मटण चॉप्स - ४-५ तुकडे
१ छोटा कांदा - बारीक चिरलेला
मसाला:
जीरे पावडर - १ टी स्पून
धणे पावडर - १ टी स्पून
मिरे - २-३ दाणे
जीरे- १ टी स्पून
लाल तिखट - १ टी स्पून
हिरवी मिरची पेस्ट - चवीनुसार
हळद- १/२ टी स्पून
दालचिनी -१ छोटा तुकडा
मसाला वेलदोडा -१
तंदुरी मसाला/काळा मसाला - १ टी स्पून
मीठ- चवीनुसार
आले-लसूण पेस्ट - १ टे स्पून
२-३ लसूण पाकळ्या बारीक चिरुन
तेल
तूप
लिंबू
कोथिंबीर बारीक चिरुन -सजावटीसाठी
क्रमवार पाककृती:
- कुकर मध्ये १- चमचा तेल गरम करायला ठेवावे.
-तेल तापल्यावर त्यात जीरे, दालचिनी, काळा वेलदोडा, मिरे परतुन घ्यावे.
-बारीक चिरलेला कांदा ब्राउन होईपर्यंत परतुन घ्यावा. आले-लसूण पेस्ट वास जाईपर्यंत परतावे.
-आत मटण चॉप्स टाकून त्यास २-३ मिनिटे परतावे.
-चॉप्स बूडतील एवढे पाणी टाकून कुकरचे झाकण लावावे. १५-२० मिनिटे मटण शिजू द्यावे.
-शिजलेले चॉप्स मटण सूप मधून वेगळे काढावेत.
- एका जाड पॅनमध्ये १-२ चमचे तूप गरम करायला ठेवावे.
-तूप गरम झाल्यावर गॅस मंद करावा. त्यात बारीक चिरलेला लसूण परतावे.
-लसूण लालसर झाल्यावर तंदूर मसाला, मिरची पेस्ट, जीरे पावडर, धणे पावडर, लाल तिखट, हळद क्रमाने टाकून परतावे.
-चॉप्स पॅनमध्ये टाकून परतावे.
-मसाला सगळीकडे लागल्यावर मीठ टाकावे.
-गॅस मोठा करुन २-३ मिनिटे परतावे.
-लिंबू पिळून कोथिंबीर टाकून गरमा-गरम सर्व्ह करावे.
-ह्या पदार्थासाठी हलालकडुन मटण चॉप्स शक्यतो कोवळे घ्यावेत. अमेरिकन दुकानात meat section मध्ये baby lamb chops म्हणून मिळतात.
-कुकर ऐवजी पॅनमध्ये देखील शिजवता येते मात्र त्यासाठी अजून थोडा वेळ लागेल.
-फ़ोर्क टेस्ट करून चॉप्स शिजल्याची खात्री करुन मगच ते परतावे नाहीतर ते खाताना चिवट वाटतात.
- शिजलेले मटण स्टॉक हे बिर्याणीचा भात शिजवताना वापरता येते. किंवा सूप म्हणून ओरपावे
फोटो भारीच! आम्ही घासपूसवाले
फोटो भारीच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही घासपूसवाले त्यामुळे लांबुनच छान छान म्हणणार
वॉव मस्त एकदम!!!
वॉव मस्त एकदम!!!
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
व्वा
वॉव्व्व्व्व.... पाणी सुटले
वॉव्व्व्व्व.... पाणी सुटले तोंडाला.
माझा उपवास आहे आज ![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मस्त पाककृती. मला वाटतं
मस्त पाककृती. मला वाटतं भारतात जरा मोठेच मिळतात चॉप्स.
चिकन लेग्ज हा पर्याय होईल का ?
अर्थात मी लाजोच्या टिममधला !
मस्तच!
मस्तच!
एकदां कधीतरी मी प्रयत्न केला
एकदां कधीतरी मी प्रयत्न केला होता; पण कुणीतरी सांगितल्याप्रमाणे १] हिरवा मसाल लावून कूकरमधे शिजवून, मग २] अंड्यामधे घोळवून तळले होते. नाही इतके आवडले . वरील पद्धत खूपच बरी वाटतेय; नक्की करून पहाणार . धन्यवाद.
chaan aahe
chaan aahe![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोंपासू अगदी ....आम्ही पण
तोंपासू अगदी
....आम्ही पण मसाल्यात मॅरिनेट करून अंड्यात घोळवून फ्राय करतो...ही पद्धत थोडी लेंदी वाटते.
मस्त फोटोय!!
मस्त फोटोय!!
मस्त! मी साधारण अशीच पद्धत
मस्त! मी साधारण अशीच पद्धत वापरते. पण डायरेक्ट कुकरमधे नाही घालत. भांड्यात परतून घेऊन ते भांडे कुकरमधे ठेवते. कुकरमधल्या पाण्याच्या वाफेवर शिजवते. चॉप्समधे पाणी घालत नाही त्यामुळे घट्ट मसाला तयार होतो कांदा-आले-लसणाचा. स्टॉक काढावा लागत नाही.
किलर फोटो आहे एकदम.
किलर फोटो आहे एकदम.
खतरी फोटो आहे
खतरी फोटो आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही फोटो. मस्त पाककृती!
सही फोटो. मस्त पाककृती!
श्या! कधी ती टेक्नॉलॉजी येणार
श्या!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कधी ती टेक्नॉलॉजी येणार जेव्हा असल्या फोटूचे चवदार प्रिंटाऊट्स काढून खाता येतील? (किमाण ओरिजिनल वास तरी फोटूच्या प्रिण्टाऊटातूण यावा)
असो..
तुमच्या पाक्रू मधे खालील चूक आहे.
>>>
वाढणी/प्रमाण:
२ जणांसाठी
<<<
अश्या (किमान) २ प्लेट(तरी) १ जणासाठी असे हवे. (२ जणांसाठी ४-५ तुकडे म्हणजे खाणारे व्हेजिटेरियन्स असावेत असा दाट संशय येतो)
अन सोबत लिंबाची फोड हवीच
भयंकर आहे जेवायला काही तास
भयंकर आहे जेवायला काही तास उरले असताना असं काही पाहायचं म्हणजे...खूप जास्त टेम्प्टिंग आहे...पण मी लॅंब खात नाही आणि इथे मटण मिळत नाही.......सॉब सॉब.....स्सु....स्सु....
>>(२ जणांसाठी ४-५ तुकडे म्हणजे खाणारे व्हेजिटेरियन्स असावेत असा दाट संशय .......:D![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
इब्लिस, अगदी अगदी! रेसिपी,
इब्लिस, अगदी अगदी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रेसिपी, फोटो एकदम कातिल !
पुढच्या गटगला हाच प्रकार करून आण बरं का
फोटो पाहुन तोपासु.
फोटो पाहुन तोपासु.
वेका उर्फ वेळकाढू
वेका
उर्फ वेळकाढू ताइ/माइ/अक्का
मेंढी खायला काय झालं?
गोंधळाच्या मटनात बोलाइ अन बोकड एकत्रच शिजतं हो
नुस्तं वेका म्हणा नं...चालेल
नुस्तं वेका म्हणा नं...चालेल मला..:)
ते मला गोलाईचा वास येतो...म्हणून मी खात नाही (आणि घरी बनवत पण नाही) आईकडे कधी खाल्लं नाहीये म्हणून...
मस्त अगदी तोंपासु
मस्त अगदी तोंपासु ,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वाढणी/प्रमाण: २ जणांसाठी >>> मला एकट्याला ते चकणा म्हणुन पण पुरणार नाहीत
सोनली, मस्त फोटो.
सोनली, मस्त फोटो. शेजार-पाजार्यांनी अजुन बघितला नाही असे दिसते आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा ! फोटो बघून एकदम तोंपासु..
वा ! फोटो बघून एकदम तोंपासु..
जबरदस्त फोटो कधी खाउ असे
जबरदस्त फोटो
कधी खाउ असे झालंय