भय चिकित्सा..........

Submitted by टोल्या on 28 March, 2012 - 02:40

"मला दारु प्यायची आहे बास!!!!!!"
अम~या रेसिडेंट क्वार्टर च्या दारातन आत येत ओरडला, आल्या आल्या त्याने ऍप्रन फ़ेकुन दिले स्टेथॉस्कोप भिरकावला दिवसभर वागवलेले ग्लॉसी फ़ॉरमल्स उतरवले व झकास बॉक्सर वर बसुन ढेरी खाजवु लागला
"काय झाले आहे अम~या????" डॉ.भगत विचारु लागला, हा मनुष्य भगत बाबा म्हणुन प्रसिद्ध जन्मपत्रिका पाहुन रोकठोक सडेतोड उतारे बनवणे असले उद्योग असायचे ह्याचे, सालं हे डॉक्टरांच जगच वेगळं असतं यार, काही इतके विज्ञाननिष्ठ की देवळाची पायरी पण चढणार नाही अन दुसरे असे की जे दवा सोबत दुआ च्या डोस वर पण निर्भर असतात, दुस~या प्रकारात एक आमचा भगत्या होता, अम~या आमचा बालमित्र अन भगत चुलत मित्र!!!! अम~याचा बॅचमेट!!!!!!.......
"घंटा काय होणार आहे भगत, ऑर्थोपेडिक्स घ्यायला काय आम्ही येडझवे होतो काय???? म्हणुन जनरल सर्जरीच्या पण ड्युट्या ठोकत फ़िरावे लागते आहे..... त्यात आज कहर केला रे, मावळच्या दंग्यांची बुलेट वुंड केस काल ऑपरेट केली होती मी... त्याचा फ़ॉलोअप घ्यायला डीन सोबत रोज एक नवा राजकारणी!!!!!"
"हा हा हा...... अंब्या तुझे काही खरे नाही तुला आता गर्लफ़्रेंड हवी आहे लेका हा हा हा" इति अस्मादिक
"गप साल्या, पोरीचे तर नाव पण काढु नको, आज दुपार नंतर गायनिक्स ला ड्युटी लावली साल्यांनी..... पाच डीलिव्ह~य़ा करुन आलो आहे आता मल्लिका शेरावत आणुन दिली तरी नकोय मला.... वैताग नुसता त्या पाच डीलिव्ह~यात ३ प्रायमी"
माझी शंका उफ़ाळताना पाहुन मी अजुन शिव्या न खाव्या म्हणुन भगत्याच चट्कन म्हणाला"प्रायमी म्हणजे पहीलटकरणी रे गु~या"
"हा ना राव, ताई पुश कर ताई पुश कर म्हणुन ओरडतोय तर नुसतीच ओरडते येडी, पोरगे का आता मी पुश करु काय" अंब्या बेहद्द वैतागलेला होता, मी हळुच भगत्याला डोळा मारला भगत बोलला "चल अंब्या आज दारु मी पाजतो"
ह्या डॉक्टर लोकांची साली एक मजा असते, दारु प्यायच्या आधी शर्ट वर करणार व दुस~याला सांगणार लिव्हर पाल्पेशन बघ रे!!!!, अल्कोहोल पिऊन लिव्हर पालपेट होत नाही तोवर प्या हा सर्वसाधारण नियम, मला पण चेक करतो म्हणतात मला नाही आवडत, हॉटेलात काय शर्ट वर करुन बसायचे राव!!!!!!!!
तरी अंब्या निघताना म्हणतो कसा "गु~या तु पोलीस झाला न असे एयर फ़ायर वगैरे करायचे नाही फ़ॉरेन्सिक्स अन मेडीकोलिगल केसेस होतात मग, सरळ पॉईंट ब्लॅंक वरुन टकुरेच उडवायचे!!!!!!", ह्याच अंब्या ला अजुन एक आवड होती ती म्हणजे ज्या दिवशी डोके जास्त फ़िरेल त्या दिवशी सरळ वीस चा कॅनाबिस म्हणजे गांजा मारायचा, बेस्ट न्युरो रिलॅक्संट असे तो त्याचे वर्णन करायचा, कधी तरी आम्हाला पण एक जॉईंट मिळायचा, ट्रांस म्युझिक ऐकत ते जड झालेले डोके मस्त वाटायचे
भगत्याने गाडी काढली तेव्हाच अंब्या रोल बनवायला लागला होता, आज का काय माहीत पहिला मान मला होता, "घे गु~या कर बम बोले " मी सणसणीत घोट घेतला गांजाचा अन सरसरसरसर कणा शहारला माझा..... भगत म्हणाला "कुठे बसायचे रे???"
माझे स्पष्ट मत होते, साईवर्षा च्या मुतारी मागे हे संपवु, तिकडे एक एक बियर लाऊ अन मस्त जेवण करु.... पण भगत्याला मस्ती फ़ार आज कुठुन तरी नवीनच फ़ियर थेरेपी वाचुन आलेला होता, "ए तसले नको यार , एक काम करुयात एम.आय.डी.सी च्या मागे जाऊ पडक्या गढीत जाम मजा येते, रंग दे बसंती फ़िल येतो तिथे, तिथे बसुन भुताच्या गोष्टी करु, fear accelerates mental an neural activity hence aggrevating the cannabis kick and giving mere esctasy मला तसे पुर्ण लहानपण वाडी वस्ती अन शेताडीत गेल्याने काही फ़रक पडत नव्हता परत वरतुन गांजाची मस्ती आलेली अंगात. आज का कोणास ठाऊक अंब्या थोडा अस्वस्थ वाटला "काय रे???" मी "काही नाही रे, तु पी गांजा मला नको मी नंतर फ़क्त दारुच पितो कसा"
गढी आज दुरुनच भयानक दिसत होती... भकाभक वाढलेली बोगनवेली आज त्या चांदण्यात भेसुर काटेरी वाटत होती फ़क्त, ब्युटी ऍंड द बिस्ट च्या बिस्ट चा महाल असावा तसला आलम होता, मला काय मी तर मस्त मौला होतो..... तितक्यात मला देवडी वरच कंदिल दिसला एक अन माझी अर्धी किक उतरुनच गेली, "हे काय रे!!!!, मी केकाटलो"
"चुप भोसडीच्या, भगत्या म्हणाला.... अंब्या शुन्यात बघत बसलेला होता, गाडीच्या मंद पिवळ्या पार्किंग लाईट मधे त्याचे तोंड पण नीट दिसत नव्हते.... भगत खाली उतरला तर एक म्हातारा होता, हातातला कंदिल पार डॊळ्याजवळ आणलेला, "कॅटॅरॅक्ट असेल म्हाता~याला" अंब्या बोलला आज आवाज पण क्षिण होता त्याचा, "काय आबा, बसु का जरा??" भगत्याने विचारले "बसा की मालक आता मोटारीतुन आले तुम्ही म्हणजे तालेवारच नव्हं काय!!!!" असे म्हणत म्हातारा भेसुर हसला....... "चल रे" भगत्या म्हणाला.....
आम्ही सगळ्यात उंच बुरुजावर बसलो होतो, मी ३ अन हे दोघे दोन दोन चिलमी संपवुन बसले होते, "यार आज किक नाय बसली" हे माझे नेहमी चे रडगाणे चालले होते. भगत म्हणत होता "दारु पण इकडेच आणायला पायजे होती रे!!!" तेवढ्यात अतिशय किन~या आवाज हाक आली, "मालक काही सेवा लागली तर बोला , गावठी माल आहे अस्सल एकाच चिलमीत मजा देईल असा" खाली बघितले तर बुरुजाच्या पायाशी म्हणजे अंदाजे ३५ फ़ुटांवर खाली तो म्हातारा उभा होता, मी चेकाळुन म्हणालो "हो नाना हवंय, किती घेणार????" "पैशे कश्याला मालक फ़क्त जरा गप्पा मारत बसु" आम्ही खाली उतरलो.... आज अंब्या जरा जास्तच शांत होता.... चौकीच्या देवडीत आम्ही बसलो.... म्हाता~याने सराईत पणे चिलिम भरली अन माझ्या हातात दिली ती घेताना मी सहज खाली पाहीले व मी गर्भगळित झालो, म्हाता~याचे पाय उलटे होते, भगत कडे डोळे विस्फ़ारुन पाहीले तर त्याची पण बोबडी वळलेली...."अरे माझा मोबाईल बुरुजावरच राहीला चला तो शोधु" असे भगत म्हणतो आहे तोवर तो म्हातारा उठला "अवं अवं मालक बसा इथे मी हुडकतो की तो " असे म्हणत सरळ चालत बुरुजाच्या पायथ्याशी गेला व आपण सहज पायरी चढतो तसा ३५ फ़ुटांचा बुरुज चढला, तिथे चढुन तो गडगडाटी हसला व म्हणाला, "कितीतरी दिवसांनी माणसांबरोबर खेळायचा मौका आला आहे तुमची सेवा तर करावीच लागणार ह्या सुभानरावाला ह्हिह्ह्ह्हिहिहिहिहिहि" आमचा गांजा सरर्र्रकन उतरला.... भगत्याचा हात धरला त्याला म्हणालो "गाडीत बसायच्या आधी मागे वळुन पाहीले तर मरु, चल पळ आता"... पुढे बघतो तर काय, शेकोटीच्या प्रकाशात अंब्या स्पष्ट दिसत होता.... फ़क्त त्याचे डोळे आता गुंजेसारखे लाल भडक होते, "थांबा "तो एखाद्या टीनेजर च्या आवाजात बोलला...... "बाहेर पडला तर सुभाना जीव घेईल तुमचा अडकाल असेच माझ्यासारखे ह्या गढीत सुकाळीच्यांनो..... "तु कोण आता, आमचा अंब्या कुठंय????" भगत्या अवसान आणुन म्हणाला, "माझे नाव यशवंत, गढी माझी होती.... पण भाऊ बंदकीत गेली, माझ्या वडलांनंतर काकांनी बळकावली व अश्याच एका रात्री ह्याच सुभान्याच्या हातुन माझा मुडदा पाडला " तेव्हा पासुन मी त्याला अन तो मला ह्या गढिबाहेर हुसकायचा प्रयत्न करतो आहे...." आम्ही पुरते सर्दावलो होतो........ "मला कश्याला घाबरताय, अंब्याच्या अंगातला यशवंत म्हणाला..... मी वाचवतो तुम्हाला...." असे म्हणताना जे एक विशिष्ट स्माईल असते ते देत होता अंब्या/यशवंत...... ओठांची दोन्ही टोके वर वळलेली पांढरे दात दाखवत, डोळे ताणत तारवटत बोलत होता तो!!!!! अगदी बॅटमॅन मधल्या जोकर सारखा....... "आता मी सुभानाला खाली बोलवतो आहे, भगत मला माहित आहे तुझ्या खिशात अंगारा असतो मी सुभानाला पकडला की तो त्याच्या अंगावर फ़ुकायचा कळले काय????" आम्ही हो म्हणालो मी बघत होतो, भगत तयार होता....
"सुभान्या ये इकडे गद्दार कुळीच्या"....... "आलो यशवंत मालक"
ते म्हातारं (?) हाताला फ़ेव्हिकॉल चिकटवल्या गत बुरुजाच्या भिंतीला चिकटतच खाली आले...... मी थरथरत होतो, जसे ते म्हातारे जवळ आले, भगत्याने अंगारा फ़ुंकला त्याबरोबर ते बुढघे पेट्रोल टाकल्यागत पेटले व सुड सुड करत जळाले, पाव मिनिटातच आम्ही जिंदगी बघितली आई बाबा बहीण सगळे एकदम आठवले आम्हाला,
आता अंब्या भेसुर हसत होता गढीभर धावत होता क्षणात बुरुजावर चढत होता क्षणात विहिरित उडी घेत होता ओलाच बाहेर येऊन परत गढीच्या पांढ~या मातीत गडाबडा लोळत होता व किन~य़ा आवाजात ओरड्त होता "आबा आबा बघा गढी परत आपली आहे आबा आबा"
मी हिंमत केली व म्हणालो "यशवंत राव, आता आमच्या दोस्ताला सोडा कसे तुम्ही" ते तो एकदम तुच्छते ने माझ्या कडे पाहात हसु लागला अगदी तसाच ओठांची दोन्ही टोके डोळ्यांकडे वळवुन डोळे तारवटत......
"अरे हाड", तो म्हणाला...." इतकी वर्षे त्या पिंपळावर बसलो होतो मी, आज तुमचा मित्र त्या पिंपळाच्या बुंध्या वर मुतला अन मला झाड मिळाले आहे लटकायला.... अन हे मला लाभले पण आहे, मी नाही ह्याला सोडणार जा चालते व्हा, आता मी ह्याला विहरीत बुडवुन मारणार अन ह्याच्या कुडीत कायमचा राहणार माझ्या गढीत..... हिहिहिहिहिहिहिहिहिइह"
परत भेसुर हसणे, मी भगत्याकडे पाहीले त्याचा अंगारा संपला होता घाईत त्याने सगळा अंगारा सुभानरावावरच उधळला होता.... आम्ही काय करावे ह्या विचारात होतो तोवरच यशवंत अंब्याला घेऊन देवडीतल्या कपडे टांगायच्या खुंटीवर चढुन बसला होता..... ८० किलो चे एक पोरगे प्लास्टीक चे असल्यागत कधी छपरापर्यंत वर जायचे कधी खुंटी वर चढुन बसायचे, इतक्यात भगत चमकला माझ्या हाता कडे पाहु लागला व लगेच माझ्या डोक्यात प्रकाश पडला कारण माझ्या हातात होते अस्सल पंच धातुचे पंचमुखी हनुमानाचे कडे, तेव्हा मला कळले मला कुठल्याच भुताने का धरले नव्हते.... कारण मी कड्याच्या अन भगत्या अंगा~याच्या कवचात होतो, उरला होता एकटा नास्तिक अंब्या.........
भगत्याने हळुच बोटांना चिकटलेला थोडा अंगारा स्वतःच्या कपाळाला लावला व मला इशारा केला मी अवसान आणुन म्हणालो, "बरं तर मग यशवंत मालक आम्ही येऊ का आता???"
"जा फ़ुटा चालते व्हा, उद्या उठाल तेव्हा तुम्ही आजची रात्र विसरला असाल..... पळा..... डॉक्टर्स म्हणे हाहाहाहा"
"बरं मालक, एकदा आमच्या दोस्ताची गळाभेट घेऊ द्या ना कृपा करुन गरीबां वर.... उपकार होतील राजे"
परत तोच चेहेरा, भेसुर, तारवटलेले डोळे तेच खुनशी हास्य, "ठीक आहे "म्हणत जवळ येत असलेलं........ माझ्या अगदी जवळ......... अंब्याच्या अंगातला यशवंत जवळ आला पहीले भगत्याच्या गळ्यात पडला अन अंब्या क्षिण आवाजात बोलला "भगत वाचव यार".... तोच परत एकदम चेहे~यावरचे भाव बदलुन ओरडला "ए गप".....
जसा यशवंत/अंब्या माझ्या जवळ आला मी पहीले त्याला घट्ट मिठी मारली इतकी की ते भुत पण बावचळले, "अरे अरे काय करतो सोड मला" ते ओरडले.... पण चेहे~यावर तेच खुनशी हास्य विलसत होते त्याच्या.... मी दात ओठ खाऊन ओरडलो" "हरामी माझ्या मित्राला नडतो काय" काही कळायच्या आत माझे हनुमानाचे कडे मी त्याच्या उजव्या हाती चढवले होते...... पुर्ण हवा भरलेला फ़ुगा जर बुडाकडुन मोकळा सोडला तर जसा हवेत सैरावैरा धावतो तसा अंब~या चे शरीर हवेत उडत होते, तो भयानक खिंकाळ्या मारत होता, शेवटी अंब्याच्या तोंडुन एक अगम्य आवाज निघाला व अंगातुन एक प्रकाश निघुन आमच्या समोर कापरासारखा भसाभस जळाला....... अन आश्चर्य म्हणजे अंब्याला पुर्ण गढीत उड्या मारताना खुंट्यांवर लटकताना धावताना झालेल्या जखमा अन फ़ाटलेले अन मातीत मळलेले कपडे पुर्ववत झाले होते.......
झोपेतुन उठल्यासारखा तो उठुन बसला व म्हणाला "इतका कडक नका भरत जाऊ रे चिलमीत, मी तर पार बेशुद्ध झालो गंजेड्यांनो" तुम्ही सगळा संपवला असेल न फ़कॉल पब्लिक स्टफ़.... भगत्याने व मी एकमेकांकडे पाहिले व ढसाढस रडायला लागलो...... अंब्याला जास्त काहीही न बोलता आम्ही सरळ गाडी काढली साईवर्षाला गेलो, २ बियर लावल्या अन शांत झोपलो, दुस~या दिवशी उठले तर भगत अन अंब्याला काहीच आठवत नव्हते त्यांना फ़क्त गाडी गढी बाहेर लावलेली आठवत होती व मनसोक्त चिलिमीमारुन साईवर्षावर प्यायलेली आठवत होती.... अन मला काही विसरता येत नव्हते...... कारण माझा असलेला मनुष्यगण माझी ती आठवण मिटू देत नव्हता अन अंब्या भगत्यांच्या पत्रिकेत असणारे राक्षस व देवगण त्या आठवणी पुसुन बसले होते...........
आजही कधी कधी जेव्हा अंब्या एखादी खोडी काढतो तेव्हा मी फ़ारच अस्वस्थ होतो....... कारण अंब्याला ही कळत नाही अन भगत ला पण कळत नाही..... पण ते मला कळते...... कारण आजही अंब्याने एखादी खोडी काढली की तो त्या रात्रीसारखाच हसतो....... डोळे तारवटत...... ओठांची टोके डोळ्यांकडे वळवत........

गुलमोहर: 

कारण माझा असलेला मनुष्यगण माझी ती आठवण मिटू देत नव्हता अन अंब्या भगत्यांच्या पत्रिकेत असणारे राक्षस व देवगण त्या आठवणी पुसुन बसले होते...........>>>>>>>>> पण भुत मनुष्यगणाला त्रासदायक ना?? मग राक्षस / देवगण वाल्या अम्ब्याला त्रास कसा झाला?