी निघालो. तिलाही माहित होत की मि जर काही बोललो नाही तर आत्ताच काही सांगणार नाही. ति पण गप्प राहीली.
ऑफिस मध्ये आलो तेव्हा लगेच मला हवालदारान चौधरी साहेबांन तडक यायला सांगीतल्याचा मेसेज दिला
"मे आय कम ईन सर" साहेबांच्या रुमच्या दरवाज्यात मि परमिशन मागीतली
"ओह चव्हाण येस येस कम ईन"
"थॅन्क्यू सर" म्हणत मी साहेबांच्या टेबलाच्या समोरच्या खुर्चीवर बसलो
"आय एम वेरी ग्लाड यु हॅव डन ईट वेल. टेल मी व्हेर डु यू वाँट पोस्टींग ? " साहेबांनी डायरेक्ट ऑफर दिली.
"आय हॅव नोट थॉट अबाऊट इट सर"मि कबूली दिली
" एटीस मध्ये जाणार का?"
"येस सर"मि सरळ उत्तर दिल कारण ही टिम खास होतीच परत काम ही चॅलेंजींग होत.
"ओके आयएम प्रमोटीग यु अॅन्ड ट्रान्सफरींग टु यु स्पेशल टिम"
म्हणत मला त्यांनी एक जाड लिफाफा दीला.
"थॅन्क्यू सर"म्हणत मी बाहेर आलो स्वतःच्या डेस्क वरती जाउन लिफाफा ऊघडला आणी स्वतःशीच हसलो. मला आता समजल माझी निवड आधीच झाली होती अॅन्टी टेररीस्ट स्क्वाडला फक्त कालची एक परीक्षा होती.
कालच्या कामगीरीचे बक्षीस आणी अॅन्टी टेररीस्ट स्क्वाडच आपॉईटमेंट लेटर एका नविन कामगीरीची सुरवात झाली होती.
"
छान!!
छान!!
चांगली आहे. पण पहिल्या
चांगली आहे. पण पहिल्या भागानंतर काही तर खूप नाट्यमय घडेल अश्या अपेक्षा ठेवल्या होत्या.
अर्थातच अजून तुमचं लेखन वाचायला आवडेल.
धन्यवाद
धन्यवाद
मस्त. छान!!
मस्त. छान!!
छान लिहिले आहे......
छान लिहिले आहे......
मस्त... समाप्त आहे की
मस्त... समाप्त आहे की क्रमशः???.. अजुन वाचायला आवडेल
मस्त... अजुन भाग येउ द्यात
मस्त... अजुन भाग येउ द्यात
नक्कीच अजून भाग येत राहातील
नक्कीच अजून भाग येत राहातील
कथा आवडली....
कथा आवडली....
चांगली आहे. पण पहिल्या
चांगली आहे. पण पहिल्या भागानंतर काही तर खूप नाट्यमय घडेल अश्या अपेक्षा ठेवल्या होत्या.
अर्थातच अजून तुमचं लेखन वाचायला आवडेल.
>>>>>>>>>>>
सहमत.. मलाही असेच वाटले होते साधारण..
पण ही तर सुरुवात आहे नाही का... पुढच्या लिखाणाची प्रतिक्षा राहील.. येऊ द्या आता आणिक एखादी भारी थरारकथा.. अश्या कथा लिहायची शैली तर आपल्याला जमलीच आहे..
रावण, आता कुठे संहाराला
रावण,
आता कुठे संहाराला सुरुवात केलीये तुम्ही! एव्हढ्यातच समाप्त? पटंत नाही बुवा!
कथा खूपच पकड घेणारी आहे. आजून येउद्यात!
आ.न.,
-गा.पै.
पोलिसांच्या खर्या जगात
पोलिसांच्या खर्या जगात एन्काउंटर्स असेच होतात... हात सोडतात, पळायला सांगतात आणि उडवतात..
कथा पकड घेतेय... पण जरा शुद्धलेखनाकडे लक्ष द्याल का?
धंन्यवाद मि नक्कीच अजुन चांगल
धंन्यवाद मि नक्कीच अजुन चांगल लिहायचा प्रयत्न करेन.
मस्त... समाप्त आहे की
मस्त... समाप्त आहे की क्रमशः???.>>>+१
पुढे अजुन नाट्यमय असणार काहितरी. येउद्यात अजुन.
रावण ........... कथा छान
रावण ........... कथा छान आहे.................
फक्त तुम्ही एन्काउंटर्स करतानाची घालमेल आणि ते करुन झाल्यावर घरी आल्यावर स्वभावात आलेला बदल.. हे भाग राहीले.........कुणीही प्रथम खुन करताना .. सहज कांदा चिरतोय असा करत नाही.. प्रचंड घालमेल असते मनात..मग तो कोणी का असेना.. सैनिक सुध्दा पहिली गोळी चालवताना प्रचंड तनावाखाली असतो.
रंग छान भरले आहेत...तुम्ही... मी फक्त माझ्यातर्फे तुम्हाला अजुन रंग देत आहे....
..
.
माझ्या घराण्यात आणि मित्र मंडळी सगळेच पोलिसात आहेत... म्हणुन हे वागणे मला पटले नाही..थोडेसे...
.
.धन्यवाद