Submitted by टोकूरिका on 26 March, 2012 - 01:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
२०० ग्रॅम पनीर
४ मोठ्या सिमला मिरच्या उभ्या पातळ चिरून
४ हिरव्या मिरच्या दोन भाग करून मधे चीर दिलेल्या
१ मोठा कांदा उभा पातळ चिरून
जाडसर चिरलेला भरपूर लसूण
पाणी+ २ चमचे कॉर्नफ्लोर यांची पेस्ट.
३ चमचे तेल
मीठ चवीनुसार.
शेजवान सॉस ४ चमचे.
सोया सॉस १ चमचा
क्रमवार पाककृती:
पनीरचे छोटे तुकडे करून तळून टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या व लसूण घालावा, लगेच कांदा घालून परतावा.
सिमला मिरची व मीठ घालून झाकण ठेवावे.
वाफ आल्यावर सिमला मिरची शिजते. आता शेजवान सॉस्+सोया सॉस्+पनीर घालून चांगले एकजीव करावे.
त्यात कॉर्नफ्लोर पेस्ट घालून हलवावे. गॅस बंद करावा.
खायला तयार झटपट पनीर चिली शेजवान.
वाढणी/प्रमाण:
३ जण
माहितीचा स्रोत:
चायनीज कॉर्नर
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे कृति. फोटो अनिवार्य
छान आहे कृति. फोटो अनिवार्य आहे ना स्वर्धेसाठी ?
यम्मी!!!
यम्मी!!!
यम्मी ! कधी येऊ जेवायला ?
यम्मी ! कधी येऊ जेवायला ?
टोके फोटो टाक ना ग
टोके फोटो टाक ना ग
ही कधीही फोटो नाही
ही कधीही फोटो नाही टाकत........ ऑफिसमधून घरी जाताना वेगवेगळ्या हॉटेल्स्मधून रेसीपी लिहून घेते बहुतेक
टोकु... फोटो..?? त्याशिवाय
टोकु... फोटो..??
त्याशिवाय प्रतिसादच नै देनार जा.
अरे हो हो! बघितली पाकृ की
अरे हो हो! बघितली पाकृ की लागले लगेच फोटो फोटो करायला. हावरट खादाड कुठचे!
चिऊ प्रतिसादाला प्रचि ची तमा नसावी असे थोर संत म्हणून गेले.
भुंग्या टवळ्या चिकन ६५ चा फोटू पाहिला नैस का?
दिनेशदा फोटो अनिवार्य आहे, आणि म्हणूनच मी तो टाकणारही आहे, पण उद्या.
अवलतै केव्हाही ये गं, कल्याण आपलाच आंसा...
लाजो , अनु फोटो टाकते ग उद्याच...नक्कीच्या नक्की
पुणे ते कल्याण प्रवासखर्च
पुणे ते कल्याण प्रवासखर्च जमेला धरला तर पुण्यात पनीर चिली शेजवान स्वस्तात पडेल
भुंग्या : टोके फोटो टाक
भुंग्या :
टोके फोटो टाक म्हणजे लगेच करुन पहावस वाटत
मस्त टोकु फोटो तो मंगता है:)
मस्त टोकु
फोटो तो मंगता है:)
आला आला... फोटो आला मस्त
आला आला... फोटो आला
मस्त
मोबाईलने काढलायस का? थोडा ब्लर वाटतोय.. की तिखट चिलीमुळे माझ्या डोळ्यात पाणी आलय????
लाजो, ब्लर झालाय सेलवरून
लाजो, ब्लर झालाय सेलवरून काढल्यामुळे आणि दुसरा फोटो काढेपर्यंत मला धीर कुठला?
मोबाईलने काढलायस का? थोडा
मोबाईलने काढलायस का? थोडा ब्लर वाटतोय.. की तिखट चिलीमुळे माझ्या डोळ्यात पाणी आलय???? >>
लाजो
टोके, रेसिपी इतनी बढिया और फोटु इतना धुंदला. ये बात (पाककृती) कुछ हजम नही हुइ
नेडु पनीर च्या जागी चिकन घातल
नेडु पनीर च्या जागी चिकन घातल कि चिकन चिल्ली पण तॅयार
चिकन चे नाव कढताच पाणी सुटले तोंडाला
छान ..
मि करेल आता चिकन चिली
निंबे सेलवरून काढला ग शेफाली
निंबे सेलवरून काढला ग
शेफाली त्यापेक्षा तू पप्पांना सांग ना! ते बनवून पाठवतील
टोक्स.... गुड वन...
टोक्स.... गुड वन...
फायनली..... व्हेज रेसिपी लिहिलीस....
निंबे सेलवरून काढला
निंबे सेलवरून काढला ग
>>>>>>>>>>>
फोटो धूसर आहे..... टोकूला सिनेमाची तिकिट्म पण स्कॅन करून पाठवा...... ती पण धूसर
पजो, व्हेजी फ्रेण्ड्स च्या
पजो, व्हेजी फ्रेण्ड्स च्या पोटाची पण काळजी आहे म्हटलं मला
भुंग्या