--------------------------------------------------------
कशी दाद देऊ मित्रा, तुझा विकासाचा आलेख वेगळा
ऐश्वर्य तुझे सात मजली, तुला गालिच्यांचा लळा
आरसी - ओसी मध्ये तुझी करंगळी खेळते, पण;
त्या तिथे गावी बापास मिळत नाही कोरडा जोंधळा
---------------------------------------------------------
कापला रेशमाच्या सुताने गळा
जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
कापला रेशमाच्या सुताने गळा
घेतला आळ नाही निसर्गावरी
भोगुनी सोसले मी तडाखे-झळा
साथ नाही सुखाचा खरे हे जरी
का तुझ्या वाचुनी मी लुळापांगळा?
राहतो मी कुठे, नेमका कोण मी?
सापडेना खुणा, मी कसा बावळा?
भाग ओसाड का घाम गळतो जिथे?
वाट चुकलाय पैसा-टका आंधळा
झेप घेण्यास तू वेळ लावू नये
मांडला आज आहे इथे सापळा
रंग खात्रीस पक्का, फिका ना पडे
वर्ण भाग्यात माझ्या निळासावळा
मार्ग सारेच धुंडाळतो कैकदा
चालण्याला तरी शोधतो वेगळा
चित्त शाबूत असणे ”अभय" चांगले
पोळलेला जरी भावनांचा मळा
- गंगाधर मुटे
---------------------------------------
साठाळण्याआधि नाठाळलो मी
वयाला नसे सोय मागे वळा !!! .... वैभव वसंतराव कु...
दडली मनात किती ही कॄष्ण्कॄत्ये
परी दिसतो वरुन हा कसा बगळा ! ..... बंडोपंत
बिचार्या शामचा गळाच कापला
सुत निघला भलताच आगळा ..... बंडोपंत
अवांतर - एक विडंबन
मै खंजर तो नही
मगर ये घोरफडी
जबसे मैने तुझको काटा
खंजरी हो गयी....॥
---------------------------------------
<<<< तुमचे प्रतिसाद पाहून
<<<< तुमचे प्रतिसाद पाहून कपाळाला हात लावण्याशिवाय काही उरलेले नाही >>>>>
मला एक वात्रट विद्यार्थी समजून माझ्यात सुधारणा घडवून नाद सोडून द्या. मग तुम्हाला कपाळाला हात लावण्याची गरज भासणार नाही.
वात्रट विद्यार्थी वगैरेचा
वात्रट विद्यार्थी वगैरेचा प्रश्न नाही मुटे, पण शाम यांनी केलेल्या (आमचा कंपू वगैरे नाहीये , सहा सहा महिन्यातून साधा फोनही होत नाही आमचा) (नाहीतर आज नाही पण चार महिन्यांनी मायबोलीवरच लिहाल की मायबोलीवर गझलेत कंपू आहेत्) सुचवण्या खरोखर सुयोग्य आहेत, त्यावर भरीव प्रकारची चर्चा करणे तुम्हाला शक्य असताना तुम्ही उगाच संसर्गजन्य रोगांचा प्रतिसाद देऊन हा धागा चुकीच्या पद्धतीने गाजवण्यास कारणीभूत ठरलात
बेफी, कधीकधी भिकार्याची "भिक
बेफी,
कधीकधी भिकार्याची "भिक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती होते" तव्दतच माझे झाले आहे.
त्यामुळे मी असे म्हणतोय की, मला इतरांसारखी गझलीयतपूर्ण गझल लिहायचीच नसेल, किंवा मी सुधारायला तयारच नसेल तर, इतरांनी मला एक वात्रट विद्यार्थी समजून माझ्यात सुधारणा घडवून नाद सोडून द्यावा.
आणि मला जसे लिहिता येते तसे लिहिण्याचे माझे स्वातंत्र्य अबाधित राहू द्यावे.
ही आजची स्थिती आहे. उद्या कदाचित वेगळी असेल तेव्हा मी येईल ना इतरांकडे मदत मागायला.
यापूर्वीही मी तुम्हाला अनेकदा फोन करून तुमची मदत घेतली आहेच ना? यापुढेही घेईल; पण मला जेव्हा गरज भासेल तेव्हा.
मात्र;
माझ्या रचनेवर टीका करण्याचे, रसग्रहण किंवा समिक्षा करण्याचे, नावडल्यास तसे प्रतिसादात लिहिण्याचे किंवा अनुल्लेखाने मारण्याचे प्रतिसादकांना अधिकार आहेच, ते मला मान्य आहे.
काही काळापुरत्या सुचवण्या तेवढ्या थांबवाव्यात, ही विनंती.
मुटे, आता तुम्ही गंभीर लिहीत
मुटे, आता तुम्ही गंभीर लिहीत आहात म्हणून माझेही म्हणणे रेटून पाहतो
============
संकेतस्थळांवर असलेली 'तत्क्षणी प्रतिसाद' ही सोय एकंदरच खुल्या आणि सकस साहित्यनिर्मीतीला बाधक आहे असे आपले मला वाटते
म्हणजे प्रतिसादच द्यायची सोय नसती तर अनेक वाईट गोष्टी टळल्याच असत्या
पण आता प्रतिसाद देता तर येतात
मग गझलही सुटत नाही त्यातून
मग कोणी आनंदयात्री हा मायबोलीवरील गझलबाबत केल्या गेलेल्या गंभीर उपक्रमातून निर्माण झालेला गझलकार असतो, कोणी बेफिकीर हा सुरेश भट या स्थळावर धडपडत व विचारत विचारत गझल शिकलेला गझलकार असतो तर कोणी शाम हा ग्रामीण विभागात अत्यंत कष्टप्रद व ध्येयवादी जीवन जगताना कोणा निफाडकरांच्या स्नेहबंधातून किंवा त्यावाचूनही निर्माण झालेला गझलकार असतो, तसाच एक मुटेही असतो जो गझल प्रवीण नसला तरीही गझलेबाबत गंभीर तर असतो, पण प्रतिसाद विनयाने घेत नाही
तुम्हाला सुचवण्या नको आहेत आणि त्याच वेळी तुमच्याच एका गझलेखाली तुम्ही 'मला माझा मतला कमजोर वाटत आहे, कोणी कृपया बदल सुचवेल का' असे विचारता. तुम्हाला सुचवण्या नको आहेत पण बेफिकीरच्या एका गझलेच्या मतल्यावर तुम्ही चाळीस प्रतिसाद देऊन तो मतला कसा अयोग्य आहे हे दाखवत इतरांना सुचवण्या देता.
हा दुटप्पीपणा आंतरजालावर आणि तोही या वयात करणे तुम्हाला कसे आवडते हे मला माहीत नाही, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमस्व. पण तुम्हाला सुचवण्या हव्या आहेत की नाहीत याची पाटी तुम्ही गझलेखाली देत नाही ना? काही गझला मला इमेल करून कशा आहेत हे विचारता त्यांच्याहीखाली पाटी नसते आणि ज्या गझलांत तुम्हाला सुचवण्या नको आहेत त्यांच्याहीखाली पाटी नसते
मग प्रतिसादक त्यांना हवे ते स्वातंत्र्य घेणारच ना?
शाम यांनी तुम्हाला केलेल्या सुचवण्या या केवळ तुम्हाला उद्देशून नसून शाम सर्वच गझलांवर अतिशय पटण्यासारख्या सुचवण्या व शंका उपस्थित करतात
त्यांचा प्रत्येक प्रतिसाद मी तरी गंभीरपणे घेतो
तसेच प्रतिसाद घेतले गेले तर चर्चाही मस्तच होईल की? नाही का?
<<माझ्यासाठी माझे कवित्व हा
<<माझ्यासाठी माझे कवित्व हा पोरखेळ किंवा टाईमपास नाही. जशी असेल तशी पण ती माझी अनुभूती आहे.
>> हे वास्तव आहे मुटे जी ,बाकी आपल्यासारख्या दिग्गजांसमोर आम्ही बापुडे काय बोलणार,?
माझ्यासाठी माझे कवित्व हा
माझ्यासाठी माझे कवित्व हा पोरखेळ किंवा टाईमपास नाही..............>>>
इतरांसाठी असतो बहुधा .............?? अगदी अगदी !!
<<< हा दुटप्पीपणा आंतरजालावर
<<< हा दुटप्पीपणा आंतरजालावर आणि तोही या वयात करणे तुम्हाला कसे आवडते हे मला माहीत नाही, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमस्व. >>>
मी वरिल प्रतिसादात चक्क कालदर्शक भाषा वापरली आहे. "ही आजची स्थिती आहे. उद्या कदाचित वेगळी असेल " असेही म्हटले आहे. त्यामुळे याला दुटप्पीपणा म्हणता येत नाही.
या वयात करणे तुम्हाला कसे आवडते? हा प्रश्न म्हणजे स्पष्ट बोलणे नसून तोंडसुख घेणे होय.
भांडू नका रे बेफिकीर यांनी
भांडू नका रे
बेफिकीर यांनी महत्वाचा मुद्दा मांडला. प्रतिसादाची सोय हा. प्रतिसाद देणारा कोणत्या अवस्थेत (मनाच्या) असेल याबद्दल काहीच सांगता येत नाही. अशा वेळी गझल, कथा किंवा इतर साहीत्य लेखक यांनी स्वतःच्या मनाची अशी तयारी करावी कि कुठला प्रतिसाद गंभीरपणे घ्यावा किंवा कुठल्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे हे जमावे. ते जास्त ठीक होईल.
उदा. बरेचदा माझे प्रतिसाद हे दुर्लक्ष करण्यायोग्य किंवा सोडून देण्यासारखे असतात.
मुटे तुम्ही वयाची साठ वर्षे
मुटे तुम्ही वयाची साठ वर्षे पार केली आहात का?
<<< मुटे तुम्ही वयाची साठ
<<< मुटे तुम्ही वयाची साठ वर्षे पार केली आहात का? >>>
का? मी मरायला अजून किती अवकाश आहे, याचे गणित मांडायचे का?
नाही, म्हटले त्याच्या आधीच
नाही, म्हटले त्याच्या आधीच बुद्धी नाठी झाली की काय ते तपासावे म्हणजे आम्हालाही नाद सोडून देता येईल.
(No subject)
(No subject)
बिचार्या शामचा गळाच
बिचार्या शामचा गळाच कापला
सुत निघला भलताच आगळा
साठाळण्याआधि नाठाळलो मी वयाला
साठाळण्याआधि नाठाळलो मी
वयाला नसे सोय मागे वळा !!!
हा शेर या गझलेत अॅड करता येइल का .............मुटे सर ??
बंडोपंत आणि वैवकु
बंडोपंत आणि वैवकु
मुटे सर: कणखर जी : धन्यवाद
मुटे सर::दिवा:
कणखर जी : धन्यवाद
दडली मनात किती ही
दडली मनात किती ही कॄष्ण्कॄत्ये
परी दिसतो वरुन हा कसा बगळा !
थांबलात ?
थांबलात ?
थांबलात
थांबलात ?>>
होय.................. तुम्हालाही सन्धी मिळावी म्हणून !!
बंडोपंत.... मुटे गझलेपेक्षा
बंडोपंत.... मुटे गझलेपेक्षा बरेचसे आडमुठे मुद्दे मांडू लागल्याने माझी भुमिका मांडून थांबलोय.. इतकच.
Pages