धडपड हा तसा प्रत्येक उद्योजकाच्या कारकिर्दीचा अविभाज्य भाग. उद्योगाची सुरुवात, परिश्रम, आलेले चढउतार, चाखलेलं यश, अपयशाला धीरानं तोंड देणं अशा काही पायर्या या प्रत्येकाच्याच व्यावसायिक आयुष्यात दिसून येतात. बर्याच उद्योजकांचा हा प्रेरणादायी प्रवास आपण कुठेना कुठे वाचलेला असतो. त्यातल्या घटनांमुळे तो आपल्या लक्षातही राहिलेला असतो.
'मसाला' हा चित्रपट मांडतो कहाणी एका उद्योजकाच्या धडपडीची...
या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी स्पर्धा - 'उद्योजक ओळखा'.
चला तर मग खेळूया 'उद्योजक ओळखा' हा खेळ..
या स्पर्धेतले दुसरे उद्योजक ओळखण्यासाठी क्लू -
चित्र क्र. १.
चित्र क्र. २.
चित्र क्र. ३.
चित्र क्र. ४.
चित्र क्र. ५.
चित्र क्र. ६.
या सहा क्लूंचा वापर करू तुम्हांला या उद्योजकाचं नाव ओळखायचं आहे.
खेळाचं स्वरूप आणि नियम येथे पाहता येतील.
एक महत्त्वाची सूचना.
उत्तर देताना तुम्हांला या तिन्ही (किवा सहाही) क्लूंचा उद्योजकाशी काय संबंध, हे सांगायचे आहे. पूर्ण स्पष्टीकरण नसेल, तर उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. शिवाय, 'अमुकतमुक हे उत्तर का?' अशी प्रश्नात्मक उत्तरंही (त्यात उद्योजकाचे नाव बरोबर असले तरी) ग्राह्य धरली जाणार नाहीत.
सर्वप्रथम बरोबर उत्तर देणार्या विजेत्यास मिळतील 'मसाला' चित्रपटाच्या खेळाची २ तिकिटे!
आपली उत्तरं या बाफावर लिहा (स्पष्टीकरणासह )आणि जिंका 'मसाला' चित्रपटाची दोन तिकिटं..
विक्रम पंडीत असेतील का ? १)
विक्रम पंडीत असेतील का ?
१) अमेरीकेत आहेत म्हणून कदाचित अमेरीकन बास्केट बॉल दाखवलय
२) बॅंकेशी संबंधीत म्हणून आकडे मोड
३) नाव विक्रम म्हणून विक्रम वेताळ आणिक हॅरी पॉटर पूस्तकाने पुस्तक विक्रीचा विक्रम केला म्हणून कदाचित विक्रम
४) ते हॉस्पीटलच काही कळ्ळ नाय बॉ
(विक्रम वेताल, हॅरी पॉटर -
(विक्रम वेताल, हॅरी पॉटर - रोलिंग, Dr - PhD) विक्रम कनोदिया?
उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी एक
उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठ्ठा क्लू - उद्योजक मराठी आहेत, आणि त्यांच्या उद्योगाचं मुख्यालय पुण्यात आहे.
वरच्या पोस्टींमधले काही शब्द तुम्हांला उत्तरापर्यंत सहज पोहोचवतील..
पर्सिस्टंट सिस्टीम्स चे डॉ.
पर्सिस्टंट सिस्टीम्स चे डॉ. आनंद देशपांडे हे उत्तर आहे.
सुहास पाटील.
सुहास पाटील.
मंडळी, उत्तराबरोबर
मंडळी,
उत्तराबरोबर स्पष्टीकरणही आवश्यक आहे, हे लक्षात असू द्या.
सगळे क्ल्यू सांगता आले
सगळे क्ल्यू सांगता आले पाहिजेत का माप्रा?
हो.
हो.
उत्तर आहे विवेक रणदिवे. पार्ट
उत्तर आहे विवेक रणदिवे.
पार्ट ओनर ऑफ गोल्डन स्टेट वॉरियर्स -क्लू १
फाउंडर ओफ सॉफ्ट्वेअर कंपनी टिबको - क्लू २
जन्म मुंबई - क्लू ३ ( भायखळा हॉस्पिट्ल म्हणजे मुंबई)
नाव विवेक - क्लू ४ ( विक्रम वेताळ कहाणी - विवेक पहिलं अक्षर घेऊन)
ऑथर ऑफ द पॉवर ऑफ नाउ - क्लू ५ ( २ बेस्ट सेलर्स टू हिज क्रेडिट )
मी सर्वसाधारण सगळ्या क्ल्युज
मी सर्वसाधारण सगळ्या क्ल्युज वरून काढलेला अर्थ सांगते.
बायनरी कोड दर्शवितो की व्यक्ती ही संगणक/ सॉफ्टवेअर उद्योगाशी संबंधित असावी. चित्र क्रं ६ वरून खरगपूर हा क्ल्यू मिळतो. म्हणजे खरगपूर आयआय्टी येथून शिक्षण झाले असावे.
सगळ्यात मोठ्ठा क्ल्यू तुम्ही आत्ता दिलात की पुणे येथे मुख्य कार्यालय आहे.
वरती चित्र क्र. ३ मध्ये हॉस्पीटल आहे. त्यावरून डॉ. हा निष्कर्ष काढला.
हॅरी पॉटर- एच पी
चित्र क्रं १- गोल्डन स्टेट कॅलिफोर्निया. ( याठिकाणी एच पी मध्ये ते कार्यरत होते)
विक्रम वेताळ- वरून मला पर्सिस्टंट सुचले
डॉ. आनंद देशपांडे ह्यांनी खरगपूर आयआयटी येथून शिक्षण घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले. एच पी या कंपनीत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी पुण्यात परतल्यावर पर्सिस्टंट ही कंपनी चालू केली.
बिल्वा, तुमचं उत्तर अगदी
बिल्वा,
तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. आणि बरचसं स्पष्टीकरणही.
बक्षीस म्हणून तुम्हांला 'मसाला'ची दोन तिकिटं मिळतील. ही तिकिटं तुम्ही इतर कोणालाही देऊ शकता. आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.
तुमचं हार्दिक अभिनंदन.
हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करणार्या सर्वांचे आभार.
कोड्याचं उत्तर -
डॉ. आनंद देशपांडे.
चित्र क्र. १. - एनबीए - यशस्वी उद्योगाची स्थापना करण्यासाठी need, budget, authority या तीन गोष्टीं गरज असते, असं डॉ. देशपांडे नेहमी सांगतात. यशस्वी उद्योगाच्या या त्रिसूत्रीला ते फार महत्त्व देतात.
चित्र क्र. २. - पिंगळा या भारतीय विद्वानानं सर्वप्रथम 'छंदशास्त्र' या ग्रंथात 'बायनरी सिस्टिम'ची संकल्पना मांडली, असं समजलं जातं. 'पर्सिस्टंट'च्या एका इमारतीचं नाव पिंगळा आहे.
चित्र क्र. ३ - या चित्रातल्या कमानीवर ओपीडी असं लिहिलं आहे. Outsourced software product development (ओपीडी) हे 'पर्सिस्टंट'चे बलस्थान आहे.
चित्र क्र. ४ - विक्रम आणि वेताळ - पर्सिस्टंट
चित्र क्र. ५ - हॅरी पॉटर = एचपी. पुण्यास परतण्याआधी डॉ. देशपांडे 'एचपी'मध्ये कार्यरत होते.
चित्र क्र. ६ - खरगपूरच्या आयआयटीच्या आवारातलं रुग्णालय. डॉ. देशपांडे यांचं शिक्षण या संस्थेत झालं.
सुहास पाटील १) अमेरिका
सुहास पाटील
१) अमेरिका कनेक्शन
२) ०-१ सेमीकंडक्टर्स ईंडस्ट्री
३) "डॉ" सुहास पाटील
४) ---
५) हॅरी पॉटरचे ईडियन कनेक्शन म्हणजे त्या 'पाटील' आडनावाच्या दोन मुली
६) आय आय टी खरगपूर.
बिल्वा, अभिनंदन.
बिल्वा, अभिनंदन.
बिल्वा, अभिनंदन!
बिल्वा, अभिनंदन!
अर्रे!! थँक्यू थँक्यू, माप्रा
अर्रे!! थँक्यू थँक्यू, माप्रा
तुमचे क्ल्यूज मागे दडलेले अर्थ भारी होते. मी फारच सरधोपट अर्थ लावून , क्लूजची गोळाबेरीज करून उत्तर दिलं.
थँक्यू नंदिनी, आर्च
अरे व्वा! अभिनंदन बिल्वा
अरे व्वा! अभिनंदन बिल्वा
बिल्वा अभिनंदन...
बिल्वा अभिनंदन...
अभिनंदन बिल्वा छान होतं हे
अभिनंदन बिल्वा
छान होतं हे कोडं 
बिल्वा, मनःपूर्वक अभिनंदन
बिल्वा, मनःपूर्वक अभिनंदन
अभिनंदन बिल्वा!!!
अभिनंदन बिल्वा!!!
बिल्वा, अभिनंदन! सही पहचाना!
बिल्वा, अभिनंदन!
सही पहचाना!
बिल्वा अभिनंदन !!! पण एकंदर
बिल्वा अभिनंदन !!!
पण एकंदर मला हे क्लु पटले नाहीत. कारण एकवेळ त्यांच्या शैक्षणिक बाजु , कंपनीच नाव वगैरे ठीक आहे. पण त्यांच्या बिल्डींग च नाव वगैरे कठीण आहे. जे लोक पुण्यात रहात नाहीत त्यांना हे कोडं कधीच सोडवता येणार नाही. आणि हे कोडं सोडवण्या साठी त्या उद्योजकाची एकदम इत्यंभुत माहिती पाहीजे. म्हणजे त्यांचे विचार वगैरे
परत डॉ. आनद देशपांडे हे काही आधीच्या कोड्या प्रमाणे दिलेल्या किर्लोस्करांसारखे फेमस नाहीत की कोणालाही ते माहिती असावेत.
आज जी लोक आय टी शी संबंधीत नाहीत त्यांनी त्यांचे नाव देखील ऐकलेले असणे कठीण आहे.
शाब्बास बिल्वा.
शाब्बास बिल्वा.
बिल्वा, हार्दिक अभिनंदन...हा
बिल्वा, हार्दिक अभिनंदन...हा धागा मी फ़क्त वाचतेय....मला फ़क्त सुरूवातीला उगाच स्टीव्ह जॉब्ज वाटला होता पण क्लु खतरनाक होते...आणि ते हॅरी पॉटर आणि वेताळ आल्यावर तर डोक्याचं दहीच झालं....मग उर्वरीत धागा नित्यनियमाने वाचला....मस्त कल्पना आहे आयोजकांची.....
Pages