Submitted by जागो मोहन प्यारे on 5 May, 2012 - 16:53
बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये
जन्मता त्या टाकणार्या तू खळा शोधून ये
जीवनाची द्वाड रेती निसटली हातातुनी
सोडुनी गेला तुला त्या तू पळा शोधून ये
जीवनाचा अर्थ पाणी सांगती जन सारखे
बुडविली नौका तुझी त्या तू जळा शोधून ये
कर्म करता कर्म करणे आणि जा विसरूनिया
बोलते गीता तरीही तू फळा शोधून ये
बंध होते प्रीतिचे अन स्वार्थ नव्हता कोणता
आपल्याला जोडणार्या तू बळा शोधून ये
गुलमोहर:
शेअर करा
खरं तर रदीफ शोधू नये असे
खरं तर रदीफ शोधू नये असे घेतले होते.. पण सगळे पूर्ण झाल्यावर कळले की शोधून ये हे जास्ती समर्पक वाटेल. म्हणून तसे बदलले. शोधू नये असे वाचल्यास वेगळे अर्थ मिळतील ( जे मला पूर्वी अपेक्षित होते.)
रदीफ पहिल्यांदाच घेतले.
येतेय येतेय... आशयाकडे वाटचाल
येतेय येतेय... आशयाकडे वाटचाल सुरू झालीय....
क्या बात है... !!
क्या बात है... !!
छान...
छान...
वा सुरेखच, खूप आवडली हे वेगळे
वा सुरेखच, खूप आवडली हे वेगळे सांगायला पाहिजे का ?
व्वा!!!!
व्वा!!!!
एक वेगळाच जामोप्या..
एक वेगळाच जामोप्या.. आवडेशकुमार
जीवनाची द्वाड रेती निसटली
जीवनाची द्वाड रेती निसटली हातातुनी>>
आपल्याला जोडणार्या तू बळा शोधून ये>>
ओळी मस्तच
गझल जमलेली नाही. (अर्थात, आपण आत्ताच गझल रचता आहात हे माहीत आहे, पण आपला मैत्रीखातर स्पष्ट लिहितो)
रदीफ नीटशी निभावल्यासारखी नाही
बळा, जळा असे शब्दप्रयोग खटकले. बळाला, जळाला अशा शब्दांची ती रुपे गझलेत शोभत नाहीत.
आशय सुस्पष्ट होत नाहीये. अर्थात, वृत्तावर हुकुमत आणी सफाई आली की तुमचे खयाल वाचायला मजा येणार हे नक्कीच.
धन्यवाद