बेबी फ्रॉक

Submitted by मानुषी on 27 March, 2012 - 09:49

अधून मधून बाळंतविडे किंवा कधी स्वतासाठी , पुतणीसाठी, लेकीसाठी टॉप/कुर्ती असं काही शिवत असते. अगदीच शिवणाची सुरसुरी आली की काही नाही तर गेला बाजार(?) पिशव्या तरी शिवतेच!
कधी कॉट्सवुलचं कापड आणून छोटी ब्लँकेट्स शिवते.
तर असंच कुणाकुणाला काही प्रसंगाने द्यायला हे फ्रॉक शिवले.

साधारण एक ते दीड वर्षाच्या मुलीसाठी शिवले आहेत.

DSCN2207.JPGDSCN2208.JPGDSCN2210.JPG

गुलमोहर: 

तिन्ही झगे खूपच मस्त .. अतिशय आवडले. माझी आई असेच सुर्रेख झगे शिवत असे. सध्या नात्यात कोणालाच बाळी नाहीये.. मावसभावाच्या मुलासाठी तिने मस्त झबली शिवली अन लोक री कपडे. Happy
मला काहीच का येत नाही रे देवा. .. अन आवडही नाही.. या जन्मी येणार नाही शिवता.. Sad
आवड फक्त पहाण्या ची Happy Happy

मस्त आहेत फ्रॉक. आमच्याकडे मावश्या, काकू, बहिणी यांचे उत्साह बघण्यासारखे असतात बाळांचे कपडे शिवायचे म्हटले की! सुंदर सुंदर कापडे, लेस, बटणे, फुले, बो, रिबिनी.... थाट असतो अगदी! Happy

सर्व मुलींना खूप खूप धन्यवाद!
नानबा फ्रॉकचं कटिंग आणि मापं देण्याचा प्रयत्न करीन.

हे हे हे कित्ती गोड, मानुषी. Happy

मी शाळेत शिवणकला ह्या विषयाला एक झबले शिवले होते. माझ्या आईने ने कौतुकाने माझ्या बाळासाठी सांभाळून ठेवले होते. राजससाठी खूपदा वापरले ते.

हे आहे ते झबले. Happy

untitled3.JPG

फ्रॉकसाठी एक झब्बु देऊ का? जरा लहान बाळीसाठीचे फ्रॉक चे डीझाईन आहे. राजस एकदम लहान असताना मीच स्वतः डीझाईन्स बनवून एका झबली /फ्रॉक्स शिवणार्‍या काकूंना ड्रॉ करून द्यायचे. राजससाठी अशी बरीच झबली (आणि १-२ फ्रॉक्स सुद्धा!) शिवून घेतली होती.

untitled4.JPG

सर्वांना धन्यवाद! आणि निंबुडे..तुला खास धन्स शाळेत असताना शिवलेल्या झबल्यासाठी आणि
नंतरच्या झब्बूसाठी!

मानुषी, खूपच सुंदर आहेत सगळे फ्रॉक्स. कटींग आणि माप मिळाली तर सोने पे सुहागा. खास करून पहिल्या फ्रॉकचे तरी द्या.

वर्षू गोडमिट्ट प्रतिसादाबद्दल तुला एक गोडमिट्ट व्हाइट चॉकोलेट!(जे खरंच गोड मिट्ट असते.)
आर आणि नानबा
वर्षानुवर्षं इतकं शिवलंय...हॉबी म्हणूनच हं..........की आता इतके छोटे कपडे बेतायला आणि कापायला फ़क्त कात्री लागते. नो टेप! अंदाजपंचे धागोदरसे!
तरी प्रयत्न करीन.
आर धन्यवाद!

मानुषी, तुम्ही ग्रेटच आहात अंदाजपंचे इतक सुंदर काम.
हॉबी म्ह्णून मला पण आवड आहे. गेल्या वर्षी बंगळूरला शेजारच्या पंजाबी मेत्रिणीकडून फुल पटियाला शिकली, पुढच शिकेपर्यंत माझी हेद्राबाद्ला ट्रान्सफर झाली. तिकडे खूप काही शिकण्यासारख राहून गेल. Sad
त्यानंतर मावस बहिणीच्या होणार्‍या बाळासाठी ३-४ झबली असच अंदाजपंचे केल होत. फोन करून बहिणीने सांगितल त्यातल फक्त एकच झबल तिला झाल. बाकिची झबली तिच्या बाहुलीसाठि होतील. Happy
शिवण कामाच पुस्तक विकत घेतल पण शिफटिंगमध्ये मशिन विकून टाकली. Sad
स्वताचे पंजाबी ड्रेस फक्त छान शिवू शकते. लाख लाख धन्यवाद मंजू भाभीला.
सध्या मशिन नसल्याने माझी शिवन कलेची हॉबी बंद आहे. Sad

चला.........जिस स्कूलमे हम पढते थे उस स्कूलके हेडमास्तरका प्रतिसाद आया(अवल!)
सर्वांना धन्यवाद!

मानुषी, तीन्ही फ्रॉक छान झाले आहेत्.मोठ्यांचे कपडे सतत शिवल्यावर असे लहान बेबी फ्रॉक शिवले कि स्वताचेच स्वताला खुप कौतुक वाटायला लागते होय ना?कारण त्यासाठीचे नमुनेही आपोआप सुचतात्.शिवणकामातुन उरलेल्या कापडाचा योक करायचा कि फ्रिल ...हा फील आपसुकच येतो अन छानसं प्रॉडक्ट तयार होते.

Pages