३ वाट्या लाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी (साल न काढता)
१ वाटी तेल (जरा सढळ हातानी तेल लागतं या भाजीला)
हिंग
मीठ चवीनुसार
पाव वाटी चिंच कोळ
पाव वाटी किसलेला गुळ
हळद
लाल तिखट
गरम मसाला
सुकं खोबरं अर्धी वाटी (गुलाबी रंगावर भाजून घेतलं तर छानच नाहीतर तसही चालतं)
अर्धी वाटी खसखस (भाजून)
(खोबरं आणि खसखस एकत्र वाटून घ्यावी)
आलं लसूण्-हिरव्या मिरचीचं वाटण पाव वाटी
गरम मसाला पाव वाटी (आचार्यांचा ताजा मसाला असतो पण सांगत नाहीत काय घातलंय! 'गरम मसाला चालतो हो ताई' असं उत्तर मिळालं!)
१ वाटी आधणाचं पाणी
८-१० पानं कढीलिंबाची
भरपूर कोथींबीर
पाव चमचा मेथ्या
१ चमचा चारोळ्या (नाही घातली तरी चालते)
*जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात हिंग, कढीलिंब आणि मेथीदाणे घालावे.
*आलं-लसणाची गोळी तेलात परतून घ्यावी. (जराशी चिकटेल भांड्याला पण काही हरकत नाही.)
*त्यावर वाटलेलं खोबरं-खसखस घालून परतावं.
*यावर भोपळ्याच्या फोडी, मासाला, हळद, तिखट मीठ, चिंच आणि गुळ घालून ढवळावं.
*आधणाचं पाणी ओतून, जाड झाकणी ठेवून फोडी शिजु द्याव्यात.
*कोथींबीर घालून एक उकळी आणावी.
*(चारोळ्या घालायच्या असतील तर त्या भोपळ्याच्या फोडींबरोबर घालाव्या नाहीतर लवकर करपतात.)
*थोडा रस्सा हवा असल्यास एक वाटीऐवजी दीड ते दोन वाटी पाणी घालून, त्यानुसार मीठ्-मसाला वाढवावा.
*कोळ बाजारचा किंवा फार घट्टं असल्यास कमी करावा. आंबटपणा कमी वाटल्यास भाजी उकळताना चिंच घालता येते.
*विदर्भात लग्नकार्यात ही भाजी असते. त्यात आचारी वरून भसकाभर तळणीचं तेल ओततात. (चवदार लागतं, पण महातेलकट!)
बाकर म्हणजे काय? मी तेल जरा
बाकर म्हणजे काय?
मी तेल जरा कमी करून नक्की करणार ही भाजी
अर्र मी आठवेल तशी केल्याने
अर्र मी आठवेल तशी केल्याने जिन्नस जरा कमी-जास्त झाले काल. आता पुन्हा करुन बघेन
बाकरः आलंलसूणगोळी, मसाला,
बाकरः आलंलसूणगोळी, मसाला, खसखस, खोबरं, भरपूर कोथिंबीर, मीठ, तिखट एकत्र करून तयार होणारा कोरडा ढीग.
नागपूर भागात नेहेमी होते ही
नागपूर भागात नेहेमी होते ही भाजी! ़मस्तं तेल असत त्यात पण... चवीला आहाहा! या शनीवारी करेन आता! बरं झाल क्रुती दिलीत ते!
बाकरः आलंलसूणगोळी, मसाला,
बाकरः आलंलसूणगोळी, मसाला, खसखस, खोबरं, भरपूर कोथिंबीर, मीठ, तिखट एकत्र करून तयार होणारा कोरडा ढीग.>>
हे वर्णन भारी असून ते वाचून तळमळ होत आहे
नागपूर भागात नेहेमी होते ही भाजी! ़मस्तं तेल असत त्यात पण... चवीला आहाहा! या शनीवारी करेन आता! बरं झाल क्रुती दिलीत ते!>>
कृती दिली असेल बहुधा
शनिवारी नागपुरात आहात की पुण्यात?
त्या भागातले लोक फार आठवण
त्या भागातले लोक फार आठवण काढत असतात या भाजीची.
परवाच एका पॉटलक पार्टी साठी
परवाच एका पॉटलक पार्टी साठी ही भाजी केली होती. लाल भोपळा इतका चवदार लागू शकतो यावर लोकांचा विश्वासच बसेना. चट्टामट्टा केला. आता तुझ्या पद्धतीने करुन पाहीन. मी केली त्यात गोडा मसाला होता आणि चारोळ्यांच्या ऐवजी दाण्याचा कूट.
नक्की करणार. धन्यवाद मृण्मयी.
नक्की करणार. धन्यवाद मृण्मयी.
माझी एक नागपुरची मैत्रीण
माझी एक नागपुरची मैत्रीण नेहमी करायची ही भाजी. पार्टीला एकदम हिट व्हायची. तेलही सढळ हाताने वापरायची. कमी तेलात तेव्हढी छान होत नाही पण मी तशीच करते नेहमीसाठी.
विदर्भ पेशल. आमच्याकडेही
विदर्भ पेशल.
आमच्याकडेही असते. सासुबाई छान करतात.
८-१० पानं कढीलिंबाची>>
८-१० पानं कढीलिंबाची>> कढीलिंबाची की कडीपत्त्याची.. आयाम कन्फ्युझ्ड
मस्त, मस्त!! आता भोपळा आणला
मस्त, मस्त!!
आता भोपळा आणला की अशीच भाजी करणार. दुधी किंवा दोडका भसकवणार नाही यात
साहित्यात गरम मसाला दोनदा का लिहिलाय?
ही पद्धत आवडली.बाखर-मसाल्याचा
ही पद्धत आवडली.बाखर-मसाल्याचा अजुन एक प्रकार भाजलेले तिळकुट व खोबरे समप्रमाणात्,आले,धने-जिरेपुड,गरम मसाला,लाल सुक्या मिरच्या थोडा वेळ पाण्यात भिजवलेल्या आणि आमचुर पावडर मिकसरमधे थोडे पाणी घालुन वाटुन घ्यायचे.या भाजीत तेल जास्त.आधणाच्या वाफेवर शिजवायची पण रसासाठी वरुन पाणी घालायचे नाही. पण गुळ अजिबात नाही घालायचा.तसेच कांदा-लसुण ही नाही.
>>>दुधी किंवा दोडका भसकवणार
>>>दुधी किंवा दोडका भसकवणार नाही यात
हाच बाकर आणि पध्दत वापरून सगळ्या भळभाज्या बर्या होतात.
कढीलिंबं = कढीपत्ता,
भारी झाली होती भाजी, काल केली
भारी झाली होती भाजी, काल केली होती, भोपळ्याची भाजी कृपया अशीच करावी असेही सुचवण्यात आले
छान पा.कृ., मृण्मयी!! मस्तच
छान पा.कृ., मृण्मयी!!
मस्तच लागते हि भाजी!!
छान पाकृ....मी भोपळा माझ्या
छान पाकृ....मी भोपळा माझ्या पद्धतीने केलेला मलाच आवडत नाही म्हणून जवळजवळ बंदच केलाय आणायला.....आता पुन्हा एकदा प्रयत्न करून भोपळ्याला स्वयंपाकघरात स्थान द्यायला हवंय असं ही कृती वाचून वाटतंय...
खरं म्हणजे अशा पाकृ वाचण्याचा फ़ायदा म्हणजे नावडत्या भाज्यांना वेगळ्या पद्धतीने करून पाहायला मिळतात आणि मग कदाचित त्याही आवडू शकतात.....अशा सगळ्याच पाकृवाल्यांचा एकदा जाहिर सत्कार करायला हवा....:)
>>>अशा सगळ्याच पाकृवाल्यांचा
>>>अशा सगळ्याच पाकृवाल्यांचा एकदा जाहिर सत्कार करायला हवा.
भोपळा खा. बाकरभाजी नको असल्यास कोरोडा करा.
>> दुधी किंवा दोडका भसकवणार
>> दुधी किंवा दोडका भसकवणार नाही यात >> तुझ्यापेक्षा मृ नेच केली असेल तशी भाजी. तिची भोपळा घालून तुरीया पात्रा वाटाणा भाजी माझ्या लक्षात आहे
वा.. वाचुनच मनात सुवास व
वा.. वाचुनच मनात सुवास व स्वाद दरवळला. फ्रीजात ढीगभर दूधी भरलाय. फारफार मोह होतोय त्याला ह्या बाकरात फेकण्या ऐवजी प्रेमाने टाकले तर तशीच चविष्ट होईल का?
भो बा भा मस्त भाजी!
भो बा भा मस्त भाजी! धन्यवाद.
फोटो काढल्यानंतर कोथिंबीर घातली. नंतर मिळून आली आणि तेलही सुटले.
लोला, भाजी कातिल दिसते आहे!
लोला, भाजी कातिल दिसते आहे! फारच मस्त!
वा लोला! करून बघायलाच हवी ..
वा लोला!
करून बघायलाच हवी .. (पण मेहेनत फार दिसते आहे .. ;))
BTW तुम्ही खसखस वाटायला काय वापरता? कॉफी ग्राइंडर का?
मस्त दिसतोय फोटो लोला. सशल,
मस्त दिसतोय फोटो लोला.
सशल, कुठे मेहनत आहे? फक्त खोबरं, खसखस वाटून लावायची आहे. कॅलरीज खूप आहेत म्हटल्यास पटेल एकवेळ
वाटण-घाटण म्हणजे कठिणच की
वाटण-घाटण म्हणजे कठिणच की ..
पण सांगा की खसखस कशात वाटता?
पण सांगा की खसखस कशात वाटता?
पण सांगा की खसखस कशात वाटता? >>> मी बरीच खसखस आणून, जराशी भाजून मिक्सरमधे वाटते आणि फ्रिजमधे ठेवून देते. जास्त असली, की व्यवस्थित वाटली जाते. (शिवाय ऐनवेळेस पटकन कुठल्याही पदार्थात घालता येते.)
थोडीशी वाटायची असल्यास, भाजून एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायची आणि ती पिशवी पोळपाटावर आडवी ठेवून त्यावरून (फुल्ल जोर देऊन) लाटणं फिरवायचं (पोळ्या लाटताना फिरवतो, तसंच). अगदी अर्धा चमचा खसखस असली, तरी छान पूड होते. (मात्र जरा खमंग भाजावी लागते.)
मृण्मयी, ही भाजी नक्की करून बघणार. माझ्या सासूबाई साधारण अशीच करतात, पण त्यात आलं-लसूण, गरम मसाला नसतो, पण ती पण खूप छान लागते.
ह्या भाजीची वर्णने लैच ऐकली
ह्या भाजीची वर्णने लैच ऐकली होती. आता पाकृही मिळाली. मस्त!! लोला, फोटो कातिल आहेत.
मृ ही भाजी केली होती. चव एकदम
मृ ही भाजी केली होती. चव एकदम मस्त झाली होती. खूप आवडली. फक्त तेल फाऽर जास्त होते माझ्यामते त्यामुळे पुढच्यावेळी भोपळ्याचा कोरोडो करणार.
रूनी, खूप मस्तं दिस्तेय भाजी!
रूनी, खूप मस्तं दिस्तेय भाजी! रंग पण सही!
हो हो, बाकरभाजी, भरली वांगी या भाज्या तब्बेतीनं केल्या तर तेलकट होतात, म्हणून नेहमी न करता लग्नकार्यात करतात.
नेहमी घरी करायची तर अक्षरशः चमचाभर तेलातही होते. चव बदलते, पण वाईट लागत नाही.
आज केली ही भाजी. मस्त अप्रतिम
आज केली ही भाजी. मस्त अप्रतिम चविष्ठ झाली. फार पाणी घातले नाही. साधारण रुनीच्या भाजीसारखी दिसत होती.
Pages