मुर्ग शोले

Submitted by आशुतोष०७११ on 9 April, 2012 - 02:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन, ब्रॉयलर १ किलो
दही १ वाटी
धणे पावडर २ च चमचे
जिरे पावडर २ च चमचे
आलं-लसूण पेस्ट ४ च चमचे
व्हिनेगार २ च चमचे
मीठ-तिखट चवीपुरते
तंदुरी मसाला ४ च चमचे
लाल रंग ऐच्छिक
लिंबुरस २ च चमचे
चाट मसाला

क्रमवार पाककृती: 

१) चिकन स्वच्छ धुवून घ्यावी.
२) वर लिहिलेल्या जिन्नसांपैकी चिकन आणि चाट मसाला वगळून बाकीचे साहित्य एकत्र करुन त्याची पेस्ट करावी.
३) प्रत्येक चिकनच्या तुकड्यांवर सुरीने किमान २ काप/खाचे करावेत.
४) प्रत्येक चिकनच्या तुकड्याला ही मसाला पेस्ट व्यवस्थित चोळून घ्यावी.

IMG_1040_skw_0.JPG

५) चिकनच्या तुकड्यांमध्ये हा मसाला कमीत कमी ५ ते ६ तास मुरु द्यावा.
६) मसाला चिकनच्या तुकड्यांमध्ये व्य्वस्थित मुरल्यावर कोळशाच्या ग्रिलमध्ये हे तुकडे खरपूस भाजावे.

IMG_1047_skw_0.JPG">

७) सर्व्ह करण्यापूर्वी प्रत्येक तुकड्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरावा.

IMG_1053_skw_0.JPG

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

वर लिहीलेला ३० मिनिटे लागणारा वेळ हा ग्रिल करण्यासाठीचाच आहे. मसाला मुरवण्याचा वेळ वेगळा.
मसाला जितका जास्त मुरवता येइल तितका उत्तम. मी शक्यतो १२ तास मुरवत ठेवतो चिकन मसाला लावून.
ग्रिल नसल्यास मायक्रोवेव्हमध्येही करु शकतो. अर्थात ग्रिलची चव मात्र येत नाही. (स्वानुभव)
चिकन आणतानाच तंदुरीसाठी हवी सांगुन आणावी. ( संपुर्ण चिकनचे फक्त ४ तुकडे करुन आणावी )
घरी तंदुरी चिकन आवडीने हादडणारे असल्यास किमान २ चिकन आवश्यक.

माहितीचा स्रोत: 
कुक बुक्स / स्वतः केलेले प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच Happy माझा डबा इतके दिवस राहिलाय ते चांगल झालं म्हणायचं. प्लेट मधून सिद्धा डब्बेमेच जाना मंगताय Proud डब्यात नाही मावलं तर डबा बदल Proud

जबरीच!! थेट बा.ने.ला खुन्नस Proud

कवडीचा डबा भरायला कधी येऊ? तिच्या डब्यात जे मावणार नाही, ते माझ्या पोटात मावेल Proud

है शाब्बास!!
अश्शी एंट्री पाहिजे स्पर्धेसाठी Happy

आणि मी हे खाते बरं का Wink .... कविता, यासाठी एक गटग ठरवून टाका(च.)

काका.. तुम्ही सध्या भारतातच आहात ना????

आदल्या दिवशी फोन केल्यावर दुसर्‍या दिवशी नक्कीच खायला मिळेल हा पदार्थ.. तेव्हा यायच्या आदल्या दिवशी फोन करतोच....

:फक्त लाळ गाळणारा बाहुला:

वॉव!!!! तोषा, हीच का ती सुप्रसिध्द कोंबडी???? वर्णन केलंस त्याहीपेक्षा यम्मी दिसतेय .....

यम यम यम्म. मस्त आहे...मॅरीनेट करून कोंबडी फ्रिजात ठेवायची की फ्रिजर मध्ये? फ्रिजमधे ठेवल्यास जुन वास नाही का येत?

हाये.. हेच का ते????????? मला कधी बोलवतोय्स?? उगीच डब्याबिब्यातुन नेऊन ते थंड झालेले चिकन कोण खाईल?? मला डायरेक्ट फ्रॉम कोळश्यावरुन ते ताटात पाहिजे.......

अरे काय हे.. जरा काम करु देत.. रोमातुन बाहेर काढले कोंबडीने.. तोंडाला पाणी सुटले म्हणजे संकष्टी मोडली Uhoh

सही आहे हा प्रकार Happy

आशुतोष हा वेबरचा ग्रीलर आहे ना? स्टीलची जाळी आणि कोल बघुनच ओळखलं मी. Happy माझ्या बोक्याने तिकडुन येताना वेबरचा ग्रीलर आणला म्हणुन मी खुप सटकले होते. नसता पसारा म्हणुन. आज माझं मतपरिवर्तन झालं. Proud मावेपेक्षा कोलवर मस्त होत असणार तंदुरी चिकन. तु आता रेसिपी पण दिली आहेस तर करुनच बघणार या विकेंडला. Happy

जबरन!!!!!! सह्ही दिसत्येय मुर्गी Happy

बार्बेक्युवर ही मुर्गी पकवण्याचा प्रयोग करण्यात येइल Happy

शोले मधले जय आणि वीरु.. सोबत ते दोन जाडजुड तुकडे म्हणजे गब्बर आणि ठाकुर... लिंबु म्हणजे खट्टी बसंती आणि कांदा म्हणजे रडकी जया.... Lol