ट्रॅव्हल एजंट माहिती आहे का?

Submitted by sneha1 on 18 April, 2012 - 13:18

नमस्कार,
जून्-जुलैमधे भारतवारीचा विचार चालू आहे.कोणाला अमेरिकेतले चांगले एजंट्स माहित आहेत का?
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली बहुतेक लोक makemytrip, yatra सारख्या इंटरनेट साईट वरून तिकिटं काढातात.
Airline च्या स्वतःच्या साईट आहेतच.
ओळखीची Travel-agent पण हेच सुचवते.. कारण त्यांना हल्ली फार कमिशन नसतं, त्यामुळे Net वरून तिकिटं स्वस्त पडतात. आणि आधी एजंट कडून काढलं आणि नंतर Site वर स्वस्त दिसलं की लोक कटकट करतात...
Airlines नी Agent ला जवळपास संपवलं आहे..

जबाबदार एजंट असेल तर क्वचित फायदा होतो... पण त्यासाठी जास्त पैसे भरायला कोणी बघत नाही.

किस्सा १: मित्र कॉन्टिनेन्टलने लंडन, आणि तिथून गल्फने हैदराबादला जाणार होता. तिकीट EWR-HYD-EWR असे एकत्र होते. EWR हून लंडनची फ्लाईट उशीरा गेली. Gulf ची फ्लाईट चुकली. तिकडे Gulf ने याला no-show असे मार्क करून त्याचे जाते आणि येते दोन्ही तिकिटं कँसल केली. मित्र शनिवारी सकाळी London ला अडकला. Continental च्या लोकांनी त्याला 'यात तुमच्या एजंटची चूक आहे' असं सांगून हात वरती केले. नशीब एजंट फोनवर सापडली, आणि तिने gulf ची चूक निस्तरून त्याला पुढे जायची आणि परत यायची सोय करून दिली.

किस्सा २: आम्ही Makemytrip वरून United चं तिकीट घेतलं आणि विमान Continental चं. भारतात मुंबई-दिल्ली Kingfisher कडे. क्रेडिटकार्डवर Kingfisher चा charge आला. जाताना no-problem. येताना दिल्ली-नूवर्क तिकिटं Reservation System मधून गायब. Kingfisher म्हणतं Continental बघेल, Continental म्हणतं United बघेल. United चा भारतात Counter नाही, आणि makemytrip ला काहीच माहीत नाही. आणि आम्ही दिल्ली विमानतळावर 'कुणी सीट देता का सीट?' करत फिरत बसलो.. Happy

धन्यवाद सगळ्यांना.
आधी आम्हीपण वेबवरूनच बुक केले आहेत्..पण ह्यावेळी एकतर अ‍ॅडव्हान्स पॅरोल वर जायचे आहे, त्यामुळे जाताना ट्रांझिट व्हिसा कुठे लागतो ते पाहणे,शिवाय नवर्‍याकडे एक न वापरलेले कॅन्सल केल्या गेलेले तिकिट आहे ते वापरणे या गोष्टी आहेत. शिवाय मी असे ऐकले आहे एअरलाइन्स च्या साईटवर असतात त्यापेक्षा एजंट्स ना जास्त सीट्स चा अ‍ॅक्सेस असतो म्हणे Happy

परदेसाई, तुमचे अनुभव खासच..

Happy Happy

आर्च
Happy
बा द वे : मी अत्ता पर्यंत एअर फ्रांस वा के एल एम च्या ऑफिसला( गुडगाव) फोन करून तिकिटे काढली आहेत. मु.म्बै- अ‍ॅम्स्टर्डॅम्-एस एफ ओ व परत. अनुभव चांगला आहे.

सगळ बुकींग झाल की लगेच प्रत्येक एअर लाईन ला फोन करुन बुकींग कन्फर्म करायचं.
तसेच जाताना आणि येताना दोन्ही वेळेस कमीत कमी तीन दिवस आधी परत बुकींग कन्फर्म करायचं.

>>>मी अत्ता पर्यंत एअर फ्रांस वा के एल एम च्या ऑफिसला( गुडगाव) फोन करून तिकिटे काढली आहेत. मु.म्बै- अ‍ॅम्स्टर्डॅम्-एस एफ ओ व परत. अनुभव चांगला आहे.
अनुमोदन! के एल एम, एअर फ्रान्स आणि डेल्टा हे त्रिकूट एकत्र माणसं उडवतं. ३ महिन्यांपूर्वी मुंबई एअरपोर्टाहून निघताना एअर फ्रान्सचा फारच सुखद अनुभव होता. मोठी ब्याग चेक इन केल्यावर केबिन बॅग, आपणहून विचारून फुकटात चेक इन करून दिली.

एजंटाचा अनुभव एकदा चांगला तर एकदा अगदी वाईट. डायरेक्ट एरलाइनीच्या वेबसाइटीवरूनचा अनूभव बेस्ट. कधी कटकट झाली नाही.

एअर फ्रान्सचा फारच सुखद अनुभव >> एफ्रा बद्दल चांगलं बोलणार्‍या तुम्हीच पहिल्या.. स्वतः अनुभव नाही पण ऐकिव अनुभवांवरुन जाण्याचे धाडस नाही. Happy

मला एक्स्पिडियाचा अनुभव चांगला आहे भारताच्या तिकिटांसाठी.

सगळ्या सगळ्यांना धन्यवाद Happy
बरं, अ‍ॅडव्हान्स पॅरोल वर जाण्याबद्दल कोणि काही टिप्स देऊ शकेल का? युरोप मधून व्हिसा असल्याशिवाय जाता येत नाही असे ऐकले आहे.

Sneha not all EU countries need visa and air lines normally has the information ..

My exp Lufthansa via Frankfurt and Jet via Brussels do not need visa although u change terminals for LH... On the way back they confirm at transit that you do have your visa to enter in US of A... In your case it would be your EAD.

मला पण एअर फ्रान्सचा फारच सुखद अनुभव ह्यावेळेस आधी बेक्कार अनुभव होता. मी वायामा वर डिल बघुण डायरेक्ट एअरलाइन ला फोन करतो, ते त्या पेक्शा चांगले डिल देतात