गुढीपाडवा

Submitted by श्रीकांत काशीकर on 22 March, 2012 - 09:05

आम्रफुलांचा सुगंध घेऊनि
लहर वायूची आली ।
सहज आळवी सुरेल पंचम
कोकिळ प्रातःकाली ।।

तापतापतो जरी हा दिनकर
होय जिवाला त्रास ।
परी मोगरागंध देतसे
जगण्याचा विश्वास ।।

समयाचे हे भान ठेवुनी,
जगा तुम्ही धैर्याने ।
निसर्गराजा सांगत असतो
सदैव अपुल्या कृतिने।।

ठेवून याची जाण करूया,
स्वागत नववर्षाचे ।
प्रसन्नता मंत्राने करूया,
सोने आयुष्याचे ।।

हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कविता चांगली झालेय.

कड्व्यांमधे एक ओळ सोडली असती तर वाचायला सुलभ होईल.
२-३ ठिकाणी वृत्तासाठी र्‍हस्व-दीर्घाची तडजोड आवश्यक वाटते.

धन्यवाद pradyumnasantu आणि UlhasBhide.

UlhasBhide - आपल्या सूचनेनुसार कड्व्यांमधे एक ओळ सोडली आहे..