"चिडचिड करणार नसलास तर बोलते"
विरूने हिनाकडे रोखून पाहिले. दोघेही त्यांच्या सहाव्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या टेरेसमध्ये रात्री अकरा वाजता बसलेले होते. कित्येक दिवसांनी ही एक अशी रात्र आलेली होती जेव्हा दोघेही मुले, सोहन आणि ओवी विरुच्या मित्राच्या मुलांबरोबर खेळायला आणि राहायला गेलेली होती.
संधी साधून विरुने हिनाकडे हा विषय काढला. संध्याकाळी आठ ते आत्ता रात्री अकरापर्यंत हिना हसून 'छे, असे काहीच नाही' वगैरे म्हणत होती. पण विरुने चिवटपणा दाखवल्यामुळे आत्ता तिला बोलणे भाग पडले. तिला ते बोलायचे होतेच, पण ते असे दुसर्याने ड्राईव्ह केलेल्या चर्चेचा भाग म्हणून बोलायचे नव्हते. अनेक महिन्यांनी आलेल्या या रात्रीचा काळ तिला हसत खेळत घालवावासा वाटत होता कारण असा वेळ, अशा गप्पा मारणे हे मुलांच्या व त्यामुळे स्वतःच्या व्यस्त शेड्यूलमुळे जमायचे नाही.
पण आठ सव्वा आठला विरुने तो प्रश्न विचारला आणि तो त्या प्रश्नाच्या उत्तराच्या मागेच लागला
मोहिनीला तिच्या माहेरचे आणि विरू हे सगळेच हिना अशी हाक मारायचे
नको तो विषय नव्हता तो हिनासाठी, खरे तर अत्यंत महत्वाचा विषय होता, पण या वेळी टाळला गेला तर बरे यासाठीचे तिचे प्रयत्न अयशस्वी ठरले
मग तिने ठरवले की ही संधी असेही विषय बोलायची आहेच की
उलट ही दुर्मीळ संधी आहे, तर बोलून घेऊ
माणसाच्या मनावर सर्वाधिक प्रभाव ज्या विचाराचा असतो तो विचार व्यक्त करताना शब्द का दगा देतात समजत नाही
अगदी आठवून आठवून , प्रत्येक शब्दाचे गुणांकन, फायदे तोटे अभ्यासून मग वापरावे लागतात
नात्यांमधील एक महत्वाचा प्रश्न म्हणजे संवाद. सुसंवादापेक्षाही अधिक महत्वाची बाब संवाद, पण हटकून अशा वेळी तो सुरू करता येत नाही.
हार मानून हिनाने शेवटी तिच्यामते असलेले अंतिम तात्पर्य किंवा अंतिम निष्कर्षच एकदम व्यक्त केला, ज्यामुळे आता त्याच्या समर्थनार्थ मांडावे लागणारे मुद्दे आपोआपच घरंगळत आणि हवे ते शब्द पांघरत येणार होते
असे करणे शेवटी सोपे ठरते
मनातील मुद्दा थेट सांगून टाकला की मूळ ताण, दडपण जाते आणि मग मोकळेपणाने बोलता येते
"विरेन, आय अॅम बीइंग यूझ्ड"
विरुकडे पाहण्याचे धाडस तिला जमवता आले नाही, त्यामुळे काळ्या आणि चांदण्यांनी चमचमत्या आभाळाकडे डोळे रोखत ती स्वगत बोलल्यासारखी बोलली
कसे कोण जाणे, पण विरुलाही त्या विधानाचे नवल वाटले नाही. खरे तर हे वाक्य ती बोलली नसती तरीही तिच्या मनात असे काहीतरी असू शकेल अशी शंका त्याला येत होती. पण ते तिच्या मनात असू नये अशी त्याची भावूक इच्छाही होती. त्यामुळे आजवर तो 'का गं अशी दिसतीयस' पुढे गेलेला नव्हता
तराजूच्या पारड्यांच्या उंचीची अदलाबदल झाली आता एका क्षणात
आता हिना अगदी मोकळेपणाने आकाशाकडे पाहात होती आणि विरूला स्वतःच्या मनावरचे दडपण वाढत आहे याची जाणीव होऊ लागली होती
तो लगेचच समर्थनाचे मुद्दे आठवू लागला होता
आणि शेवटी असह्य होऊन म्हणाला
"व्हॉट डू यू मीन? यूझ्ड?"
"आय मीन.. मी इथे एक.... एक हवी असलेली व्यक्ती आहे इतकेच... एक आवश्यक व्यक्ती"
"आवश्यक आहेस म्हणजेच महत्वाची आहेस "
"नाही.. आवश्यक आहे ती बाकीच्यांच्या काही गरजा भागवण्यासाठी.. मला काही हवे असेल याचा विचार त्यामागे नाहीये"
"जगातल्या कोट्यावधी विवाहीत स्त्रिया हेच म्हणतात"
"आणि त्या हेच म्हणतात म्हणून त्या चूक असतात?"
"मी चूक म्हणत नाहीये.. पण.. हिना.. मॅरिड लाईफमध्ये माझ्यामते एक स्टेज अशी येतेच जेव्हा रिकामेपणाची, वेग असह्य झाल्याची, हवा तसा वेळ घालवता येत नसल्याची खंत दाट होऊ लागते"
"प्रत्येकाच्या?"
"जवळपास... आणि आपल्यासारख्या नोकरदार मध्यमवर्गीयांच्या बाबतीत अधिक... कारण आपल्याला एकाच वेळी आर्थिक विकास आणि मनःशांती या दोन्ही बाबी हव्या असतात... अती श्रीमंतांना पैसा टिकवण्या व थोडा वाढवण्यापलीकडे काही नसल्याने निदान ते मनःशांती , समाधान यावर वेळ घालवण्यास सिद्ध तरी असू शकतात... त्यावर वेळ घालवतात की नाही हे ज्याचे त्याचे.. पण निदान त्यांची ती परिस्थिती असते अनेकदा.. मला जॉबमध्ये प्रगती करावीच लागते... त्यासाठी वैयक्तीक आयुष्यात कमी वेळ मिळणार हे स्वीकारावे लागते... गरिबांचे आणखीन वेगळे.. एक झोपडे असले आणि एक केबल असलेला टीव्ही असला की झालं.. त्यांना पैसा कमवायची इच्छा नसते असे अजिबात नाही... पण राहणीमान आपल्यासारख्यांसारखे असावे असे काही फारसे नसते त्यांचे... मग आपल्यासारख्यांच्या आयुष्यात असे क्षण येतातच.. जेव्हा आपण जणू एकटेच आहोत असे वाटायला लागते...लग्नाआधी घेतलेल्या आणाभाका आणि नव्या नवलाईतील माधूर्य केव्हाच ओसरलेले असते....मुलांसाठी सर्वाधिक वेळ द्यावा लागतो.. त्यांची कौतुके, खेळणी, शिक्षण, छंद यात स्वतःला सगळे जणू स्वतःसाठीच चाललेले असावे अशा मानसिकतेने गुंतवावे लागते.. त्यात दुसरा आपली साथ देत नाही आहे अशी एक निराश भावना उगीचच मनाला व्यापू लागते... वगैरे..."
"विरेन गोष्टी अचूक शब्दात मांडल्या की त्या समर्थनीय ठरतात का?"
"नाही... ते नुसतेच एक कम्युनिकेशन स्किल ठरेल.. पण मी जे म्हणतोय त्याही पलीकडे असे काही तुझ्या मनात आहे?"
"नसेलच याबाबत तू ठाम होतास मगाशी बोलताना"
"तो माझा इगो झाला.. तो इगो या क्षणाला आणि कदाचित या क्षणापुरता मी सोडला... तर तू काय म्हणशील?"
"मग मी असे म्हणेन की तुला माहीत नसतील अशाही काही संवेदना, वेदना, अपेक्षा आणि भावना जगात असू शकतात"
"एक वरवर प्रामाणिक आणि समजून घेणारा नवरा म्हणून मी 'हो' असेच म्हणणार हिना...की नक्कीच अशा काही भावना असतील ज्या मला किंवा काहीजणांना नसतील समजत.. आणि उदाहरणार्थ तुलाही अशा काही वेगळ्या भावनांबाबत काही कल्पना नाही असेही होऊ शकेल..."
"आपण शाब्दिक खेळ करायचा असे ठरवले तर त्या तिकडे क्षितिजावर सूर्य उगवला तरी आपण बोलतच राहू..."
"परफेक्शन हे प्रत्येकाच्या संवादात असायला हवे.. तू तुझा मुद्दा न सांगता केवळ तुला काय वाटत आहे हे सांगत आहेस.. यू आर बीइंग यूझ्ड.. धिस इज व्हॉट यू थिंक.. पण तुला तसे का वाटते ते तू सांगितले नाहीस..."
"म्हणजे एखादी गोष्ट अगदी विभक्तीकरण करून विशद केली तरच ती समजली जाईल या पात्रतेची नाती इतकी जवळची नाती समजली जातात का?"
"हो. वास्तविक नात्यांना काय समजायचे हे आपल्याला संस्कारांच्या प्रोसेसमधून सांगितले, शिकवले जाते व आपण ते तसेच समजावे अशी अपेक्षा ठेवली जाते... म्हणजे लग्न झाले की बायकोबरोबरचे आपले नाते इतके महत्वाचे मानले जायला लोकांना हवे असते की लग्नानंतर पुरुषाने आपल्या मित्रांबरोबर, स्पेशली अविवाहीत मित्रांबरोबर वेळ घालवूच नये, त्याने त्याला जे काय करायचे आहे ते त्या नात्याच्या वीणेच्या समृद्धीसाठीच करावे वगैरे.. पण तू आणि मी आणि सगळेच अनुभवत असतात की लग्न केल्यानंतर बदल फक्त इतकाच होतो की एक अगदी जवळचा, हक्काचा आणि समाजमान्य माणूस असा निर्माण होतो जो आपल्याकडून वागण्यातील काही विशिष्ट अपेक्षा व्यक्त करू लागतो आणि दोघांच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांची जमेल तितकी, जमेल तशी अलाईनमेन्ट म्हणजे मॅरीड लाईफ"
"म्हणजे प्रत्यक्षात प्रत्येक जण एकटाच असतो?"
"पूर्णपणे"
"मग दारावर तुझे आणि माझे नांव असलेली पाटी कशाला हवी? मी थोडीच फ्लॅटचे हप्ते भरतीय?"
"तुला आपला वापर केला जात आहे असे वाटू नये म्हणून"
"म्हणजे माझ्या वरवरच्या आणि तुला अभिप्रेत असलेल्या समाधानासाठी ती पाटी आहे?"
"फक्त तेवढेच नसून तुला माझ्या जीवनात असलेल्या स्थानामुळे व माझ्या तुझ्यावर असलेल्या प्रेमामुळेही ती पाटी आहे"
"मग तुझे हे माझ्यावर असलेले प्रेम तुला हे सांगते की हिनाचेही नाव पाटीवर टाक जेणेकरून तिला तिचा वापर होत नाही आहे असे वाटेल?"
"हो. अगदी. कारण बायकोला तिला महत्व मिळत आहे हे वाटण्यासाठी नवर्यांकडे फार कमी गोष्टी असतात.. तिचे कौतुक करणे, तिच्याशी गप्पा मारणे, तिच्या विचारांना प्राधान्य देत आहोत असे दाखवणे आणि तिचा घरावर समान हक्क आहे हे सिद्ध करत राहणे"
"फुले आणणे, आय लव्ह यू म्हणणे वगैरे"
"हिना जगातले ९९ टक्के पुरुष आपल्या बायकोला आय लव्ह यू असे म्हणताना ९९ % खोटे बोलत असतात"
"तू उरलेल्या एक टक्क्यातला का?"
"नाही... उरलेले एक टक्का पुरुष जन्माला यायचे आहेत"
"आणि ९९ % खोटे बोलत असतात म्हणजे एक टक्का खरे बोलत असतात?"
"नाही.. खरे आणि खोटे यांच्या सीमारेषेवर एक असा बिंदू असतो जेथे सत्य आणि असत्य यापैकी काहीच अस्तित्वात नसते.. समाजाने ठरवलेली बहुतेक नाती त्या बिंदूवर जन्माला येतात आणि त्याच बिंदूवर मरतात"
"असा कोणता हा बिंदू म्हणे?"
"ज्याला सत्य आणि असत्य हे दोघेही टेकलेले असल्याने दोघांचाही गंध येत असतो असा बिंदू... त्यातील आय लव्ह यू कधी खरे असते... कधी खोटे.. बिंदूच्या ज्या बाजूला असत्याचे मैदान असते... तिकडून बहुतेक पुरुष आलेले असतात... बहुतेक बायका सत्याच्या बाजूने...काही वेळा उलटेही असू शकते.. त्याच बिंदूवर वयाच्या नव्वदीतही म्हातारा आपल्या बायकोला आय लव्ह यू म्हणत असतो..."
"कमाल आहे.. सगळं तूच मान्य करतोयस..."
"कारण मला सत्याचा शोध घ्यायची इच्छा आहे... व्यावहारीक व लौकीक जगात मला त्या दृष्टीने एक पाऊलही टाकणे शक्य नाही... पण कधीतरी हे करायचे आहे... हा समाज, ही संस्कृती, या लोकांच्या धारणा, रुढी, अपेक्षा हे सगळे असे का यावर ध्यान लावावेसे वाटते"
"छान.. पण तू तुझा इगो सोडून पुरुषांची चूक मान्य करत आहेस म्हणून माझे मन शांत होईल असेही वाटते का तुला?"
"गोंधळलीयस तू.. मी तमाम पुरुषांची वगैरे चूक मान्य करत नाही आहे.. ज्या प्रकारे निसर्गाने पुरुषाला बनवले आहे त्या प्रकारची व्यक्ती ही अनेकदा असत्याकडून सत्याकडेच जाणारी असते.... आणि ज्या प्रकारे निसर्गाने बाईला बनवले आहे त्या प्रकारची व्यक्ती सत्याकडून त्या बिंदूपाशी येऊन थांबते.. ती पुढे जात नाही... पुढे असत्य आहे हे माहीत असते... पुरुष तिकडूनच आलेले आहेत हेही माहीत असते.. तरी ती त्यांना स्वीकारते.. एक तर नाहीतर तिचे जिणे हराम करेल समाज.. आणि दुसरे म्हणजे आपल्याजवळ नाही त्याचे आकर्षण प्रत्येकालाच.. त्यामुळेच खोटेखोटे 'आय लव्ह यू' बायका नुसते खपवून घेत नाहीत तर आनंदाने स्वीकारतात... हिना.. मी माझी किंवा एकंदर पुरुषांची चूक मान्यबिन्य केलेली नाही.. मला अजून माझी काय चूक झाली हे तुझ्याकडून ऐकायचेच आहे.."
"अरे पण सगळे नातेच जर मुळात एका गिव्ह अॅन्ड टेक स्वरुपाच्या अधिष्ठानावर आहे म्हणतोयस तर तेही तुला मी सांगून मला कोणता आनंद मिळणार आहे? असत्याचा?"
"नाही.. मला सत्याकडे खेचण्याचा... खेचायचा प्रयत्न करण्याचा.... त्यात जिंकण्याहारण्याचा.. पुन्हा तीच उर्मी मनात धरण्याचा... हाच तुझा प्रवास..."
"का? आणि तुझा प्रवास???"
"मी खेचला जात आहे आणि तुझ्यासमोर हारत आहे हे तुला दाखवत राहण्याचा..."
"आजवर सीमलेस राहिलेल्या वैवाहीक आयुष्याची अशी शकले उडवताना तुला माझा विश्वास गमावण्याची भीती नाही?"
"नाही.. कारण तू बद्ध आहेस... दोन मुलांना जन्म दिला आहेस पण त्यांना नांव माझे लावावे लागत आहे.. तुलाही वडिलांच्या नावाला त्यागून माझे नांव लावावे लागत आहे.. ते हातातून गेले तर काय होईल याची भीती तुला बद्ध करत आहे.. आणि तुझ्या या अवस्थेचा मी फायदा घेत आहे... हे प्रातिनिधीक म्हणता येईल.. "
"मग संध्याकाळपासून मला का विचारतोयस की तुझ्या मनात काय आहे, तुझ्या मनात काय आहे?"
"कारण तू मनाने या संसारात, या घरात नसणे हे मला घातक वाटते म्हणून.. यातून काहीतरी तिसरेच घडेल या भीतीने मी काळजी घेऊन तुला विचारतो की तुझ्या मनात काय आहे.."
"म्हणजे माझ्या मनात काय आहे ते माझ्या मनाच्या सुखासाठी विचारत नाहीस..."
"नाहीच... "
"मग काय सांगू तुला..."
"सांगायचे असले तर जरूर सांग... मी खोटे कधीच बोलणार नाही... ऑफीसमधल्या सहकार्यांना ते आवडत नसले तरी आवडतात असे भासवावे लागते... हे तुझे माझे प्रत्यक वैयक्तीक आयुष्य आहे.. इथे तसे दाखवत, भासवत राहून आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ.. "
"वा वा... म्हणजे एकीकडे घर मोडू नये या भीतीने माझीच काळजी असल्यासारखे मला विचारायचे की काय होतंय तुला... आणि बोलायला बसलो की म्हणायचे हे प्रत्यक्ष आयुष्य असल्याने येथे खोटे बोलण्यात अर्थ नाही.. काय व्हायचे ते होऊदेत पण बोल"
"तुला गंमत समजली नाही हिना.. जोवर परिस्थिती अशी आहे की तुला मी तसे नाही विचारले नाही तरी चालते तोवर मी विचारणार नाही.. पण आज तू अशी वागत आहेस आणि घरात मुले नाहीत... आज जर मी हा विषय काढला नाही तर मी तुला सत्याकडून असत्याकडे खेचतोय असे होईल.. "
"निव्वळ घोळ घालतोयस.. माझा एक सरळ प्रश्न आहे.. बायका सत्याकडूनच त्या बिंदूकडे का येतात? बायकांवर का हे बंधन???"
"कारण त्यांचे बाई असणे.. हेच त्यांचे बंधन आहे.. निर्माण झालेल्या संस्कृतींमध्ये बायकांवरील निर्बंध हेच महत्वाचे फरक आहेत... त्यावरच संस्कृतीचा विकास अथवा अधोगती ठरत आलेली आहे.. "
"पुस्तकी गप्पा मारण्यात मला रस नाही..."
"कोणतेही विधान खोडून तर दाखव??"
"संसार ही वक्तृत्व स्पर्धा नाही..."
"बोलू न शकणारे पटकन हार न मानता चर्चा भरकवटात याचे तू सुंदर उदाहरण आहेस"
"मी बोलू शकते.... पण बोलण्याआधी झालेले संवाद हे बोलण्याचे मूळ कारणच हिरावून घेत आहेत.. तुझ्यामते तुझे चूक असणेही बरोबर आहे.."
"नाही.. माझे चूक असणे बरोबर असे मी म्हणत नाहीये.. जोवर शक्य आहे तोवर आपलेच बरोबर म्हणणे हा मानवी स्वभाव आहे.. तूसुद्धा तेच करणार आणि मीसुद्धा.... मी फक्त एवढेच म्हणतोय की तुला काय झाले आहे हे विचारताना मी पूर्णपणे प्रामाणिक नसणे पण तरीही तुला ते पुरणे ही आपल्यासारख्या समाजातील वैवाहीक आयुष्यातील सर्वसामान्य बाब आहे"
"मुलामे लावले की स्टेजपुरते चेहरे बदलतात... ते चेहरे घेऊन जगात वावरता येत नाही... तू शब्दांच्या मुलाम्यांनी चुका झाकणे हा प्रकार करत आहेस असे वाटत नाहीये का तुला?"
"कोणत्या चुका?"
"कोणत्या चुका! आता काय सांगू! बेसिकली मुलांना आई हवी आणि आपल्याला बायको हवी या दृष्ट्कोनातून स्थिरावलेल्या माझ्या अस्तित्वाला मी का पेलत बसू? तर तुझे म्हणणे असे की पारंपारीकरीत्या स्त्रीलाही तेच हवे असते किंवा तसे तिला वाटत असते वगैरे... अरे पण आत हे समजा हे कळलेले आहे की मला तसे वाटणे, मी येथे केवळ अपेक्षापूर्तीसाठी आहे हे मला समजणे पण मी ते मान्य करणे हे चूक आहे .. तर तरी निदान माझ्या अपेक्षांबाबत ठोस चर्चा व्हायला हवी ना?"
"माझ्या चुका कोणत्या?"
"तू खोटारडा आहेस आणि खोटेपणाने मला विचारत आहेस हे तुला आणि मला कळल्यानंतरही मी तुझ्याशी बोलत बसणे आणि तू ते स्वीकृत वगैरे करणे ही तुझी चूक नाहीये का?"
"नाही.. त्यात काय चूक? आपण कधीतरीच तर बोलतो..."
"हे पहिले नॉर्मल वाक्य आहे चर्चेतले तुझे..."
"कारण तुला अशीच वाक्ये ऐकायची आहेत..."
"तुझं काय आहे माहितीय का विरेन??? सगळं असंच होणार आहे, असे असे होण्याची मुळी कारणेच आहेत वगैरे गृहीतके एकदम ठाम आहेत तुझी... अरे मला जर हेच ऐकायचे आहे हे तुला समजतंय तर बाकीची बडबड कशाला करतोयस??"
"कारण आपल्यात आणि इतरांच्यात फरक आहे... सत्याच्या बाजूकडुन त्या बिंदूप्रती मी आलो आहे आणि तू असत्याकडून..."
"..................."
".........."
"व्हॉट डू यू मीन????? मी अप्रामाणिक आहे???"
"हो..."
"काय केलंय मी????"
"माझ्याकडून खोट्या प्रेमाची अपेक्षा केली आहेस... खरे प्रेम किती ते समजून घेण्याची तुला गरज वाटत नाही आहे"
"प्रेम समजून घेणे हा एकच आविष्कार असू शकतो का प्रेमाचा? प्रेम दाखवणे, दिसणे, याला काही अर्थच नाही?"
"अर्थ आहे की... पण मी आत्ता तुझ्याशी बोलणे हा प्रेमाचा आविष्कार सर्वात सुंदर नाही का? तुला माझ्याशी दिलखुलासपणे बोलावेसे वाटणे हा आविष्कार अधिक सुंदर नाही का???"
"पण असे कुठे बोलता येते नेहमी???"
"म्हणून प्रेमच नाही असे समजायचे???"
"हो पण.. .. पण..."
"तुला बोलताच येत नाही आहे.. तुझा आणि लाखो स्त्रियांचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला प्रेम दिसणे, दाखवले जाणे यात अधिक स्वारस्य आहे... "
"जे दाखवलेच जात नाही त्या प्रेमावर विश्वास ठेवायचा का मग??? आपण एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे इज ऑल??? कोणतीही चर्चा हवी त्या दिशेला वळवणे आणि बोजड शब्द आणि हुकुमी संवाद कौशल्य या जोरावर ती भरकटवणे हे मला हवे आहे असे तुला वाटते????"
"आय डोन्ट नो हिना.. पण मला असे वाटते की तुला एकदा भडभडा बोलायचे आहे.. कारण विशेष असे काहीच नाही.. एकंदर आपला राग... एकंदर अॅक्युम्युलेट झालेली नाराजी वगैरे... एकदा ओकून टाकायची आहे... आणि हक्काचा माणूस म्हणून मी.. कदाचित त्या नाराजीपैकी पंचवीस टक्के नाराजी कामवाली टिकत नाही यामुळेही असेल.. पण बोलणार कोणाला???"
"नाही विरेन... माझ्याकडे खास असे काही मुद्दे आहेत...जमलेले, साचलेले गढूळपण मला माझ्या डबक्यातून तुझ्यावर शिंतोड्यांसारखे उडवायचे नाहीये..."
"कोणते मुद्दे??"
"पहिला मुद्दा.. मी इथे का राहू?"
"मग काय करणारेस?"
"हे उत्तर आहे?"
"हे उत्तर नाहीये.. पण पर्यायी व्यवस्था डोक्यात असल्याशिवाय माणूस असे निर्णय घेत नाही.."
"तुझ्यातला मार्केटिंग मॅनेजर कंपनीतून घरात आणत जाऊ नकोस यापुढे..."
"म्हणजे???"
"मी येथे न राहण्याचा निर्णय घेतलेला नाहीये.... मी इथे राहण्यासाठी असे काय खास कारण आहे हे विचारतीय..."
"तुझ्या मनात इतके घनघोर विचार चाललेले आहेत??? मला काहीच माहीत नाही...."
"आणि तू आत्ता असे म्हणणे की तुला काहीच माहीत नाही.. हे तुझे खोटे प्रेम असूनही ते समर्थनीय असेल नाही का?"
"नाही.. असे काहीच म्हणत नाहीये मी.. पण तू या थराला का विचार करतीयस??"
"अरे मला प्रॉब्लेम काहीच नाहीये बाबा.. मी सुखात आहे.. पण मला मी इथे का आहे , का असावे हेच समजत नाहीये..."
"म्हणजे काय?? मग तू कुठे असावेस??"
"अरे सकाळपासून डबे करा.. रिक्षेत मुलांना बसवा.. टाटा बाय बाय करा.. घरी आल्यावर आवरा.. बाहेर जाऊन संध्याकाळची भाजी आणा.. मग दुपारी मुलांना जेवायला घाला.. त्यांचा अभ्यास घ्या.. त्यांची काळजी घ्या... जरा अर्धा तास पडा.. वाचा... टीव्ही बघा... चहा घ्या.. पुन्हा बाहेर जाऊन काही किराणा वगैरे घेऊन या ... आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक.. मग तू येणार.. मग सगळ्यांची जेवणे... आवराआवर.. तू टीव्ही पाहात बसणार.. मी काहीतरी वाचत झोपून जाणार...रविवारी बाहेर जायचे... महिन्यातून काही ना काही शॉपींग... वर्षातून एक ट्रिप... अधेमधे माहेरी जाऊन यायचे.. कधी कोणी पाहुणा येणार... आणि सर्व सर्व गोष्टींमध्ये माझी भूमिका एक कर्तव्यदक्ष विवाहीत स्त्री व आई या पलीकडे नसणार.... आणि हेच मला नको झाले तर मी इथे का असावे?? मी एखाद्या कॉलेजमध्ये एखादा सब्जेक्ट शिकवीन...मुलांना घेऊन वर्षभर माहेरी राहीन आणि तिथूनच शाळेत सोडीन आणीन.. व्हाय द हेल अॅम आय सो टाईड अप हिअर???"
"तू जे करशील म्हणतीयस त्यातही वैतागशील.."
"अरे मग वेगळं काहीतरी करीन.. जे हवं ते... आय विल सिंग.. मी पोहायला जाईन.. वाटेल ते करेन.."
"तू जबाबदारी घेणार नाहीस इतकेच म्हणत आहेस ना? की काही विशेष सन्माननीय असे मुद्दे आहेत?"
"हो पण जबाबदारीच का घेऊ???"
"कोणाच्या पोटची मुलं आहेत ती???"
"मग तू का त्यांना जेवायला वाढत नाहीस ऑफीसमधून आल्यावर???"
"कारण मी घरासाठी उत्पन्न आणण्याचे काम करतो..."
"कोणते घर??? ज्यात माणसे काय करतात हेच तुला माहीत नसते???"
"म्हणजे???"
"डिड यू नॉट नोटिस की गेल्या महिन्यात मला बरे नव्हते???"
" आय आस्क्ड यू...."
"आस्क्ड यू काय आस्क्ड यू... दोन ताप आला होता मला एकदा रात्री तर... आय मायसेल्फ वेन्ट टू द डॉक्टर... तू फक्त अशी का दिसतीयस आणि बरे नाही का इतकेच..."
"हो पण तू मला सांगितलं का नाहीस एका घरात राहून????"
"कारण तुला मला स्पर्शही करायची इच्छा नव्हती... स्पर्श केला असतास तर कपाळ तापलंय आणि टेंपरेचर आहे हे समजलं असतं... "
" हो पण...आय मीन.."
"आता तुला बोलताच येत नाहीये.. पण काही दिवसांनी याचेही समर्थन तू तयार करशील.. की माझी अशी अशी अपेक्षा असणे हेच माझे दुबळेपण आहे वगैरे.. मुळात मला काय म्हणायचंय... की ठीक आहे.. सगळ्यांचच प्रेम खोटं असतं.... पण हे आपल्याला समजतंय तर आपण का बदलू शकत नाही?? तुझे भरल्या पोटचे संवाद ऐकून मी मन रिझवायचे का? तुला शनिवार रविवार सुट्टी असते..मला काय???"
"हिना... तू... तू फक्त लाखो स्त्रियांचे असतात तेच प्रश्न सांगतीयस.. घरात बांधले गेले आहे.. घरातून सुटका नाही वगैरे..."
"छे छे... ए बाबा... अजिबातच नाही... अरे भलतेच गैरसमज होतात तुझे.... अडाणी बाई नाहीये मी.. म्हणजे तुला समजलंच नाही मी काय म्हणतीय ते... माझा मुद्दा समजून घे... तोंडची वाफ दवडणार्या तुला मुळात माझे हे प्रॉब्लेम्स आहेत हे अॅप्रिशिएटच करावेसे वाटत नाही आहे ही माझी शुद्ध फसवणूक नाही का? केवळ ते लाखो स्त्रियांच्या प्रॉब्लेम्ससारखे वाटतात म्हणून ते बावळट प्रश्न ठरतात? तुला त्यावर वेळच घालवावासा वाटत नसणे हे तुझ्यातील नवरा निव्वळ स्वार्थी असण्याचे लक्षण नाही का? एक चेंज, बदललेला सभोवताल ही माझ्याही मनाची गरज असेल हे शिरतच नाही डोक्यात? अरे तू जे थेअरम्स मला सांगतोयस... ते ओक्केच आहेत... पण त्यानंतरही मी माझ्या मनाची समजूत तुला अभिप्रेत असलेल्या व तू माझ्यावर वापरलेल्या शैलीने घालू शकत नाही ना? हे इतर स्त्रियांसारखे नाहीयेत प्रश्न.. मला तू दिवसातून दहा वेळा कशी आहेस विचारावेस वगैरे नाही म्हणायचे मला.. पण तू घरी आल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी ऑफीसला जाईपर्यंत एकटा नसतोस विरेन.. मी तू घरात असलास काय आणि नसलास काय.. एकटीच असते.. मनाने एकटी.. बरं हे माझ्या एकटीच्या मनाचे वेडे खेळ आहेत असे म्हणायचे असले तर एक सांग.. मी वाचत असलेल्या घरगुती विषयाच्या कादंबरीची तू सतत थट्टा करणे.. मी पाहात असलेल्या सिरियल्सना हासणे आणि न्यूज लावू का असे विचारणे.. फक्त मुलांशी मोकळेपणाने बोलतानाच माझ्याशी खास असे, जे दैनंदिन जीवनाबाहेरचे आहे असे काहीही कधीही न बोलणे.. आर्थिक आवाक्यात असलेल्या सुखी क्षणांची बरसात करतोय असे दाखवून आम्हा तिघांना भौतिकतेच्या एका परिघावर जखडून ठेवणे व आमच्या अपेक्षाही मर्यादीत ठेवणे.. हे सगळे काय आहे?? धिस इज रेप.... मी तुला आत्ता या क्षणी खदहदून हासते विरेन.. फक्त बारा लाख पर इयर या तुझ्या पॅकेजमध्ये मला हवे तसे वागता येत नाही... छी... कसली ही नोकरी फालतू.... मी फालतू सिरियल्स बघते तसा तू फालतू नोकरीत आयुष्य घालवतोस.. म्हणू असे?? हसू?? ... मी का तू दिलेल्या, तुला शक्य असलेल्या परिस्थितीत राहून संसारावर प्रेम करत किंवा तसे नाटक करत जगायचे??? तू सतत मला हासावेस म्हणून??? तू कधीच माझ्या मनाचा कल विचारू नयेस म्हणून?? आय अॅम बीइंग यूझ्ड विरेन.. तू म्हणशील तेव्हा हातात चहाचा कप ठेवणार्या मी जर आज म्हंटले की उद्यापासून तीन दिवसांची रजा घेऊन आमच्या घरी राहायला चल तर येशील का?? इफ आय कान्ट एक्स्पेक्ट अ मायन्यूट चेंज इन यू... व्हाय शूड आय डान्स टू यूअर म्यूझिक.. मला हेच प्रश्न मुलांमुळेही आहेत.. पण मुले लहान असल्यामुळे मी त्यांना हे विचारूच शकत नाही.. आणि मोठी होतील तेव्हा ती घरात थांबायचीच नाहीत माझ्याशी दोन शब्द बोलायला.. माझे दोन प्रश्न ऐकायला आणि त्यांची उत्तरे द्यायला... बेसिकली सगळे 'गरज' या एकाच तत्वावर चाललेले आहे विरेन... वुई हॅन नो टाईम फॉर ईच अदर... आपण फक्त जगत आहोत... एकानुसार दुसरा... सर्वांनुसार मी... आणि तुला माझी गरज नेमकी नाहीये.. मुलांना माझी आई म्हणून गरज असली तरी काही काळाने ती कमी होईल.. जणू फक्त मलाच गरज आहे की मी येथे राहायला हवे... आता मला सांग... मी इथे का राहावे??? हे सांग की तू कसा काय सत्याच्या मैदानातून न्यूट्रल बिंदूला आला आहेस आणि मी कशी काय असत्याच्या?? तू खरे बोलतोस.... प्रत्येक नातेसंबंधाचे.. प्रत्येक वाक्याचे... प्रत्येक अपेक्षेचे विश्लेषण करू शकतोस.. त्यातील अनंत पापुद्रे वेगवेगळे... सुट्टे करून दाखवू शकतोस.. म्हणून तू खरा आणि मी खोटी??? अरे तू म्हणतोस त्या सत्यापुढेही एक खरेखुरे 'सत्य' असते.. त्याचे नांव 'असत्य'! असत्य हे जगातील सर्वात मोठे सत्य आहे.. आज तू मी आहोत... मुले आहेत.. शंभर वर्षांनी आपल्यापैकी कोणीच नसेल.. म्हणून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काही फार मोठे समाजकार्य आणि कर्तबगारीच करावी लागते असे नाही... लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी केवळ पुतळा उभारला जाईल असे वागावे लागते असेच नाही... खरे तर ते प्रत्येकाला शक्यही नसतेच.. शक्य असते ते इतकेच की एकमेकांना एकमेकांबद्दल वाढते प्रेम वाटेल आणि कोणत्याही क्षणी असलेल्या स्वारस्यापेक्षा किंवा ओढीपेक्षा मागच्या क्षणाचे स्वारस्य आणि ओढ कमी असेल.. हे आपले अस्तित्व टिकवणारे सत्य आहे.. आणि ते असत्य असले तरी चालते.... असत्य आपले हे विश्व आहे.. हे आयुष्य आहे जे संपणार आहे.. त्या असत्यात आणखी एक असत्य मिसळायला काय झाले रे??? की माझे तुझ्यावर प्रेम आहे.. तू किती करतेस... तू घरात असतेस म्हणून मी निश्चींत असतो.. हे खोटे बोलले तरी चालते.. बायका सत्याच्या मैदानातून त्या बिंदूपाशी का येतात माहीत आहे??? त्यांना असत्याच्या मैदानातून आलेल्यांचे आकर्षण का असते माहीत आहे?? कारण त्यांच्यात असत्य स्तुतीने, असत्य प्रेमाने आणि असत्य मायेनेही सुखी व्हायची क्षमता निसर्गाने पेरलेली असते... पुरुष दु:खी प्रसंग घडला की दु:खीच होतात...बायका दु:खी प्रसंगातही कठोरपणे उभ्या राहू शकतात ते या .. तू म्हणतोस तसल्या असत्य वाक्ये ठासून भरलेल्या खोट्या प्रेमामुळे... यू आर नथिंग विरेन.. तू...मुले... सगळे जण माझ्यामुळे आहात आणि माझ्याचवर अवलंबून आहात.. माझे तसे नाही.. पण तरी हे घर मोडणे मला नकोच आहे.. मला फक्त हे दाखवून द्यायचे होते.. की तुम्हाला सर्वांना वाटते तितकी मी टेकन फॉर ग्रॅन्टेड स्वरुपाची व्यक्ती नाही... शो रिस्पेक्ट.. धिस मोमेंट ऑन... "
===================================
-'बेफिकीर'!
छान
छान
नेहमीसारखे छान.. पण... कधीतरी
नेहमीसारखे छान.. पण... कधीतरी पुरुषांची बाजूही मांडा हो..
कधीतरी बायकांनाही सांगा की कर्क राशीचे पुरुष सोडल्यास कोणताही पुरुष आपल्या फॅमिलीला एवढे प्राधान्य देत नाही जेवढे तुमच्या कथेतील नायिका नेहमी अपेक्षा धरून असतात..
पुरुष दु:खी प्रसंग घडला की
पुरुष दु:खी प्रसंग घडला की दु:खीच होतात...बायका दु:खी प्रसंगातही कठोरपणे उभ्या राहू शकतात ते या .. तू म्हणतोस तसल्या असत्य वाक्ये ठासून भरलेल्या खोट्या प्रेमामुळे... यू आर नथिंग विरेन.. तू...मुले... सगळे जण माझ्यामुळे आहात आणि माझ्याचवर अवलंबून आहात.. माझे तसे नाही.. पण तरी हे घर मोडणे मला नकोच आहे.. मला फक्त हे दाखवून द्यायचे होते.. की तुम्हाला सर्वांना वाटते तितकी मी टेकन फॉर ग्रॅन्टेड स्वरुपाची व्यक्ती नाही... शो रिस्पेक्ट.. धिस मोमेंट ऑन... "
Amazing , khupach chan
खुप छान, आवडलि.
खुप छान, आवडलि.
अतिशय उत्तम! बेफिकीर तुम्ही
अतिशय उत्तम!
बेफिकीर तुम्ही हे जे काही मांडता ना, ते इतकं भिडणारं असतं की करावं तितकं कौतुक कमी ठरेल!
लिखाण नेहमीप्रमाणेच उत्तम
लिखाण नेहमीप्रमाणेच उत्तम !
तरीही, या कथेपुरता, व्यक्तिशः मला विरेन सत्याच्या जास्त जवळ आहे असे वाटले. हिना स्वतःच तयार केलेल्या जाळ्यात अडकून पडली आहे.
'हे लेखन वाचून लिंगभेदाला खतपाणी घातले जात आहे की काय असे वाटले.' पुरूषांनाही हे जग तितकेसे सोपे नसते, जितके अशा प्रकारच्या लिखाणातून ते आहे, असे भासवले जाते. दे आर आल्सो बेईंग यूज्ड.
एक थोडेसे क्रूड अवतरण आठवले- "नोबडी इज वर्जिन, लाईफ ** एव्हरीवन."
अर्थात मी पुरूष असल्यामुळे माझा दृष्टिकोन असा असू शकेल. माझ्या विपरीत मते असलेल्यांची जी बाजू आहे, तिचाही आदर आहेच.
नेहमीप्रमाणेच उत्तम !
नेहमीप्रमाणेच उत्तम !
"मला फक्त हे दाखवून द्यायचे
"मला फक्त हे दाखवून द्यायचे होते.. की तुम्हाला सर्वांना वाटते तितकी मी टेकन फॉर ग्रॅन्टेड स्वरुपाची व्यक्ती नाही... शो रिस्पेक्ट.. धिस मोमेंट ऑन... "
तुमच्या विचारांचा गुंता झालाय किंवा स्त्रीच्या बाजूने लिखाण केले की सहानुभूती (किंवा प्रतिसाद) मिळतात म्हणून तश्या अंगाने तुमचा प्रत्येक लेख जातोय असं माझं मत झालंय. बहुतेक प्रत्येक लेखामध्ये स्त्री टोकाची भुमिका घेताना दिसते आणि शेवटी तीच जिंकते ( लेखाच्या आणि प्रतिसादांच्या सोयीसाठी कदाचित) ... असो... असतो एकेकाचा दृष्टीकोन. पुढच्या वेळी असे एकांगी लेख न वाचण्याची काळजी घेईन. धन्यवाद...
बेफिकीर, आजून एक उत्तम कथा.
बेफिकीर,
आजून एक उत्तम कथा. उत्तम यासाठी म्हंटलं की अशीच गोष्ट पुरुषाच्या बाबतीत घडू शकते. त्यासाठी लग्नाच्या जागी नोकरी, नवर्याच्या जागी साहेब आणि बायकोच्या जागी पुरूष कल्पून बघायला लागेल. आदराच्या जागी पोचपावती (रेकग्निशन) टाकता येईल.
मात्र पात्रांचे कार्यकलाप (अॅक्शन्स) फार वेगळे राहतील. कथेत पतीपत्नी घरी बसून बोलतात. तर कचेरीत वाटाघाटी होतील.
मेंदूस चविष्ट खाद्य लाभले आहे. त्याबद्दल आभार!
आ.न.,
-गा.पै.
इथे फारच भयंकर गृहीतके होत
इथे फारच भयंकर गृहीतके होत असतात बुवा, बेफिकीरच्या लेखनावर एक पिंक टाकली की मोकळे:
<<तुमच्या विचारांचा गुंता झालाय किंवा स्त्रीच्या बाजूने लिखाण केले की सहानुभूती (किंवा प्रतिसाद) मिळतात म्हणून तश्या अंगाने तुमचा प्रत्येक लेख जातोय असं माझं मत झालंय>>
पुरुषासारखा पुरुष वाचले नाहीत काय? 'मदत' वाचले नाहीत काय? मला हजारो प्रतिसाद मिळाले आहेत आणि मी शेकडो विषयावर इथे लिहिलेले आहे.
गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकल्यासारखे प्रतिसाद कृपया दिले जाऊ नयेत अशी एक माफक अपेक्षा
या कथानक स्त्री जिंकते की पुरुष याला अर्थ नाही. शेवटचे वाक्य ऐकून तो विरेन काय गप्प बसला असेल होय? की शो रिस्पेक्ट? तो काहीतरी बोललाच असणार ना? नात्यातील विणेचे पदर मलाच स्वतःला उलगडावेसे वाटत होते म्हणून लिहिले
==========================
ज्ञानेश,
<<अशा प्रकारच्या लेखनाचा वरवर स्त्रीवादी भासणारा पण मूलतः लिंगभेदास खतपाणी घालणारा जो सूर आहे, तो मला अस्वस्थ करतो>>
तुम्हाला अस्वस्थ करतो म्हणजे काय? लिंगभेदाविरुद्ध चार दशके एखादी संस्था चालवत असल्यासारखे हे विधान झाले
-'बेफिकीर'!
सदर कथा वाचून झाल्यावर "मला"
सदर कथा वाचून झाल्यावर "मला" काय वाटले, हे मी सांगितले. हा फक्त एका वाचकाचा अभिप्राय आहे. यात "माझी" पात्रता काय, याचा काहीच संबंध नाही. माझ्या मताशी इतरांनी सहमत असावे हा आग्रहदेखील नाही.
तुम्हाला फक्त 'वा वा' करणारे प्रतिसाद हवे असतील तर सेल्फ मॉडरेटेड ब्लॉग चालवा. ही कथा वाचून नाही, पण तुमचा प्रतिसाद वाचून तुम्हीसुद्धा (रावसाहेब म्हणतात त्याप्रमाणे) 'बायकांच्या आड्यन्सला रडवण्यासाठी' लिहिता, या संशयाला पुष्टी मिळते आहे.
wow
wow
ज्ञानेश नाही, बायकांना
ज्ञानेश
नाही, बायकांना रडवण्याबिडवण्यासाठी नाही
मला फक्त वावा करणारे प्रतिसाद हवे असतात हा एक बरेच दिवसांपासूनचा गैरसमज आहे. हे तर वेगळेच की सर्वात जहाल प्रतिसाद मलाच मिळालेले आहेत. पण तुमचे जे वरील विधान होते की :
<<अशा प्रकारच्या लेखनाचा वरवर स्त्रीवादी भासणारा पण मूलतः लिंगभेदास खतपाणी घालणारा जो सूर आहे, तो मला अस्वस्थ करतो. >>
यात सरळ (लिंगभेदास खतपाणी घालणे हा) आरोप व (अशा प्रकारचे या शब्दांमधून) जनरलायझेशन आहे आणि त्यानंतर परत ते सर्व आपल्याला अस्वस्थ करते असे म्हणून एका चिंतकाची पोझिशन घेऊन बाजूला होणे आहे
नुसता 'वाचकाचा अभिप्राय' असता तर 'हे लेखन वाचून लिंगभेदाला खतपाणी घातले जात आहे की काय असे वाटले' असे म्हंटले गेले असते. तुमच्या अभिप्रायात समाजाबद्दल एकदम कळकळ वगैरेच दिसून येत आहे
(अवांतर - लिंगभेद हा खतपाणी घातले न घातले तरी अस्तित्वात राहणारच आणि त्याचे फायदे तोटे दोन्ही होत राहणार हे वेगळे)
(अवांतर - मी ब्लॉग न काढताही वावा असे प्रतिसाद मिळवू शकतो व ब्लॉगवरही कोणी जहरी टीका केली तरी खपवून घेऊ शकतो. )
फक्त बेजबाबदार पण विचारी भासणार्या प्रतिसादांना काउंटर करणे न करणे हे मी ठरवतो
ठीक. तुम्हाला हवा तसा बदल
ठीक.
तुम्हाला हवा तसा बदल माझ्या आधीच्या प्रतिसादात केला आहे.
'अशा प्रकारच्या लिखाणात' या जनरलायजेशनमधे 'बेफिकिर यांचे सर्व लिखाण' अभिप्रेत नाही. हे लिहितांना मी सध्या वाचलेले (वृत्तपत्रात आणि वेबसाईट्सवर) दोन-चार लेख माझ्या नरजेसमोर होते.
"इथे फारच भयंकर गृहीतके होत असतात बुवा, बेफिकीरच्या लेखनावर एक पिंक टाकली की मोकळे" या जनरलायजेशनचे काय करायचे हे तुम्हीच ठरवा.
असो.
नाही , ते विधान तुमच्यासाठी
नाही , ते विधान तुमच्यासाठी असूच शकत नाही
आपल्या दोघांचे वाद बघून खूप
आपल्या दोघांचे वाद बघून खूप निराश झालो............ खरेच.......... वाटले होते आता अजून दोन-चार जण मध्ये येऊन कांड्या टाकतील आणि वातावरण जाम तापेल.. .... छ्या.. पण सकाळपासून तसे काहीच नाही.. यापेक्षा आपले ऑर्कुट आजही फॉर्मला आहे..
असो.., पु.भा.शु.
Please bahdu naka , baki
Please bahdu naka , baki kahihi asale teri katha manun chanch ahe
कथा आवडली.
कथा आवडली.
कथा नेहमी प्रमाणेच आवडली...
कथा नेहमी प्रमाणेच आवडली...
थोडं अनमॅरीड मुलं/पुरुषांवरही लिहा ना बुवा... सगळच लग्न झालेल्यांवर लिहिता तुम्हि....याचा प्रेमपूर्वक जाहीर निषेध करीत आहे!
छान कथा आहे....क्लिश्ट वाटली
छान कथा आहे....क्लिश्ट वाटली थोडी पन मस्त आहे
ओघवते लिखाण. चांगली कथा,
ओघवते लिखाण.
चांगली कथा, आवडली.
____________________
धन्यवाद
नेहमीप्रमाणेच. आवडलं. पटलं.
नेहमीप्रमाणेच. आवडलं. पटलं.
अजिबात आवडली नाही. खुपच
अजिबात आवडली नाही. खुपच लेक्चर बाजी. एकतर मला रीस्पेक्ट द्या!!! असा सांगुन रीस्पेक्ट मिळत नाही. तो आपल्या वागण्या मुळे कमवावा लागतो. मला महत्व द्या, मला ग्रुहीत धरु नका, मी आहे म्हणुन तुम्ही आहात... हे असे सांगुन लोकं ऐकणार आहेत का? दुसरे म्हणजे हे असे सांगावे लागते ह्यातच त्या नात्याची शोकांतिका आहे.
कोणतेही नाते मग ते बायकोचे नवर्याशी, आईचे मुलांशी किंवा सुनेचे सासुशी असो, त्यात जर एकामेकात सामंजस्य नसेल, आणि एक अबोल बाँडिंग नसेल आणि त्याचे पदर जर असे उलगडुन सांगण्याची वेळ आली असेल, तर त्या नात्याला काहीही अर्थ रहात नाही. प्रत्येक गोष्ट सांगावी का लागावी? बघा मी हे करते, तुम्ही हे करता, मी आहे म्हणुन तुम्ही आहात... वगैरे वगैरे हे शब्दांचे बुड्बुडे आहेत. मुळात नातच बिघडलेलं आहे.
नवर्याला आपली पत्नी आपली सहचारीणी न वाटता "बायको" वाटते, तिकडेच सगळी गोची आहे किंवा उलटही, की पत्नीला आपला सहचर "नवरा" वाटतो. जेंव्हा नात्यातली ही देवाण घेवाण एक कर्तव्य आहे, असे न वाटता एक सहजधर्म होइल तेंव्हाच हे असे प्रश्ण पडणार नाहित.
हे येवढं लेक्चर दिल्यावर तो नवरा नीट वागला ( म्हणजे तिच्या अपेक्षेनुसार वागला) तरी शेवटी काय, नात एका छोट्याश्या दोरीवर उभं आहे. जरा तोल गेला की कोलमडलं.
मुळात आपण ग्रुहीत धरले जात आहोत हे कळत होतं तरी ती सीच्युएशन निर्माण व्हायला कारणी भुत कोण?
सगळे शब्दांचे बुड्बुडे वाटले, बाकी कथा बीज जुनेच आहे.
सर्व दिलखुलास
सर्व दिलखुलास प्रतिसाददात्यांचा आभारी आहे
मोकिमी अगदी अगदी.. कोणी
मोकिमी अगदी अगदी..
कोणी आपल्याला गृहित धरत असेल तर नक्कीच त्यात आपली ९९.५% आणि त्या माणसाची ०.५% चुक असते. कारण तुम्ही कोणताही थँकलेस जॉब एखाद्यासाठी १० वेळा केलात कि ११व्या वेळी त्याने तुम्हाला गृहित धरणे हा मनुष्यस्वभाव आहे.
मुलांमुळे आणि स्वतःचे काहीही करीयर/ उद्योग/ छंद नसल्याने रिकामपण आलेल्या बाईला आज रुटीनचा खुप कंटाळा आला आणि म्हणुन ती लेक्चर झाडतेय असे वाटते. उद्यापासुन आहेच.. येरे माझ्या मागल्या..
बायांनो.. अजुनही जाग्या व्हा आणि स्वतःच्या करीयर/ उद्योग/ छंदांवर केवळ लग्न झालंय म्हणुन किंवा मुलं झालीत म्हणुन पाणी सोडण्याआधी आणि "संसाराच्या वेलीवर फुलं हि हवीतच" म्हणुन मुलं जन्माला घालण्याआधी हजार वेळा विचार करा.