Photographic Society of Pune यांच्या द्वारे आयोजित केल्या गेलेल्या, दिनांक १९-२० मे २०१२ च्या 'वेडिंग फोटोग्राफी' ह्या कार्यशाळेविषयी माझे मनोगतः
आदरणीय गुरुजन आणि इथे जमलेल्या सर्व छायाचित्रकार सवंगड्यांना तसेच व-हाडी मंडळींना माझा नमस्कार,
आभार व्यक्त करायला सुरुवात कुठुन करायची याबद्दल थोडिशी साशंकता आहे. आणि आभार प्रदर्शन, Thanks Giving, २ शब्द असंच काहिसं बोलायला खरं तर मी इथे आलोय. पण इथे आल्यावर मला एक जाणीव झाली ती म्हणजे, भुकेल्याला घास भरविणा-याचे ऋण फेडणं किंवा व्यक्त करणं, इतकं सोप्पं नाही. इतक्या सगळ्या अनुभवी आणि मातब्बर लोकांच्या मध्ये मी काय बोलणार? ह्या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे काल, संध्याकाळी इथुन घरी परतताना ह्या वर्कशॉपबद्दल माझ्या मनावर हे जे काही उमटलं, ते सर्व इथे उतरवलंय. कारण मला जे काही वाटलं, ते शब्दांच्या स्वरुपात काहिही विसरायचं नव्हतं, सर्वच्या सर्व जसंच्या तसं व्यक्त करायचं होत आणि म्हणुनच मी हे आभार प्रकटन करतोय. ह्याला आभार प्रदर्शन असं नाही मी म्हणणार, कारण प्रदर्शन म्हणजे exhibition . . . .ज्याचं 'प्रदर्शन' होतं. त्यामुळे जरी वरुन हे कृत्रिम वाटत असलं तरी ह्यातील विचार माझे स्वत:चेच आहेत, मनापासून आहेत. माझ्याप्रमाणेच आपल्याही अशाच भावना असल्याची मला पूर्ण खात्री आहे. इथे जमलले बहुतेक सर्वच जण ह्या क्षेत्रातले अनुभवी आहेत. आणि आपल्या सर्वांच्या मनात जे आहे तेच फक्त मी इथे व्यक्त करतोय. त्यामुळे आपल्या गुरुंबद्दल ऋण व्यक्त करताना जर माझ्या बालबुद्धीने रचलेली ही वाक्यरचना कुठेही हास्यास्पद वाटली तर तो माझा भक्तिभाव समजावा.
माझ्या लहानपणी फोटोग्राफर म्हणजे कॅमे-यावरचे बटण दाबुन फोटो काढणारी एक सर्वसाधारण व्यक्ती अशीच माझी बालबुद्धी असे. आत्ताआत्ता पर्यंतही ती तशीच होती हे ह्या वर्कशॉप मध्ये मला जाणवले. पण इथे आल्यावर मला एक गोष्ट कळली, ती म्हणजे आपल्याला काय कळत नव्हतं, काय कळलं आणि काय कळायला पाहिजे.
मी स्वतःला फोटोग्राफीच्या जगातील अजुनही रांगतं बाळ असंच समजेन. आत्ताशी कुठे एक-एका गोष्टींची ओळख होतेय. आणि नविन जन्मलेलं बाळ हे काही चालण्याचा क्लास लावत नाही, त्याला वडिलांनी एकदा हाताचा आधार देऊन उभं केलं की त्या चालण्याची मजा वाटायला लागते आणि स्वत:हुन ते उभं राहुन चालायचा प्रयत्न करायला लागतं. उभं राहता यायला लागलं, की मग जिना चढायला बघतं. आणि असंच बघता बघता आयुष्यातली एक-एक पायरी चढत मोठ्ठं होतं. अगदी तसंच; त्याच पित्याच्या भूमिकेतून, फोटोग्राफी ह्या कलाविष्काराची ओळख करून देणा-या आमच्या गुरुंनी हा आधार कायम ठेवण्याचे वचन दिले आहे. कालपासुन ह्या वर्कशॉपला सुरुवात झालीये खरं, आज २० मे रोजी त्याचा शेवटचा दिवस. पण अजुनही मी जेव्हा घरी जाईन, तेव्हा झोपेतही हा वर्कशॉप मला जागृत ठेवेल इतकी ह्याची आठवण ताजी राहणार आहे. आत्ता-आत्तापर्यंत ज्या कॅमे-यामधलं ABCD सुद्धा कळत नव्हतं तो कॅमेराच जणु मला सांगत होता, की तुला PSP शिवाय दुसरा कुठलाही गुरु नाहीये. कारण इथे, फोटोग्राफीचा मुख्य गाभाच असलेल्या ’लाईट’ ह्या घटकावर प्रकाश टाकला गेला आणि इतके दिवस अंधारात असलेल्या माझ्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला; अगदी पुरेपूर पटलं कि आपण कुठे चुकत होतो ते. . . .
डिजीटल फोटोग्राफी मधील ISO, Aperture, Shutter Speed, White Balance, Exposure & Flash Compensation अशा basic गोष्टींबरोबरच perfect composition कसं असावं हे इथेच शिकायला आणि पहायला मिळालं. Every Picture Has a Story, असं जर इथे मानलं तर त्या Story तील कथानकाच्या दिग्दर्शकाचं काम आज आपल्या गुरुंनी केलेलं आहे असं मला वाटतं. डिजीटल फोटोग्राफी ही अथांग समुद्रासारखी आहे. इथे आपण ज्या वस्तुकडे पाहु, त्या एकाच वस्तूचे विविध angle ने आपण अनेक फोटो काढू शकतो. पण, तरीही, कुठल्याही नाटकामध्ये जसं टाईमिंग महत्वाचं असतं तसं इथेही, परफेक्ट टाईमिंग नसेल तर आपण काढलेला फोटो आणि ढग नसलेल्या आकाशाचे चित्र ह्यात काहिही फरक नाही असंच समजावं.
फोटोग्राफी ह्या कलेकडे आणि परिणामी कॅमे-याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा हे इथेच आल्यावर जाणले. आता इथुन पुढे, अगदी वेडींग फोटोग्राफीच नाही पण कुठेही फोटोग्राफी करायची वेळ आली, तर होय, मी आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगु शकतो, कि PSP ने माझ्यासारख्याला’बि’ घडवलंय. ह्या कार्यशाळेतील आपल्या गुरुजनांनी म्हणजेच श्री. देशपांडे, श्री. मानव जैन, श्री. जितेंद्र कोपर्डे आणि श्री. संदीप कपाडिया ह्या सर्वांनी; वेडींग, म्हणजेच "वेड लावणारी" फोटोग्राफी, हा विषय नुसता शिकवलाच नाही पण मनात खोलवर रुजवला, त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. ह्याबरोबरच मला PSP मध्ये येण्यासाठी निमंत्रण देणारे श्री. नावडे सर ह्यांचेही आभार, कारण त्यांनी जर मला PSP मध्ये आणलं नसतं, तर आज हा सोहळा मला अनुभवता आला नसता. तसेच ज्यांच्यामुळे लग्नसराईचं वातावरण हुबेहुब उभं राहिलं त्या दोघाही मॉडेल्सचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हे मनोगत वाचणा-या सर्वांनाच मी असं सांगेन की आपल्याला जर फोटोग्राफीची आवड असेल आणि फोटोग्राफी मधलं खरं ’सिक्रेट’ जाणून घ्यायचे असेल, तर ह्या फोटोग्राफीक सोसायटी ऑफ पुणे मध्ये आवर्जुन सहभागी व्हा.
धन्यवाद
गौरव विजय काकडे
सभासदः THE PHOTOGRAPHIC SOCIETY OF PUNE
संकेतस्थळः http://www.photosocietypune.org
संपर्कः ९९२१३४०७०२
ई-मेलः gaurav@magicwordsent.com
मनोगत छान मांडलय. तुम्हाला
मनोगत छान मांडलय.
तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करा आणि लवकरात लवकर आम्हाला छान छान प्रचि दाखवा
एक शंका, PSP च्या ज्या मान्यवरांची नावे तुम्ही वर घेतली आहेत, ते सगळे किंवा कोणि एक माबेकर आहे का? असल्यास कृपया त्यांचे माबो आय डी सांगाल का?
नमस्कार शापित
नमस्कार शापित गंधर्व,
तुम्हाला मन:पुर्वक धन्यवाद या कौतुकाबद्दल.
वरील मान्यवरांपैकी कुणी मायबोलीचे सभासद आहेत की नाही मला कल्पना नाही. पण जर ते असतील तर त्यांचे माबो आयडी मी जरुर मिळवून देईन. परंतु आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल, तर आपण PSP च्या संकेत स्थळावर म्हणजेच http://www.photosocietypune.org येथे भेट देऊ शकता.
पुन:श्च धन्यवाद,
गौरव काकडे
सभासद: The Photographic Society of Pune
वेबसाईट: www.photosocietypune.org
अवांतर :- FTTI च्या Short
अवांतर :- FTTI च्या Short Courses बद्दल कोणाला माहीती/ अनुभव आहे का ?