Submitted by पुरंदरे शशांक on 16 April, 2012 - 06:19
रंगपंचमी
हातावरली रेखिव मेंदी
करातले हे हिरवे कंकण
अंगी शोभे ओली हळदी
गळ्यातले हे रेशीम बंधन
कुळकुळीत केसांचा पट तो
उलगडता या नजरेपुढती
रंग गुलाबी ओठावरचा
खुलून येतो ओठाओठी
मेघ सावळा तुज रुपाने
बरसत जातो अंगागांवर
उमटत जाती तनामनावर
शहार आणि कोवळ अंकुर
उत्कट गहिरी प्रीती आपुली
प्रणयाचे हे रंग अनावर
रंगपंचमी ही अलबेली
स्वर्गींचे सुख इथे धरेवर
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छानच.... अगदी सहज वर्णन
छानच.... अगदी सहज वर्णन केलंय.
"उत्कट गहिरी प्रीती आपुली
प्रणयाचे हे रंग अनावर
रंगपंचमी ही अलबेली
स्वर्गींचे सुख इथे धरेवर" >>> हे अधिक आवडलं.
वा! छान हळूवार कविता लिहिलेय!
वा! छान हळूवार कविता लिहिलेय!
सुंदर
सुंदर
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार.........
आवडेश
आवडेश