घरात एक अधिक झालेलं (जास्त पिकलेलं) केळं होतं. केळं घालून शिरा नुकताच करून झाला होता. त्यमुळे परत शिराच नको वाटला करायला. बरं ते केळं टाकूनही देववेना. त्यामुळे ह्या केळ्याचं काय करावं या प्रश्नाला उत्तर म्हणून ही रेसिपी स्वतःच्या मनाने ट्राय करून पाहिली.
१ केळं
गव्हाची कणीक (अंदाजाने)
मीठ
किसलेला गूळ
तूपाचे मोहन
तळण्याकरीता तेल
१) केळं चांगलं कुस्करून त्यात थोडी कणीक घातली.
२) अंदाजाने गूळ किसून घातला (माझ्या मते कुस्करलेले केळे जितके असेल त्याच प्रमाणात गूळ घ्यावा.) + मीठ + तूपाचे मोहन
३) पुर्यांकरीता भिजवतो तशी जरा घट्टसर कणीक भिजवली. कणीक भिजवताना लागेल तसतसे पीठ घालत गेले.
४) जाडी पोळी लाटून वाटीने पुरीचे आकार कापून पुर्या कढईत तळून काढल्या.
लाल भोपळ्याच्या गोड पुर्याही अशाच करायच्या. भोपळा चांगला शेंदरी असला पाहिजे. पिवळा नको. आणि भोपळा उकडून घ्यायचा व पाणी चांगलं निचरून मगच पीठ घालून कणीक मळायला घ्यायची. कारण थोडे जरी पाणी राहिले तरी जितके पीठ घालू तितके त्यात बसतच जाते. तितकाच मग गूळही जास्त घालावा लागतो.
भोपळ्याच्या पुरया खाल्ल्यात
भोपळ्याच्या पुरया खाल्ल्यात मी..मस्त लागतात.
आता केळीच्या पुरया ट्राय करेन पण समप्रमाणात गुळ घातले तर पुरया जास्त गोड लागतील ना??
मी भोपळ्याच्या करते आणि
मी भोपळ्याच्या करते आणि रताळ्याच्या पण करते.
समप्रमाणात गुळ घातले तर पुरया
समप्रमाणात गुळ घातले तर पुरया जास्त गोड लागतील ना??
>>>
अंदाजाने घाल गं. मी नक्की किती घातला आठवत नाही. पण माझ्या पुर्या अगोड झाल्या होत्या. त्यामुळे पुढच्या वेळी एकास एक प्रमाण घेऊन करेन म्हणतेय.
मी ८-१० दिवसांपुर्वीच
मी ८-१० दिवसांपुर्वीच खाल्ल्या. दक्षीच्या घरी. मस्त लागतात
भोपळ्याच्या पुरया खाल्ल्यात
भोपळ्याच्या पुरया खाल्ल्यात मी. आता केळ्याच्या करेन.