ऑलिव्ह ऑईल संबंधी

Submitted by पूनम on 24 April, 2012 - 02:32

ऑलिव्ह ऑईलचा भारतीय स्वयंपाकात उपयोग कसा करतात ह्याविषयी माहिती हवी आहे. त्याआधी काही माहिती-
१) ऑलिव्ह ऑईल कधीही खाल्लेले नाही. त्याची चव कशी असते ह्याची कल्पना नाही.
२) भारतीय स्वयंपाकात, म्हणजे प्रामुख्याने 'फोडणी देणे' ह्यासाठी ते वापरता येईल का?
३) त्याची चव वेगळी जाणवते/ लागते का? रोजची भाजी, आमटी ऑलिव्ह ऑईल वापरून केली तर वेगळी लागते का?
४) त्याची फोडणी करू नये, ते तापवू नये, उलट ते कच्चंच खावं हे योग्य असेल तर कसं खाता येईल- भारतात मिळणारे पदार्थ वापरून? कुठे पाककृती असतील तर दुवा द्या, अथवा वेगळा धागा काढून लिहा कृपया.
५) अनेक प्रकारची ऑलिव्ह ऑईल्स पाहिली आहेत बाजारात. सुरूवात कोणत्या ऑऑपासून करावी?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरच्या तुपाचा मोह म्हणजे कामं वाढवून ठेवायचे धंदे गं. >>> अगदी !! पण विकतचं आवडतच नाही, म्हटल्यावर करना पडता है...

वीर संघवीचा हा लेख उत्तम आहे - http://www.virsanghvi.com/vir-world-ArticleDetail.aspx?ID=756

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलाचा स्मोक पॉइंट सर्वांत कमी असतो, त्यामुळे ते तापवू नये. स्मोक पॉइंट जितका जास्त, तितकं ते तेल चांगलं. त्यामुळे तळण्यासाठी सूर्यफुलाचं रिफाइंड तेल उत्तम.

ऑलिव्ह ऑईल / एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलला वेगळा वास येतो. आमच्याकडे आवडतो तो वास आणि चव. मध्ये एकदा मी लाईट ऑलिव्ह ऑईल आणले होते त्याला मात्र असा वेगळा वास नव्हता. भारतात जे लोकं ऑलिव्ह ऑईलचा वेगळा वास जाणवत नाही म्हणत आहेत ते असे लाईट ऑईल आणत नाहीयेत ना हे तपासून घ्या.

मागे आमच्या डायेटिशियनने आम्हाला दिवसाला प्रत्येकी ४-५ चमचे तेल /तुप वापरायला सांगितले होते. पण हे असं मोजणं अवघड आहे. खरंच तितकंच तेल्/तुप खाल्लं जातं की त्यापेक्षा जास्त खातोय हे समजत नाही.

एकूण महिनाभरात किती वापरलं जातं हे मोजणं जास्त सोप्प आहे. मला २.५-३ लीटर तेल लागतं महिन्याला. साडेतिन माणसं +बर्‍यापैकी पाहूणे असतात घरी. कनोला, सोयाबीन, सरसो असं आलटून पालटून वापरते. तिन्हीच्या १-१ लीटरच्या पिशव्या /बाटल्या आणलेल्या असतात. तेलाच्या कावळ्यात एका आठवड्यात कनोला, एका आठवड्यात सोयाबीन तेल काढते. आठवड्यातून २-३ वेळा सरसोच्या तेलाची फोडणी. मधून अधून घरच्या तुपाच्या फोडण्या. घरचं तुप मात्र १.५-२ किलो लागतं. Sad

माणशी अर्धा लिटर तेल प्रति महिना असं प्रमाण मी वाचलेल / ऐकलेल आहे.
आपण बाहेर खातो त्यावेळचं कस मोजणार किती तेल पोटात गेल ते?
त्यामुळे माणशी अर्ध्या लिटरपेक्षा कमीत भागतय का प्रयत्न करावा.

दालड्याला हेट लिस्ट मध्येच घातलेल बरय.

सरसोचे तेल मी नाही वापरू शकत. एकदा प्रयत्न केला होता. पण तेल तापल्यावर एक वास येतो तो सहनच नाही होत मला. Sad तेव्हापासून सरसो तेल नाही वापरत.
मी जास्त करून सूर्यफूलाचे तेलच वापरते. कधीकधी करडीचे आणि शेंगदाणा तेलही आणते.
ऑऑ सध्या आहे घरात. पण रोज नाही वापरत मी.

दालड्याला हेट लिस्ट मध्येच घातलेल बरय. >> हो मी एकदा डालड्यात बनवलेली भरल्या वांग्याची भाजी खाल्ली होती गरम गरम.. मस्त लागली होती.
पण गरम गरमच हं... गार झाल्यावर याक लागतात डालड्यातले पदार्थ Sad

चांगली चर्चा चाललीये. आजच्या दिव्यभास्करच्या पुरवणीत ऑऑ १-२ चमच्यापे क्षा जास्त नको अस आलेय. मेद आणि मेदाने होणारे इतर रोग (डा.बे.ह.इ.इ.) होतात म्हणे. पण तसही वर लिहील्याप्रमाणे कुठचही तेल ४-५ चमचे माणशी बरे राहील -- पण करणे कठीण.. Uhoh

मी ईटालियन पदार्थासाठी नेहमीच ऑ.ऑ वापरते. जस महेश ने वर सांगितल आहे त्या प्रमाणे सॅलड्स वर, ब्रेड क्रम्स, फ्रेश ब्रेड वर थोड्स कच्च ऑऑ मस्त लागतं.
मी पण एकदा आमच्या कंपनीतल्या डायटेशियन ला विचारले होते वेगवेगळी तेल एकत्र करुन वापरण्या बद्दल पण तिने ही हेच सांगितलं की , तुम्ही वेगवेगळी तेल नक्कीच वापरा रादर वापरायला पहिजेच. ती तेलं एकत्र करू शकता पण मग ते कच्चेच वापरा (जसे की सॅलड्स वर, चटण्यांवर वगैरे) त्यांना एकत्र करून गरम करू नका.

पौर्णिमा, ऑऑ नक्की वापर फायदा तर आहेच!

सरसोचं तेलं तापत असताना त्याचा उग्र वास येतो, तेल चांगलं तापलं की तो वास निघून जातो. मला पण तो वास सहन होत नाही (हल्ली सवय झालीये). त्यामूळे सरसोच्या तेलातल्या फोडण्या /भाज्या नवरा आणि दिर बनवतात. Happy

अगदी अगदी अल्पना. तेल खूप तापलं की जातो तो वास. पण तोपर्यंतच तो इतका डोक्यात बसतो माझ्या, की मी भाजी खाऊच नाही शकत. Sad
मला माहिती नसताना कोणी सरसोच्या तेलात बनवलेली भाजी मी खाऊ शकते मात्र. Happy

गोडेतेल किंवा डालडा पूर्वी सर्रास वापरायची पद्धत होती. ते पूर्ण म्हणजे पूर्ण बंद करा शक्य असेल तर. <<< गोडेतेल, नेमके कशाचे काढलेले असते?

अरुंधती, मला पण हेच वाटायचं. पण वाण्याकडे दरफलकावर शींगतेल आणि मीठातेल अशी दोन नावं वेगवेगळ्या दरानिशी असतात. (की हिंदीतले मीठातेल आणि मराठीतले गोडेतेल वेगवेगळी आहेत? )

पौर्णिमा, दोन प्रकारची ऑऑ बाहेर मिळतात. एक खूप दाट असतं आणि एक त्यापेक्षा पातळ (त्यांची नावं आठवत नाहीयेत आत्ता) दाट प्रकारचं ऑऑ इटालियन जेवणाला चांगलं तर पातळ प्रकारचं फोडण्या करायला. ही माहिती एका मैत्रिणीने दिलीये जी रेग्युलरली ऑऑ वापरते.

मी रोजच्या स्वयंपाकाला (फोडणी, पोळ्या, भाज्या वगेरे) ऑऑ वापरते. तळणासाठी vegetable तेल वापरते आणि तळण झाले कि ते फेकुन देते. तळणीचे तेल परत वापरु नये म्हणतात ना!! ऑऑ खुप महाग असते, त्यामुळे ते टाकुन द्यायला जिवावर येते म्हणुन हा उपाय.

थोडे विषयांतर - अमेरिकेत कोणी घरी लोणी बनवुन तुप बनवते का? मी unsalted butter आणुन बनवते तुप घरी. पण लोणी बनवले नाहिये कधी. याबद्दल कोणाकडे काहि tips असतील तर क्रुपया सांगाल का?

मी तळण, लोणचे वगैरे करायला शेंगदाणा तेल, रोजच्या स्वयंपाकात तसेच बेकिंगसाठी कनोला, सॅलड ड्रेसिंग करायला एक्स्ट्रा वर्जिन ऑ.ऑ. वापरते. मिस्टो मधे कनोला ठेवते स्प्रे करायला. तूप घरचे कढवलेले. साधारण ३ फॅट सर्विंग ठेवायचा प्रयत्न असतो.

गजानन, मला तुझ्यामुळे आजच हा साक्षात्कार झालाय! धन्स ....
मीठा तेल = तिळाचे तेल / खसखशीचे तेल असा एक अर्थ मिळाला.

<< मीठा तेल , की परिभाषा मीठा तेल , का अर्थ मीठा तेल - मीठा तेलसंज्ञा पुं० [हिं०मीठा+ तेल] १. तिल का तेल । २. पोस्ते के दाने या खसखस का तेल । >>
http://pustak.org/home.php?mean=59568

<< पोस्ता पुं० [फा० पोस्त] एक प्रकार का पौधा जिसके डोडों से अफीम तैयार की जाती है। >>

माझ्या मावशीने ऑऑवर सोया चंक्स परतून त्यावर मोकळा भात घातला होता. छान वेगळी चव आली होती. नेमका कसा केला होता ते मात्र माहीत नाही. Happy इथे जाणकारांना कदाचित क्रुती माहीत असेल..

अमेरिकेत Costco /Bj /SAMs अशा ठिकाणि त्यातल्या त्यात परवडत घाउक ऑऑ .मी नेहमीच सगळ जेवण त्यातच करते पण तळायला मात्र दुसरं कुठ्ल म्हण्जे Vegetable /CAnola Oil वापरते... वास बिसचा काही त्रास नाहीये ऑओ ने ..माझ्या कुटुंबात थोड कोलेस्टरॉल्चा त्रास आहे पण माझे नंबर्स सध्या तरी ठिक आहेत ...त्याचा ऑऑ चा संबंध नसेलही पण उगीच जिवाला शांती .....:)

ऑलिव्ह ऑईलवरुन हा धागा तुपापर्यंत आलेला आहे.. Lol म्हणजे मध्ये बाकीचे सगळे कव्हर झाले असेल.

भारतीय स्वयंपाकासाठी वापरायचे तर 'एक्स्ट्रा लाईट' च वापरावे. बाकीची ज्या पदार्थात त्यांचा फ्लेवर हवा असतो त्यासाठी वापरावीत.
इथे माहिती आहे- http://whatscookingamerica.net/OliveOil.htm

हे दोन ब्रँड, यांच्या प्रकारामध्येही कशासाठी वापरायचे ते लिहिले आहे.

http://carapelliusa.com/product.html

http://bertolli.com/products_oliveoil.aspx

(पण हे खूप महाग असेल तर सनफ्लावर का नको?)

तेलाचे दोन्ही धागे वाचल्यावर रोजच्या स्वयंपाकासाठी ऑ ऑ, सॅलड ड्रेसिंग, डिप्स इ. साठी EVOO आणि तळणासाठी कनोला आणावं ह्या निष्कर्षास आले आहे.

अमेरिकेत Costco /Bj /SAMs अशा ठिकाणि त्यातल्या त्यात परवडत घाउक ऑऑ >>>>> घाऊक घ्यायचं की नाही विचार करा:
तीन महिन्यांपेक्षा जास्त जुन्या ऑऑचे antioxidant गुण झपाट्याने कमी होत जातात असं संशोधन आहे.
Scientific article हवं असल्यास इथे आहे (मी फार खोलात वाचलेलं नाही) यावर विश्वास ठेवायचा झाल्यास ऑऑचे (तब्येतीसाठीचे) सर्व फायदे मिळवायचे असतील तर घाऊक आणण्यापेक्षा छोटी बाटली आणून लवकर संपवलेली बरी.

पौर्णिमा, ऑऑचा स्मोक पॉईंट कमी असल्याने मी त्यात फार चरचरीत फोडण्या वगैरे करत नाही. मोहरी तडतडेपर्यंत तापवायला नको वाटतं. थोडंसं तापवून जिरे, लसणीला चटका द्यायचा आणि त्यात भाजी घालून परतायची. पालेभाज्या बरेचदा ऑऑमध्ये परतून करते. ऑऑला स्वतःचा वेगळा स्वाद नक्कीच असतो. सरसोंच्या तेला इतका उग्र नक्कीच नाही, पण असतो नक्की.

मी ऑऑ सगळ्या स्वंयपाकासाठी वापरते, मलातरी वेगळी चव जाणवली नाही. सॅलड्साठी EV ऑऑ वापरते. तळणीसाठी व्हेज ऑइल वापरते. माझ्याकडे तळणीचे प्रमाण खूप कमी आहे. मी costcoतला ऑऑचा ब्रॅन्ड वापरते.

चना, मीही unsalted butter च वापरते तूप बनवायला. पण मलाही आवडेल जाणून घ्यायला कोणी इथे घरगुती पद्धत माहीत असेल तर. भारतात आई घरी बनवायची तेव्हा पाहिलेय किती मेहनत लागायची, त्यामुळे unsalted butter चा पर्याय मला खूप आवडतो.

हा धागा खूप चांगला आहे पण इथे लोकांच्या प्रतिक्रिया खूपचं चुकीच्या आहेत.
१) वर मामी म्हणतात ते अगदी योग्य आहे. अनेक तेल एकत्र मिसळून मग ते वापरुच नये.
२) तूपामुळे कोलेस्टेरॉल वाढते हे अगदी सत्य आहे.
३) मुळातच तेल अधिक प्रमाणात वापरु नये. अगदी ऑलिव्ह ऑईल सारखे खूप जास्त प्रमाणात Omega3 & Omega6 असणारे तेल किंचित जास्त वापरले तर चालते पण बर्‍याचशा तेलांमधले फॅट्स हे घातक असतात.
४) पोळ्यांना तेल जरुर लावावे. कोरड्या पोळ्या खाल्ल्यांनी शरिरात वात निर्माण होतो. म्हणून पोळ्यांना तेलाचा हलका हात जरुर द्यावा.
५) जाड बुडाच्या पातेलात वा कढईत तेल गरम करावे. स्टीलच्या कमी जाडीच्या पातेल्यात तेल तापवू नये. तेलातून धुर निघत असल्यास ते तेल वापरु देखील नये.
६) तळण काढल्यावर उरलेले तेल वापरु नये. ते सर्वात सर्वात हानीकारण आहे.
७) अभय बंग ह्यांचे पुस्तक मी वाचले आहे. त्यांनी तीळाचे तेल, सुर्यफुलाचे तेल, करडईचे तेल, सोयाबीनचे तेल, सरसोचे तेल एकत्र करुन वापरा असे लिहिले आहे. त्यांचे ह्याबद्दक नक्की काय संशोधन आहे हे मात्र त्यांनी लिहिले नाही. तेंव्हा मीही त्यांचे हे मत फक्त मत आहे म्हणून तसे केले नाही.
८) करडईचे तेल (सफोला) चांगले असते.
९) तेलापासून विकार टाळण्यासाठी अक्रोड, बदाम, पिस्ता आहारात असावेत. ह्यातून मिळणारे तेल हे Good cholesterol म्हणून शोधले गेलेले आहे.
१०) ऑलीव्हच तेल जर ताज असेल तरच त्याचा घमघम वास येतो. आपल्याकडे पोचलेल्या तेलाचा वास केंव्हाच उडून गेलेला असतो. भाजी शिजल्यावर तर कुठले तेल वापरले हेही कळत नाहे.
११) कोल्ड प्रेस्ड ऑलिव्ह पासून जे तेल निघते ते चांगले मानल्या जाते.
१२) त्वचेसाठी फिगारो म्हणून ऑलिव्हचे तेल मिळते.

मी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह्व ऑईल व कनोला ऑईल वापरते आलटून पालटून. तळण अजिबात होत नाही.
ऑऑ चांगले असते पण धूर येईतो अजिबातच तापवू नये व एकच एक तेल ही वापरू नये. त्यामुळे पौ, तू आण तेल, छोटीच बाटली आण. बंगांना फॉलो कर.

रैना, मी पुस्तक शोधून लिहीते माणशी किती तेल ते. मी तेल प्रचंड कमी वापरते त्यामुळे लक्षात नाहीये आता..

Pages