नान आणि पनीर बटर मसाला

Submitted by प्रीति on 21 March, 2012 - 22:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नान साठी
२ कप मैदा किंवा कणिक अथवा दोन्ही अर्धे अर्धे (आवडी नुसार)
१ टि.स्पून ईस्ट
१ टि.स्पून साखर
१ टि.स्पून मिठ
२ टेबल स्पून तेल
२ १/२ टेबल स्पून दही
१/२ कोमट कप पाणी
चिमूटभर बेकिंग सोडा
पिझा स्टोन

पनीर बटर मसाला
१ मोठा कांदा चिरुन
१ मध्यम कांदा बारीक चिरुन
१/२ छोटा कॅन टोमॅटो प्युरी
१ चमचा आलं लसूण पेस्ट
खडा मसाला - २ तमाल पत्र, २-३ लवंगा, १ तुकडा दालचिनी, ५-६ मिरे
बटर १ टेबल स्पून
१ १/२ टेबल स्पून कसुरी मेथी
१ कप दुध
१ टि.स्पून गरम मसाला
चवीनुसार मिठ, साखर आणि तिखट

क्रमवार पाककृती: 

नान
- ईस्ट पाण्यात १० मि मिसळुन ठेवावे.
- मैदा, साखर, मिठ, सोडा मिसळुन घ्यावा.
- तेल आणि दही मिसळुन घ्यावे, ह्या मिश्रणाने मैदा भिजवावा.
- छान क्रम्स झाले पाहिजेत, त्यानंतर ईस्टच्या पाण्याने भिजवून ऊबदार जागी ३-४ तास झाकुन ठेवावे.
- नान करायच्या १५ मि आधी पिझा स्टोन ओव्हनमधे ठेऊन ३५०फॅ सेट करवा.
- ३५० फॅ ला प्रिहिट झाल्यावर ओव्हन ब्रॉईलवर सेट करावा.
- नान करताना पिठ छान तेलाच्या हाताने मळुन घ्यावे आणि मैद्यावर जरा जाडसर लाटुन पिझा स्टोनवर टाकावे.
- १-२ मि नान टम्म फुगुन तयार होतात.

पनीर बटर मसाला
- पॅनमधे थोडे तेल घेऊन १ मोठा चिरलेला कांदा परतुन घ्यावा, चांगला ब्राऊन होईपर्यंत.
- त्यानंतर त्यात दुध घालावे. दुध ३/४ होईपर्यंत उकळु द्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमधुन पेस्ट करुन घ्यावी.
- आता एका पॅनमधे बटर वितळवुन खडा मसाला, बारीक कांदा परतुन घ्यावा.
- ब्राऊन झाल्यावर आलं लसूण पेस्ट टाकावी, सोबत पनीर टाकुन हलका ब्राऊन रंग येईपर्यंत परतत रहावे.
- कसुरी मेथी हाताने चिळुन घालावी, मस्त वास येतो.
- त्यानंतर कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट, तिखट टाकुन परतून घ्यावे, थोडे पाणी घालुन शिजु द्यावे.
- भाजी शिजुन हवी तशी कन्सिस्टंसी झाल्यावर गरम मसाला आणि साखर, मिठ घालुन गॅस बंद करावा.

गरम गरम नान, पनीर बटर मसाला, लिंबू आणि मिठ घातलेल्या कांद्या सोबत सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणं
अधिक टिपा: 

नुसत्या कणकेचा नान ऐवढा छान लागत नाही. मैद्याचाच सर्वात छान लागतो.

माहितीचा स्रोत: 
नान - मंजुलाज किचन वेबसाईट, पनीर बटर मसाला - मी स्वतः (क्रिम आणि काजु पेस्ट न घालता कशी करता येईल म्हणुन केलेला प्रयत्न)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नान मस्त फुलले आहेत. माझे फुलके पण असेच फुलतात.
प्रीति, आपल्या पोळपाटासारखा असतो का हा पिझ्झा स्टोन? लाटणे नसते का त्याला?

प्रिति, काल ह्या प्रकारे पनीर बनवलं . अप्रतिम चव होती.
मी ( परिस्थितीजन्य Happy ) काहि बदल केले. अर्धं नारळाचं दूध वापरलं , खडा मसाला ऐवजी पूड वापरली. बटर न वापरता तेल वापरलं. पण मस्तच. धन्यवाद .

प्रीति, आपल्या पोळपाटासारखा असतो का हा पिझ्झा स्टोन? लाटणे नसते का त्याला?>> अरे हा बेक करायला वापरायचा, लाटायला नाही.
धन्यवाद सुले़खा!!
भान, छान. आवडलं ऐकुन छान वाटलं, धन्यवाद!!

@ प्रिति,अगं बटर ,क्रिम ,काजू न वापरता पण कसली क्रिमी चव आली होती. नुसती ग्रेवी चाटून पुसून संपवली मी.
यम्मी Happy

आज मी इथे लिहिल्याप्रमाणे पनीर मसाला केली आणि एकदम अप्रतिम सुंदर झाली. ती कांदा दूधात शिजवून पेस्ट करायची कल्पना एकदम भारी आहे. खूप म्हणजे खूपच आवडली. Happy

एकदम झकास पाकृ आहे.. आज केली होती... सगळ्यांना आवडलेली आहे.. आणि त्यात पुढचा बदल म्हणून पनीर ऐवजी वेगळ्या भाज्या घालून करायचे ठरवले आहे.

अरे धन्यवाद सगळ्यांना!!
मी हे प्रतिसाद पाहिलेच नव्हते.
सोनाली आणि आऊटडोअर्स फोटो छानच!!
हिम्सकूल, चांगली आयडिया.

मस्त फोटो आणि कृती. मला आता यीस्ट अ‍ॅक्टिव करणे ह्य. प्रकाराचा कॉन्फिडन्स आल्यामुळे नान ट्राय करता येतील कधीतरी.
पिझ्झा स्टोन मस्टच आहे का?

प्रगती, पराठ्यासारखं ट्र्याय करता येईल.
रैना धन्यवाद Happy
सीमा, हि भाजी जास्त खातात लोकं Happy
दोन पनीरचे स्लॅब पुरायला पाहिजे, दोन भाज्या गृहित धरुन.

प्रीति, सर्च करत होते पिझ्झा स्टोनकरताच. कॉस्कोत दिसत नाहीये आता. $३० पर्यंत मिळू शकेलसं दिसतंय. तुझा सिरॅमिकच आहे ना?

Pages