३ वाट्या लाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी (साल न काढता)
१ वाटी तेल (जरा सढळ हातानी तेल लागतं या भाजीला)
हिंग
मीठ चवीनुसार
पाव वाटी चिंच कोळ
पाव वाटी किसलेला गुळ
हळद
लाल तिखट
गरम मसाला
सुकं खोबरं अर्धी वाटी (गुलाबी रंगावर भाजून घेतलं तर छानच नाहीतर तसही चालतं)
अर्धी वाटी खसखस (भाजून)
(खोबरं आणि खसखस एकत्र वाटून घ्यावी)
आलं लसूण्-हिरव्या मिरचीचं वाटण पाव वाटी
गरम मसाला पाव वाटी (आचार्यांचा ताजा मसाला असतो पण सांगत नाहीत काय घातलंय! 'गरम मसाला चालतो हो ताई' असं उत्तर मिळालं!)
१ वाटी आधणाचं पाणी
८-१० पानं कढीलिंबाची
भरपूर कोथींबीर
पाव चमचा मेथ्या
१ चमचा चारोळ्या (नाही घातली तरी चालते)
*जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात हिंग, कढीलिंब आणि मेथीदाणे घालावे.
*आलं-लसणाची गोळी तेलात परतून घ्यावी. (जराशी चिकटेल भांड्याला पण काही हरकत नाही.)
*त्यावर वाटलेलं खोबरं-खसखस घालून परतावं.
*यावर भोपळ्याच्या फोडी, मासाला, हळद, तिखट मीठ, चिंच आणि गुळ घालून ढवळावं.
*आधणाचं पाणी ओतून, जाड झाकणी ठेवून फोडी शिजु द्याव्यात.
*कोथींबीर घालून एक उकळी आणावी.
*(चारोळ्या घालायच्या असतील तर त्या भोपळ्याच्या फोडींबरोबर घालाव्या नाहीतर लवकर करपतात.)
*थोडा रस्सा हवा असल्यास एक वाटीऐवजी दीड ते दोन वाटी पाणी घालून, त्यानुसार मीठ्-मसाला वाढवावा.
*कोळ बाजारचा किंवा फार घट्टं असल्यास कमी करावा. आंबटपणा कमी वाटल्यास भाजी उकळताना चिंच घालता येते.
*विदर्भात लग्नकार्यात ही भाजी असते. त्यात आचारी वरून भसकाभर तळणीचं तेल ओततात. (चवदार लागतं, पण महातेलकट!)
फोटो काढण्याची विनंती तेथील
फोटो काढण्याची विनंती तेथील संपादकांना केली आहे. माहिती नसल्याने परवानगीशिवाय फोटो घेतला यासाठी परत सॉरी .
(No subject)
(No subject)
फोटो काढलेला आहे.
फोटो काढलेला आहे.
अरे अरे थांबा, मधुराने लिहिले
अरे अरे थांबा, मधुराने लिहिले ना की तिला माहित नव्हते म्हणून असे झाले आणि लेखातला फोटो सुद्धा काढलाय आता, मग बास की.
महत्वाचे म्हणजे तिच्या हातची ही भाजी मी परवाच खाल्लीये :).
मधुरा, मिपाचं सदस्यत्व
मधुरा, मिपाचं सदस्यत्व घेण्याचे कष्ट वाचवल्याबद्दल धन्यवाद
मंजूडीनं लिहिलं आहे तसं तिथे मूळ फोटोची लिंक देणं किंवा आयडी आणि साइटचा उल्लेख करणं तुम्ही करू शकला असता. इथे येउन विचारणं पण फार अवघड नाही. असो, फोटो काढून टाकला आहे असं तुम्ही सांगितल्यामुळे प्रश्नच मिटला.
१५ माणसांचे प्रमाण सांगा ना
१५ माणसांचे प्रमाण सांगा ना क्रुपया प्लीज जरा.
धन्यवाद.
आरती दीड कीलो ची भाजी पुरेशी
आरती दीड कीलो ची भाजी पुरेशी होईल..
जर एकच भाजी करणार असाल तर थोडी जास्त करा.. ही भाजी शीळी पण छान लागते किंवा दुसर्या दिवशी याचे थालीपीठ ही करता येते..
काल संध्याकाळ भोपळाच घेतला
काल संध्याकाळ भोपळाच घेतला होता. नवीन घरात आता ही पहिलीच भाजी करतेय.. थँक्स रेसिपीसाठी.
Pages