करियर आफ्टर अ गॅप्..मदत हवी आहे

Submitted by sneha1 on 28 March, 2012 - 13:25

नमस्कार्..मला थोडी माहिती हवी आहे.

लग्न, मुलगी, अमेरिकेत येणे अशा अनेक कारणांमुळे माझ्या जॉब मधे चांगलीच गॅप पडली आहे. आणि आता EAD मिळाल्यामुळे पुन्हा सुरुवात करायची आहे. तर मला असे प्रश्न आहेत,
१. ही गॅप कव्हर लेटर मधे एक्स्प्लेन करावी की नाही?केल्यास कशी?
२. कव्हर लेटर लिहिण्यास मदत करणार्‍या साईट्स सुचवू शकेल का कोणी?

धन्यवाद..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या नवर्‍याने दोन वर्षे न-नोकरी स्थितीत घालवली हल्लीच. नोकरीतील राजकारणाचा कंटाळा येऊन ती सोडली. आणि भारतात परत कुठे प्रयत्न केला नाही. मधून अधून एका आर्किटेक्टाबरोबर बिझनेस स्पेस डिझाईन, ऑडियो डीझाईन वगैरे करत होता. पण मुख्यत्वे, आमच्या बंगलोरच्या फ्लॅटचे इंटीरियर त्याने केले. पलंग, सोफे, दिवे वगैरे प्रकार थेट लाकडी फळ्या, लोखंडी सळ्या, कॅनव्हास कापड वापरून बनवले. थोडक्यात चिपा बनवण्याच्या कामापासून दूर राहिला.

यूकेत एकच इंटरव्यू झाला. त्यात ब्रेकबद्दल काहीच विचारले नाही. कामाबद्दल याने दिलेली माहिती पुरेशी वाटली आणि जॉब मिळाला.

तात्पर्य - जॉबची गरज काय आहे ते बघणे. कव्हर लेटरमध्ये मी त्याला कशी योग्य आहे ते लिहिणे. आणि मुलाखतीत ते सिद्ध करणे. एव्हढे पुरेसे ठरावे.

बाकी ओपन सोर्स बद्दल अजयशी सहमत.

अरे वा...किती छान माहिती मिळते आहे Happy

माझे क्षेत्र आयटी चे नाही. मी मेटलर्जीकल इंजिनीअरिंग मधे मास्टर्स केले आहे, स्पेशलायझेशन welding consumables मधे. ३ वर्षे VRCE मधे लेक्चरर आणि ३ वर्षे L&T मधे R&D Engineer.

अजय, हे volunteering कुठेही केलेले चालते का?जसे गुडविल, लायब्ररी, की टेक्निकलच लागते?नोकरी मिळेपर्यंत तरी काही तरी सुरू करता येइल.

धन्यवाद सगळ्यांना..
मृण्मयी, मेलची वाट पाहते आहे Happy

तुम्ही जर खूप सिनियर असाल (वय ४४-४५ च्या पुढे) तर एखाद्या वर्षांची गॅप सुद्धा मोठा अडथळा आहे. इतक्या गॅपनंतर तुम्हाला विशेषतः भारतात जॉब मिळणे खूप अवघड आहे. साधारणपणे वयाच्या ३५-४० वयाचा/ची कोणीही ज्यूनिअर रोल घेऊ शकत नाही आणि कोणत्याही कंपनीत सिनियर रोल खूप कमी असल्याने व प्रमोशनसाठी अनेकजण प्रतीक्षा यादीत असल्याने बाहेरून येणार्‍या आणि विशेषतः गॅप घेऊन येणार्‍या सिनिअरांना कंपनी फारसे महत्त्व देत नाही.

पण तुम्ही काहिसे ज्यूनिअर असाल (वय ३५ च्या आत), तर मोठी गॅप असूनसुद्धा जॉब मिळू शकतो.

मी आय सी आय सी आय लोंबार्ड हायद्राबाद येथे फक्त १० दिवस होतो... पण तिथल्या राजकारणाल कंटालुन जॉब सोडला.

मग मुंबईत त्याच ग्रुपच्या आय सी आय सी आय प्रुडेन्शियलमध्ये जॉब लागला, तेंव्हा सगळी हिस्टरी दिली होती, पण हायद्राबाद लिहिले नव्हते... त्याना नंतर कुठून तरी कळले आणि त्यानी मला डायरेक्ट नॉन डिस्क्लोजर ऑफ मटेरियल फ्याक्ट खाली दहाव्या दिवशी टर्मिनेट केले.... ( अर्थात , खरे राजकारण वेगळेच होते.. तिथे सगळे नॉन महाराश्ट्रियन आहेत, त्याना मराठी माणुस हायर लेवलला आणि पे ला नको होता.. पण त्याना आयतेच निमित्त मिळाले. Sad ) असेही होऊ शकते....

एकेक दिवसाचा हिशोब दाखवाल तर बरे होईल.. नंतर कटकटी होणार नाहीत.. कधी कधी असे अंतर्गत नियमही असु शकतात.. अमुक एका कंपनीत असेल तर तो जॉब सोडल्यावर अमुक वर्षे अमुक एका दुसर्‍या कंपनीत जॉब करता येणार नाही वगैरे.. ( ही कंपन्यांची इंटर्नल लफडी असतात.. कुणी कुणाचे लोक चोरु नयेत म्हणून केलेले म्युच्यल करार वगैरे... पण नॉन डिस्क्लोजरमध्ये असली लफडी होऊ शकतात.. )

आणि एकदा नॉन डिक्लोजरचे लफडे लागले, की पुन्हा परत पुढच्या वेळेला ते डिस्क्लोज करणार का, हा वेगळाच ( रादर पुन्हा तोच प्रश्न ! Proud ) प्रश्न.. त्यापेक्षा सगळे लिहा.

जॉब मिळाला तरी कंपनीवाले एक दोन महिने इन्वेस्टिगेट करतच असतात.. त्यात काहीतरी नवीन मिळाले, असे होऊ न देणे चांगले.

तुमच्याकडे आवश्यक ते कौशल्य (स्किल्ससेट) असलं तर अमेरिकेत तरी गॅप असणं याने काहि फरक पडत नाहि. हे सगळं मागणी-पुरवठ्याचं गणित आहे. थोडक्यात गॅप नंतर वर्क फोर्स मध्ये सामील व्हायचं असेल तर बाजारात कुठल्या कौशल्याला मागणी/उठाव आहे ते कौशल्य आत्मसात करा...

आणि चुकुनहि गॅप लपवायचा प्रयत्न करु नका. इंटीग्रेटेड सिस्टिम्स आणि प्रचंड डेटाबेस यापासुन तुम्ही काहिहि लपवु शकत नाहि.

ओपन सोर्स वर काम करायला कुठे जावे लागत नाही. तुमच्याकडे एक संगणक आणि इंटरनेट कनेक्शन असले की झाले. तुम्ही रोज किती वेळ द्यायचा हे ही तुम्हीच ठरवायचे. पूर्वी फक्त प्रोग्रामींग येणार्‍यांसाठीच हे शक्य होते पण आता जसे जसे ओपन सोर्स प्रकल्प जास्त प्रगल्भ होऊ लागले तसे QA, Project management, Marketing, Documentation, graphics याक्षेत्रातल्या व्यक्तीही ओपन सोर्सवर काम करत आहेत.

>हे कसे करायचे, याची काही वेबसाईट असते का? डॉक्युमेंट आहे का?
गुगल नावाची एक वेबसाईट असते. माहीती नसेल तर बींग वर किंवा फेसबुकवर शोधून पहा Happy
तिथे "Open source, Open source project, Open source softare, Open Source software organization, Free software Foundation, Open source volunteering, How to do opensource volunteering" असे वेगवेगळे शब्द शोधले तर ज्या अनेक वेबसाईट पहिल्या पानावर येतात तिथे माहीती मिळेल. (मी हे आत्ता करून खात्री करूनच मग लिहितो आहे). विकीपीडीया नावाच्या वेबसाईटवरही माहिती आहे.

ही माहिती पुरेसी नसेल, आणि तुम्ही आयटीत असूनही हे जमणार नसेल तर Open source ही भानगड तुमच्यासाठी नाही हे धरून चाला. कारण Open source वर काम करताना काही अडले तर परत आपले आपण गुगल करून शोधायचे हा फार महत्वाचा रोजचा भाग आहे. यापुढे कुणाकडून कुठलाही नवीन शब्द कळाला तर त्याच्याशी संबंधीत साईट आपल्या आपण गुगलवरून शोधायची सवय लावा.

तुमच्या गावात Open Source शी संबंधीत ग्रूप असतील तर तिथे जाऊन लोकांना भेटा. ते ग्रूप देखील तुम्हाला गुगलवर सापडतीलच.

>मग कुठला प्रोजेक्ट करायचा, कुणाला जास्त स्कोप आहे, कुणाचा ब्रँड जास्त चलतीत आहे कसे कळणार.
ते कळणार नाही. पण घरी बसून काहीही न करण्यापेक्षा , घरी बसून कुठल्याही ब्रँडवर्/प्रोजेक्टवर काम करणे चांगले असे माझे मत आहे. तुमच्या व्यावसायिक ओळखी तरी होतील. ज्या प्रोजेक्टच्या नियमीत Conferences होतात त्यांच्यापासून सुरुवात करायला हरकत नाही. म्हणजे त्यांची थोडी तरी EcoSystem तयार झालेली असते.

अजय , फार छान पोस्ट्स. आवडल्या.

मी इथे जवळ जवळ ५/६ वर्ष स्वयंसेवकाच काम केलय./ अजुनही करीत आहे. आता तर वेळ मिळत नाही तरी वेळ काढून करते इतकी सवय झालीये.

लायब्ररीमध्ये फक्त न बघता, तुमच्या सिटीच्या( म्युन्सिपाल्टी,. जिथे पाणी बील, रिक्रीएशन पार्क वगैरे गोष्टी असतात) वेबसाईटवर volunteering हा सेक्शन असतो तिथे नाव रजिस्टर करा. पोलिस, अग्निशमन , फंड रेझिंग , अ‍ॅडल्ट एज्युकेशन , गरजु स्त्रीया आणि मुलांसाठी चालवले जाणारे कार्यक्रम , फुड बँक इत्यादी ठिकाणी काम मिळू शकते. तुमच्या एक्स्पर्टीज नुसार पण काम देतात. (आमच्याइथे तर केबल वर एक सिटी volunteering चॅनलच केलय. )
जस कि वेबसाईट डेव्हलपमेंट , अ‍ॅडमिन, कम्युनिकेशन इत्यादी सुद्धा जॉब्ज असतात. पण तेच पाहिजे अस न करता मिळेल ते करावे अस मला वाटत.
स्कुल PTA , स्कुल मधल्या विविध org मध्ये तर नेहमी गरज असते.
काम करणार्‍याला या देशात बसून रहावे लागत नाही अस इतके दिवस राहिल्यावर लक्षात आले आहे. Happy

>>राज, गॅप लपवायची नाहीच....पण फक्त कव्हर लेटर मधेच उल्लेख करावा का नाही हाच प्रश्न होत
अर्थात नाहि. Cover letter is your first (or last) opportunity to impress hiring manager and stand out from the crowd. Obviously, you want to brag about your accomplishments rather than highlighting shortfalls. Moreover, you don't have to bring this point (employment gaps) up during interview. "Don't Ask Don't Tell" policy is not restricted to US Army. Happy

However, if the interviewer asks you to explain then you should be prepared and respond in a heartbeat...

उत्तम माहिती...जामोप्या अनुभव जबरी आहे....चक्क काढून टाकलं.....बापरे....

स्नेहा तू तुझ्या भागातल्या ना नफ़ा ना तोटा (नॉन फ़्रॉफ़िट) संस्था बघ तिथेही बरंच वॉलेंटियरींग काम उपलब्ध असतं...तसंच तुझं क्षेत्र आहे (ज्याचं मला ओ की ठो माहित नाही आहे) त्यांच्या काही संस्था असतात का? त्यांची मेंबर्शीप घेतलीस तर तुझे नवे संपर्क बनतील आणि मग ओळखीतूनही काही मार्ग निघेल.....

>>>>खोदून खोदून गॅप बद्दल विचारणे, एकेका महिन्याचा हिशेब लावणे गॅपचा हे फक्त भारतातच पाहिले मी.
>>>पण एकुणच आशियायी देशात जन्मकुंडली विचारायची पद्धत जाणवली. आपल्या इथे तर धरबंधच नसतो. किती मुलं, मुलांचे वय काय, नवरा काय करतो पासुन काहीही विचारतात.
<<<

+१

भारतात तर दहावीचे सर्टिफिकेट विचारतात.. मला तर मुर्खपणाच वाटतो. MBA चे सर्टीफिकेट दिले ना मग दहावीची मार्क्शीट वगैरे कशाला हवी? १०-१२ वर्षाचा अनुभव आहे, MBA आहे तरी असली माहीती हवी असते.
लग्नाला किती वर्षे झाली असे सुद्धा विचारतात. Sad ह्याचा काय संबध नोकरीशी? इथेच मी जोक म्हणून लिहिला होता वाटते.

तर असो. मी भारतात, एशियाई देशात नोकरी केली तेव्हा असले प्रश्ण विचारलेच. मएरीकेत कोणी नाही विचारले(मला गॅप न्हवती पण साधारण अशी परीस्थिती असते देशा देशातून म्हणून लिहितेय)
प्रश्ण गॅपचा, आपण जस्टिफाय केली व ज्यास्त बाउ न दाखवला तर काही फरक नाही पडत. तुम्हीच आत्मविश्वास दाखवला तर होते. एका मैत्रीणीने नोकरी म्हणून कधीच केली नाही , मग इथे अमेरीकेत येवून ५ वर्षानंतर्(आधी मूल, विसा कारणं) सुरुवात केली. मुलाखतीत उत्तर दिले, मला सर्व कामात पुर्ण डेडीकेशनने करते, तेव्हा जेव्हा घरात्ल्या कामात(मूल संगोपनात) डेडीकेशन हवे होते तेव्हा पुर्ण वेळ नोकरी शक्य न्हवती.

>>>>Generalization धोका पत्करून सांगतो. बहुतेक भारतीय व्यक्तीं "पैसे मिळत नाहित तर कशाला काम करायचे" अशा कोषात असतात. आणि चांगला अनुभव मिळवायची, नेटवर्कींग करण्याची संधी घालवून बसतात.

अगदी अगदी!

शैक्षणीक क्षेत्रातल्या किंवा आधीची नोकरी ज्या क्षेत्रात होती अशा अनुभवाच्या ठिकाणी व्हॉलंटियर काम केलं तर तिथेच नोकरी देखिल मिळू शकते हा अनुभव आहे.

मृण्मयी अगदी अगदी पटतंय...आपल्याला नेटवर्किंग आणि वॉलेंटियरींग याचं महत्त्व पटकन कळत नाही..निदान मला तरी उशीराच कळलं..पण अमेरीकेत मात्र हे लोकं आनंदाने करतात..काही वेळा मानसिक स्वास्थ्यासाठीही ते उपयुक्त आहे कारण नोकरी नसेलच तर नुस्तं घरी बसून डोक पिकवण्यापेक्षा हे बरं....

अवांतर....हे मात्र खरं की भारतीय जितके आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्द्ल विचारतात तितकं परकीय नाही विचारत..त्यांचे प्रश्न जनरली एकंदरित भारतीय आपलं कल्चर याबद्दल असतात आणि ते ठिकच आहे म्हणा..इतक्यात माझा क्लायंन्ट कडचा साहेब भारतीय मिळाला तर त्याने अगदी तू उशीराने काम करतेस मग तुझ्या घरी जेवण कोण करतं इथवर विचारलं..मी सरळ म्हटलं तुला सगळ्या बाहेर खाल्ल्याच्या पावत्या दाखवल्या तर मला पैसे मिळणार आहेत का पण जाम चोंबडेपणा करतो...बरं कधी खरी गरज असली तर सहानुभूती शून्य.......असो....हे थोडं विषयांतर आहे...पण सहज आठवलं......

सुंदर माहिती.. अजय.. कधी गरज पडली नव्हती त्यामुळे तसदी घेतली नव्हती हे सगळ बघायची.. पण आत्ताच राजीनामा दिलाय आणि ब्रेक घ्यायचाय ह्या विचाराने सुद्धा कसं तरी होत होतं नेमकी इथे आले..
लक्षात ठेवेल आता..
रैना.. ते १-८ खूपच आवडले.. ब्रान्ड च्या मागे कधी जाव लागलं नाही ते आपसूक मिळाले १,२ कौटुंबिक प्रायोरिटी मुळे विचार केले नाही. पण ग्याप नंतर परत येताना ह्या गोष्टी कामी येतील.. म्हणजे लक्षात ठेवून करणार आहे असा विचार पक्का केला होता

नमस्कार.

माझी पत्नी QA मधे लग्नाआधी काम करत होती. लग्न झाल्यावर अमेरिकेला आल्यावर तिच्या नोकरीत गॅप पडला जवळपास 10 वर्षाचा. भारतात परत आल्यावर तिने एक रीफ्रेशर कोर्स केला. एक सर्टिफिकेशन केले आणि तिला आता परत नोकरी मिळाली आहे.
कव्हर लेटर मधे फक्त लिहायला हवे की "I am confident that I have the necessary skills and experience to be able to discharge work duties effectively".

काही मुद्दे:
१. लग्न, मुलांच्या जबाबदारीमुळे कामात गॅप पडला यात वावगे काहीच नाही. ही गॅप लपवण्याची किंवा त्याबद्दल awkward वाटण्याची काहीच गरज नाही. रेझुमे मधे लिहायची गरज नाही पण कव्हर लेटर मधे जरुर उल्लेख करावा.
२. Job Interview मधे गॅप बद्दल विचारले जाणे अगदी साहजिक आहे(भारतात , अमेरिकेत किंवा उत्तर ध्रुवावर सुद्धा). त्याचा बाउ करण्याची गरज नाही.
३. या गॅप मधे किंवा नंतर तुम्ही तुमच्या field मधे up to date रहायचा प्रयत्न केला आहे ही गोष्ट मात्र अत्यंत महत्वाची आहे कारण त्यामुळे एक गोष्ट अधोरेखित होते की तुम्ही तुमच्या कामाबाबत serious आहात.

शुभेच्छा.

रेझुमे मधे लिहायची गरज नाही पण कव्हर लेटर मधे जरुर उल्लेख करावा. >>> नाही उलट आहे.
कव्हर लेटर ट्रॅशमध्ये जाऊ शकतो (भारतात आणि आशियायी देशात). कव्हरलेटरवर काय लिहावे हे आपल्या आवडीनुसार ठरवावे फारतर.

रेझ्युमे फायलीत जातो. बॅकग्राऊंडचेकलाही जातो. त्यात चुकीची माहिती अथवा माहितीच दिलेली नसली मुद्दाम तर मिळालेली नोकरी जाऊ शकते.
रेझ्युमे मध्ये नीट क्रमवार माहिती असावी. तपशील चुकीचे नसावे.

प्रश्न कव्हरलेटरमध्ये नमुद करावे विशेषतः की नाही असा होता मानस्मि. Happy
क्रमांक ३ बाबत अनुमोदन.

रैना,

रेझुमे मधे लिहायची गरज नाही पण कव्हर लेटर मधे जरुर उल्लेख करावा.>>>
रेझुमे मधे प्रत्येक प्रोजेक्ट च्या start and end dates असतात. त्यात गॅप आपोआप दिसते (उदा, end date 2001 नंतर start date 2011 आली की गॅप दिसलीच). मी रेझुमेत लिहायचे नाही असे म्हणालो त्याचा अर्थ dates बदलाव्या असे नाही पण explicitly गॅप पडली आहे असे लिहु नये. Strong points वर भर द्यावा एवढेच.
अर्थात हेही सब्जेक्टीव आहे..रेझुमे वाचणारा जो अर्थ काढायचा तो ते काढतोच म्हणा Happy

गुगल नावाची एक वेबसाईट असते. माहीती नसेल तर बींग वर किंवा फेसबुकवर शोधून पहा स्मित
तिथे "Open source, Open source project, Open source softare, Open Source software organization, Free software Foundation, Open source volunteering, How to do opensource volunteering" असे वेगवेगळे शब्द शोधले तर ज्या अनेक वेबसाईट पहिल्या पानावर येतात तिथे माहीती मिळेल. (मी हे आत्ता करून खात्री करूनच मग लिहितो आहे). विकीपीडीया नावाच्या वेबसाईटवरही माहिती आहे.

ही माहिती पुरेसी नसेल, आणि तुम्ही आयटीत असूनही हे जमणार नसेल तर Open source ही भानगड तुमच्यासाठी नाही हे धरून चाला. >>>

अजय Proud

अजय, धन्यवाद. open source ची माहिती नव्हती. आयटी मधे volunteering चा पर्याय असु शकेल असे कधी वाटलेच नव्हते. करायला नक्की आवडेल.
स्नेहा तुम्हाला पण धन्यवाद. चांगली माहिती मिळाली. कवरलेटरवर गॅप लिहु नये असे मलापण वाटते. resume मधुन आपोआप कळेलच व मुख्य म्हणजे मुलाखतीतुन कळेल की गॅप असुन पण डोक्यात सगळे ज्ञान तसेच शिल्लक आहे की नाही.

चर्चा वाचते आहे. माझा थेट संबंध नाही, पण सामान्यज्ञान वाढतं आहे. Happy

अजय, तुमच्या volunteeringच्या मताशी पूर्णपणे सहमत.

अजय, रैना, खूप छान आणि उपयुक्त पोस्टस आहेत.

मी लग्नानंतर चांगल्या कंपनीत माझा QA चा चालू असलेला जॉब स्वखुशीने सोडला आणि अमेरिकेत गेले. तिथे ६च महिने होता पहिला विसा, त्यामुळे वर्क पर्मिटही काढलं नाही. विसा रिन्यू होईलशी खात्री नव्हती हे एक, आणि विसा रिन्यू झाला तर वर्क पर्मिटची सगळी प्रक्रिया पुन्हा पैसे भरून करावी लागते. एक वेळची प्रक्रिया ३ महिन्यांची असते. सुरूवातीलच जर ६ महिने रहायचे, तर ३ महिने प्रक्रियेत जाणार. काही वेळा इतक्या छोट्या कालावधीसाठी वर्क परमिट मिळतही नाही असंही समजलं होतं.
शिवाय नव्याने आलेली घराची जबाबदारी, पूर्ण वेगळं वातावरण यामुळे ६ महिने मजेत घालवले. परत देशात आलो, विसा रिन्यू झाला. अमेरिकेत गेल्यावर पहिल्याच आठवड्यात वर्क पर्मिटसाठी फॉर्म भरला आणि ३ महिन्यानी ते मिळालं. पण तोवर शेवटचं क्वार्टर चालू होऊन नोकर्‍या मिळायची शक्यता कमी झाली होती. अर्थात तरी मी रोज अनेक ठिकाणी अप्लाय करणे आणि फोनवरून बेसिक माहिती कम मुलाखत देणे (गॅपसकट) हे चालूच ठेवलं होतं.

पुढे नवर्‍याचं प्रोजेक्ट संपणं, अमेरिकेत नक्की किती वास्तव्य आहे याबद्दल अनिश्चितता इत्यादीमुळे मला नोकरी करता आली नाही. मी लायब्ररीत स्वयंसेवक म्हणून काम केलं. (इथे मायबोलीवर भयंकर उनाडलेही! :फिदी:) जोक्स अपार्ट, मायबोलीवर गणेशोत्सवात केलेल्या कामाचा अप्रत्यक्षपणे भरपूर फायदा आजही होतो आहे. पण शेवटी वर्क पर्मिट मिळाल्यानंतर १० महिन्यांनी आम्ही परतलो देशात. आल्यावर मलाही गॅपचा ताण होता. त्यातही, मला परत माझ्या होम पीचवर- अर्थात E & TC मधे, शक्यतो Lecturer म्हणूनच काम करायचं होतं कारण मला खरंच यातच रस जास्त आहे. पहिला अनुभव आयटीचा, मग पावणेदोन वर्षं गॅप आणि आता पूर्वानुभव नसलेला शिक्षकी पेशा कायमसाठी...
सुदैवाने त्रास झाला नाही. मी जिथे काम करतेय तिथे माझ्या गॅपबद्दल सांगित्लं. माझा टेक्निकल इंटर्व्यू झाला नाही, पण इतर आवश्यक माहिती घेतली. वैयक्तिक नाही! माझं लग्न झालंय का, मुलं आहेत का...वयं काय....काहीही नाही! फक्त रहाते कुठे ते विचारलं आणि शिकवायचा अनुभव नसल्यामुळे कॉलजच्या विद्यार्थ्यांसमोर मला शिकवायला जमेल ना याची खात्री करून घेतली. भविष्यातही हेच क्षेत्र कायम ठेवायचंय का हे विचारलं आणि दुसर्‍या दिवशी मला रुजू करून घेतलं.

सॉरी पोस्ट फार मोठं वाटलं तर सांगा, मी नंतर एडिट करीन किंवा डिलीटही करीन.

तुम्हाला शुभेच्छा! Happy

.

गॅप नंतर काम सुरु करायच्या प्रोसेसमध्ये भारतात खूप निराशाजनक अनुभव येतोय. गॅप घेतलीत हा तुमचा प्रॉब्लेम आहे. आता तुमची व्हॅल्यू शुन्य.. असा काहीसा सुर असतो....

एनीवे, नववी दहावीच्या मुलांची जशी अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट करता येते तशी सेकंड. ईनिंग सुरु करायच्या प्रयत्नात. असणार्याना उपयोगी पडते का? ( जर अगदीच नविन काही ट्राय करायच असेल तर ) .. असेल तर मुंबईत ही टेस्ट कुठे करता येते?

अजयच्या पोस्टी खूप छान आहेत.

ताई मेटॅ. इंजिनिअरिंग करुनही तुम्हाला काही घरून उद्योग वगैरे करणे कन्सल्टन्सी सुरू करणे शक्य नाही का? ह्या फील्ड मध्ये सॉफट्वेअर ची गरज असेल तर ते डेवलप करणे विकणे असे ही करता येइल. जॉब मिळे परेन्त स्वतःचा उद्योग चालू करू शकता ना?

माझाही काहीसा असाच प्रॉब्लेम आहे. ३ वर्षापूर्वी माझ L&Tमधील कॉन्ट्रॅक्ट संपल आणि ते कंटिन्यु झाल नाही. त्यानंतर सासर्‍यांच्या आजारपणामुळे ३ वर्ष मी घरीच होते. या फेब्रुवारीत सासरे देवाघरी गेले आणि सासुबाई म्हणाल्या की तु परत जॉब सुरु कर. सध्या फॅमिली फ्रेंडच्या ओळखितले विमा एजंट आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जॉब करते, एकिकडे जॉब शोध चालु आहे. पण मनात शंका आहे की अश्या प्रकारची गॅप विचारात घेतली जाईल का? मला अजुन मुलबाळही नाहि.

Pages