देवस्थान श्री नागेशी (गोवा)
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
21
मला गोवा आवडत ते तिथल्या सुंदर सुंदर देवळांसाठी
.
देवस्थान श्री नागेशी (गोवा) येथील छायाचित्र
विषय:
प्रकार:
शेअर करा
केदार,
केदार, मस्तच रे!!
केदार,
केदार,
फोटो फार सुंदर आहेत. मी आजतागायत गोव्याला कधीही गेलेली नाही.
पण विविध लोकांनी सांगितलेल्या गोष्टी, किंवा तुझ्यासारख्या लोकांनी काढलेले फोटो यांमूळे माझी गोव्याला जाण्याची ईच्छा प्रबळ होतेय दिवसेंदिवस. 
सुंदर फोटो....
दक्षिणा...
छान
छान फोटो,
फोंड्याचा, काय रे तू?
केदार, छान
केदार, छान आहेत फोटो. मी पण गोव्याला होतो गणेशचतुथ्रीनिमीत. मन्गेशीला. मी गणपतीचे आणि माटोळीचे फोटो नन्तर टाकिन. तु कधि फोन करणार आहेस?
आय टी,
आय टी, दक्षीणा, श्यामली आणि चेतन धन्यवाद



.
मध्य गोवा. जे अध्यात्मात रमत नाहीत त्यांनाही भूरळ पाडेल अशी सुंदर सुंदर ठीकाण आहेत गोव्यात. माझ्या गोव्याच्या ५ दिवसाच्या वास्तव्यात मला वर्षभर पुरेल इतका ऑक्सीजन भरुन घेत्लाय
.
श्यामली : मी फोंड्याचा नाही. पण फोंड्याच्या जवळच्या परीसरात श्री नागेशी, श्री शांतादूर्गा , श्री मंगेशी , श्री रामनाथी, श्री म्हाळसा अशी सगळी देवस्थान येतात.
.
दक्षीणा : गोव्याला अवश्य जाऊन ये
.
चेतन : तूला फोन करत होतो पण लागत नव्हता. आज नक्की करेन
केदार, फोटो
केदार,
फोटो फार सुंदर आहेत.
छान रे!
छान रे! प्रसन्न वाटले मंदिर पाहून.
धन्यवाद
धन्यवाद आटल्या आणि चिन्नू
हे
हे नागेशीचे तळे आहे. तो नगारखाना आहे. त्याच्या खाली देवळाकडे तोंड करुन उभे राहुन तळ्यात पाहायचे. नागेशाचे प्रतिबिंब त्यात दिसते. मी बरेच वर्ष गेलो नाही ह्या देवळात. नेहमी घाई असल्यामुळे फक्त मंगेशी, शांतादुर्गा आणि महालक्ष्मी एव्हढेच जमते. मंगेशीच्या बाहेर मिळणार्या काकड्या आणि करमळ; तसेच शांतादुर्गेच्या बाहेर मिळणारा गोटीसोडा मात्र कधीच चुकवत नाही.
आभार केदार. ह्यावर्षी गणपती चुकला तरी ह्या फोटोने अनुभवता आले. दुधाची तहान......
>>>शांतादुर
>>>शांतादुर्गेच्या बाहेर मिळणारा गोटीसोडा
अगदी, अगदी
लहानपणापासून हे एक जोरदार प्रलोभन!! अजूनही!! 
केदार, मस्त
केदार,
मस्त फोटो टाकलेस रे. लहान असताना बाबा आणि त्यांच्या मित्रांबरोबर इथे पोहायला जायचो. पोहून झाल्यावर चालत फार्मागुडीला जायचो बस पकडायला. तिथे मिळणारे कोवळ्या काकड्यांचे वाटे पण सही असायचे.
छान आठवण करून दिलीस.
केदार, छान
केदार, छान आहे फोटो!
मला आत्ता नक्की आठवतं नाही, पण बहुतेक या ठिकाणी आम्ही फेरी ने गेलो होतो.
देवळात जायच्या वाटेवर, एक तळं लागत. केवढी भरपूर कमळं होती त्यात. खूप सुन्दर परिसर आहे तो.
काकड्या ,
काकड्या , गोटी सोडा , लिंबू सोडा वॉव
या तलावात
या तलावात पाणसाप देखिल आहेत. या तलावा पलीकडे महालक्ष्मीचे मंदीर आहे.
मी माझ्याकडे असलेले फोटो इथे upload करु का ?
मस्तच फोटो
मस्तच फोटो रे!
पहिला फोटो क्लासिकच. काय गच्च झाडी आहे आजुबाजुला. प्रसन्न वाटतय अगदी
****************
हो हो सतीश
हो हो सतीश काहीच प्रॉब्लेम नाही

झकोबा आज फोनतो रे तूला
श्री
श्री मंगेशाचा रथ
श्री मंगेशाच्या देवालय समोरील दिपमाळ
श्री देवी महालसाच्या देवालया समोरील दिपमाळ
श्री देवी महालसाच्या देवालया समोरील दिपमाळा
श्री देवी महालसाच्या देवालया समोरील धातुच्या दिपमाळा. या मंगेशकर कुटुंबीयांकडुन अर्पण केल्या आहेत.
श्री नागेशाच्या देवालया बाहेरील दिपमाळ
श्री नागेशाच्या मंदिराबाजुस अस्लेले श्री देवी महालक्ष्मीचे देवालय. (मागील बाजुने)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी मराठी .. मी मराठी ... मी मराठी ....
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी
खुपच छान
खुपच छान सतीश

माझ्या डोळ्यासमोर ती नागेशी वरून महालक्ष्मी ला जाणारी पाय वाट आली
सतीश, काय
सतीश, काय मस्त फोटो
सतीश,
सतीश, केदार तुम्हा दोघांना धन्यवाद!
मस्तच फोटो
नमस्कार
नमस्कार मित्र हो !
मी खराखुरा , रेडि चा , वेन्गुर्ला. गोव्यला बरेच्दा जातो.
गोव्यापासुन जवळ्च आहे वेन्गुर्ला-रेडि. निसर्गरम्य.
गोव्यात सारस्वतअन्चि बरिच देवस्थअने आहेत.
आम्च्या वेन्गुर्ला ला नवदुर्गा मन्दिर आहे ज्याला बराच इतिहास आहे.
लिन्क पुढे दिलि आहे :
http://www.geocities.com/ggavaska/navadurga.html