Submitted by महेश on 25 April, 2012 - 15:51
कळेना मिळालेले सोसू कसे
खोटेच ते सांगना हासू कसे
हरवले माझे स्वप्न वेडे
सत्यात ते सांगना आरासू कसे
नयनात होते काल थोडे
विझलेत ते सांगना आसू कसे
भरूनी तरी रिक्त आहे
आयुष्य ते सांगना मिजासू कसे
येईल काय परतोन कोणी
महेश ते सांगना तपासू कसे
(आयुष्यात पहिल्यांदाच गझल जमली आहे (असे मला वाटते) आणि ती तयार झाल्यावर प्रथम विनाविलंब माबोवर लिहिली आहे.)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
महेश, कल्पना चांगल्या आहेत.
महेश,
कल्पना चांगल्या आहेत. मात्रा /अक्षरगणवृत्ताचा अभ्यास आवश्यक आहे.
जयन्ता५२
सहमत आहे जयंतरावांशी सुंदर
सहमत आहे जयंतरावांशी
सुंदर खयाल आहेत
वृत्तात बसवून देईन मी थोड्या वेळाने
मुळात गझलियत असल्यावर तंत्र जमायला वेळ लागणार तेवढाच वेळ लागणार
छान
छान
सर्वांशी सहमत.
सर्वांशी सहमत.
महेशराव, गझलियत हा गझलेचा
महेशराव,
गझलियत हा गझलेचा आत्मा आहे... आणि आपल्या रचनेत तो आहे... तंत्र ही दुय्यम बाब आहे..ती आपणास जमेलच.
आपल्या रचनेतील खयाल आवडले. शुभेच्छा.
कळेना जे मिळाले ते कसे
कळेना जे मिळाले ते कसे सोसायचे
मुखावर हास्य मी खोटे कसे आणायचे
हरवले वास्तवाच्या अडगळीमध्ये जणू
कसे ते स्वप्न मी सत्यात साकारायचे
अता कुठल्याच दृष्याने न मी ओलावतो
अता नयनात ते अश्रू कसे आणायचे
अशा वृत्तात पुढचे खयालही बसावेत असे वाटते
धन्यवाद व आगळीकीसाठी दिलगीर आहे
सर्वांचे प्रतिसादाबद्दल
सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
खरेतर मात्रा /अक्षरगणवृत्ताचा विचार अजिबात न करता
केवळ गझलचे मुलभुत नियम पाळून मनातले विचार उतरवायचा प्रयत्न केला.
बेफिकीर दिलगीर कशासाठी, उलट आभारी आहे सुचनांबद्दल.
पुढच्या वेळेस अजुन काही सुचले तर उपयोगी पडेल.
aayla!! gazal joraat! lage
aayla!! gazal joraat!
lage raho !!!
मस्त
मस्त
अरे वा, महेशजी.... क्या बात
अरे वा, महेशजी.... क्या बात है ...