Submitted by जागो मोहन प्यारे on 10 May, 2012 - 05:57
धावत्याला जोश येई आणि रस्ता सापडे
पण दुतर्फा बोचकरण्या का उभी ही माकडे
दाबिता कळ काम होई अंगवळणी हे पडे
दहनही माझे विजेवर ना चिता ना लाकडे
काल बापू आज साई रोज बाबा वेगळा
पावला कोणीच नाही घालता मी साकडे
जन्म होता वासुनी आ श्वास पहिला घेतला
जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे
वासनांचा खेळ सारा या इथे अन त्या तिथे
शुष्क चाफा मज मनाचा व्यर्थ फुलण्या धडपडे
गुलमोहर:
शेअर करा
जन्म होता अधिरतेने श्वास
जन्म होता अधिरतेने श्वास पहिला घेतला
जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे
वासनांचा खेळ सारा अवति भवती रंगला
शुष्क चाफा मज मनाचा व्यर्थ फुलण्या धडपडे
>>
छान
========
काल बापू आज साई - असे करा. म्हणजे 'उद्या' या शब्दामुळे वृत्तभंग होणार नाही
चालतो नाकासमोरी पण तरी होतो
चालतो नाकासमोरी पण तरी होतो गुन्हा
काय मी करणार जर का नाक माझे वाकडे
हा माझा जुना शेर व जमीन आठवली. आता सांगलीला येईन तेव्हा रॉयल्टी द्या
(No subject)
एकदम 'उत्स्फुर्त !' - मस्तच,
एकदम 'उत्स्फुर्त !' - मस्तच, खूप आवडली गझल....
वृत्तभंगाच्या त्वरीत पर्यायी
वृत्तभंगाच्या त्वरीत पर्यायी सूचनेचे मानधन वेगळे बरं का कागलकर
ओके
ओके
छान! चालतो नाकासमोरी पण तरी
छान!
चालतो नाकासमोरी पण तरी होतो गुन्हा
काय मी करणार जर का नाक माझे वाकडे >>>
"सरळ चालता येईना नाक वाकडे" अशी नवी म्हण चालू व्हायला हरकत नाही.
बेफिंना तिथेही रॉयल्टी द्यावी लागेल ना मग?
मार्ग झाले वाकडे......... खूप
मार्ग झाले वाकडे......... खूप छान !!
र्हस्व दीर्घाच्या सुटींचे
र्हस्व दीर्घाच्या सुटींचे काहीतरी करा आता जामोप्या.
बेफिंना तिथेही रॉयल्टी द्यावी
बेफिंना तिथेही रॉयल्टी द्यावी लागेल ना मग?>>
नव्हे, फक्त नाक सरळ असल्यास वाकडे करून घ्यावे लागेल
र्हस्व दीर्घाच्या सुटींचे काहीतरी करा आता जामोप्या.>>
अहो ते फक्त गझला करत नाहीत, ते विविध दाखले देऊन धर्म, जात, समाज, राजकारण, कायदे, प्रथा, शिक्षण, भाषा या सर्व विषयांवर मायबोलीकरांच्या नाकी नऊ आणत असतात, त्यामुळे गझलेपुरती त्यांना अजून काही दिवस ही सूटच द्यावी लागेल
ओके
ओके
(No subject)
र्हस्व दीर्घ दुरुस्त केले.
र्हस्व दीर्घ दुरुस्त केले.
र्हस्व दीर्घ दुरुस्त केले.>>
र्हस्व दीर्घ दुरुस्त केले.>>
आता र्हस्व हा शब्द दुरुस्त करा
केले
केले
आता र्हस्व हा शब्द दुरुस्त
आता र्हस्व हा शब्द दुरुस्त करा>>>>>>>>>

ना़का समोर पाहून, दिलेली सरळसोट प्रतिक्रिया.......
लाकडे आणि वाकडे अप्रतिम.
लाकडे आणि वाकडे अप्रतिम.
interesting Gazal!
interesting Gazal!
जन्म होता वासुनी आ श्वास
जन्म होता वासुनी आ श्वास पहिला घेतला
जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे...
खूप छान.....
काल बापू आज साई रोज बाबा
काल बापू आज साई रोज बाबा वेगळा
पावला कोणीच नाही घालता मी साकडे.............. छान... हा शेर वाचून मला माझा शेर आठवला.
आज देव्हार्यातले तेतीस कोटी मोजले
वाटले होते कुणी पावेल एखादा तरी.............. मलाही वेगळी रॉयल्टी का काय ते.......
मस्त आहे गझल.
(No subject)
(No subject)