मनगट खूपच दुखल्याने भरपूर रडून झाल्यावर सानिया ( आपली मिर्झा हो !) खोली बाहेर पडली.. जरा कॉफी प्यावी म्हणजे बरं वाटेल असा विचार करून ऑलिंपीक विलेज च्या कॉफी शॉप च्या दिशेने निघाली..तसही इथे कोणी फारसं आपल्याला ओळखत नाही त्यामुळे एकेरी आणि दुहेरीत धुव्वा झाल्याचा निषेध-बिषेध करायला कोणी येणार नाही असा विचार तिने आधी केला होताच. दुकानातल्या चिनी मुलीशी "संवाद" साधून आपल्याला हवी ती कॉफी एकदाची मिळाल्यावर ती बाहेर पडली.. तितक्यात मागून आवाज.."Hey Sania, how are you dear? would you join me for coffee?" "आयला... रॉजर फेडरर !!!!!!! हा आपल्याला नावनी ओळखतो???? आणि आपल्याला एक काम नाही पण हा इथे कसा?? ह्याची quarter final आजच होती ना?? आणि चेहेरा असा ओढलेला का दिसतोय???? आणि त्याची ती girl friend की बायको असते प्रत्येक मॅच ला ती कुठे दिसत नाही !! पण दिसतो बा़की हँडसम हा!!! " हा एव्हडा सगळा विचार मनात करून प्रत्यक्ष काय बोलावं हे न समजल्याने फक्त "hehehehee.. ya.. I mean sure.. I mean why not??" असं काहिसं म्हणाली...
*********************************************************************
मंडळी तुम्हाला करायच एव्हडंच की सानिया आणि रॉजर मधला ह्या पुढचा संवाद रंगवायचाय.
नियमः
१.मर्यादा : साधारण ५०ओळी.
२. प्रसंग काल्पनिक असल्याने अर्थातच लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पुढचे संवाद मराठी त लिहावे. अधे मधे इंग्रची चा वापर चालेल.
३. मनातले विचार किंवा actions (e.g. खूर्ची वर बसत.. हसत.. एकडे तिकडे पहात इ.) कंसामधे लिहावे.
४. एक आयडी कितीही प्रवेशिका टाकू शकतो फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मधे लिहाव्या.
५. निकाल जनमत चाचणी ने.
६. स्पर्धेची अंतिम मुदत सोमवार १५ सप्टेंबर.
**********************************************************************
मायबोली
मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.
मायबोली गणेशोत्सव २००८