'ती' बात नाही

Submitted by वैभव फाटक on 6 May, 2012 - 12:47

सूर पक्का लागला जर ज्ञात नाही
का म्हणावे बेसुरा मी गात नाही ?

साबुदाणा चापला अन वर म्हणालो
"आज तर 'एकादशी', मी खात नाही"

चाललो मी, जर तुला झालो नकोसा
त्याग हा तर, तू दिलेली मात नाही

भ्रष्ट नेता पाहुनी जनता म्हणाली
" 'कमळ' परवडले परंतू 'हात' नाही"

काय तुलना जीव जडल्या झोपडीची ?
भव्य प्रासादातही 'ती' बात नाही

वास्तवाशी आज नाते जोडले मी
कल्पनाविश्वात आता न्हात नाही

चंद्रम्याला एकदा ना धाडते पण,
धाडला ना 'दिवस' ऐसी रात नाही

----- वैभव फाटक ( ५ मे २०१२) -----

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

काय तुलना जीव जडल्या झोपडीची ?
भव्य प्रासादातही 'ती' बात नाही

वास्तवाशी आज नाते जोडले मी
कल्पनाविश्वात आता न्हात नाही>>

छान खयाल आहेत

धन्यवाद...मी या ग्रुप ला खूप दिवसांपासून वाचत आलो आहे...
माझ्यात सुधारणा व्हावी या हेतूने मी मायबोलीवर लिहायला लागलो आहे..
तेंव्हा काही चुकल्यास सर्वांनी मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती..