Submitted by मकरन्द जामकर on 5 May, 2012 - 03:49
यार, थोडी तू,
ढोसून घे !!
आज, जरा तू,
जगुनी घे !!!!
पाहशील तोच,
कितीदा "शोले "?
ष्टोरी ती पाठ,अन,
जीवन रटाळ झाले !!!!
भूतकाली रे,
काय दडलंय,
नको उगालूस
जे घडलय,
त्यावाचून का,
काही अडलंय ??
त्यापेक्षा पेला,
तो भर जरा,
जीवनात आनंद ,
भर जरा !!!!!!
वर्तमानाचा तू तर राजा,
दुखाचा न गाजावाजा,
आला दिन होई वजा,
कष्ट कर अन मार मजा,
भविष्याची ती,
चिंता कशाला ?
जे आहे ज्ञात,
त्याची टोचणी कशाला ?
सोबत न येणार जे,
त्यांचा मोह कशाला ?
नको माथेफोड करू,
कोरड पडली,
न घशाला ?
यार, थोडी तू,
ढोसून घे !!
आज जरा,तू,
जगुनी घे !!!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
भविष्याची ती, चिंता कशाला
भविष्याची ती,
चिंता कशाला ?
जे आहे ज्ञात,
त्याची टोचणी कशाला ?
सोबत न येणार जे,
त्यांचा मोह कशाला ?
छान
धन्यवाद.
धन्यवाद.
व्वा. ते 'ढोसण्यायोग्य' पेय
व्वा. ते 'ढोसण्यायोग्य' पेय म्हणजे इंहलोकीचे अमृतच जणू. सर्व कवी-लेखक-रसिकांनी त्याचे प्राशन-प्रचार-प्रसार करायलाच हवा!!!!!
मात्र जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण 'ढोसल्यामुळे' कसे होत असावे हे समजले नाही.