कळलंच नाही

Submitted by रीया on 27 March, 2012 - 12:39

कळलंच नाही

भातुकलीचा खेळ खेळता खेळता
कधी मोठी झाले कळलंच नाही

तुझ्या पदराआड लपता लपता
डोईवर पदर ल्याले कळलंच नाही

तुझी अंगाई ऐकता ऐकता
मंगलाष्टके ऐकू आली कळलंच नाही

तुझा हात धरून कित्येकदा पार केलेल्या
वाटा कशा परक्या झाल्या कळलंच नाही

आधाराने तुझ्या जग जिंकले मी आई
आज विश्व माझे वसले कळलंच नाही

छायेतून तुझीया कधी बाहेर न आले
आज क्षितीज गवसले कळलंच नाही

गोष्टी ऐकता ऐकता राजकुमाराच्या
त्याची स्वप्ने मी पहिली कळलंच नाही

तुझी छोटीशी बछडी आता दूर निघाली
दुसर्‍याची ही झाली खरच कळलंच नाही

saptpadi by arati tai.jpg

छायाचित्र श्रेय : आरतीतै (अवल)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

गुलमोहर: 

अभिनंदन कशाबद्दल?

माझं लग्न ठरलेलं नाहिये >>>>

अरेच्चा मी आता पर्यन्तच्या तुझ्या कवितेत सगळ्यात उत्तम कवितेसाठी अभिनंदन केलय! Happy

तुला असे का वाटावे??? Proud आणि एवढे डोके का आपटून घेतेस?

हो का कृष्णा
मग ते स्पष्ट आधोरेखीत करुन तस सांगायच ना
एवढे सगळे माझ्या लग्नाच्यामागे लागलेत मला वाटलं तुम भी
धन्यवाद...........................

शेफाली, शुभांगी ताई, शाम धन्स

प्रचि आवडली म्हणुन टाकली

जरतारी शालू....नाकात नथ.....
हिरव्या चुड्यानी ....शोभतायत हात....

दागिन्यांनी मढ्लेली नवरी मी नखशिखान्त....
कृतार्थ भावना आई-बाबांच्या डोळ्यात....

नवेपणाची नवलाई जरी माझ्या चेह-यावर....
तुझ्या आठ्वांचीच मेंदी अजूनी माझ्या ह्रदयावर....
.
.
-सुप्रिया.

अनुभव नाहीये ना त्यामुळे असेल कदाचित....

प्रिया
आपली चर्चा अधुरी राहिली होती या वाक्यावरची. तुला कळालं नाही मला काय म्हणायचं होतं..
जन्मापासून बाईपण असेल तर या भावनांसाठी अनुभव घ्यावा लागत नाही हे सांगत होतो मी.

सुनिल, सुप्रिया ताई : धन्स Happy
सुप्रिया ताई : एकदम मस्त ग Happy
युरी मी याच उत्तर दिलं होतं त्या दिवशी
आता पुन्हा ऑनलाईन भेटलास की सांगेन पुन्हा Happy

मस्तच ग प्रिया........ आणि लग्न ठरल्याबद्दल शुभेच्छा....... नवीन आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा..... Happy

अरे म्हणजे ठरलं कि नाही ठरलं ?
एका धाग्यावर आधीच्या प्रियकराला श्रद्धांजली वाहून आलेलो आहे. आता अभिनंदन करता येईल..

युरी : जिथे तिथे आपल्या अतीसंकुचीत मनोवृत्तीच प्रदर्शन मांडायची गरज नाहिये
आणि बहुदा आपल्याला ती कथा समजली नसावी
तस असेल तर पुन्हा एकदा वाचा
आणि जर तरीही हे असच वाटलं तर स्वतःची मनोवृती बदला...
प्रियकर आणि मित्र यातला फरक आपल्याला कळत नसेलच अस आपल्या एकंदर झालेल्या संभाषणातुन वाटलं होतं मला पण जर कळालाच तर बर आहे.अन्यथा खरच आपल्या प्रतिक्रियेची गरज नाहिये
बाकी इतर दिग्गज आहेत मला मार्गदर्शन करायला

Pages