१) १ पालक जुडी (साफ करुन स्वच्छ धुवुन)
२) १ वाटी मोड आलेली मटकी व मुग किंवा मोड आलेले कोणतेही कडधान्य
३) १०-१२ पुदीन्याची पाने
४) मुठभर कोथिंबीर
५) ७-८ लसुण पाकळ्या
६) पाव इंच आले
७) १-२ मिरच्या
८) पाव चमचा हिंग
९) १/२ चमचा हळद
१०) १ चमचा गोडा मसाला
११) चवीनुसार मिठ
१२) कणिक गरजेनुसार
१३) तुप
१४) तेल
१) पालकची पाने थोड्या पाण्यात वाफऊन घ्या किंवा फक्त एक उकळी आणा.
२) पालकची उकडलेली पाने व वरील जिन्नस क्रमांक २ ते १० ची एकत्र मिक्सरमधुन पेस्ट करुन घ्या.
३) आता आपल्या गरजेनुसार किंवा मिश्रणात मावेल एवढे कणिक मिसळा. मिसळतानाच मिठाचा अंदाज घेउन मिठ टाका.
४) आता थोड तेल घालून पिठ चपातीप्रमाणे चांगल मळून घ्या.
५) आता चपाती प्रमाणे अगदी तुम्हाला हवे तसे म्हणजे घडीचे, साधे पराठे लाटा.
६) गरम तव्यावर पराठे मध्यम आचेवर खरपुस भाजून घ्या व भाजताना दोन्ही बाजुने तुप पसरवा.
७) हे गरमागरम पराठे आता सॉस/चटणी/लोणचे/रायते/भाजी कशाही बरोबर सर्व करा.
आपली छोटी लेकरे पालक, मुग, मटकी खाताना जरा आढे-वेढे घेतात पण तेच जिन्नस घालून केलेले पराठे मात्र आनंदाने खातात.
तुमच्या आवडीनुसर अजुन भाज्याही तुम्ही घालू शकता.
जर तिखट आजिबात नको असेल तर मिरची कमी किंवा नाही घातली तरी चालेल.
व्वा व्वा स्स्स्स्स्स्स
व्वा व्वा
स्स्स्स्स्स्स
Pages