भीमरूपी महारुद्रा...

Submitted by आशुचँप on 6 April, 2012 - 09:33

मनोजवम् मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियम् बुदि्धमताम् वरिष्ठम् ।।
वातात्मजम् वानरयूथमुख्यम्, श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये ।।
जय हनुमान...!!....जय श्रीराम......!!

समर्थ रामदासांनी शक्तीबरोबर बुद्धिचीही देवता म्हणून गौरवले असले तरी भूतप्रेतसमंधादी शक्तींना दूर ठेवण्यासाठीच जास्त करून मारूतीरायांची स्थापना होत असे. यामुळेच अनेक ठिकाणी गावाच्या वेशीपाशी हनुमानाचे मंदिर आढळून येते. किल्ले विशेषत तट, बुरुज येथे अनेकदा युद्धादी प्रसंग घडलेले. अनेकांनी तिथे प्राण गमावलेले. त्यामुळे अशा ठिकाणी, मूळ किल्ल्यापासून दूरवर पहारा करणार्या सैनिकांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी हटकून मारूतीरायांची शिल्पे कोरलेली आढळतात. ही शक्तीची देवता शत्रुबरोबरच अमंगळापासून संरक्षण देत असल्याने या देवतेला आगळेच महत्व प्राप्त आहे. अर्थात, अशा अनघड ठिकाणी सुबक मंदिर वगैरे बांधणे शक्यच नसल्याने बरेचदा कातळात कोरलेल्या मूर्तीला शेंदूर फासून भीमरूपाची स्थापना करण्यात येत असे.
दुर्ग गणेश (http://www.maayboli.com/node/28677) दुर्गे दुर्घट भारी (http://www.maayboli.com/node/29506) आणि शिवदुर्ग (http://www.maayboli.com/node/32819) या मालिकेतील पुढचा भाग आजच्या हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर सादर करण्यात खूप समाधान वाटत आहे. नेहमीप्रमाणेच मायबोलीकर याचेही स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

पहिले मारूतीराय राजगडावरील...सुवेळा माचीकडे जाताना

तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी एका मंदिरात स्थापन झालेले मारुतीराय...गंमत म्हणजे यांना छानपैकी भरघोस मिश्या आहेत..असे मिश्या कोरलेले मारूतीराय पहिल्यांदाच पाहिले

कावनई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कपीलधारातीर्थ मंदिरातील भव्य मूर्ती

रामशेज किल्ल्यावर तर मारूतीराय असणारच असणार..दासहनुमान मुद्रेतील मारूतीराय

आंबोळगड किल्ल्याच्या सुरुवातीला

किल्ले देवगड

कर्नाळा किल्ला

यशवंतगड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हापश्याच्या महारुद्र संस्थानाचा फोटो माझ्याकडे नाही पण रिवणच्या गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठातला एक अत्यंत जुना, १५ व्या शतकातला मारुतीराय तुमच्यासाठी.
PC261007-001.JPG

भटक्या..अरे फोटोंबरोबर माहीती पण सांगा की समर्थस्थापीत ११ मारूती नक्की कोणकोणते आहेत आणि नक्की कुठे आहेत. इंटरनेटवर फार गोंधळून टाकणारी माहीती मिळते.

जय जय बजरंग बली Happy
आशु आणि बाकीचे गडकरी ... मस्तच
बागलान प्रांतातील सलोटाच्या माथ्यावर ...

वासोटाच्या वाटेवर ..

हे काही प्रचि माझ्याकडुन...

हनुमान टोक, गांन्तोक, सिक्किम....

किल्ले हडसर...

किल्ले सज्जनगड....

किल्ले त्रिंगलवडी..

आशु, मस्तच थिम आणी सगळ्यांचे फोटो पण झकासच..

माझेही काही...

१. रायगड पायथ्याच्या छत्र-निजामपुर गावातील हनुमान

२. नाशिकच्या पांडवलेण्याजवळील हनुमान

३. ब्रम्हगिरी चढताना वाटेत लागणारे हनुमान

४. सातारच्या नांदगिरी/कल्याणगडावरील मिशाधारी हनुमान

५. गिरिविहारने आधीच पावसाळ्यातील फोटो टाकला आहे पण त्रिंगलवाडी किल्ल्याच्या दरवाज्यातील हनुमानाचा हा उन्हाळ्यातील फोटो

६. मकरंदगडावरील पाण्याच्या टाक्यावरील हनुमान

बजरंग बली की जय !!!!!!!!!!!!!!!!!

व्वा... मनोज, गिरि, रोमा, यो, झकास... सगळ्यांचे कलेक्शन भारी आहे.

हा कालच काढलेला... आंजार्ल्याच्या कड्यावरिल गणपती जवळील मारुतीराया.

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ||१||

वसई किल्ला

सज्जनगड

हडसर

पवपुत्र हनुमान कि जय
बोलो बजरंग बली कि जय

मिशी वाला मारुती राया पहिल्यांदाच पाहतोय, पहिलं कधी पाहिल्याचे स्मरत नाहीये.

मिशी वाला मारुती राया पहिल्यांदाच पाहतोय, पहिलं कधी पाहिल्याचे स्मरत नाहीये.>>> आमच्या मुळ गावाला आहे. Happy
स्वयंभु मुर्ती आहे असं आज्जी म्हणायची.
मला लहाणपणी हनुमानाच ते सिग्नेचर वानर सारखं तोंड न दिसल्याने मी आईला सारखं विचारायचो आपल्या गावातल्या हनुमानच तोंड असं का म्हणून... Happy

सुधागडला धोंडसे गावातून जाताना दर्शन देणारे कासारपेठचा मारुती

'घरगड' ला जाताना दर्शन देणारे :

अप्रतिम धागा.. खूप दुर्गम ठिकाणी स्थापित मारुतीची प्र.चि. एका ठिकाणी!!! Happy

काही नवीन प्र.चि.

१. समर्थांच्या ११ मारुतींपैकी एक ‘बाहे’ इथला:
1_Maruti_Baahe_DiscoverSahyadri.JPG

२. हारगड (मागे दिसतात ते मोरा अन् मुल्हेर, हे दुर्गरसिकांनी ओळखलं असेलंच..)
2_Maruti_Hargad_DiscoverSahyadri.JPG

३. खांदेरी
3_Maruti_Khanderi_DiscoverSahyadri.JPG

४. मोरा
4_Maruti_Mora_DiscoverSahyadri.JPG

५. रसाळगड
5_Maruti_Rasalgad_DiscoverSahyadri.JPG

६. रतनगड
6_Maruti_Ratangad_DiscoverSahyadri.JPG

७. सुरगड
7_Maruti_Surgad_DiscoverSahyadri.JPG

८. विसापूर
8_Maruti_Visapur_DiscoverSahyadri.JPG

मनोजवम् मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियम् बुदि्धमताम् वरिष्ठम् ।।
वातात्मजम् वानरयूथमुख्यम्, श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये ।।

jay hanuman, आमच्या कडे जुनी सुंदर मंदिरं पाडून कोटी रुपयांची सिमेंट कॉंक्रीट ची मंदिरं बांधायची क्रेझ आली आहे.

खुपच छान!
मारुतीरायांची किती मनोवेधक रुपे पहायला मिळाली या एकाच लेखात आणि प्रतिसादांमध्ये. मस्तच.

Pages