नान साठी
२ कप मैदा किंवा कणिक अथवा दोन्ही अर्धे अर्धे (आवडी नुसार)
१ टि.स्पून ईस्ट
१ टि.स्पून साखर
१ टि.स्पून मिठ
२ टेबल स्पून तेल
२ १/२ टेबल स्पून दही
१/२ कोमट कप पाणी
चिमूटभर बेकिंग सोडा
पिझा स्टोन
पनीर बटर मसाला
१ मोठा कांदा चिरुन
१ मध्यम कांदा बारीक चिरुन
१/२ छोटा कॅन टोमॅटो प्युरी
१ चमचा आलं लसूण पेस्ट
खडा मसाला - २ तमाल पत्र, २-३ लवंगा, १ तुकडा दालचिनी, ५-६ मिरे
बटर १ टेबल स्पून
१ १/२ टेबल स्पून कसुरी मेथी
१ कप दुध
१ टि.स्पून गरम मसाला
चवीनुसार मिठ, साखर आणि तिखट
नान
- ईस्ट पाण्यात १० मि मिसळुन ठेवावे.
- मैदा, साखर, मिठ, सोडा मिसळुन घ्यावा.
- तेल आणि दही मिसळुन घ्यावे, ह्या मिश्रणाने मैदा भिजवावा.
- छान क्रम्स झाले पाहिजेत, त्यानंतर ईस्टच्या पाण्याने भिजवून ऊबदार जागी ३-४ तास झाकुन ठेवावे.
- नान करायच्या १५ मि आधी पिझा स्टोन ओव्हनमधे ठेऊन ३५०फॅ सेट करवा.
- ३५० फॅ ला प्रिहिट झाल्यावर ओव्हन ब्रॉईलवर सेट करावा.
- नान करताना पिठ छान तेलाच्या हाताने मळुन घ्यावे आणि मैद्यावर जरा जाडसर लाटुन पिझा स्टोनवर टाकावे.
- १-२ मि नान टम्म फुगुन तयार होतात.
पनीर बटर मसाला
- पॅनमधे थोडे तेल घेऊन १ मोठा चिरलेला कांदा परतुन घ्यावा, चांगला ब्राऊन होईपर्यंत.
- त्यानंतर त्यात दुध घालावे. दुध ३/४ होईपर्यंत उकळु द्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमधुन पेस्ट करुन घ्यावी.
- आता एका पॅनमधे बटर वितळवुन खडा मसाला, बारीक कांदा परतुन घ्यावा.
- ब्राऊन झाल्यावर आलं लसूण पेस्ट टाकावी, सोबत पनीर टाकुन हलका ब्राऊन रंग येईपर्यंत परतत रहावे.
- कसुरी मेथी हाताने चिळुन घालावी, मस्त वास येतो.
- त्यानंतर कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट, तिखट टाकुन परतून घ्यावे, थोडे पाणी घालुन शिजु द्यावे.
- भाजी शिजुन हवी तशी कन्सिस्टंसी झाल्यावर गरम मसाला आणि साखर, मिठ घालुन गॅस बंद करावा.
गरम गरम नान, पनीर बटर मसाला, लिंबू आणि मिठ घातलेल्या कांद्या सोबत सर्व्ह करावे.
नुसत्या कणकेचा नान ऐवढा छान लागत नाही. मैद्याचाच सर्वात छान लागतो.
व्वा!! तोंपासु नान मस्त टम्म
व्वा!! तोंपासु
नान मस्त टम्म फुगलेत
तोंपासु!!! मस्तच!
तोंपासु!!! मस्तच!
छान दिसतेय. ते पिवळे काय
छान दिसतेय. ते पिवळे काय दुसरे बाजूला?
मस्त दिसतायेत नान आणि पनीर
मस्त दिसतायेत नान आणि पनीर बटर मसाला सुद्धा .
सहिच दिसताहेत दोन्ही प्रकार!!
सहिच दिसताहेत दोन्ही प्रकार!!
छानच दिसताहेत दोन्ही पदार्थ.
छानच दिसताहेत दोन्ही पदार्थ.
नान मस्त दिसतोय आणि पनीर बटर
नान मस्त दिसतोय आणि पनीर बटर मसालासुद्धा
वा मस्तच.
वा मस्तच.
मस्त !!
मस्त !!
अप्रतिम... भुक लागली..
अप्रतिम...
भुक लागली..
परतलेल्या कांद्यात दूध
परतलेल्या कांद्यात दूध घालायचे?
मस्त दिसतायत दोन्ही !
मस्त दिसतायत दोन्ही !
नान कसले टम्म फुगलेत! प्रीती,
नान कसले टम्म फुगलेत!
प्रीती, कृपया पिझा स्टोन कुठल्या कंपनीचा/कुठून घेतला सांगाल का? माझ्या विश लिस्ट वर आहे.
मस्त पाककृती आणि फोटो!
मस्त पाककृती आणि फोटो!
पिझ्झा स्टोनऐवजी तव्यावर
पिझ्झा स्टोनऐवजी तव्यावर होतील का गं??
ते पिवळे काय दुसरे
ते पिवळे काय दुसरे बाजूला?
>>>
मला तर आम्रखंड वाटतेय
व्व्व्वॉव..... भारी फोटोज....
व्व्व्वॉव..... भारी फोटोज.... मस्त पाककृती
मला तर आम्रखंड वाटतेय >> +१
नान जबरीच दिसतायत.
नान जबरीच दिसतायत.
यम्मी दिसते आहे प्लेट.
यम्मी दिसते आहे प्लेट.
परतलेल्या कांद्यामधे दुध आटवलं आहे का? मला तरी तसंच समजलं वाचताना? हे थोडंसं अवघड वाटतं आहे खायला. चालतं का दुध & कांदा? दुध नासणार नाही ना?
धन्यवाद सगळ्यांना वृशा, हो
धन्यवाद सगळ्यांना
वृशा, हो परतलेल्या कांद्यात दूध घालायचे.
कृपया पिझा स्टोन कुठल्या कंपनीचा/कुठून घेतला सांगाल का? >> कॉस्कोतला आहे, कंपनीचं नाव लक्षात नाही.
ते पिवळे काय दुसरे बाजूला?>> आम्रखंड आणि बाजुला वाटीत बुंदी रायता
परतलेल्या कांद्यामधे दुध आटवलं आहे का?>>हो
चालतं का दुध & कांदा? दुध नासणार नाही ना?>> दुध नासत नाही.
काय सुंदर दिसतय ते!!
काय सुंदर दिसतय ते!! अमेझिंग.
पिझा स्टोन म्हणजे काय प्रीत?
व्वाह........ फोटो बघून फक्कड
व्वाह........ फोटो बघून फक्कड जमलेलं कळतेय......... तोंपासु.
छान रेसिपी व फोटो. नान
छान रेसिपी व फोटो.
नान लाटले जातात का नीट? यीस्ट घातलेले पिझ्झाचे पीठ सहजी पसरत नाही लाटण्याने , तसे होत नाही का ?
यम्मी!!!! फोटोवरुन तरी मस्त
यम्मी!!!! फोटोवरुन तरी मस्त झालेले दिसतेय...अगदी तोपासु
मस्त ते नान मस्त टम्म फुगलेत.
मस्त ते नान मस्त टम्म फुगलेत.
मला तर आम्रखंड वाटतेय >>
मला तर आम्रखंड वाटतेय >> +१
उत्तम पाकृ.
धन्यवाद!! रैना, पिझा स्टोन
धन्यवाद!!
रैना, पिझा स्टोन बद्द्ल इथे बघता येईल.
देशी, मैद्याचे नान लाटालया थोडे अवघड जाते.
प्रीति, भाजी आणि नान दोन्ही
प्रीति, भाजी आणि नान दोन्ही फारच भारी दिसतेय
माझ्याकडे पिझ्झा स्टोन नाही त्यामुळे मी वरच्याच पद्धतीने कणिक मळून तव्यावर शेकते. त्याची चव मला नानपेक्षा भाजलेल्या भटुर्यासारखी लागते. अमृतसरी छोले,पंजाबी भाज्या ह्याबरोबर मस्त लागतात हे भटुरे. मी अर्धी कणिक / अर्धा मैदा घेते.
प्रीति, मस्त फोटो आहे गं!!
प्रीति, मस्त फोटो आहे गं!! भाजी लगेच खावीशी वाटतेय.
जेवण झाल्यावर सुद्धा भुक
जेवण झाल्यावर सुद्धा भुक लागावी असा फोटू आहे
Pages