धडपड हा प्रत्येक उद्योजकाच्या कारकिर्दीचा अविभाज्य भाग. उद्योगाची सुरुवात, परिश्रम, आलेले चढउतार, चाखलेलं यश, अपयशाला धीरानं तोंड देणं अशा काही पायर्या या प्रत्येकाच्याच व्यावसायिक आयुष्यात दिसून येतात. बर्याच उद्योजकांचा हा प्रेरणादायी प्रवास आपण कुठेना कुठे वाचलेला असतो. त्यातल्या घटनांमुळे तो आपल्या लक्षातही राहिलेला असतो.
'मसाला' हा चित्रपट मांडतो कहाणी एका उद्योजकाच्या धडपडीची...
![Flexsmall.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4614/Flexsmall.jpg)
या चित्रपटाच्या निमित्तानं तुम्हांला खेळायचा आहे हा खेळ - 'उद्योजक ओळखा'.
हा खेळही इतर खेळांसारखाच सोपा आहे.
उद्योजकाच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटनांच्या आधारे देण्यात येणार्या एकूण सहा क्लूंवरून तुम्हांला त्या उद्योजकाचं नाव ओळखायचं आहे.
खेळाचे स्वरूप व नियम -
१. उद्योजकाच्या माहितीवर आधारित एकूण सहा क्लू दिले जातील.
२. क्लू ३-३ अशा दोन टप्प्यांत दिले जातील. हे केवळ खेळाची रंजकता वाढविण्यासाठी आहे.
३. सहाही क्लूंवरून बरोबर उत्तर न आल्यास दोन वाढीव क्लू दिले जातील.
४. एक आयडी कितीही वेळा उत्तरे देऊ शकतो.
५. 'ही व्यक्ती अमुकतमुक का?' अशी अंदाज व्यक्त करणारी उत्तरे, त्यात उद्योजकाचे नाव बरोबर असले तरी ग्राह्य धरली जाणार नाहीत.
सर्वप्रथम बरोबर उत्तर देणार्या विजेत्यास मिळतील 'मसाला' चित्रपटाच्या खेळाची २ तिकिटे!
चला तर मग खेळूया 'उद्योजक ओळखा' हा खेळ..
या स्पर्धेतले पहिले उद्योजक ओळखण्यासाठी क्लू -
१. या व्यक्तीने एमआयटी (अमेरिका) येथून पदवी घेतली.
२. एक सायकलींचं छोटं दुकान सुरू करून वडिलांनी व्यवसायाचा पाया घातला. पुढे या व्यक्तीने उद्योगाचा प्रचंड विस्तार केला.
३. इ.स. २००३ हे साल या व्यक्तीसंदर्भात विशेष आहे. या वर्षी या व्यक्तीचा एका विशेष गोष्टीद्वारे सन्मान करण्यात आला.
आपली उत्तरं या बाफावर लिहा आणि जिंका 'मसाला' चित्रपटाची दोन तिकिटं..
मला वाटते हे "किर्लोस्कर
मला वाटते हे "किर्लोस्कर बंधूपैकी" कोणीतरी असावेत.
अरे हे सोपं आहे. 'शंतनुराव
अरे हे सोपं आहे. 'शंतनुराव किर्लोस्कर'
शंतनुराव किर्लोस्कर
शंतनुराव किर्लोस्कर
विशेष गोष्टीने सन्मान म्हणजे
विशेष गोष्टीने सन्मान म्हणजे त्यांच्या १०० व्या जन्म वर्षात त्यांच्या नावाचं टपाल तिकिट काढलं.
टपालतिकिटाचं माहिती नव्हतं पण शोधल्यावर सापडलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२००३ साली कुठला सन्मान
२००३ साली कुठला सन्मान करण्यात आला?
चमन, अभिनंदन. शंतनुराव
चमन, अभिनंदन. शंतनुराव किर्लोस्कर हे उत्तर अगदी बरोबर आहे. इतक्या कमी वेळात बरोबर उत्तर दिल्याबद्दल अजून एकदा अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.
.
अरेरे मी ऊगीचंच एवढ्या लवकर
अरेरे मी ऊगीचंच एवढ्या लवकर ऊत्तर दिले का? बाकी कोणी आलेच नाही ह्या धाग्यावर.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
माध्यम_प्रायोजक तुम्ही पुढचं कोडं एकदम अवघड टाका बरं....मग त्या 'क्लूलेस' सारखा हा बाफ पण जोरदार वहात राहील.
प्लीज सोप्पे क्लू द्या ना
प्लीज सोप्पे क्लू द्या ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'क्लूलेस' सारखा हा बाफ पण
'क्लूलेस' सारखा हा बाफ पण जोरदार वहात राहील.>>>>>>>> अगदी...
आजकाल क्लुलेसचं माबो वर्जन जोरदार चालु आहे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माबोवरचे काही साहित्य/धागे
माबोवरचे काही साहित्य/धागे देखिल हल्ली 'क्लुलेस' वाटते![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माप्रा पुढचा उद्योजक
माप्रा पुढचा उद्योजक घ्याना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आय मिन क्लु द्या.
माप्रा, खेळ पुढे कधी नेणार?
माप्रा, खेळ पुढे कधी नेणार?