राजगडाबदल खूप ऐकून होतो. ऐकून असल्यावर जाणे झाले नाही असे झाले, असे झाले नाही असे झाले, तरच नवल. आपल्या मायबोलीकरांपैकी घुबड, चित्ता, आगीचा बंब, हिरवा सरडा, आकांक्षा, बधीर, संजीव ढमाले, बाप, नणंद व शंख हे सदस्य आले होते. कुचकट कोंबडा, कंपूबाज, पिवळा एजंट, कुबट तिरळा, ओबामा, आर्त व्याकुळ, पैठणी, भायखळा किंग हे येऊ शकले नाहीत. त्यांचा निषेध.
वृत्तांतः
सकाळी गेलो व रात्री परतलो.
विशेष बाबी:
हिरवा सरडा हाच आर्त व्याकुळ असल्याचे तेथे समजले.
इतर नगण्य किरकोळ बाबी:
येथे पूर्वी शिवाजी महाराज राहायचे. हवा छान आहे. दरी खोल असून घारी जवळून पाहायला मिळतात. आगीचा बंब वाट्टेल त्या डोंगराला तोरणा, रायगड, सिंहगड अशी नावे देत सुटला होता. कुबट तिरळा ही वास्तविक एक स्त्री आहे. हिरवा सरडा आल्यामुळे व तोच आर्त व्याकुळ असल्यामुळे आर्त व्याकुळ न आल्याचा निषेध मागे घेत आहोत.
काही नोंदी:
१. या डोंगराला एक भोक पडलेले असून त्यात बसण्याइतकी जागा आहे. शंख वर त्या भोकापर्यंत चढू शकला नाही. त्यामुळे त्याला आम्ही 'तू वर चढू शकला नाहीस' असे सांगितले. त्याने ते मान्य केलेले आहे. या भोकाला नेढे म्हणतात असे ओबामा ठामपणे म्हणाला. मात्र त्यावर वाद झाले नाहीत.
२. बधीर यांचे गुर्र गुर्र हे आवाज ऐकून प्रथम जवळपास वाघरू असल्याबद्दल संशय व्यक्त करण्यात आला. नंतर त्यावर पडदा पडला. त्या प्रसंगावर 'चित्ता' यांनी एक शेर रचला, तो असा
आवाज गुरगुर , म्हणे वाघ आला
कुणी का असेना 'चित्ता' म्हणाला
हा शेर आहे की मतला यावर तेथे नणंद व चित्ता यांचे वाजले. शेवटी तो बधीर यांनी निर्माण केलेला 'स्वर' असल्यामुळे हा स्वरकाफिया असलेल्या गझलेचा मतला आहे हे नक्की झाले. मात्र अजून त्यावर थोडी धुसफूस चालू आहे असे खात्रीलायकरीत्या समजलेले आहे.
३. राजगड हा मानवनिर्मीत गड नसल्याचेही तेथे समजले. तेथून एक वाट पुण्याला येते असे म्हणतात. आम्ही पुण्याहून उलटे तेथे गेल्यामुळे आम्हाला ती वाट दिसली नाही.
४. घुबड आय टी मध्ये नोकरीला आहे
५. अफजलखानाची कबर या गडावर नाही. (यामुळे एक गट नाराज असल्याचेही समजते).
६. हा गड चढणे हे उतरण्यापेक्षा अवघड आहे असे 'बाप' या सदस्याचे म्हणणे आहे. बाप बारा वर्षाचा असून या मोहिमेत सामील झाला होता. आम्हा बाकी सर्वांना गड चढणे व उतरणे हे दोन्ही तितकेच कठीण वाटले.
७. आकांक्षाने सॅन्डविचेस आणली होती. ती, संजीव व घुबड यांनी ती संपवली.
८. या गडाला बालेकिल्ला आहे असे तेथे गेल्यावर समजले. मात्र पुरेशी चर्चा झाल्यानंतर गडाला बालेकिल्ला नसून बालेकिल्ल्याभोवती गड आहे असे एकमताने ठरले.
काही साहित्यविषयक अनुभुती
१. येथपर्यंत पोचलेल्या माणसाला तोवर झालेले श्रम, मिळणारी थंडगार हवा, नेत्रसुखद सभोवताल व आता चढ संपलेला असून काहीतरी खायला मिळेल ही भावना या मिश्रणातून साहित्यकल्पना सुचतात हे खरे आहे. त्याचा परिपाक म्हणून माणसे विविध दगडांवर आपली नावे कोरून साहित्यनिर्मीती करतात. एखादा कमी दमला असेल तर तो त्याच्या स्वतःच्याच नावासोबत एखाद्या मुलीचेही नांव कोरतो व जनमजनमच्या प्रेमाला पत्थरकी लकीर असे स्वरूप दिल्याच्या आनंदात आरोळी ठोकतो. शंख व आगीचा बंब यांनी आपली सदस्यत्वाचीच नामे एका दगडावर कोरली व साहित्यनिर्मीती केली.
२. येथून पुन्हा परतू शकलेला वृत्तांत लिहू शकतो व काहीशी अधिक सकस साहित्यनिर्मीती करू शकतो. साहित्यीक बनण्याच्या क्लेशकारक प्रवासात राजगड स्वारी (कोणीही शत्रू नसताना) याचा अंतर्भाव असल्यास अनुभुती खणखणीत अभिव्यक्तीमधून साकारल्या जातात हा आमचा स्वानुभव!
३. सहल असली की हिशोब लिहिणे आलेच. याही माध्यमातून एक 'सर्वांना मान्य' अशी साहित्यनिर्मीती आपोआपच होते. तीव्र बोचर्या प्रतिक्रियांच्या चाळणीतून हे साहित्य तावून सुलाखून निघत असल्यामुळे ते साहित्य व त्यावर आलेले अभिप्राय जन्मभर लक्षात राहतात.
काही काव्यविषयक जाणिवा (यात सर्वानुमते गझल समाविष्ट करण्यात आली नाही:
१. गड चढताना अतीव वेदना होतात व वेदनेला एक रिदम मिळून माणूस दर श्वासागणिक 'आ' असा ओरडतो. यातून आपोआपच लयविषयक तत्व मुरते. यानंतर उच्चारले जाणारे गद्य विधानही पद्य होऊ लागते. एक उदाहरणः
"ए .. आ.. शंख्याच्या... आईला... आ... कसला... आ.. हा .. गड का काय... आ"
यात प्रत्येक यतीनंतर 'आ' हा स्वर आलेला आपल्याला दिसेलच.
२. परिश्रमांनंतर मानसिकता उजळते व त्यातून प्रामाणिक भावना तितक्याच प्रामाणिक ताकदीच्या शब्दांमधून प्रकट होतात. यामुळे काव्यात तेज आणणे सुलभ होते. उदाहरणः
"सॅन्डवीच कुठेयत भडव्या?"
हे वाक्य एरवी काव्यात असे लिहिले गेले असते.
"हाय मित्रा सॅन्डविच गेले कुठे रे"
पण परिश्रमांमुळे प्रामाणिकतेची जी झळाळी त्या अभिव्यक्तीला प्राप्त होते ती एकंदर काव्यप्रवासातील यशःटप्प्यांसाठी अनुकूल ठरते. दुसरे उदाहरणः
"तुझ्यायच्चा आर्त व्याकूळ साला"
आता आर्त आणि व्याकूळ या दोन जाणिवांना काव्यात लाभलेले धृवस्थान पाहता परिश्रमांनंतर त्याबद्दलचा मत्सर किती सामर्थ्याने व्यक्त होतो हे आपण वर पाहिलेतच.
काही ऑफलाईन वादः
आपण ऑनलाईन नेहमीच भांडतो. पण राजगड चढताना, चढून झाल्यावर व उतरताना आणि उतरल्यावर, तसेच परतीच्या एस टी प्रवासात जो एकंदर तीव्र शीण येतो त्याने क्षीण झालेल्या शरीरांनी लोक तुफान ऑफलाईन वाद घालतात. हिशोब, खाद्यपदार्थांचे असमान वाटप, चढताना आधार न देणे, उतरताना आधार काढून घेणे, नेढ्याला जायची गरज होती का, अशा अनेक विषयांवर शिवीगाळ होते. यामुळे मन लख्ख स्वच्छ होऊन त्यात विशुद्ध प्रेमाला स्थानापन्न व्हायला जागा मिळते.
प्रचिची जबाबदारी:
हा हा हा हा! तुम्हाला काय वाटले??? राजगडावर गेल्यावर कोणा प्रचि नामक सदस्याची जबाबदारी घ्यावी लागते की काय अशीच भीती वाटली ना? नाही नाही नाही नाही. अज्जिबात नाही. घाबरू नका. प्रचि म्हणजे प्रकाशचित्रे असून त्याची जबाबदारी सहलीला न येऊनही भायखळा किंग या स्त्री सदस्याने उचलल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आम्ही कॅमेरा सरळ त्यांच्याकडे देऊन टाकला कारण त्यांचा या क्षेत्रातील अधिकार वादातीत की काहीसा असल्याचे समजते.
तर मित्रांनो... अशी झाली आमची राजगड सहल... आता द्या बरं छान छान प्रतिसाद??????
आपला गिर्यारोहक मित्रः
लाजरा गरूड
===================================
प्रतिसादः
===================================
रेखा:
माझ्या निवडक दहात
==================================
हेमा:
आला का वृत्तांत एकदाचा...
=================================
सुकट बोंबीलः
हायल्ला... भायखळा किंग बाईये होय... मला काहीतरी भलतंच वाटायचं
================================
रेखा:
सुकट्या, भलतंच म्हणजे काय? बाई नाहीतर पुरुषच असणार ना?
===============================
उपाध्ये:
मी आठवा
================================
उपाध्ये:
अर्र्र्र्र सॉरी... पाचवाय मी
================================
गुर्हाळ :
माझ्याही निवडक दहात
================================
सुकट बोंबील :
रेखे... आता तोंड उघडू नकोस..
===============================
काणक्यः
राजगड तुमच्या बापाने पाहिलावता का?
================================
काकूडू :
अॅडमीन, इकडे लक्ष द्या
================================
काणक्यः
अॅडमीनला कामं नाहीत का दुसरी??
===============================
पेरू:
काणक्या, तोंड सांभाळ
===============================
दगडः
अफजलखानाची कबर नाहीये म्हणजे काय?? नाहीच्चे मुळी.. ती नाही आहे यात काय विशेष नोंद?
===============================
लाजरा गरूडः
काणक्य, वाईट वाटले तुम्ही एकदम बाप काढलात हे पाहून. माझे वडीलही गेलेले आहेत तसे राजगडला. पण जरा सौम्य बोलाल का प्लीज??
==============================
बिहारी:
टुकार वृत्तांत आहे. कुठेही जायचे आणि काहीही खरडायचे. बोडक्याच्या काव्यविषयक जाणिवा
=============================
आगीचा बंबः
बिहारी, प्रत्येक ठिकाणी तोंड घातलंच पाहिजे का?
===========================
ल्युसी:
मी येथे नवीन आहे. छान आहे वृत्तांत. पण का गेला होतात राजगडला? उगीच?
===========================
बिहारी:
ल्युसीबाई, का गेलावतात म्हणजे काय? अहो यांना काय उद्योग आहे का? घरच्यांनी वार्यावर सोडलेले पशूपक्षी हे. घुबड काय, गरूड काय, चित्ता काय! वाट्टेल तिथे जातात आणि परत आले की डोक्याला ताप देतात
==========================
शकू कपूरः
माझ्या निवडक दहात
=========================
अभ्यंकरः
गरड्या, तोडलंस रे... अप्रतिम.. ! राजगड म्हणजे खायची बात नाय.. ! काणक्या... तुझा आजा गेलावता का राजगडला?
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
=========================
विकासः
साहित्य या शब्दाचा अर्थजी माहीत नसलेले साहित्यविषयक अनुभुतींवर बोलताना पाहून पोट धरून हासलो.
(कधीही टीका करू नका, ती तुमच्यावरही होऊ शकते)
=========================
पिताजी:
एका दिवसात होतो का राजगड?
========================
काणक्यः
अरे पिताजी, तूही भारीच आहेस. हे चार दिवस चढत असतील तो गड! पण इथे लिहिताना एका दिवसात नाही का लिहू शकणार?
=======================
चित्ता:
काणक्य यांचा आय डी बंद का होत नाही हेच कळत नाही
=======================
चुलत आजी:
असले वृत्तांत बंद करा की
========================
भायखळा किंगः
मित्रांनो प्रची टाकलेले आहेत
=========================
रेखा :
नाही दिसतेत प्रचि
=========================
शकुनी:
<<नाही दिसतेत प्रचि >> सुखी आहात
==========================
किडा:
येथे पूर्वी शिवाजी महाराज होते >>>
त्यांच्यामुळेच तर गड आहे..
=========================
स्वरा:
मी यात पडणार नव्हते. पण काही उल्लेख पाहून राहवले नाही. कोणताही किल्ला एखाद्या माणसामुळे निर्माण होत नाही. पृथ्वीची अंतर्गत स्तरातील कवचे एकमेकांवर आदळत असल्यामुळे भूपृष्ठाला पडलेल्या सुरुकुत्यांमधून असे डोंगर तयार होतात. बाकी वादात मला पडायचे नाही. मी लेख वाचलेलाही नाही. मात्र कोणीही उगाचच माहीत नसलेल्या विषयांवर काहीही टिपण्णि करू नये. हेमाशेपो
========================
हिरोमकांडीपकालबिधा:
स्वरा, किती किलोमीटर खाली ही गडबड होते
=========================
स्वरा:
हिधा, तू विचारतियस म्हणून, नाहीतर मी यात पडणार नव्हते. साधारण चाळीस ते साठ किलोमीटर. अॅन्ग वॉकर यांचे बिलो द अर्थ वाचलेस का?
========================
केकाटे:
कुठे मिळेल ते?
======================
लाजरा गरूडः
काय कुठे मिळेल? राजगड पुण्यापासून चाळीस एक किलोमीटरवर आहे व राजगड हा शब्द पुल्लींगी आहे
======================
काणक्यः
=======================
एकाटे:
गरुड, तुम्ही मधे पडू नका, विषय वेगळा चाललाय
======================
लाजरा गरुडः
मी मधे पडू नको म्हणजे काय??? धागा मी काढलाय. तुमची फालतू चर्चा पानांवर करा
======================
चित्ता:
सुम्या विपू केलीय
=====================
स्वरा:
<<तुमची फालतू चर्चा पानांवर करा>>
गरुड, या चर्चेला प्लीजच फालतू म्हणू नका. तुमच्या वृत्तांताहून खूप काहीतरी महत्वाचं चाललंय हे
======================
बिहारी:
सतःच्या बाष्कळ बडबडीला महत्वाचं म्हणणं हे काही जणांच हॉबीच आहे
=====================
आगीचा बंबः
प्रचि दिसत नाहीयेत
=====================
स्वरा:
हे असंच होतं म्हणूनच लिहावंसं वाटत नाही
=====================
काणक्यः
<<हे असंच होतं म्हणूनच लिहावंसं वाटत नाही
>>
अरे पण तुम्हाला सांगितलंय कोणी अक्कल दाखवायल्;आ? धागा काय, लिहिता काय!
=====================
घ्याटोप्या:
अफजलखानाची कबर असती तर भगवे हादरले नसते का?
====================
अपार दोषी:
आले, नेहमीचे यशस्वी नाटके तमासगीर उलथलेच इथे
====================
लंडनः
याचा धर्माशी काय संबंध?
आ न
लंडन
=====================
बुवा:
====================
निनादः
या वृत्तांताचा निषेध, यात महाराजांना स्थान नाही
===================
प्रशासकः
हा धागा बंद करण्यात येत आहे
====================
हे लेखन आवडलेले मायबोलीकरः १
हे लेखन न आवडलेले मायबोलीकरः ८७३
==================================
ओ बेफिजी... इतकी सारी नावं
ओ बेफिजी... इतकी सारी नावं फोडुन टाकलीत आयडी ची! खालील नावांचा विचारहि होउ शकतो
* भीजलेला उंदीर
* ऊ
* वांग्याचं भरीत
* नाडी
* डोंबीवलीचा शहारुख
इत्यादी
हे लेखन आवडलेले मायबोलीकरः
हे लेखन आवडलेले मायबोलीकरः १>>> म्या बी
आभारी आहे सर्वांचा
आभारी आहे सर्वांचा
(No subject)
हिरोमकांडीपकालबिधा: आयडीची
हिरोमकांडीपकालबिधा:
आयडीची नाव लई भारी आहेत
वेड लावंल तुम्हि मला....
वेड लावंल तुम्हि मला.... तुम्हि खरच खुप छान लिहता......
माझी तर हसून हसून पुरेवाट लागली.....
जबराट
जबराट
अफलातून ...नेहमीप्रमाणे
अफलातून ...नेहमीप्रमाणे
आ. न. लंडन
आ. न.
लंडन
च्च! नुस्तं आ.न. लंडन नाही.
च्च! नुस्तं आ.न. लंडन नाही. तो प्रतिसाद नीट पहा:
=====
लंडनः
याचा धर्माशी काय संबंध?
आ न
लंडन
====
असा आहे.
मला अॅडमिनची पोस्ट आवडली :क्ष
हे पाहीलचं नव्हतं , मस्त
हे पाहीलचं नव्हतं , मस्त लिहिलयं
(No subject)
बाप रे ! काय भयानक विनोदी
बाप रे ! काय भयानक विनोदी लिहीले आहे..... नुसत्या प्रतिक्रीया वाचुनच अजुन हसणे थांबले नाही आहे
# घेवून टाका +१० या
# घेवून टाका +१० या लेखनाबद्दल #एकदम झकास सहल होती राव तुमची, कधी एखादी सहल हिमालायावरही काढा, जय महाराष्ट्र#
(No subject)
सर्व दिलदार प्रतिसादकांचा
सर्व दिलदार प्रतिसादकांचा मनापासून आभारी आहे
-'बेफिकीर'!
भयाण विनोदी ....... हसु
भयाण विनोदी .......
हसु आवरणे कठिण....
ह ह पु वा........ लई भारी
ह ह पु वा........ लई भारी राव......
(No subject)
बाप बारा वर्षाचा होता
बाप बारा वर्षाचा होता
नोफिकीरला अनुमोदन राहीले हो !
नोफिकीरला अनुमोदन राहीले हो !
छान!
छान!
सानीशी सहमत.
सानीशी सहमत.
झक्कास. किल्ला चढण्याचा आणि
झक्कास. किल्ला चढण्याचा आणि इतका सविस्तर वृत्तांत उतरवण्याचा दमश्वास दांडगा आहे.
राजांन्नी पण मानाचं कड बहाल
राजांन्नी पण मानाचं कड बहाल केल असत हे वाचून
विलक्षण कल्पनारंजन.
पुढल्या वेळी तोरणा घ्या तिहि रात्रीचि चढाई योजा.
एक एक नग शोधून काढले आहेत.
एक एक नग शोधून काढले आहेत. वृत्तांतापेक्षा प्रतिसाद मस्त आहेत.
काय भन्नाट लिहिलयं... खरचं
काय भन्नाट लिहिलयं... खरचं तुमच्या निरिक्षणशक्तीला सलाम, आयडी ची नावं तर कमाल आहेत.. भारी एकदम..

एतदेशीय धाग्यांपेक्षा हा धागा
एतदेशीय धाग्यांपेक्षा हा धागा कितीतरी उत्तम. या निमित्ताने राजगडाच्या भव्यतेचा परिचय लोकांना झाला त्याच बरोबर प्रतिसाद देणार्या मायबोलीकरांच्या मान-सिकतेचा ही.
गझला, कथा आणि कादंबर्यालिहता लिहता आपणास ऐतीहासीक लेखना तत्सम प्रवास वर्णन लिहण्याची बुध्दी ( बुध्दी प्रामण्यवाद्यांना अपेक्षीत असलेली ) झाली हे ही नसे थोडके.
वर उल्लेख केलेला बुध्दीचा प्रकार हा बुध्दीच्या देवतेने दिलेल्या बुध्दीपेक्षा वेगळा आहे हे बुध्दीप्रामाण्यवाद्यांना अपेक्षीतच आहे असे लिहले आहे अन्यथा परमेश्वर आहे की नाही इथ पासुन तो बुध्दी देतो किंवा नाही इथपर्यंत साधक बाधक चर्चेने प्रतिसाद ओसंडुन वाहील आणि बेफिकिरांना काय म्हणायचे होते ते बाजुला राहिल.
खतरनाक!
:D
Pages