उदास छाया वेढूनी
उन्हाळा गेला सुस्तावूनी
वाराही बसला रूसूनी
पक्षीही गेले दूर निघूनी
सारे कसे भग्न भग्न....
मनही झाले उद्वीग्न उद्वीग्न
उद्वीग्न नजर भिरभिरली
दूर कुठेतरी स्थिरावली
गुलमोहराची लाली
मन आनंदूनी गेली
सारे कसे रसिले रसिले....
मन मोहरले मोहरले
छान
छान