EARTH HOUR 2012 - पर्यावरण संरक्षणासाठी एक जागतिक चळवळ
२००७ मधे सिडनी, ऑस्ट्रेलिया इथे सर्वप्रथम 'अर्थ आवर' ही कल्पना रूजली. मार्च महिन्याच्या शेवटच्या शनीवारी रात्री ८.३० वाजता वीजेचे दिवे, अनावश्यक वीजेची उपकरणे इ इ एक तासासाठी बंद ठेऊन 'ग्रीन हाऊस गॅसेस' च्या प्रमाणात लक्षणीय घट आणण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला. आता हा उपक्रम जगातिल इतर अनेक देशात राबवला जातो. भारतातसुद्धा मागची २ वर्ष 'अर्थ आवर' साजरा केला जातो.
यंदाचा 'अर्थ आवर' आहे येत्या शनीवारी ३१ मार्च २०१२ रोजी संध्याकाळी ८.३० ते ९.३० (सिडनी टाईम). या बद्दल अधिक माहिती, वेगवेगळ्या देशातिल स्थानिक वेळा आणि रजिस्ट्रेशन यासाठी खालिल दुवा बघा.
घरात, दुकानात, कार्यालयात अगदी शक्य असेल तिथे दिवे लावु नका किंवा अगदी आवश्यक तेव्हढे कमीतकमी दिवे, वीजेची उपकरणे या वेळात वापरा. वीजेची बचतही होईल आणि पर्यावरण जतन करण्यासाठी आपल्याकडुन मदत देखिल. ही साधारण जेवणाची वेळ असल्यामुळे या दिवशी कँडल लाईट डिनरचा आनंद घ्या
तसेच पर्यावरण संवर्धन/ पर्यावरण संरक्षण यासाठी तुमच्या काही कल्पना असतिल, योजना असतिल, तुम्हाला काही अजुन माहिती असेल तर इथे जरूर लिहा
चला सगळे मिळुन आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हातभार लावुया
लाजो, सुरवात आता केलीच
लाजो, सुरवात आता केलीच पाहिजे.
हि वेळ स्थानिक आहे कि जी.एम.टी. ?
दिनेशदा, मी दिलेली वेळ ही
दिनेशदा, मी दिलेली वेळ ही ऑस्ट्रेलिअन इस्ट कोस्ट वरची वेळ आहे.
अर्थ आवरच्या वेबसाईटवर अधिक माहिती मिळेल. मी देखिल शोधते
छान आहे कल्पना. नक्की हातभार
छान आहे कल्पना. नक्की हातभार लावणार. धन्यवाद, लाजो.
माझा असा समज होता कि - "
माझा असा समज होता कि - " संध्याकाळी ८.३० " हे फिक्स असते. आपापल्या टाईम झोन प्रमाणे पाळायचा झाले !
छान आहे ............
छान आहे ............
खरच चागंला उपक्रम आहे...
खरच चागंला उपक्रम आहे... गेल्या वर्षी सुद्धा वाचले होते.
चारूदत्त, माझाही असाच समज
चारूदत्त, माझाही असाच समज आहे. परंतु वेबसाईट एकदा चेक करुन कन्फर्म करायला हवे. मी थोड्यावेळाने बघते आणि लिहीते इथे.
वेळ तीच फिक्स आहे, कुठल्याही
वेळ तीच फिक्स आहे, कुठल्याही देशात.
रच्याकने, अर्थ अवरमधे माबोवर एकही पोस्ट आली नाही पाहिजे!!!!!!!!!!!!
मागच्या वर्षी 'अर्थ अवर' च्या
मागच्या वर्षी 'अर्थ अवर' च्या सन्ध्येची उपग्रह छायाचित्रे पाहिली होती . .
नक्कीच केलं पाहीजे
नक्कीच केलं पाहीजे हे.
[रच्याकने, आपण गेली ७-८ वर्षे लोड शेडींगच्या नावाखाली हे करत आहोतच. आपले सरकार ह्यासाठी स्वत:ची पाठ पण थोपटून घेऊ शकेल. ]
उपक्रम छान आहे. आणि त्यासाठी
उपक्रम छान आहे. आणि त्यासाठी शुभेच्छा !
असे वर्षातून एकदा आणि एकच तास विजेचे दिवे किंव्हा उपकरणे बंद ठेऊन पर्यावरणात असा काय फरक पडणार आहे? जगभरात होणार्या प्रदुषणाला मुख्यःत्वे जबाबदार आहेत ती वाहने. जो पर्यंत यावर नियंत्रण ठेवता येत नाही, तो पर्यंत ह्या समस्या तशाच राहतील. भारतातील एकूणच औष्णिक विज केंद्रे जितके प्रदुषण आठवड्यात करतात, तितके प्रदुषण वाहने एका दिवसात अथवा त्याही पेक्षा कमी वेळात करतात. आणि एकाद तास एकाद्या शहरात 'लोड शेडींग' करुन या पावरप्लँट वरचा भारही कमी होणार नाही.
आणि इथे मोठी शहरे सोडलीतर, उर्वरीत महाराष्ट्र सदैव बारा-बारा तास अंधारातच असतो.
आम्ही घरात सौर ऊर्जेवरचे दिवे
आम्ही घरात सौर ऊर्जेवरचे दिवे बसवून घेतले आहेत. सूर्य मावळला की आपोआप लागतात, नको तेव्हा तुम्ही बंद करु शकता. रात्रभर एक दिवा चालू ठेवतो आम्ही, नाहीतर बॅटरी वापरली जाणार नाही.
खेड्यामधे सरकारकडून १००% सबसिडी आहे. आधी आपण पैसे भरायचे, १ वर्षानंतर ते पैसे परत मिळतात. सुरुवातीला काही लोकाना पैसे परत मिळाले, आता ते त्या बदलात आणखी एक संच देतात, तुम्ही वापरा, वा दुसर्याला द्या/विका.
माझ्या आईकडे एक संच होता ( १०,००० रुपये), त्याना जो दुसरा मिळाला, तो आम्ही घेतलाय. ६ दिवे मिळालेत. छान प्रकाश आहे.
सरकारी योजना नसेल, तरी विकत घेऊनही वापरायला हरकत नाही असे वाटते. वीजबिलात काय फरक होतोय ते काही दिवसांनी कळेल.
रच्याकने, अर्थ अवरमधे माबोवर
रच्याकने, अर्थ अवरमधे माबोवर एकही पोस्ट आली नाही पाहिजे!!!!!!!!!!!! >>>> भारी आगावा.
विजय_आंग्रे , हो हा प्रयत्न
विजय_आंग्रे , हो हा प्रयत्न खूप तोडका जरूर आहे ! पण चूकिचा नाही. आणि काहिच नसण्यापेक्शा बरे.... फॅशन म्हणून विज वाचवली तरी चालेल पण थोडा भार हलका होवू दे ..
धन्यवाद आगाऊ रच्याकने, अर्थ
धन्यवाद आगाऊ
रच्याकने, अर्थ अवरमधे माबोवर एकही पोस्ट आली नाही पाहिजे!!!!!<<< हे भारीए पण जगात वेगवेगळ्या ठिकाणी ८.३० वेगवेगळ्या वेळेला वाजणार ना.... म्हणजे सगळीकडेच एकाच वेळी ८.३० नाही वाजणार त्यामुळे माबोवर पोस्टी येणारच ना ....
>>हा प्रयत्न खूप तोडका जरूर आहे ! पण चूकिचा नाही. आणि काहिच नसण्यापेक्शा बरे.... फॅशन म्हणून विज वाचवली तरी चालेल पण थोडा भार हलका होवू दे<<, ++ १
@ अश्विनी... खुप छान पर्यावरण संरक्षणासाठी हेच तर अपेक्षित आहे...
उपक्रम चांगला आहे पण एक
उपक्रम चांगला आहे पण एक शंका.. ज्यांच्याकडे दिवसातून ४-६ तास लोड शेडींग आहे किंवा दर शुक्रवारी २४ तास म्हणजे संपूर्ण दिवस लाईट जाते अश्यांनी हा दिवस का आणि कसा साजरा करावा? जिथे मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध आहे अश्या ठिकाणी खरेतर महिन्यातून एकदा हा उपक्रम राबवायला हरकत नाही.. म्हणजे जिथे लोड शेडींग आहे त्यांना तरी जरा अधिक वीज मिळू शकेल...
विजयचा मुद्दाही योग्य आहे..
रच्याकने, अर्थ अवरमधे माबोवर एकही पोस्ट आली नाही पाहिजे!!!!!
>>>लोक फोन चार्ज करून ठेवून फोन वरून येतील इकडे...
जिथे मुबलक प्रमाणात वीज
जिथे मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध आहे अश्या ठिकाणी खरेतर महिन्यातून एकदा हा उपक्रम राबवायला हरकत नाही >> +१ तेथेच जास्त उधळली जाते विज.
फारच चानगाल उपक्रम अहे ....
फारच चानगाल उपक्रम अहे .... प्रतेकाने जमेल तेवधा योगदान द्यावा!!!!!!
आज २३ मार्च २०१३ स्थानिक
आज २३ मार्च २०१३ स्थानिक वेळेनुसार रात्री ८.३० ते ९.३० हा एक तास 'EARTH HOUR' चा आहे.
ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर वीजेची बचत करा
'EARTH HOUR' इथे अधिक माहिती मिळेल.