अकल्पित
समोरच्या सृष्टीसौन्दर्याकडे डोळे भरून बघता बघता निशा जणू भान हरपून बसली होती. हातातला वेफर्सचा पुडा तसाच राहिला होता. त्यातला एकही तुकडा तिने अजून उचलला नवता.कितीवेळ तसाच गेला कोणास ठाऊक ! तिच्या पोटात भुकेने कालवाकालव सुरु झाली तेवा ती एकदम भानावर आली . सावकाश वेफर्सचा पुडा उघडून एक तुकडा तिने तोंडात टाकला.जरा बाकावर रेलून बसत ने आसमंत निरखून पाहायला सुरुवात केली . दूरवरच्या एका बाकावर एक जोडपं बसलेले तिला दिसले .आकृती जरा ओळखीची वाटली.एकदा तिला वाटले कि जवळ जाऊन बघावं की व्यक्ती खरच ओळखीची आहे की काय ! पुन्हा तिने मन झटकली . छे! काहीतरीच काय? हे काय आपले गाव आहे का ओळखीचे कोणी भेटायला? आपल्या गावापासून शेकडो मैल दूर आहोत आपण! इथे ओळखीचे कोणी कसे भेटेल?
" पण नुसते जाऊन पाहायला काय हरकत आहे?" दुसऱ्या मनाने हरकत घेतली.
" नाहीतरी रिकाम्याच तर बसलोय ! असेलही कोणीतरी ओळखीचा, आपल्याचसारखा फिरायला आलेला !”
ती स्वतःशीच बोलत होती. अखेर तिनं ठरवलं jवळ जाऊन पाहूनच यावं!निर्णय झाल्यावर अर्धवट उठता उठता तिने समोर पहिले तो बाक रिकामा !
शी! काय हे? आपला विचार ठरेपर्यंत उठून देखील गेले ते!तिचं मन हळहळले .कोणीतरी ओळखीचं भेटलं असतं तर तासभर जरा जास्त चांगला गेला असता. परत गेल्यावर जास्त मजा आली असती हकीगत सांगायला!
जाऊद्या झालं! असं मनाशी म्हणत ती हॉटेलच्या खोलीवर परतली .गावातल्या एका ग्रुपबरोबर फिरायला म्हणून ती कोकणातल्या ह्या लहानशा गावात आली होती
.का कोण जाणे पण खूप दिवसापासून तिला ह्या ठिकाणी यावं असं वाटत होतं. पण काही न काही कारणाने जमलं नव्हतं एवढं खरं! या वेळी मात्र तिने
खूप प्रयत्न करून जमवलं होतं . आणि खरोखरच हे ठिकाण तिला इतकं आवडलं की ठरलेल्या दिवशी सगळे परत गेले तरी ती मात्र गेली नव्हती.
आणखी काही दिवस ह्या शांत वातावरणात राहायचा विचार करून तिने आपला एकटीचा मुक्काम वाढवला होतं. दोन्ही वेळा आयतं खावं, सकाळ संध्याकाळ
फिरायला जावं, दिवसा आरामात लोळत पुस्तक वाचावं असा दिनक्रम मनाशी ठरवला होता.
जाऊद्या झालं! असं मनाशी म्हणत ती हॉटेलच्या खोलीवर परतली .गावातल्या एका ग्रुपबरोबर फिरायला म्हणून ती कोकणातल्या ह्या लहानशा गावात आली होती
.का कोण जाणे पण खूप दिवसापासून तिला ह्या ठिकाणी यावंअसं वाटत होतं. पण काही न काही कारणाने जमलं नव्हतं एवढं खरं! या वेळी मात्र तिने
खूप प्रयत्न करून जमवलं होतं . आणि खरोखरच हे ठिकाण तिला इतकं आवडलं की ठरलेल्या दिवशी सगळे परत गेले तरी ती मात्र गेली नव्हती.
आणखी काही दिवस ह्या शांत वातावरणात राहायचा विचार करून तिने आपला एकटीचा मुक्काम वाढवला होतं. दोन्ही वेळा आयतं खावं, सकाळ संध्याकाळ
फिरायला जावं, दिवसा आरामात लोळत पुस्तक वाचावं असा दिनक्रम मनाशी ठरवला होता.खरं तर तिला स्वतःचंच आश्चर्य वाटत होतं. कधी एक मिनिट देखील
रिकामी न बसणारी ती या रिकामपणाला कंटाळली कशी नाही? स्वतःशी हसून तिने खोलीची खिडकी उघडली दूरवरचा आसमंत इथून दिसत असे . नुकतीच ती ज्या
पार्कमधून आली होती त्या समोरच्या पार्क कडे तिची नजर गेली . पुन्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला . ते मघाचच जोडपं पुन्हा बाकावर बसून गप्पांमध्ये गुंतलं होतं .
तिला काही सुचेना ! आता मात्र या जोडप्याला गाठायलाच हवं अशा विचाराने तिला झपाटलं. तिने पटकन पायात चपला अडकवल्या आणि दार ओढून घेत जवळपास धावतच
पार्क कडे निघाली . पार्कचा तो बाक गाठेपर्यंत ती धावतच राहिली. बाकापाशी पोहोचून तिने पहिले आणि मटकन खालीच बसली . बाक रिकामाच होता ! तिने आसपास नजर फिरवली .
दूरवर ते जोडपं हसत खिदळत परत जाताना दिसलं.” शुक शुक , अहो ...”.तिने हाक मारण्याचा प्रयत्न केला . ते थांबले नाहीत किंवा त्यांनी वळून सुद्धा पहिले नाही. बहुधा तिच्या हाका त्यांच्या कानावर पडल्या नसाव्यात !
पुन्हा एकदा निशाच्या वाट्याला निराशा आली होती . कुठलं कोण ते जोडपं , आपण त्यांच्यासाठी एवढा जीवाचा आटापिटा कशासाठी करतोय ? नाही भेटले ते तर एवढं वाईट कशासाठी वाटतं आहे आपल्याला? निशाला स्वतःचा राग आला . आता त्यांचा विचार मुळीच करायचा नाही . तिने स्वतःला बजावलं. रूमवर परतून तिने एक कादंबरी काढली आणि ती वाचण्यात ती रंगून गेली