--------------------------------------------------------
कशी दाद देऊ मित्रा, तुझा विकासाचा आलेख वेगळा
ऐश्वर्य तुझे सात मजली, तुला गालिच्यांचा लळा
आरसी - ओसी मध्ये तुझी करंगळी खेळते, पण;
त्या तिथे गावी बापास मिळत नाही कोरडा जोंधळा
---------------------------------------------------------
कापला रेशमाच्या सुताने गळा
जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
कापला रेशमाच्या सुताने गळा
घेतला आळ नाही निसर्गावरी
भोगुनी सोसले मी तडाखे-झळा
साथ नाही सुखाचा खरे हे जरी
का तुझ्या वाचुनी मी लुळापांगळा?
राहतो मी कुठे, नेमका कोण मी?
सापडेना खुणा, मी कसा बावळा?
भाग ओसाड का घाम गळतो जिथे?
वाट चुकलाय पैसा-टका आंधळा
झेप घेण्यास तू वेळ लावू नये
मांडला आज आहे इथे सापळा
रंग खात्रीस पक्का, फिका ना पडे
वर्ण भाग्यात माझ्या निळासावळा
मार्ग सारेच धुंडाळतो कैकदा
चालण्याला तरी शोधतो वेगळा
चित्त शाबूत असणे ”अभय" चांगले
पोळलेला जरी भावनांचा मळा
- गंगाधर मुटे
---------------------------------------
साठाळण्याआधि नाठाळलो मी
वयाला नसे सोय मागे वळा !!! .... वैभव वसंतराव कु...
दडली मनात किती ही कॄष्ण्कॄत्ये
परी दिसतो वरुन हा कसा बगळा ! ..... बंडोपंत
बिचार्या शामचा गळाच कापला
सुत निघला भलताच आगळा ..... बंडोपंत
अवांतर - एक विडंबन
मै खंजर तो नही
मगर ये घोरफडी
जबसे मैने तुझको काटा
खंजरी हो गयी....॥
---------------------------------------
बरी आहे नेहमी पेक्षा वेगळ्या
बरी आहे
नेहमी पेक्षा वेगळ्या वृत्तातली आहे
चित्त शाबूत असणे ”अभय"
चित्त शाबूत असणे ”अभय" चांगले
पोळलेला जरी भावनांचा मळा... व्वा
... वेगळे खयाल आवडले
बाकी...
जाणवू ना दिल्या वेदना वा कळा....
कापला रेशमी काळजाने गळा..... .... काळजा ऐवजी दुसरे काही हवे होते
घेतला आळ नाही निसर्गावरी
भोगुनी सोसले मी तडाखे-झळा... भोगणे आणि सोसणे एकच आहे ना?
थंडीचे तडाखे व उन्हाच्या झळा.... अजून स्पष्ट हवे होते
साथ नाही सुखाचा खरे हे जरी........ सोबती ना सुखाचा असे आहे का?.. पोचत नाही
का तुझ्या वाचुनी मी लुळापांगळा?.....
अजून चांगली होऊ शकेल... थिंक वन्स
....................................शाम
शामजी, प्राध्यापक
शामजी,
प्राध्यापक देवपूरकरांच्या रोगाची लागण आजकाल सर्वांनाच झाली आहे काय?
तसा हा रोग संसर्गजन्य आणि लांगटच असतो.
तुम्हाला पण त्याचा संसर्ग झाल्याचे बघून दु:ख झाले.
तुम्ही माझ्यासाठी दु:खी
तुम्ही माझ्यासाठी दु:खी होण्याची अजिबातच आवश्यकता नाही....
आपण रोगाऐवजी गझलेबद्दल बोलले असतात तर बरं वाटलं असतं...
कारण मी एकही पर्यायी शेर वा गझल सुचवलेली नाही.......... मी केवळ मला खटकलेल्या बाबी स्पष्ट केल्या.
आपण त्यावर आपली भुमिका मांडायला हवी होती...
.....................असो, आपले सदविचार समजले
धन्यवाद!!!!
<<<आपण रोगाऐवजी गझलेबद्दल
<<<आपण रोगाऐवजी गझलेबद्दल बोलले असतात तर बरं वाटलं असतं...>>>
जे मला म्हणता येते आणि मांडता येते, ते मी वरिल गझलेत मांडले.
माझ्या कुवतीला झेपेल असे मी लिहितो.
सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकत माझ्या लेखनीत नाहीये.
नाईलाज आहे.
माझ्या कुवतीला झेपेल असे मी
माझ्या कुवतीला झेपेल असे मी लिहितो.
सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकत माझ्या लेखनीत नाहीये.
नाईलाज आहे. >>>>> हम्म्म्म्म !
व्वा chaan
व्वा chaan chaan.....................
रसिक मायबापहो! (एकास
रसिक मायबापहो! (एकास सोडून)
मी माझे, (माझ्या पिंडानुसार) काही खयाल, केवळ आस्वाद घेण्यासाठी, आपल्या चरणी ठेवत आहे! खयालात काही चुका असल्यास माफ करावे!
माझे खयाल खालील प्रमाणे.............
जाणवू ना दिल्या वेदना,ना कळा!
कापला रेशमी आयुधाने गळा!!
दूषणे मी दिली ना निसर्गासही;
सोसले मी उकाडे, उन्हाच्या झळा!
ह्या नको आज कुबड्या सुखांच्या मला!
एवढा मी न झालो लुळापांगळा!!
जाणतो कोण मी, जाणतो कोण तू;
एवढाही नसे मी अरे बावळा!
वेंधळ्यासारखा घाम मी गाळला!
मी कुठे? अन् कुठे दाम तो आंधळा?
झेप घेणार मी! पैज माझी तुझी!
लाव तू कोणताही अरे सापळा!!
सांग जोडी कशी व्हायची आपली?
गौरवर्णीच तू! मी निळासावळा!!
पिंड माझा तुझा वेगळा केवढा!
मार्ग माझा तुझा, यापुढे वेगळा!!
घाम ना शिंपला, शिंपले रक्त मी!
का न बहरायचा? सांग, माझा मळा!!
..............प्रा.सतीश देवपूरकर
झेप घेण्यास तू वेळ लावू
झेप घेण्यास तू वेळ लावू नये
मांडला आज आहे इथे सापळा
मार्ग सारेच धुंडाळतो कैकदा
चालण्याला तरी शोधतो वेगळा>>
चांगले ओरिजिनल शेर
============================
पिंड माझा तुझा वेगळा केवढा!
मार्ग माझा तुझा, यापुढे वेगळा!!
>>
चांगला पर्यायी शेर
===========================
हल्ली प्रत्येक गझलेवर दोनवेळा स्वतंत्र दाद द्यावी लागते
(No subject)
गंगाधरराव! आपणास माझ्यामुळे
गंगाधरराव! आपणास माझ्यामुळे जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आपली क्षमा मागतो. मला माझी चूक उमगली आहे. यापुढे मी आपल्याच काय कुणाच्याही गझलेवर माझे खयाल वा पर्यायी शेर देणार नाही, अशी मी आपणास खात्री देतो. पुन्हा एकदा आपली माफी मागतो व माझ्या हातून अशी चूक परत कधी घडणार नाही असे आश्वासन देतो.
बेफिरजी, कैलासराव, कणखरजी, द्न्यानेशजी, वैभव कुलकर्णीजी, वैभव फाटकजी, आनंदयात्रीजी आणि इतर तमाम मायबोलिकरांनो.....................
माझ्या प्रतिसादांमुळे आपणास जो मनस्ताप झाला त्याबद्दल आपणा सर्वांची मी जाहीर माफी मागतो! माझ्यामुळे जे कुणी दुखावले गेलेत त्या सगळ्यांची मी माफी मागतो. पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही.
टीप: माझ्या दृष्टीने प्रत्येक गझल व प्रत्येक गझलकार दोन्ही सन्मान्य व जिव्हाळ्याचे आहेत, माझ्या हातून कुणाचाच आता उपमर्द होणार नाही, कारण मला आपल्या सर्वच गझलकारांची सोबत हवी आहे!
.............प्रा.सतीश देवपूरकर
देरसे आये दुरुस्त आये......
देरसे आये दुरुस्त आये......:फिदी:
क्या ब्बात देवसर.!!!...आमच्या
क्या ब्बात देवसर.!!!...आमच्या तमाम गझलप्रेमिंच्या मनातली गोष्ट आपल्या ओठात आल्याबद्दल आपले अभिनंदन..... लागेल तसे आपले मार्गदर्शन घेऊच....
स्नेह असावा........शाम
बेफिरजी, कैलासराव, कणखरजी,
बेफिरजी, कैलासराव, कणखरजी, द्न्यानेशजी, वैभव कुलकर्णीजी, वैभव फाटकजी, आनंदयात्रीजी आणि इतर तमाम मायबोलिकरांनो.....................
माझ्या प्रतिसादांमुळे आपणास जो मनस्ताप झाला त्याबद्दल आपणा सर्वांची मी जाहीर माफी मागतो! माझ्यामुळे जे कुणी दुखावले गेलेत त्या सगळ्यांची मी माफी मागतो. पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही.
टीप: माझ्या दृष्टीने प्रत्येक गझल व प्रत्येक गझलकार दोन्ही सन्मान्य व जिव्हाळ्याचे आहेत, माझ्या हातून कुणाचाच आता उपमर्द होणार नाही, कारण मला आपल्या सर्वच गझलकारांची सोबत हवी आहे!>>>>>
काय बोलता राव प्रोफेसर साहेब, अहो आपण जुने जाणते आहात, थोडीशी गंमत येथे सगळेच करत असतात, आपल्याबद्दल व आपल्या गझल जाणिवेबद्दल व अनुभवाबद्दल येथे आम्हा सर्वांनाच आदर आहे
असे काही बोलू नका, मायबोलीवरील गझलेला आपल्या गझलेमुळे व अनुभवामुळे आणखीन झळाळी मिळो अशी प्रार्थना
आपला लहान मित्र
-'बेफिकीर'!
(No subject)
<<<<<< गंगाधरराव! आपणास
<<<<<< गंगाधरराव! आपणास माझ्यामुळे जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आपली क्षमा मागतो. मला माझी चूक उमगली आहे. यापुढे मी आपल्याच काय कुणाच्याही गझलेवर माझे खयाल वा पर्यायी शेर देणार नाही, अशी मी आपणास खात्री देतो. पुन्हा एकदा आपली माफी मागतो व माझ्या हातून अशी चूक परत कधी घडणार नाही असे आश्वासन देतो. >>>>>>>
--------------------------------------------------------
सतिशराव,
आपण घेतलेल्या नव्या भुमिकेचे मी मनापासून स्वागत करतो. चुका आणि मनस्ताप हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. ते कोणालाच सुटले नाही, सुटणार नाही. मात्र हे क्षणिक असतात कायमस्वरूपी असत नाही, ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब.
तुमच्या दृष्टीने प्रत्येक गझल व प्रत्येक गझलकार दोन्ही सन्मान्य व जिव्हाळ्याचे होते, या बाबत माझ्या मनात तेव्हाही शंका नव्हती आणि आजही नाही.
माझा मुळ आक्षेप काय होता, हे मी तुम्हाला सांगतो.
प्रत्येक कविता लिहिणारा मनुष्य आणि त्याचे उद्देश सारखेच नसतात. इथे मी इतरांविषयी लिहित नाही केवळ स्वतःविषयी लिहितो.
मी स्वतःविषयी जेव्हा विचार करतो, तेव्हा मला स्पष्टपणे जाणवते की मी प्रथम प्रचारक/सुधारक आहे. त्यानंतर कवी/गझलकार/लेखक आहे. अर्थात जेव्हा प्राथमिकतेचा विचार येतो तेव्हा माझी प्राथमिकता आपले विचार प्रकटीत करणे ही असते. गझलेचा विकास/गझलियत/सौंदर्य हे मग माझ्यासाठी दुय्यम ठरतात. माझ्या कविता / गझल प्रचारकी थाटाच्या असतात, असा जो आरोप माझ्यावर केला जातो, तो शब्दशः खरा आहे आणि तेच माझे उद्दीष्ट आहे.
समाजात सुधारणा होण्यात जर माझा काही हातभार लागणार असेल तर त्यातून मला जो आनंद मिळेल, तेवढा आनंद मी सर्वश्रेष्ठ गझलकार/कवी झाल्याने मला मिळणार नाही. त्यामुळे कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ या वादात मला अजिबात रस नाही.
मी लिहिली ती कविता की गझल की रचना हे प्रश्न माझ्या हिशेबाने दुय्यम असून मला जे म्हणावयाचे होते ते शब्दात उतरले किंवा नाही हे माझ्यासाठी अधिक महत्वाचे आहे.
आणि मग नेमके येथेच आशय आणि सौंदर्य यांच्यात व्दंद सुरू होते.
उदा. माझी मुळ गझल आणि तुमची पर्यायी गझल.
माझी गझल आशयसंपन्न आहे तर तुमची पर्यायी गझल सौंदर्यसंपन्न.
माझा भर आशयावर तर तुमचा भर कारागिरीवर.
माझ्या मुळ गझलेच्या आशयघनतेच्या तुलनेत तुमची पर्यायी गझल पासंगालाही पुरत नाही.
हे तुम्हाला कळणे कठीण जाते कारण तुम्ही या दृष्टीने कधी विचारच केलेला नसतो.
सौंदर्य कुणालाही कळते पण; आशयाची गहनता कळायला त्या-त्या विषयाचा अभ्यास लागतो, अनुभव लागतो आणि अनुभूतीही लागते.
त्यामुळेच मी मांडलेल्या विषयाची कुणी केलेली विदृपता मी सहन करू शकत नाही, मान्य करू शकत नाही.
माझ्या रचनांचे आतापर्यंत अनेकवेळा विडंबन केले गेले. ते मला भावले कारण त्यांनी विडंबनात हाताळलेले विषय वेगळे होते. त्या रचना स्वतंत्र होत्या. त्यामुळे माझ्या मुळ रचनेला धक्का लागलेला नव्हता.
माझ्यासाठी माझे कवित्व हा पोरखेळ किंवा टाईमपास नाही. जशी असेल तशी पण ती माझी अनुभूती आहे.
असो.
तुमचा मला रागच आला नाही त्यामुळे क्षमा वगैरे शब्द गैरलागू ठरावेत.
मतल्यात बदल केला आहे.
मतल्यात बदल केला आहे.
रेशमाच्या सुताने याचा अर्थ
रेशमाच्या सुताने याचा अर्थ रेशमा नावाच्या स्त्रीच्या मुलाने असाही होतो.
जाणवू ना दिल्या वेदना ना
जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
कापला रेशमाच्या सुताने गळा >> आवडला!
मतला फारच चपखल वापरला आहे तुम्हि मुटेजी... प्राध्यापक सरांचा वरील प्रतीसाद तुम्हाला माहित होता वाट्ट आधीच! कापला रेशमाच्या सुताने गळा वगैरे
चुभुद्याघ्या.. धन्यवाद!
रेशमाच्या सुताने याचा अर्थ
रेशमाच्या सुताने याचा अर्थ रेशमा नावाच्या स्त्रीच्या मुलाने असाही होतो.>>>>>>:G
Kiran.. आपल्या सौन्दर्यबोधास सलाम!!
(No subject)
<<<< बेफ़िकीर | 21 May, 2012
<<<< बेफ़िकीर | 21 May, 2012 - 18:51
>>>>>
अहो, कशाबद्दल हसलाय, ते तर कळू द्या.
गंगाधर अपेक्षेप्रमाणे हलकेच
गंगाधर
अपेक्षेप्रमाणे हलकेच घेतलंय. व्हेरी गुड
>>"टीप: माझ्या दृष्टीने
>>"टीप: माझ्या दृष्टीने प्रत्येक गझल व प्रत्येक गझलकार दोन्ही सन्मान्य व जिव्हाळ्याचे आहेत, माझ्या हातून कुणाचाच आता उपमर्द होणार नाही, कारण मला आपल्या सर्वच गझलकारांची सोबत हवी आहे!
.............प्रा.सतीश देवपूरकर"
आ.देवपुरकर सर , आपली ही नवी भूमिका आपल्या अलवार मनाचे प्रतिबिंब आहे . आपण ,बेफिकीरजी ...... आपला अभ्यास नमसकरणीय आहे . काय होतो ना ,की अभ्यासामुळे एक प्रकारची तपस्विता येते. तपस्वितेमुळे तेजस्विता येते . अभ्यासातून आलेल्या तपाला आणि तेजाला एक प्रकारचा दाह आणि उष्मा असतो . क्रिये-प्रतीक्रिएतून तो जाणवतो . ताप आणि तेजाचा परिणाम म्हणजे हा दाह असतो . चटका कोणालाच नको असतो मात्र ऊब आणि गारवा सर्वांनाच हवा असतो . अशावेळी विद्वानाने तप आणि तेज कायम ठेऊन त्यातून निर्माण होणारा उष्मा ,दाह पुरेशा इतक्या तापमानात रूपांतरित करण्याची किमया साधून घ्यायला हवी . सूर्याने आपला ताप आणि तेज चंद्राच्या रूपाने (शीतल आणि गार ) रूपांतरित करून घेतली तशी. हा तसा त्रासच आहे . पण त्याचा फायदा इतरांना होतो. लवचिक भूमिका घेऊन सांगितलेले स्वीकारायला (बहुदा )सर्वचजण तयार असतात. ज्ञानोबा माऊलींच्या शब्दात ही लवचिकता " का बालक बोबडा बोली l की वाकुडा विचुका पाऊली l ते चोज करुनी माऊली l रिझावि जेवी ll " अशी असते .
आपली भूमिका ही आता अशी आहे . तडजोड म्हणून नक्कीच ही भूमिका नसावी . याची मला खात्री आहे . मी आपल्या या पितृ भूमिकेतून मातृ भूमिकेत केलेल्या प्रवेशाचे मन:पूर्वक स्वागत कर्तो . अशी मातृ भूमिका न घेतल्यास एक धोका संभवतो . माऊली म्हणतात " देखा नवल अहंकाराचे गोठी l विशेष न लगे अज्ञानाचे पाठी l सज्ञानाचे झोंबे कंठी l नाना संकटे नाचवि ll " या पार्श्वभूमीवर आपली भूमिका आपल्या निखळ मोठेपणाचा परिचय देणारी आहे . आता आपण सांगितलेल्या सूचना व मार्गदर्शन थेट हृदयात जाईल .आणि विधायक बदलांच्या रूपाने तरारून येईल यात शंकाच नाही .
आपण पर्यायी शेर सुचविणे बंद करू नये असं माझं व्यक्तीगत मत आहे . त्यामुळे तंत्रशुद्धता कळण्यास मदत होते . तेव्हा टोकाची भूमिका घेऊ नये ही विनंती .
ता.क. - आपल्या नव्या भूमिकेविषयी माझी मन:पूर्वक भावना व्यक्त केली . अन्यथा न घ्यावी ही विनंती .
" अहो आपण जुने जाणते आहात, थोडीशी गंमत येथे सगळेच करत असतात, आपल्याबद्दल व आपल्या गझल जाणिवेबद्दल व अनुभवाबद्दल येथे आम्हा सर्वांनाच आदर आहे
असे काही बोलू नका, मायबोलीवरील गझलेला आपल्या गझलेमुळे व अनुभवामुळे आणखीन झळाळी मिळो अशी प्रार्थना
आपला लहान मित्र
-'बेफिकीर'!">>>>>>>>शतश: अनुमोदन
मतल्यात बदल केला आहे. >>>>>
मतल्यात बदल केला आहे. >>>>>
मी तुम्हाला कापला रेशमी काळजाने गळा..... .... काळजा ऐवजी दुसरे काही हवे होते असा प्रतिसाद दिल्यानंतर ...
मला काहीतरी रोग झाला आहे या निष्कर्षावर येऊन आपण पुढे...
मला जे म्हणावयाचे होते ते शब्दात उतरले किंवा नाही हे माझ्यासाठी अधिक महत्वाचे आहे.
असेही म्हणालात .... मग जर ते एकदा शब्दात उतरलेच होते तर आता बदलणे का आवश्यक वाटले....??
त्यामुळेच मी मांडलेल्या विषयाची कुणी केलेली विदृपता मी सहन करू शकत नाही
असे स्वतःच म्हणून स्वतःचाच शेर किती विदृप केलात पहा ना!!
जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
कापला रेशमाच्या सुताने गळा....... प्रथम वाचनात एक खूनी आपल्या गुन्ह्या बद्दल बोलतोय असेच वाटतेय....
मीच योग्य ते सांगितले होते असे माझे म्हणणे नाही आहे मात्र आपण आपल्या भूमिकेशी ठाम राहत नाहीत असेच यातून सुचित होते... त्यामुळे समाजात प्रचारक/सुधारक होण्याआधी या बाबीवर काही विचार करता आला तर पहा......
!!!!!
शामजी, तुम्ही एक नव्हे ५ बदल
शामजी,
तुम्ही एक नव्हे ५ बदल सुचवले होते.
सतिशरावांनी चक्क ५० बदल सुचवले होते. आणखी काही पाहुण्यांचे आगमन लांबलेले दिसते, नाही तर हा आकडा १०० पेक्षाही जास्त होणे कठीण नव्हते.
एखाद्याला मार्गदर्शन करणे आणि काही लोकांनी एकत्र मिळून असे एखाद्यावर तुटून पडणे या दोनवेगवेगळ्या गोष्टी आहेत.
एखाद्या रचनेवर आवडल्या/नावडल्याच्या प्रतिक्रियेपेक्षा अवांतर चर्चा करून त्या रचनेचे बारा वाजवणे माबोवर आता सर्रास झालेले दिसत आहे. (हे केवळ माझ्याच बाबतीत नव्हे तर बर्याच निवडक कवींबाबत घडतांना दिसत आहे.)
हा प्रकार थांबणे शक्य नसले तरी नियंत्रणात येणे गरजेचे आहे.
काही काळपर्यंत तरी आपण अशा सुचवण्या एकमेकांना विपू किंवा मेलच्या माध्यमातून करणे फारसे कठीण नाही.
जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
कापला रेशमाच्या सुताने गळा.
याचा तुम्ही आणि किरण यांनी काढलेला अर्थ अगदी बरोबर आहे.
एखाद्याला मार्गदर्शन करणे आणि
एखाद्याला मार्गदर्शन करणे आणि काही लोकांनी एकत्र मिळून असे एखाद्यावर तुटून पडणे या दोनवेगवेगळ्या गोष्टी आहेत.>>>
एखाद्या रचनेवर आवडल्या/नावडल्याच्या प्रतिक्रियेपेक्षा अवांतर चर्चा करून त्या रचनेचे बारा वाजवणे माबोवर आता सर्रास झालेले दिसत आहे. (हे केवळ माझ्याच बाबतीत नव्हे तर बर्याच निवडक कवींबाबत घडतांना दिसत आहे.)>>>>
हा प्रकार थांबणे शक्य नसले तरी नियंत्रणात येणे गरजेचे आहे.>>>
बेफी, वरील तीन वाक्याचे ३
बेफी,
वरील तीन वाक्याचे ३ शेर बनवायचा विचार होता.
पण तुम्ही शेर म्हटल्यावर त्यातील आशय शोधण्यापेक्षा गझलीयत शोधत बसले असते. आणि मग तुम्हाला कशाचंच काही समजलं नसतं.
म्हणून गद्यात लिहिलं. चला एकदाचा तुम्हाला अर्थ तर कळला.
मुटे, तुमचे प्रतिसाद पाहून
मुटे,
तुमचे प्रतिसाद पाहून कपाळाला हात लावण्याशिवाय काही उरलेले नाही
एखाद्या रचनेवर
एखाद्या रचनेवर आवडल्या/नावडल्याच्या प्रतिक्रियेपेक्षा अवांतर चर्चा करून त्या रचनेचे बारा वाजवणे माबोवर आता सर्रास झालेले दिसत आहे. >>>> तुम्ही सुद्धा तेच करत आहात..
तुम्ही एक नव्हे ५ बदल सुचवले होते..... >>>>
मी फक्त ना ऐवजी वा कोट केला होता ... हा एक बदल वगळता बा़की सुचना वा शंका होत्या.. आणी असे मी माबो. वर लिहणार्या सगळ्यांनाच प्रतिसादीत करत असतो.
हे केवळ तुमच्याकडून चांगली गझल यावी यासाठी होते .... बाकी कोणी विपु करावी की मेल हा ज्याचा त्याचा प्रश्न..
Pages