जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे

Submitted by जागो मोहन प्यारे on 10 May, 2012 - 05:57

धावत्याला जोश येई आणि रस्ता सापडे
पण दुतर्फा बोचकरण्या का उभी ही माकडे

दाबिता कळ काम होई अंगवळणी हे पडे
दहनही माझे विजेवर ना चिता ना लाकडे

काल बापू आज साई रोज बाबा वेगळा
पावला कोणीच नाही घालता मी साकडे

जन्म होता वासुनी आ श्वास पहिला घेतला
जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे

वासनांचा खेळ सारा या इथे अन त्या तिथे
शुष्क चाफा मज मनाचा व्यर्थ फुलण्या धडपडे

गुलमोहर: 

जन्म होता अधिरतेने श्वास पहिला घेतला
जिंदगीचा स्पर्श होता मार्ग झाले वाकडे

वासनांचा खेळ सारा अवति भवती रंगला
शुष्क चाफा मज मनाचा व्यर्थ फुलण्या धडपडे
>>

छान

========

काल बापू आज साई - असे करा. म्हणजे 'उद्या' या शब्दामुळे वृत्तभंग होणार नाही Happy

चालतो नाकासमोरी पण तरी होतो गुन्हा
काय मी करणार जर का नाक माझे वाकडे

हा माझा जुना शेर व जमीन आठवली. आता सांगलीला येईन तेव्हा रॉयल्टी द्या Proud

Proud

ओके Happy

छान!

चालतो नाकासमोरी पण तरी होतो गुन्हा
काय मी करणार जर का नाक माझे वाकडे >>>
"सरळ चालता येईना नाक वाकडे" अशी नवी म्हण चालू व्हायला हरकत नाही.
बेफिंना तिथेही रॉयल्टी द्यावी लागेल ना मग? Lol

बेफिंना तिथेही रॉयल्टी द्यावी लागेल ना मग?>> Biggrin

नव्हे, फक्त नाक सरळ असल्यास वाकडे करून घ्यावे लागेल Proud

र्‍हस्व दीर्घाच्या सुटींचे काहीतरी करा आता जामोप्या.>> Lol

अहो ते फक्त गझला करत नाहीत, ते विविध दाखले देऊन धर्म, जात, समाज, राजकारण, कायदे, प्रथा, शिक्षण, भाषा या सर्व विषयांवर मायबोलीकरांच्या नाकी नऊ आणत असतात, त्यामुळे गझलेपुरती त्यांना अजून काही दिवस ही सूटच द्यावी लागेल Lol

ओके Proud

Rofl

केले

काल बापू आज साई रोज बाबा वेगळा
पावला कोणीच नाही घालता मी साकडे.............. छान... हा शेर वाचून मला माझा शेर आठवला.

आज देव्हार्‍यातले तेतीस कोटी मोजले
वाटले होते कुणी पावेल एखादा तरी.............. मलाही वेगळी रॉयल्टी का काय ते....... Proud

मस्त आहे गझल.

Happy

Back to top