साहित्य :- कोवळे मटार दाणे एक वाटी, मिरच्या तीन, लसुण आठ दहा पाकळ्या, जिरे एक टे. स्पुन, मीठ चवीनुसार, गरम मसाला व साखर एक टे. स्पुन. कोथिंबीर, तेल तळण्यासाठी, फ़ोड्णीचे साहित्य.
पारीसाठी :- एक वाटी कणीक, दोन टे.स्पुन बेसन पिठ, किंचीत हळद, मीठ थोडेसेच चविनुसार, तेल एक टे. स्पुन. हे सर्व एकत्र करुन पिठ घट्ट मळुन ठेवा.
कॄती :- प्रथम मिरची, लसुण, जिरे एकत्र वाटून घ्या, एक चमचा तेल घालून मोहरी, हिंग, हळद घालुन फ़ोडणी बनवा, त्यावर मिरची, लसुण, जिरे पेस्ट परतुन घ्या, त्यात मटार दाणे घालून चांगले मउ होईपर्यंत वाफ़वुन घ्या नंतर त्यात मीठ, गरम मसाला व साखर,कोथिबिंर घाला,
आता हे मिक्सरमधून ओबडधोबड काढून घ्या,बाजूला ठेवा,सारण तय्यार.
आता करंजीसाठी पारी लाटून घ्या, त्यात एक ते दीड चमचा सारण भरा, करंजीचा आकार देउन कडेने कातणीने कापा, अशा सर्व करंज्या करुन घ्या
कढईत तेल गरम करावयास ठेवा, तेल चांगले तापले की
.सर्व करंज्या तळून घ्या.
गरम गरम मटार करंज्या सर्व्ह करा.
आवडत असेल तर या बरोबर चिंचेची आंबटगोड चटणी करा.
http://lh4.ggpht.com/_rln8JDRK_5E/TQT8w2KooCI/AAAAAAAAAIo/viYSka2UBaI/s4...
http://lh6.ggpht.com/_rln8JDRK_5E/TQT9KKLtqII/AAAAAAAAAI8/-2AfOIoEs7Q/s4...
http://lh6.ggpht.com/_rln8JDRK_5E/TQT9KXpQUeI/AAAAAAAAAJA/OO8R-WmO4R8/s4...
http://lh6.ggpht.com/_rln8JDRK_5E/TQT9JJaRVhI/AAAAAAAAAI4/fUK1wvBMGho/s4...
http://lh4.ggpht.com/_rln8JDRK_5E/TQT9KSZSEGI/AAAAAAAAAJE/VY_-TkBGoNU/s4...
http://lh6.ggpht.com/_rln8JDRK_5E/TQT9KXi4QOI/AAAAAAAAAJI/LOvELV4_Tmw/s4...
http://lh4.ggpht.com/_rln8JDRK_5E/TQT8xULqnyI/AAAAAAAAAI0/5Sw7-pUrp_w/s4...
छान दिसतायत करंज्या पाकृ
छान दिसतायत करंज्या
पाकृ लिहीताना मधल्या १-२ स्टेप्स लिहायच्या राहिल्या आहेत का?
आता हे मिक्सरमधून ओबडधोबड काढून घ्या,<<<<<< या नंतर?????
निवेदिता, करंज्या छान
निवेदिता, करंज्या छान झाल्यात, पण मधल्या स्टेप्स लिहून जरा अपडेट कर!
मला हे माझे मटारच्या
मला हे माझे मटारच्या करंज्यांचे फोटो कुणी अपलोड करुन देईल काय??
जमतच नाहीये .
हे घ्या फोटो!
हे घ्या फोटो!
छान जमल्यात.
छान जमल्यात.
निवेदिता, मस्त आहे रेसिपी...
निवेदिता, मस्त आहे रेसिपी... नक्की करुन बघीन...:)
मस्त आहे रेसिपी...
मस्त आहे रेसिपी...