Submitted by संयोजक on 11 September, 2008 - 22:35
नियमः
१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहिता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात.
४) विजेत्याची घोषणा जनमत पद्धतीने (पोलिंग) होइल!
आजचे चित्रः
लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पदकतक्त्य
पदकतक्त्यात शोधतोय भारत
हातात घेउन जाडजुड भिंग...
आशियाई स्पर्धेत आपला तोरा
ऑलिंपिकला फुटते बिंग...
पदकतालिके
पदकतालिकेत यंदा भारत
अगदीच काय तळाशी नाय...
भिंग लावुन बघतो जरा
च्यायला ह्यो भास का काय ...
माझ्याकडे
माझ्याकडे एक गोळा
ह्यांच्याकडे पाच?
चिन्यांच्या धररतीवर
भारतीयांची टाच.
एकात एक
एकात एक गुंतलेल्या
आहेत पाच रिंग
आयला नेम लागला
सर केलं बिजिंग
वा वा!
वा वा! सत्यजीत...
बर झाल आलास!... मला वाटल माझ्या चारोळ्यांची बिनविरोध निवड होतीय का काय?
एकात एक
एकात एक पाच रिंग
हातात घेउन बघतोय भिंग
भारताच्या विजयाचे शिंग
ऐकेल का हो यंदा बिजिंग?
मानवजातीच
मानवजातीची वर्तुळं अशी एकमेकांत गुंफलेली आहेत
जागतिकीकरणाच्या लाटेत देशांच्या सीमा पुसल्या आहेत..
चीन, अमेरिकेच्या पदकांप्रमाणेच आपल्या तीन पदकांना मानलं पाहिजे
तसंच 'हेल्लो', 'नमस्ते' बरोबर आता 'नी हाओ' सुद्धा आलं पाहिजे
मायबोली
मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.
मायबोली गणेशोत्सव २००८