DEVIL RETURNS
जिज्ञासा मानसाचा सर्वात मोठा गुण व प्रत्येक संशोधनाच मुळ .बंद दरवाजामागे काय ? हे विश्व निर्माण झाले तरी कसे ? असे केल्याने काय होइल ? तसे असल्यास काय होइल ? या व अशा अनेक प्रश्नादाखल सुरु होतो एक प्रयत्न उत्तर शोधन्याचा प्रयत्न ज्याला आपण म्हनतो संशोधन ज्याच्या अंति भेटते एक वस्तु जे एक तर उत्तर आहे वा अजुन एक प्रश्न.
परंतु प्रत्येक वस्तुच्या दोन बाजु असतात एक तर चांगली अथवा वाईट. जिज्ञासेने आज आपल्याला हा आधुनिक समाज तर दिला पण याच जिज्ञासेमुळे बरेचदा मोठ्या संकटाचा सामना सुध्दा करावा लागला. डॉ रावांच्या जिज्ञासेने निर्माण झालेल्या या औषधीच भविष्य आता काय निघेल .
London
डॉ रांवाना इथे येउन जवळ जवळ सहा महिने लोटली. या सहा महीन्यात त्यांच्या जिवनात बर्याच घडामोडी घडल्या
त्या सर्व त्यांना एका सुख सप्नासारख्या भासत होत्या. त्यांचे इथे येणे हजारा पेक्षा अधिक शास्त्रज्ञांसमोर त्यांच झालेल भव्यदीव्य स्वागत सर्व गोष्टी त्यांन सुखावून जात होत्या .एखाद्या राजा प्रमाणे त्यांना ठेवल जात होत त्यांचा प्रत्येक आदेश मानायला असीस्टंटची फौज उभी होती. इतकच काय तर त्यांच्या संशोधनासाठी त्यांना विशेष लॅब पुरवन्यात आली होती. आज त्यांच्यासाठी फार विशेष दीवस होता कारण आज त्यांच्या औषधीचे भविष्य ठरनार होते. प्राण्यांवर झालेल्या तब्बल १५०० यशस्वी चाचण्यांनंतर त्यांची औषध मानसांवर वापरन्यात आली होति.आज त्याचाच रीझल्ट येनार होता येवढ्या यशानंतरही मनात थोडी धाकधुक होतीच कारण एक चुक त्यांच्या जिवनभराच्या कर्तुत्वावर डाग लावायला पुरेशी होती. हॉटेलच्या आपल्या खोलीत बसुन ते या सर्वाचाच विचार करीत असतांना फोनची बेल वाजली.
''हैलो डॉ राव ''
''हो हो मीच बोलतोय ''
''मी लॅब मधुन जेम्स बोलतोय मानसांवर झालेल्या चाचण्यांचे रीझल्ट आलेत ''
''काय इतक्या लवकर आलेसुध्दा ''
''होय''
''चाचण्यांचे रीझल्ट कसे आहेत''
''कसे नाही आहेत ते विचारा डॉ राव औषधींनी तर गह्जब उडाला आपल्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यात कोनत्याही परिस्थीतित औषधीने १०० टक्के रीस्पॉन्स नोंदवलाय''
''ही तर आनंदाची बाब आहे''
''हे तर काहीच नाही डॉ राव आपल्या प्रयोगाची दखल खुद्द foxtrot medicine limited ने घेतली असुन त्याचे अध्यक्ष तुम्हाला पर्सनली भेटू इच्छीतात बहुदा तुम्हाला काही वेळाने त्यांचा कॉल येइलच ''
जेम्सच्या म्हणन्यानुसार डॉ रावांना foxtrot कंपनीचा कंफरमेशन कॉल आला. कंपनीचे अध्यक्ष त्यांना भेटण्यासाठी फार आतुर होते त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळीच त्यांची मिटींग ठरली होती.आत डॉ रावांना स्वर्ग फक्त दोनच बोट उरले होते .एक तर त्यांच्या संशोधनामुळे त्यांचे नाव एवढ्या मोठ्या संशोधन संस्थेशी जुळ्ले आणि ते ही काही कमी नव्हते तर आता एवढ्या मोठ्या कंपनीशी त्यांचे व्यावासायिक संबंध निर्माण होनार होते. देवाने तर छप्पर फाडूनच कृपा केली होती आता त्यांना गरज होति ती फक्त उद्याच्या भेटीची जे लवकरच त्यांच्या व त्यांच्या औषधीच भविष्य ठरवणार होति.
ठरल्याप्रमाने दुसरा दीवस उजाडला सकळीच त्यांना घेण्यासठी कंपनिने स्वताहुन चमचमती limousine कार पाठवली होती .त्यात बसतांना तर त्याच ह्रुदय भरुन वाहत होत आज त्यांना स्वताच्या कर्तुत्वाचा येवढा गर्व वाटत होता की त्याना त्यांच रक्त हजार लीटर वाढल्या सारख भासल . अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर गाडी इप्सित स्थळी पोहचली ड्रायवरच्या म्हनन्यानुसार तो कंपनीच्या अध्यक्षांच्या घरी नेतोय .पण हे घर कसल वाडा होता वाडा एक जुन्या इंग्लिश राजवाड्यासारखा दिव्य भव्य पार डोळे दीपुन जाइल येवढा भव्य .नाव त्याच्या पेक्षा ही भारी काय म्हणे phantom high काय हे अमीर लोक आणि काय त्यांचे शौक .सोळा दरवाजे आणि एक किलोमीटर (त्यांच्यामते) चालता प्रवास केल्यानंतर त्यांना मीटिंग रुमपर्यंत पोहचवण्यात आल तेव्हा त्यांना या घरात राहण्यार्याची चांगलीच कीव आली. मीटींग हॉल चांगलाच भव्य होता तर्हे तर्हेच्या वस्तुंनि भरला होता वस्तुही काही कमी नव्हत्या तर खास देश विदेशातुन आणलेले महागडे sculpture होते. ते निरखत असतांना त्यांची नजर मध्यभागी असलेल्या भिंतीवरील चित्रावर गेली चित्र फार सुंदर होते पण जर मन लावुन पाहल्यास त्यात हिरव्या रंगाचा H आकार त्यांना आढळला .ते पहात असतांनाच कोणीतरी त्यांना मागुन आवाज दिला व त्यांनि मागे वळुन पाहिले ''हैलो डॉ राव मी नेक्सल हॉबर या वाड्याचा मालक व आपला सर्वात मोठा फॅन ''
त्यांच्या समोर सहा फुटाचा एक धिप्पाड ग्रुहस्थ उभा होता .अंगावर उची वस्त्रे चेहर्यावर आनंदी भाव पाहुनच एक चांगले व्यक्तिमत्व वाटत होते. आपली एवढी प्रशंसा एकुन ते जरा भारावलेच आणि हार्बर नाव एकुन जरा चक्रावलेच
'' हॉबर ? म्हणजे हॉबर मेडीसीन रीसर्च सेंटरचे तुम्ही मालक आहात का ? ''
''नाही नाही ते मेडीसीन रीसर्च सेंटर माझे आप्पाजी सर लुसिफर हॉबर यांनि स्थापन केल पण आता ते स्वतंत्र आहे गरज पडल्यास आमचा सपोर्ट त्यांना सदैव असतो ''
''अच्छा ''
''काहि पण म्हणा डॉ राव you did very good job you are miracle man''
''काहितरीच काय''
''नाहि डॉ राव तुम्ही या प्रशंसेचे पात्र आहात तुमची मेडीसिन कमाल आहे. जी वर्षांपासुन कोमात गेलेल्या पेशंटला काही मीनटातच उठवते इतकच नव्हे तर डोक्याच्या मेलेल्या पेशी व कधी न भरणार्या जखमासुध्दा भरते याला
miracle नाही म्हनावे तर काय म्हनावे तुम्हाला याचि प्रेरणा कोठुन मिळाली''
''काहि निसर्गातुन व काही पुराणातुन''
'' निसर्गातुन ? मी समजलो नाही''
'' या जगात काही प्राणि असे आहे जे वातावरनाचा बिंदू खाली घसरल्यावर वा वाढल्यावर निष्क्रिय होतात जसे की अस्वले , बेडूक इत्यादी त्या प्रोसेसला शीतनिष्क्रियता अथवा शितनिंद्रा म्हनतात. हे प्राणि स्वताला या काळात जगवु शकेल एवढी च्ररबी जमा करतात .या काळात त्यांचा मेंदु पुर्णपने झोपल्या अवस्थेत असतो पण त्यांच्या मेंदुमध्ये एक नैसर्गिक घड्याळ असते जी त्यांना शीतनिष्क्रियतेचा काळ झाल्यावर जागन्यास मद्त करते. हि एक प्रकारची नैसर्गिक रासायनिक प्रक्रिया आहे जी ठराविक काळानंतर घडते . याचा उपयोग कोमात गेलेल्या पेशंटसाठी होउ शकेल काय? असा विचार मला आला त्यामुळे मी त्याच्यावर अभ्यास सुरु केला .तसेच पुराणात एक दोन वेळा शितनिंद्रे बद्द्ल एकुन होतो त्यामुळे मी त्याचा ही उपयोग केला दोन्ही ज्ञानाच एकत्रीकरण करुन मला जे मिळाल ते मी आताच्या ज्ञानाच्या साच्यात बसवल हे काम इतक सोप नव्ह्त त्यामुळे याने तब्बल तिस वर्ष घेतली ''
''wow its amezing तुमच्या कामाला व तुमच्या जिद्दीला माझा salute आहे मला व माझ्या कंपनीला आनंद होइल
जर तुम्ही आमच्यासोबत मिळुन या औषधीची व्यावसायिक स्तरावर उत्पादन करुन मानव जातिसाठी एक नविन भविष्य निर्माण करायला मदत कराल''
''नक्किच हे तर माझ सौभाग्य आहे''
''पण डॉ राव कंपनी पॉलीसि नुसार कॉन्ट्रॅक्ट सही करण्याआधी तुम्हाला कंपनीच्या research and development department समोर या औषधीचा एक नमुना बनवुन आम्ही दिलेल्या केस वर treatment करावी लागेल प्रयोग यशस्वी होताच कॉन्ट्रॅक्ट तुमच्या हाती राहील होप यु हॅव नो प्रॉब्लम''
''नो प्रॉब्लम''
काही दिवसातच डॉ रावांना कंपनीच्या खाजगी लॅब मध्ये आणन्यात आल. चार दीवसाच्या अथक मेहनीति नंतर त्यांनि research and development department समोर औषधीच पुन्हा निर्माण केल. ते आता त्यांना प्रोग्रेस
रीपोर्ट देउन बाहेर निघतच होते तेव्हा त्यांना रस्त्यात नेक्सल हॉबर भेटले.
''गुड मॉर्निंग डॉ राव कसे आहात ? आपण मला विसरलात तर नाहीत''
''नाही नाही चीफ आपल्याला विसरण कस शक्य आहे''
'' डॉ राव कृपया मला चीफ म्हनु नका ते मला बाकी कर्मचारी म्हनतात तुम्ही तर माझे मित्र आहात म्हनुनच मी तुम्हाला या रम्य सकाळी चहा पिन्यासाठी invite करायला आलो hope you are not busy''
''आता मी busy नाही औषध तयार झाली आहे त्यामुळे मी चहा पिन्यासाठी नक्किच येउ शकतो''
डॉ राव नेक्सल सहीत त्याच्या कॅबीन मध्ये जातात कॅबीन फार प्रशस्त होत . नेक्सलचा बटलर येउन चहा सर्व करुन जातो ''तर डॉ राव तुम्ही चाचणी द्यायला तयार आहात का? तुमची तयारी कशी आहे ? ''
''फिकर नका करु नेक्सल माझी सर्व तयारी झाली आहे मी केस स्टडी केला आहे थोडा difficult होता पण चिंतेची
काही बाब नाही'' एवढ बोलुन त्यांनि चहाचा एक घुट घेताच त्यांना कडवट चव लागली
''डॉ राव तुम्हाला चहाची चव आवडली नाही का ?''
''तस काही नाही ''
'''डॉ राव हा कंपनिचा नविन प्रोडक्ट आहे खास हृदयरोग असनार्या व्यक्तिंसाठी ''
''तुम्हाला माझ्या हृदयरोगा बद्दल कस माहीती झाल ?''
''आम्हाला आमच्या लो़कांबद्दल संपुर्ण माहीती असते डॉ राव ''
संभाषण चालु असतांना मधातच नेक्सलची सेक्रेटरी धावतच केबीन मध्ये येते ''sorry to interrupt you sir अर्जंट
कॉल आहे '' ''सॉरी डॉ राव कॉल आहे मी थोड्यावेळात येतोच तोपर्यंत आपण चहा एन्जॉय करावा'' एवढे बोलुन
नेक्सल निघुन जातो डॉ राव आता पुन्हा विचारात गढुन जातात. आता त्यांच्या सप्नपुर्ततेत काहीच वेळ शिल्लक राहीला होता तितक्यात त्यांनि मनगटी घड्याळीत वेळ पाहण्यासाठी हात पुढे केला हि घड्याळ त्यांना फार प्रिय होती रामनाथाने त्यांच्या वाढदीवसाला त्यांना दीली होती. तितक्यातच त्यांच्या डोक्यात विज चमकली
''रामनाथ मी तर त्याच्या बद्दल साफ विसरलोच कामाच्या तानात त्याच्याकडे लक्षच राहिले नाही त्याला माझ्या इथे येण्याबद्द्ल मी त्याला काहीच कळ्वल नव्हत त्याला फोन करावे लागेल आधीच फार उशीर झालाय ''
हा विचार करुन डॉ राव डेक्स वर असलेलाच फोन उचलतात पण फोन आधीच लाइन वर होता त्यामुळे ते फोन ठेवनारच तितक्यात त्यांना स्वताचे नाव एकु आले व त्यांनि फोन कानाला लावला
''डॉ रावांना इथे का आणले आहे नेक्सल ''
''सर औषध तयार करण्यासाठी ''
'' औषध बाकी लॅब मध्ये सुध्दा तयार करता आली असती इथे आणन्याची गरज नव्हती ''
''पण सर प्रश्न लॉर्डचा होता त्यामुळे औषध स्वताहाच्या अंडर ऑबजरवेशन मध्ये बनवुन घेतली''
''ठीक आहे पण डॉ राव चे काय करण्याचा विचार केला आहेस ''
'' त्याची चिंता करु नका सर मी त्याच्या चहात poison टाकलय थोड्याच वेळात तो स्वर्गवारी करत असेल ''
हे एकुन डॉ राव चांगलेच घाबरुन जातात व घाबरतच फोन ठेउन पळण्याचा प्रयत्न करतात इथे फोन वर असलेल्या
नेक्सलला फोन ठेवण्याचा आवाज एकु येतो तो रागातच त्याच्या सेक्रेटरीकडे बघुन विचारतो '' फोन कॅबीन मध्ये
लाइन वर केला होता का ?'' सेक्रेटरी घाबरुनच ''चुकीने झाला असेल सर माफ करा'' नेक्सल रागाने अजुन लालबुंद होतो '' चुकीची शिक्षा एकच म्रुत्यु '' हे बोलुन तो कोटातुन बंदुक काढतो व एका पाठोपाठ चार गोळ्या झाडतो
त्यातच तिचा म्रुत्यु होतो व धावतच केबीन कडे धावतो इकडे डॉ राव केबीनचा दरवाजा उघडतात. पण समोरच द्रुश्य पाहुन त्यांचे पाय गळुन पडतात कारण खुद्द नेक्सल बंदुक घेउन त्यांच्यासमोर उभा असतो.
''हैलो डॉ राव पळण्याचा प्रयत्न करत होता का?''
''का मारताय मला काय मिळेल तुम्हाला ?पण लक्षात ठेवा मी जर मेलो तर तुम्हाला महागात पडेल माझे लोक
मला नक्की शोधतिल ''
''कोन तुमचा तो असीस्टंट तो तर केव्हाच वर गेलाय आता तुमची बारी ''
''काय? का मारलत त्याला''
''कारण त्याला आमच्या बद्दल माहीत झाल होत .पण आता तुम्ही मरनारच आहे तर सविस्तर सांगुन देतो या औषधीची आम्हाला फार आधीपासुन गरज होती .आम्ही औषध बनवण्याचा फार प्रयत्न केला पण ते आम्हाला जमल नाही त्यामुळे या विषयावर संशोधन करनार्यांवर आम्ही नजर ठेवन सुरु केल .व तुम्ही आम्हाला सापडलात
२० वर्ष तुमच्यावर नजर ठेउन होतो आम्ही तुमच्या प्रत्येक श्वासावर लक्ष होत आमच. पण तुमच्या त्या मुर्ख असीस्टंटला याची भणक लागली त्यामुळे त्याला माराव लागल आणि आमच भाग्य म्हणा तेव्हाच तुमच संशोधन पुर्ण झाल .त्या पेटंट रजिस्ट्रेशन पासुन आतापर्यंतच सर्व खोट होत भ्रम होता आमचा निर्माण केलेला व त्यात तुम्ही फसलात परत एकदा आमची मदत केल्याबद्द्ल धन्यवाद '' कॅबीनमध्ये गोळ्या चालन्याचे आवाज एकु येतात
व जमीनिवर डॉ रावांचा म्रुतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असतो .तितक्यातच एक कर्मचारी येतो '' चीफ
तयारी झाली आहे'' '' ठीक आहे मी येतोय व या कचर्याला येथुन साफ करा '' हे बोलुन नेक्सल तेथुन निघतो .
तो धावतच जिन्याच्या पायर्या चढतो आता त्याच ध्येय अंतिम टप्प्यावर होत त्याच्या कडुन संयम राखला जात
नव्हता धावतच तो मेन हॉल मध्य पोहचतो बाहेरुन साधा दिसनारा हा हॉल आतुन खुप मोठी लॅबटॉरी होती
शंभरावर शास्त्रज्ञ तेथे काम करत होती . लॅबच्या मध्यभागी एक मोठी कॅप्सुल ठेवली होती एक माणुस मावेल एवढी
मोठी नेक्सल तिथे पोहचल्यावर एक शास्त्रज्ञ त्याच्या जवळ येतो ''सर काम झाले औषध योग्य प्रमाणे रीस्पॉन्स देत आहे येत्या पाच सेकंदातच लॉर्ड आपल्या मध्ये असतील '' नेक्सलच ध्येय पुर्ण झाल होत त्याच्या आयुष्याच्या मेहनतिच फळ त्याला मिळ्त होत आता त्याच दैवत त्याच्या समोर येनार होत काउंटीग संपते सर्वे कॅप्सुल भोवती
जमा होतात कॅप्सुल उघडली जाते व त्यातुन एक मानव आक्रुति बाहेर निघते व आनंदाने सर्वे जोरजोरात
घोषना देतात ''हे लॉर्ड '' ''हे लॉर्ड '' ''हे लॉर्ड '' ''हे लॉर्ड हीटलर''
कानांवर विश्वास बसत नाही हीटलर तो तर मेला होता. तो जिवंत कसा ? हा तोच आहे का? काय होइल आता?
काय असेल त्याच लक्ष? कोन बनेल त्याच भक्ष ? प्रश्नाच्या उत्तरादाखल अजुन प्रश्न याच उत्तर जाणन्यासाठी
वाचत रहा
THE AWEKEN OF WARLORD
(क्रमशः)
kadhechy shevat parynt
kadhechy shevat parynt romanch ahe................
katha avadli pudhcha bhag lavakar yeu dhy...... wat pahat ahe
छान पुलेशु
छान पुलेशु
पु.ले.शु.
पु.ले.शु.
CHANCH AHE.
CHANCH AHE.
worm , मन्जुशा, तृष्णा ,
worm , मन्जुशा, तृष्णा , pranu प्रतिसाद देन्याबद्दल धन्यवाद
अरे वा कहाणी फिरून पुन्हा
अरे वा कहाणी फिरून पुन्हा हिटलरवर.. सही आहे.. लवकर येऊद्या आता पुढचा भाग..
आणि हो, या भागात आधीच्या भागाची लिंक द्या ना..