पोलिस एनकाऊंटर...... असेही एक

Submitted by aabhagwat@hotma... on 27 April, 2012 - 12:25

1988/89 ची गोष्ट आहे. त्या दिवशी ऑफिसला जायच्याएवजी डायरेक्ट कस्टमर कडे गेलो होतो. ऑफिस वर पोहचता पोहचता पाच वाजून गेले होते. ऑफिस मध्ये शिरतोय तोच प्यून .. "सर कुठे होतात ? तुम्हाला प्रभात रोड पोलिस चौकीतुन फोन होता .. तुम्हाला चौकी वर बोलवलय ....ताबडतोप"
"मला का?" मी विचारले." माहीत नाही चौकीतून दोनदा फोन आला होता...घरून पण मोठ्या साहेबांचा फोन होता." ठीक आहे म्हणत मी लगेच निघालो आणि प्रभात रोड पोलिस चौकी वर गेलो. तिथे एक शिपाई सोडला तर कोणीच न्हवते. मला बघून तो म्हणाला "काय पाहिजे साहेब?" "हवालदार हिरवे आहेत का?" मी विचारले.... "नाही ते राऊंड वर आहेत ...काय काम होते?" " काही नाही मला भेटायला बोलावले होते त्यांनी".."तुम्ही भागवत का?" "हो" .." hmm या आत ....MZE ...... गाडी तुमचीच का ?" " हो. का हो?" "तुम्ही चालवत नाही का ती?' " नाही ...का पण?" "काही नाही तुमचा ड्रायवर तीन चार गाड्या उडवून पळून गेलाय....गाडी भाड्याने लावलीये का?" गाडी दुसर्‍या ऑफिसला दिलेली होती ...आता ह्याला कुठे ते एक्सप्लेन करा म्हणून म्हंटले "हो." "घरी माहीत नाही का?" आता घरच्यानचे आणि ह्याचे काय बोलणे झाले ते माहीत न्हवते म्हणून म्हंटले "नाही." " ठीक आहे" तो शिपाई म्हणाला "उद्या सकाळी दहाला या ..आणि डायरेक्ट डेक्कन पोलिस स्टेशन वरच या ...तिथे असतील हिरवे आणि ते नसतील तर रायटर शेलारना भेटा .. आणि हो ड्रायवरला आणि गाडीची कागदपत्रे पण आणा बरोबर ."

दुसर्‍या दिवशी बरोबर सकाळी दहाला डेक्कन पोलिस स्टेशन वर गेलो..रोकडे.."ड्रायवर" सह. मला वाटत होत आमच्या हीरो ने कोणाला तरी झासा दिला असणार आणि इथल्या टिपिकल इरसाल पुणेरी म्हातार्‍याने तक्रार केली असणार. पोलिस स्टेशन वर गेलो. बाहेरच "रायटर" बसला होता...कोणाचे तरी स्टेटमेंट चालू होते. मी तिथे डोकावतच त्याने ने विचारले .."काय आपले?" मी म्हणालो "मी भागवत" ...."hmm या ...तुमचीच वॅट बघतोय ..बसा जरा... हे समपवतो आणि मग घेतो तुम्हाला." तिथेच शेजारच्या बाकड्यावर बसलो. "काय झालय"? जरा टेन्स दिसणारा रोकडे म्हणाला ..".काय म्हणजे? तू काल दोन तीन गाड्या उडवल्यास" ... "मी?" "हो असे पोलिसांचे म्हणणे आहे."

यथाअवकाश त्या रायटर ने आम्हाला बोलावले." hmm बोला....अतुल आनंद भागवत, राहणार प्रभात रोड आपणच का?"..."हो."......" MZE ............ ह्या रजिस्ट्रेशन क्रमकाची गाडी आपलीच का?" " हो." "कुठाय तुमचा तो ड्रायवर?" म्हंटलं हा काय इथे आहे.... "ये रे इकडे" म्हणत त्याने रोकडेला बोलावले ..."लायसेंस" .... "हे घ्या" म्हणून त्याने लायसेंस दिले ...."कारे गाडी चालवतो का काय करतो चार चार गाड्या उडवल्यास आणि ते सुद्धा भर चौकत, सिग्नल तोडून'?" ... "अहो मी नाही असे काही केलेले" ...अगदी काकुळ्तेने रोकडे संगत होता.

"गाडी आणलीए का बरोबर?"... मी म्हंटले हो. "कुठे आहे". आम्ही वरच्या माजल्या वर होतो...रायटरच्या मागे दिसणार्‍या पार्किंग लॉट कडे हात करून मी म्हणालो "ती तिकडे लावलीये".... मागे वळून बघत तो म्हणाला "कुठाय?" मी परत हात त्या दिशेला करत म्हणालो "ती काय जांभळी पांदरी लूना आहे न तीच".... "लुना?" तो जवळ जवळ ओरडलाच... 'आम्हाला गंडावताय का राव? ओहो बस आहे बस आख्खी बस आहे निळ्या रंगाची...SKF ची .. लुना कसली आणली आहेत?"

"बस ? नाही हो आमची तर लुनाच आहे..तुम्ही सांगितलेल्या नंबरची .....हे बघा कागदपत्र".

"चाइला त्या आरटीओ च्या..xxxxxxx" "अहो त्या आरटीओ वाल्याची काय चूक तुम्ही दिलेल्या नंबर वरुन त्याने पत्ता दिला".

"अहो पण नंबर कसा चुकेल दोन पोलिस चार गाड्यांचे मालक, आजूबाजूचे बघे सगळ्यांनी हाच नंबर टिपून घेतला होता"...
"मग आता ...मी ..."
"काही नाही एक काम करा तुम्ही स्टेटमेंट द्या आणि जा" ... "काय लिहू स्टेटमेंट मध्ये?" " हेच की अमुक अमुक नंबर ने रजिस्टर असलेली गाडी ही लुना मोपेड असून तिचा इंजिन नंबर आणि चसिस नंबर असा असा आहे......आणि ह्या गाडी च कुठे ही अॅक्सिडेंट झालेला नाही" आणि जोडा तुम्ही आणलेले कागद पत्र त्याला. आणि जा"

--00--

गुलमोहर: