सुप्त मनोकामना

Submitted by pbs_2005 on 28 March, 2012 - 13:28

श्री कामत यांची पदोन्नती होते आणि ते कार्यकारी अभियंता म्हणून रुजू होण्यासाठी य विभाग कार्यालयामध्ये जात्तात. श्री कामत यांचे आदेश मुख्यालयातून आले असल्यामुळे त्यांना तेथे हजर करून घेण्यात आले. परंतु, तिथे काम करत असलेले कार्यकारी अभियंता श्री सिंग ह्यांचा तेथेच राहाण्याचा प्रयत्न चालू असतो. श्री सिंग यांच्या मदतीला त्या विभागातील सर्व अधिकारी तसेच तेथील उपायुक्त देखील होते. त्या सर्वांना श्री सिंग हेच कार्यकारी अभियंता हवे होते.

उपायुक्तांनी श्री सिंग यांना य विभागातच ठेवण्याची आणि श्री कामत यांना क्ष विभागात पाठविण्याची विनंती उच्च पदस्थान्ना पत्राद्वारे केली. श्री सिंग यांचा त्याप्रमाणे तेथेच राहाण्याचा प्रयत्न चालू होता.

श्री कामत यांना या सर्व घडामोडींची कल्पना आल्यावर त्यांनी त्या सर्वांच्या प्रयत्नांचा काय निकाल याची वाट पहाणे पसंद केले. तोपर्यंत, त्या विभागातील कामाची माहिती व हाताखालील अधिकारी वर्गाची ओळख करून घेतली. पंधरा ते वीस दिवस निघून गेले तरी श्री सिंग यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते.

दरम्यानच्या काळात उपायुक्तांकडे एक नियमीत सभा सुरू होती. एका एका विभागांचा आढावा सुरू होता. अचानक, उपायुक्तांनी श्री कामत यांना त्यांनी त्या विभागात हजर झाल्यापासून केलेल्या कामाची माहिती विचारली. श्री कामत स्तंभीत झाले. त्यांनी एवढेच सांगितले की ते विभागाची माहिती घेत असून पुढील बैठकीच्यावेळी त्याबाबत पूर्ण माहिती देतील. श्री कामत हे उपायुक्तांच्या प्रश्णांमुळे आशर्यचकीत झाले.

बैठकीच्या नंतर श्री कामत यांनी उपायुक्तान्ची त्यांच्या दालनात भेट घेतली आणि त्यांची नाराजी स्पष्ट शब्दात सांगितली.

श्री कामत: आजच्या बैठकीतील आपल्या प्रश्नाचे मला आश्चर्य वाटले. मला माहीत आहे की मी कार्यकारी अभियंता म्हणून या विभागात काम करणे हे आपल्याला पसंद नाही. तसेच माझी या विभागातून बदली करण्याकरिता आपले प्रयत्न चालू आहेत. अश्या परीस्थितीत मी येथे काम कसे करू शकणार?

असे सांगून श्री कामत हे आपल्या कार्यालयात निघून गेले. परंतु त्यांना राहून राहून उपायुक्तांच्या प्रश्नाने हैराण केले. त्या मागे उपायुक्तांचा काही तरी डाव असावा असे वाटू लागले. मग त्यांनी ठरविले की उपायुक्तांच्या त्यांच्या बदलीच्या प्रयत्नांची वाट न बघता आपले काम करावे. श्री कामत यांनी मग त्यांच्या हाताखालच्या अधिकारीवर्गाने कशाप्रकारे काम करणे अपेक्षित आहे याच्या लेखी सूचना दिल्या. तसेच त्या विभागात चालू असलेल्या कामांची पाहणी करण्याचा त्या महिन्याचा कार्यक्रम आखून त्यांच्या कनिश्ठान्ना त्या पाहाणीच्यावेळी हजर रहाण्याच्या सूचना दिल्या.

पाहणीच्या पहिल्याच दिवशी संबंधित प्रभागातील कनिष्ठ/ दुय्यम अभियंते कामे दाखविण्यासाठी आले नाही. त्यांच्या सहायक अभियंत्यांकडे चौकशी केल्यावर असे त्यांनी असे कळविले की सदर अभियंते त्या दिवशी रजेवर आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशीचा कार्यक्रम रद्द करावा लागला. दुसर्‍या दिवशी संबंधित अभियंते आजारी असल्यामुळे आले नव्हते. आणि अशीच वेगवेगळी कारणे गैरहजर राहण्याची त्यांना मिळू लागली.

श्री कामत यांना कळून चुकले की त्यांना कामे न दाखविण्यासाठीच प्रत्येकजण अनेक क्‍लूप्त्या काढत आहेत. त्यामुळे श्री कामत यांनी संबंधित सहायक अभियंत्यांना लेखी पत्र लिहून कारणे दाखविण्यास सांगितले. आणि सहायक आयुक्तान्ना अहवाल केला. पत्र मिळताच ते सर्व अभियंते आणि त्यांचे ठेकेदार उपायुक्तांना जाऊन भेटले आणि श्री कामत यांना लवकरात लवकर त्यांच्या विभागातून पाठविण्याची विनंती केली. त्या सर्व अधिकारीवर्गाचे ऐकून उपायुक्तांनी पुन्हा एक पत्र वरिश्ठान्ना पाठवून कळविले की श्री कामत यांची बदली ज्ञ विभागात करावी.

उपायुक्तांनी पाठविलेल्या या पत्राची माहिती ज्ञ विभागातील अधिकारी आणि ठेकेदारान्ना मिळाल्यावर ते सर्व उपायुक्तांना येऊन भेटले आणि त्यांना विनंती केली की श्र कामत यांना त्यांच्या विभागात पाठवू नये. परंतु, उपायुक्त त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितित नव्हते. तेव्हा ज्ञ विभागातील ठेकेदारान्नी उपायुक्तांना अक्षरश: धमकीच दिल्यावर त्यानी वरिश्ठान्ना पाठविलेले पत्र सुधारणा करण्याकरिता परत मागवून घेतले.

नंतर थोड्याच दिवसात श्री कामत यांच्या बदलीचे आदेश मुख्यालयातून आले. सदर आदेश सहायक आयुक्तांनी श्री कामत यांना दिले. त्या क्षणी उपायुक्तांनी श्री कामत यांना त्यांच्या दालनात बोलावून घेतले.

उपायुक्त: विभागात सुरू असलेल्या काही कामांची पहाणी करून कामांमधील त्रुटिन्चा अहवाल सादर करा.

श्री कामत: या विभागातील सहायक अभियंते आणि त्यांच्या हाताखालील अभियंते हे कामे दाखविण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे सुरू असलेल्या कामांची पहाणी तिथे असलेल्या कार्यकारी अभियंता श्री सिंग यांच्याकडून करून घेण्याची कृपा करावी.

उपायुक्त: श्री सिंग हे खरा अहवाल देत नाहीत म्हणून तुम्हाला सांगत आहे.

श्री कामत: कामांची यादी आणि ती कामे संबंधित अधिकारी मला दाखवायला तयार नाहीत.

उपायुक्त: कामांची यादी आणि ती कामे दाखविण्यास त्यांना सांगतो.

श्री कामत यांनी सहायक आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची कल्पना दिली.

सहायक आयुक्त: मी तुम्हाला बदलीचे आदेश अगोदरच दिले आहेत. त्यामुळे काय करायचे हे तुम्ही बघा.

उपायुक्तांचे तोंडी आदेश आणि सहायक आयुक्तांनी दिलेले बदलीचे लेखी आदेश यांचा विचार करून श्री कामत यांनी य कार्यालय सोडून मुख्यालय गाठले. तिथे जाऊन बदलीच्या आदेशाची प्रत दिली.
प्रशासकीय अधिकारी: श्री कामत, तुम्हाला इथे रुजू करून घेता येणार नाही. तुमच्या उपायुक्तांचा फोन होता. त्यांनी तुम्हाला परत पाठवायला सांगितले आहे.

श्री कामत: मुख्यालयातून आलेल्या आदेशानुसार सहायुक्तांनी मला तिथून सोडले आहे.
प्रशासकीय अधिकारी: उपायुक्तांनी तुमची कामे प्रलंबित असल्यामुळे तुम्हाला परत पाठवायला सांगितले आहे.

अशाप्रकारे श्री कामत यांना पुन्हा य विभागात जावे लागले. तेथे जाऊन त्यांनी उपायुक्तानची भेट घेतली.

उपायुक्त: श्री. कामत, तुम्हाला कामे पाहून अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

श्री कामत: सहायक आयुक्तांनी मला बदलीचे आदेश देऊन सोडले आहे.

उपायुक्त: परंतु मला तुम्ही कामे पाहून अहवाल द्यायलाच हवा.

श्री कामत यांना समजले की उपायुक्त त्यांच्याकडून का मागत आहेत. त्यामुळे श्री कामत यांनी त्या विभागातील सहायक अभियंत्याला बोलावून घेतले आणि उपायक्तांनी दिलेल्या आदेशांची माहिती दिली.

श्री कामत: उपायुक्तांना कार्यकारी अभियंता म्हणून या विभागात नको आहे. तरीदेखील त्यांनी मला असे आदेश का दिले आहेत याचा विचार करा. त्यांना हवा असलेला अहवाल मी लेखी सादर करणार आहे, तोंडी नाही. त्यामुळे उपायुक्तांच्या आदेशांची पूर्तता करण्याकरिता कामांची यादी आणि कामे दाखविण्याची व्यवस्था करा.

श्री कामत यांनी दिलेल्या माहितीची आणि परिणामांची कल्पना आल्यावर एवढ्या त्वरेने काय घडामोडी झाल्या हे त्यांना कळले नाही. एक तासाच्या आतच उपायुक्तांनी श्री कामत यांना बोलावून घेतले.

उपायुक्त: श्री कामत वरिश्ठान्चे आदेश पाळायचे असतात. मी आदेश दिलेले असतानादेखिल तुम्ही निघून मला न सांगता निघून गेलात म्हणून मी तुम्हाला पुन्हा बोलावून घेतले. पुन्हा असे करू नका.

असे सांगून त्यांनी श्री कामत यांच्या बदलीच्या आदेशावर त्यांची हरकत नसल्याचे लिहिले आणि श्री कामत यांची य विभागातून सुटका केली. श्री कामत यांना कल्पना आली की उपायुक्तान्ची सुप्त मनोकामना पूर्ण झाली असावी आणि त्यांनी पुन्हा मुख्यालायाकडे प्रस्थान केले.

गुलमोहर: 

kathelaa pharsa ogh watala nahi. shbdanmadhe ji pakad asayla phije ti nahi tyamule kathemadhe ras watat nahi.