चिकन, ब्रॉयलर १ किलो
दही १ वाटी
धणे पावडर २ च चमचे
जिरे पावडर २ च चमचे
आलं-लसूण पेस्ट ४ च चमचे
व्हिनेगार २ च चमचे
मीठ-तिखट चवीपुरते
तंदुरी मसाला ४ च चमचे
लाल रंग ऐच्छिक
लिंबुरस २ च चमचे
चाट मसाला
१) चिकन स्वच्छ धुवून घ्यावी.
२) वर लिहिलेल्या जिन्नसांपैकी चिकन आणि चाट मसाला वगळून बाकीचे साहित्य एकत्र करुन त्याची पेस्ट करावी.
३) प्रत्येक चिकनच्या तुकड्यांवर सुरीने किमान २ काप/खाचे करावेत.
४) प्रत्येक चिकनच्या तुकड्याला ही मसाला पेस्ट व्यवस्थित चोळून घ्यावी.
५) चिकनच्या तुकड्यांमध्ये हा मसाला कमीत कमी ५ ते ६ तास मुरु द्यावा.
६) मसाला चिकनच्या तुकड्यांमध्ये व्य्वस्थित मुरल्यावर कोळशाच्या ग्रिलमध्ये हे तुकडे खरपूस भाजावे.
">
७) सर्व्ह करण्यापूर्वी प्रत्येक तुकड्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरावा.
वर लिहीलेला ३० मिनिटे लागणारा वेळ हा ग्रिल करण्यासाठीचाच आहे. मसाला मुरवण्याचा वेळ वेगळा.
मसाला जितका जास्त मुरवता येइल तितका उत्तम. मी शक्यतो १२ तास मुरवत ठेवतो चिकन मसाला लावून.
ग्रिल नसल्यास मायक्रोवेव्हमध्येही करु शकतो. अर्थात ग्रिलची चव मात्र येत नाही. (स्वानुभव)
चिकन आणतानाच तंदुरीसाठी हवी सांगुन आणावी. ( संपुर्ण चिकनचे फक्त ४ तुकडे करुन आणावी )
घरी तंदुरी चिकन आवडीने हादडणारे असल्यास किमान २ चिकन आवश्यक.
तोंपासु
तोंपासु
मस्त सोपी रेसिपी
मस्त सोपी रेसिपी
भारीच माझा डबा इतके दिवस
भारीच
माझा डबा इतके दिवस राहिलाय ते चांगल झालं म्हणायचं. प्लेट मधून सिद्धा डब्बेमेच जाना मंगताय
डब्यात नाही मावलं तर डबा बदल 
कहर आहे कहर! असे फोटु टाकु
कहर आहे कहर! असे फोटु टाकु नका रे...आमचा निर्धार उगीच डळमळीत होतो.
वाहवा! पण वेळ १० तास हे
वाहवा!
पण वेळ १० तास हे जरा एडीट कराच
मुख्य पाकृसाठीचा वेळ असे अपेक्षित असेल ना??
आशु. ...टू तोंपासु..
आशु. ...टू तोंपासु..
जबरीच!! थेट बा.ने.ला खुन्नस
जबरीच!! थेट बा.ने.ला खुन्नस
कवडीचा डबा भरायला कधी येऊ? तिच्या डब्यात जे मावणार नाही, ते माझ्या पोटात मावेल
है शाब्बास!! अश्शी एंट्री
है शाब्बास!!
अश्शी एंट्री पाहिजे स्पर्धेसाठी
आणि मी हे खाते बरं का
.... कविता, यासाठी एक गटग ठरवून टाका(च.)
असलं काही खात नाही.. याऐवजी
असलं काही खात नाही.. याऐवजी वांग्याचं भरीत केले जाईल.
आशुतोष तुम्ही आज नक्कीच
आशुतोष तुम्ही आज नक्कीच कोणाचीतरी संकष्टी सोडणार
एकदम तोपासु.
आज सोमवार ..आनि हे असल पाहुन
आज सोमवार ..आनि हे असल पाहुन कस आवराव स्वतःला...खुप तोपासु
मस्त जमलंय !
मस्त जमलंय !
आतो, मस्तच रेसीपी.
आतो, मस्तच रेसीपी.
तोंपासु.....
वॉव, मस्त दिसतंय हे. माझ्याही
वॉव, मस्त दिसतंय हे. माझ्याही तोंडाला पाणी सुटलं.
काका.. तुम्ही सध्या भारतातच
काका.. तुम्ही सध्या भारतातच आहात ना????
आदल्या दिवशी फोन केल्यावर दुसर्या दिवशी नक्कीच खायला मिळेल हा पदार्थ.. तेव्हा यायच्या आदल्या दिवशी फोन करतोच....
:फक्त लाळ गाळणारा बाहुला:
वॉव!!!! तोषा, हीच का ती
वॉव!!!! तोषा, हीच का ती सुप्रसिध्द कोंबडी???? वर्णन केलंस त्याहीपेक्षा यम्मी दिसतेय .....
आशुतोष तुम्ही आज नक्कीच
आशुतोष तुम्ही आज नक्कीच कोणाचीतरी संकष्टी सोडणार >>>>>>>>>>>.+++११
एकदम तोपासु.
यम यम यम्म. मस्त
यम यम यम्म. मस्त आहे...मॅरीनेट करून कोंबडी फ्रिजात ठेवायची की फ्रिजर मध्ये? फ्रिजमधे ठेवल्यास जुन वास नाही का येत?
हाये.. हेच का ते?????????
हाये.. हेच का ते????????? मला कधी बोलवतोय्स?? उगीच डब्याबिब्यातुन नेऊन ते थंड झालेले चिकन कोण खाईल?? मला डायरेक्ट फ्रॉम कोळश्यावरुन ते ताटात पाहिजे.......
अरे काय हे.. जरा काम करु
अरे काय हे.. जरा काम करु देत.. रोमातुन बाहेर काढले कोंबडीने.. तोंडाला पाणी सुटले म्हणजे संकष्टी मोडली
सही आहे हा प्रकार
मस्त!
मस्त!
छानच!
छानच!
आशुतोष हा वेबरचा ग्रीलर आहे
आशुतोष हा वेबरचा ग्रीलर आहे ना? स्टीलची जाळी आणि कोल बघुनच ओळखलं मी.
माझ्या बोक्याने तिकडुन येताना वेबरचा ग्रीलर आणला म्हणुन मी खुप सटकले होते. नसता पसारा म्हणुन. आज माझं मतपरिवर्तन झालं.
मावेपेक्षा कोलवर मस्त होत असणार तंदुरी चिकन. तु आता रेसिपी पण दिली आहेस तर करुनच बघणार या विकेंडला. 
जबरन!!!!!! सह्ही दिसत्येय
जबरन!!!!!! सह्ही दिसत्येय मुर्गी
बार्बेक्युवर ही मुर्गी पकवण्याचा प्रयोग करण्यात येइल
शोले मधले जय आणि वीरु.. सोबत ते दोन जाडजुड तुकडे म्हणजे गब्बर आणि ठाकुर... लिंबु म्हणजे खट्टी बसंती आणि कांदा म्हणजे रडकी जया....
लाजो भारीच्चेस
लाजो भारीच्चेस
अरे वा ! सहिच!
अरे वा ! सहिच!
मस्त! मी काय ओवनमध्ये
मस्त! मी काय ओवनमध्ये बनवले.चव अजुन तोंडावर आहे.