Submitted by झकासराव on 14 March, 2012 - 04:17
आज असाच विषय निघाला चित्रकलेचा आणि मी माझी चित्रकला कशी वाइट होती ह्याचे अनुभव लिहिले पिचि बाफ वर. तर तिथे "माझिया जातीचे" अजुन काहि होते :फिदी:. त्यानी त्यांचेहि किस्से ऐकवले.
असे किस्से शेअर करण्यासाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चित्रकलेवरुन आठवल. दरवर्षी
चित्रकलेवरुन आठवल. दरवर्षी लेकींच्या हातावर मेंदी काढायचा प्रसंग आला की चंद्र, सुर्य, तारे असल काहीस काढल जात. रेखीव डिझाइन्स काढताच येत नाहीत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दरवर्षी लेकींच्या हातावर
दरवर्षी लेकींच्या हातावर मेंदी काढायचा प्रसंग आला की चंद्र, सुर्य, तारे असल काहीस काढल जात.>>>>>>>>>>
मलाही मेहंदी येत नाही... १०वीत असताना एकदा प्रय्त्न केला होता मेहंदी काढायचा पण डिझाईन सुचेना... शेवटी फर्नेस काढायला घेतला, पेपरावर फर्नेस जमत नव्हता तो हातावर काय जमनार.... काहीतरी विचित्र कोलाज झालं होतं हातावर.. नशीब मेहंदी रंगली नाही, नाहीतर हात लपवत फिरावं लागलं असतं आठवडाभर तरी ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
झकोबा, इथे चित्रकला आवडणारे जास्त आहेत, तर धाग्याचं नाव बदलायचा जरा विचार करा की?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा आवडता विषय सगळ्यात!
माझा आवडता विषय सगळ्यात! एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या परीक्षा दिल्यात, बी ग्रेड मिळाली होती. बाकी कुठल्याच नाही पण हस्ताक्षर आणि चित्रकलेच्या शाळेतल्या स्पर्धा, कॅम्लिन कलर कॉन्टेस्ट्सवगैरेत बहुतेक वेळेस नंबर यायचा. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि 'पश्चिम घाट बचाओ' मोहीम यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत, बाबांनी दिलेल्या 'देवराई'च्या कल्पनेवर काढलेल्या चित्राला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाल्याचं आठवतंय. तेव्हा कळलं नव्हतं पण त्या स्पर्धेचं परीक्षण बाबुराव सडवेलकर आणि प्रफुल्ला डहाणूकर यांनी केलं होतं हे आता आठवलं की छान वाटतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बायोलॉजीच्या आकृत्या काढायला खूप आवडायचं. आणि माझ्या बहीणीची बॉटनीची जर्नल्ससुद्धा आनंदाने करुन द्यायचे.
स्टील लाईफ तेव्हाही आणि आताही खूप कठीण वाटतं. मला आवडायचं ते फ्री हँड, डीझाईन, ते अॅस्टर किंवा झेंडू वगैरे काढायचा एक पेपर होता तेही आवडायचं.
मला चित्रकलेचा भारी कंटाळा.
मला चित्रकलेचा भारी कंटाळा. इतका की दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत जीवशास्त्रातला आकृती काढायचा ३ गुणांचा प्रश्न सोडून दिला.
सरळ रेषांतून निर्माण होणारे आकार काढायला, रंगवायला आवडायचे. घर, सोसायटी, साडीची बॉर्डर अशा विषयांची माझी चित्रे चित्रकलेच्या शिक्षकांना आवडली होती. (आमच्या वेळी चित्रकलेला ग्रेड असायची, तरीही मी दहावीला चित्रकला सोडून अर्थशास्त्र घेतले होते).
माझ्या तीन चित्रांबद्दलच्या गंमती चांगल्याच लक्षात आहेत :
एकदा स्वप्नदृश्याचे चित्र म्हणून हिंदी सिनेमातल्यासारखा दोन्ही हातात पिस्तुले घेतलेला माणूस काढला, तर पुढच्या बाकावरल्या मुलीने ''स्वप्नात हातात लाडू घेऊन फिरतात वाटतं'' अशी कमेंट केली, त्यावर मी तिला 'काही काही लोकांना स्वप्नातही खाण्याशिवाय दुसरे काही दिसत नाही' असं ऐकवलं!
एकदा मराठीच्या पाठ्यपुस्तकातलंच बघून एका मुलीचं चित्र काढलं, ती म्हातारी वाटायला लागली. पण तेव्हा माझ्याबरोबरची मुलं चेहरा =वर्तुळ, पोट=आयत, हात-पाय= रेषा अशी चित्रे काढत असत.
ऑफिसच्या एका ट्रेनिंग सेशनला तुम्ही स्वतः कोणत्या प्राण्यासारखे वाटता हे दाखवण्यासाठी हत्ती ( बहुतेक वेळा शांत-चिडला तर भयंकर) काढला, पण लोकांना तो उंदीर वाटू नये म्हणून चित्राएवढ्याच मोठ्या आकारात एलिफंट असे लिहिले.
हस्तकलेत परीक्षेच्या वेळी करायची वस्तू मला कधीच जमत नसे. त्यामुळे शिक्षिकाच दुसर्या विद्यार्थ्यांना मला मदत करायला सांगत (बाकीच्या विषयांत नंबरात असल्याचा फायदा
).
भरत
भरत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी पण याच पंथातली चित्रकला
मी पण याच पंथातली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चित्रकला प्रचंड आवडते, पण नाही तर नाहीच जमत.... बोटात पैसाभरही कला नसावी म्हणजे काय?
चित्रकलेत कधीच ५०-५५च्या वर मजल गेली नाही. दहावीला चित्रकलेचे मार्क्स फायनलमधे धरणार नव्हते तर तेव्हा ६५ मिळाले !! इतकी हळहळले होते की काय सांगू. (आपल्याकडे विद्यार्थी नाही, तर परिक्षार्थी घडतात याचं हे ढळढळीत उदाहरण
)
मी मेंदी चांगली काढते, स्केल ड्रॉइंग चांगलं जमतं - मग ते शाळेतलं चित्र का जमू नये म्हणते मी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हायल्ला खपली काढलीस राव झक्या
हायल्ला खपली काढलीस राव झक्या![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
माझी चित्रकला चांगलीच होती. खरेतर मला चित्रकलेतच करियर करायचे होते. अगदी काहीच न जमल्यास एटीडी करायचीही तयारी होती माझी. एलिमेंटरी, इंटरमिजिएट नंतर अभिनवमधुन फाऊंडेशनला प्रवेशही घ्यायची तयारी केली होती. पण सालं बारावीला दुर्दैवाने चांगले मार्क्स पडले आणि इंजीनिअरींग करावं लागलं
माझी चित्रकला आगाध होती एक
माझी चित्रकला आगाध होती![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
एक सरळ रेष काढता आली तर शपथ, शिवणाचीही तिच बोंब होती. इयत्ता ८वी पासून चित्रकलेची थियरी असल्याने थोडा धीर होता... अन्यथा मी वर्गप्रमुख असल्याने चांगली चित्रकला असलेल्या मुलिला धाक दाखवून दोन्ही वर्ष तिच्याकडूनच वही पुर्ण करून घेतलेली आहे. एकदा काही केल्या तिने काढलेले चित्र मला भावेना... तुझं नाव कॅम्पच्या वहीत लिहून टाकिन अशी धमकी देऊन चित्र पुन्हा काढून घेतलं.
शिवणात ती धाव टिप आणि हेम टिप... काही केल्या जमायचीच नाही मला.
रांगोळीची तर त्याहून बोंब आहे माझी..
जाऊदे कशाला त्या कडूझार आठवणी?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण सालं बारावीला दुर्दैवाने
पण सालं बारावीला दुर्दैवाने चांगले मार्क्स पडले >> विश्ल्या पेप्रात चांगली चित्र काढली नाहीस म्हणून चांगले मार्क मिळाले.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझीपण चित्रकला अजिबात चांगली
माझीपण चित्रकला अजिबात चांगली नाही. एकदा एक बैलाचं चित्र काढलं होतं. त्याला रंग कुठला द्यायचा हेच कळ्त नव्हतं. मग डोक्याला एक आणि गळ्याभोवती एक पट्टा काढून बाकी अंगाला एक, असे २ रंग दिले. माझं बघून माझ्या मैत्रिणीने पण तेच केलं. तर सर म्हणाले, 'तुमच्या गावातल्या बैलांना २-२ रंग असतात वाटतं !'
माझा वर्गात पहिला-दुसरा नंबर असायचा..त्यामुळे कदाचित सर फार बोलायचे नाहीत. पण कौतुक करायचा चान्स मी त्यांना कधी दिलाच नाही. शेडिंग हा प्रकार कधी जमलाच नाही. त्यामुळे वस्तुचित्राला कायम १० पैकी ५ मार्क्स. त्यातल्या त्यात भौमितिक रचना आणि अक्षरलेखन बर्यापैकी जमायचं.
९ वीत गेल्यावर खरंच सुटका झाली होती.
>>मी पण इथे फक्त वाचायलाच
>>मी पण इथे फक्त वाचायलाच येणार.. कारण चित्रकला माझा फारच आवडता विषय...>> +१+१
माझी चित्रकला लईच भारी आठवीत
माझी चित्रकला लईच भारी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आठवीत असतांना सरांनी सणाचे चित्र काढायला सांगितले होते तर मी मारे नवरात्रोत्सवाचे चित्र काढले
नंतर माझी बहिण तिच्या नी माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना दाखवत होती 'बघ बघ जखिणी गरबा खेळताते.'
माणसं असलेली चित्र तर सोडाच पण साधी फुलदाणी, बादल्या जग प्लेट अॅपल असे ठेवुन काढायचं स्थिरचित्र पण नाही जमायचं
विज्ञानाच्या आक्रुत्या तर हरी ओम. अमीबा, हायड्रा, स्पयरोगायरा, सदाफुलीच रोप सगळं भलतच.
तसंच मेहंदी नी रांगोळी तही बोंबच आहे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पण कसं काय माहीत लेकीची चित्रकला मस्तच आहे. माझ्या आठवी- नववीच्या चित्रांच्या मानाने ती पहिलीत असुन मस्त चित्र काढते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय सगळ्यांचेच किस्से. माझी
मस्तय सगळ्यांचेच किस्से. माझी चित्रकला भयानक यापेक्षा थोडी बरी. वस्तु ओळखायला येत, रंगसंगती बरी पण गती म्हणून नाही त्या विषयात. एलिमेंटरी, इंटरमिजेट दिल्या. पासही झावे व्यवस्थित मार्कांनी. पण बोरच व्हायचे जास्त.
रैना तु काढलेल्या वस्तू ओळखता
रैना तु काढलेल्या वस्तू ओळखता यायच्या म्हणजे चित्रकला मस्तच म्हणायची तुझी.
दक्षे अगदी खरं गं..
दक्षे
अगदी खरं गं..
अजय-आदित्य दोघंही अप्रतिम चित्रं काढतात. (स्वतःला जमत नसल्यामुळे असेल कदाचित, पण) चित्र आकार घेत असताना बघायला मला फार आवडतं. पण ते दोघंही मला त्यांच्या जवळपास फिरकूही देत नाहीत.
आद्या तर 'तू लिहित असताना मागे उभं राहून वाचलेलं तुला चालेल का?' असंही सुनावतो मला...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आमचे मास्तर अजब होते. ८/१०
आमचे मास्तर अजब होते. ८/१० रेघांच्या फटकार्यात पूर्ण चित्र उभे करत असत. त्यांचे नेहमीचे वाक्य...
'अरे माणसाचा रंग नाही जमला तर काळा रंग फासा... माणूस काळा असतो. पण निळा किंवा हिरवा नका रे फासू..'![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझी अश्शी बोंब होती म्हणून
माझी अश्शी बोंब होती म्हणून सांगू चित्रकलेची! शाळेत सलग दोन तासिका (पिरियड्स्) चित्रकलेच्या असंत. सुरुवातीला कागद वाटून झाले की मास्तर विषय सांगीत. वर्गातली मुलं मग उत्तेजित होऊन स्स्स्-हा-वा-छान इत्यादि उद्गार काढीत. मला तो भयंकर नाटकीपणा वाटे.
मात्र पोरं बर्याच कलात्मकतेने चित्रं काढीत. कागदाला वॉश वगैरे देत. पेस्टल कलर वापरीत. वेगवेगळ्या आकाराचे कुंचले वापरीत. मला ज्याम जमायचं नाय.
एकदा मास्तरांनी विषय दिला की घरच्या दिवाणखान्यात मी मांजराला पकडायला पळतोय. मांजर उंदराला पकडायला धावत्येय आणि उंदीर फटीत जायला धडपडतोय. काय डोंबलाचं चित्रं काढणार मी! माझा एक मनुष्याकृती आकार, एक कसलातरी चतुष्पादी आकार आणि लांब सूत सुटलेला एक लोकरीचा गुंडा (=उंदीर) हे प्रकार कसेबसे रेखाटले. दिवाणखान्यातलं फर्निचर वगैरे इत्यादि जिन्नस अल्ट्राव्हायोलेट रंगात रंगवायचं ठरलं (म्हंजे ते दिसणारच नाहीत!). पेटीतले (दृश्य) रंग हे चित्रकेलेचे नसून रंगपंचमीचे असतात ही ठाम धारणा! मग सुवर्णमध्य म्हणून कागदावर रंगपंचमी साजरी केली. ते चित्रं मग पान खाऊन पिंका टाकल्यागत दिसू लागलं.
तरी ५/१० मिळाले. बहुतेक किमान ५ गुण द्यायचा दंडक होता. मास्तर मात्र चांगले होते. सांभाळून घ्यायचे.
५ वीत असतांना मास्तरांनी एक छळवाद मांडला. रोज एक चित्र काढायचं. आणि वर्षाअखेरीस वही तपासणार! मग काय, शेवटल्या आठवड्यात सगळा तुंबलेला कार्यभाग मोकळा करायला बसायचं! चित्रकलेची वही ऐसपैस असायची. प्रत्येक पृष्ठाचे चार भाग करून प्रत्येकात एक चित्र काढायचं. मी सगळी एकंच चित्रं काढली. कारण समोरासमोरची दोन पृष्ठे मिळून ८ चित्रे होत. एकाच फराटा ८ वेळा मारायचा, की मग वेळ वाचत असे. फुल्टू असेम्ब्ली लाईन लावली चित्रांची. मास प्रॉडक्शनचं स्वनिर्मित आणि स्वप्राशित बाळकडूच जणू.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
१०वीनंतर हा आचरट प्रकार थांबला.
तरीही पुढे अकरावीबारावीला जीवशास्त्र नावाचा जीवघेणा प्रकार चालू होताच. त्यात प्रयोगवही पूर्ण करणे हा एक सक्तमजुरीचा कार्यक्रम असे. सुदैवाने बारावीत असतांना तेरावीच्या एका सिनियरची जुनी प्रयोगवही मिळाली. त्याप्रमाणे आकृत्या एका मित्राकडून काढून घेतल्या. त्याबदल्यात तो लाईन मारीत असणार्या पोरीच्या मैत्रिणीची (पोरीची नव्हे!) बरीचशी माहिती काढून पुरवली आणि त्याच्या (एकतर्फी) प्रेमप्रकरणास सहानुभूतीपूर्वक द्विकर्णी श्रोतृवृंद पुरवला.
१२वीला बोर्डाच्या परीक्षेत प्राणीशास्त्राच्या (झूऑलॉजी) पेपरात काहीही येत नव्हतं. पहिल्या प्रश्नात जोड्या लावा, गाळलेल्या जागा भरा वगैरे किरकोळ प्रकार सोडले तर उर्वरित संपूर्ण पेपर कोरा होता. फक्त शेवटल्या प्रश्नात होती ती बेडकाच्या मेंदूची सुबक आकृती काढीत बसलो होतो तासभर. ती आकृती नेहमी यायची हे माहीत होतं. त्याची जोरदार तयारी केली होती. मन लावून काढलेली जीवशास्त्रातली ही एकमेव आकृती. एक तास झाल्यावर मित्राने खूण केली आणि आम्ही दोघांनी पेपर टाकले. आणि अवघा वर्ग स्तंभित झाला. कारण आम्ही दोघे 'हुशार' म्हणून गणले जायचो. बाकीच्या पेपरांच्या वेळी तसं दिसलं होतं. प्राणीशास्त्राची हेळसांड का केली असा प्रश्न पर्यवेक्षकांच्या चेहर्यावरही उमटला होता. काहीका असेना ६२/१०० मिळाले. प्राणी आणि वनस्पती शास्त्रांत स्वतंत्ररीत्या किती मिळाले ते काढायचा धीर झाला नाही. न जाणो चुकून पास झालो असलो तर...!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पुढे इंजिनियरिंगला ड्रॉईंग होतं ते ठीक जमायचं.
तर अशी आमची चित्रकलेची साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ!
वाचकांच्या संयामाबद्दल धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आ.न.,
-गा.पै.
माझे देखिल या विशायावर बरेच
माझे देखिल या विशायावर बरेच किस्से आहेत.
मी ६/७ वीत असताना सरान्नी विषय दिला "दहिहन्डि".
बोम्बला !!! काय कधणार? माझी कल्पानाशक्ति चान्गली आहे. पण कागदावर कस कढ्णार?
बराच वेळ इकडे तिकडे पाहुन मझ्या पुढे बसणर्या मैतिणिने तिचे चित्र रन्ग्वाय्ला घेत्ल्याचे दिसले.
तिला सन्गित्ला मला पन कढुन दे म्हनुन. बिचरिने तिला जमेल तसे मला कढुन दिले. ति माला "अग मला पण नाही जमत ग वगैरे म्हनालि" मी म्हत्ल " ते तर ते. काही तरी आहे ना!!!" .
आता, तिने कढ्लेले चित्र म्हनजे, काही डोक्यासाठी गोल आनी त्यवार नाक- डोळे, एक आयत (शर्ट) त्याला २ काठ्या (हात) आणि खाली २ उन्च आयात(पाय) यान्चे ३-४ layers.
तरी सरान्नि ६/१० मार्क दिले होते. मझा काका माझी वहि पहुन इत्का हसला होता कि मला वाटत होते त्याला सान्गावे कि ते मी नाही कढ्लेले पन विचार केला, तो म्हणेल तुला हे ही जमली नही. ;-(
मला अजुनही ते चित्रा आठवते. मी नन्तर मोठी झल्यावर याचा विचार केला. माझ्या डोक्यात इत्क्या कल्पना असुनही मला का नही जमले? may be I was expecting too much . हलक फुलक कस काठयच किम्वा तसा विचार कसा कराय्चा हे त्या वयात कळत नाही. मी तेव्हा जास्त मेहनत घेत्ली असति तर थोडफार जमल ही अस्त. पण जमेल की नाही म्हणुन घाबरुन गेले. तसेच मला scaling चा problem होता. objects जरुरी पेक्शा मोठे अथवा लहान येत. मग दहिहडि चे ३-४ layers ८" क्ष ११" च्या कागदावर कसे माव्णार?
शाळा कॉलेजात कशाला माझी
शाळा कॉलेजात कशाला माझी चित्रकला(?) अजून फार काही सुधारलेली नाही. ४ वर्षाच्या लेकाला फुलाचं चित्र काढून दिलं तर त्याने 'not this one, a beautiful flower' काढून दे सांगितले ह्यावरुन काय ते समजून घ्या.
ते चित्रकलेचे २ तास आम्हाला पण होते. महा वाईट. एकदा तर सगळं चित्र/टेक्निक समजून सांगितल्यावर सुद्धा मी काढलेले भयानक चित्र बघून सर इतके संतापले की वर्गातून निघून गेले. मी मॉनिटर होते. सगळ्या वर्गाला घेऊन आनंदाने ग्राउंडवर गेले. तशी पद्धत होती शाळेत, ऑफ पिरियडला ग्राउंडवर जायची.
नंतर काय उत्क्रांती झाली माहिती नाही पण जीवशास्त्राच्या मॅडमनी जरनलमधल्या एकूण एक फिगरला (फिगरच म्हणतात त्या आकृत्यांना) व्हेरी गूड शेरा दिला इतपत बरी चित्र जमायला लागली. बॉटनी आणि झू दोन्ही विषयांचे पेपर वेगवेगळ्या फिगरांनीच सजवून कसेबसे निघाले. PCM च्या जोरावर आता टाइपरायटर बडवते आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त धागा!! मला आवडते
मस्त धागा!!
मला आवडते चित्रकला. चित्र रंगवण्यापेक्षा ते रेखाटायला जास्त आवाडतं. त्यातुन स्वतःहून चित्र काढण्यापेक्षा बघून तस्स्च्या तस्स चित्र काढायला आवडते. त्यामुळे प्रयोगवहीतल्या आक्रुत्या काढायला जाम आव्डायचं.
कॉलेज मध्ये असताना Drawingच्या पुस्तकातले बरीच रेखाटने मी माझ्या वहीत काढली आहेत आणि आता १२ वर्ष झाली ती वही अजुन जपून ठेवली आहे. आता विचार करतेय...या एका तपात मी १ही चित्र का काढलं नाही?:(
माझी एक खूप जुनी ईच्छा आहे (का ते माहित नाही).....घरातल्या एका आख्ख्या भिंतीवर एका संपुर्ण गावाचं चित्र काढायचं आहे.
शाळेतला एक किस्सा आठवला... मी आणि माझी मैत्रिण(जी दुसर्या शाळेत होती), आम्ही चित्र काढत होतो..चित्राचा विषय होता...साडीची किनार. मी आईची एक साडी घेतली अन त्याचीच किनार कॉपी केली...आणि तिने मनानेच चित्र काढलं. त्यामधे तिने बॉर्डरवर बदकाच्या पिलासारखे छोटे पक्षी(एक्मेकांकडे चेहरा केलेले) काढले होते. काही दिवसांनंतर तिने सांगितलं..:"आज वही तपासली. आमच्या मॅडमना नाही आवडलं चित्र. कमी मार्क्स दिले मला...त्या म्हटल्या, हे काय चोचीला चोच लावलेले पक्षी काढलेत, अशी असते का साडीची बॉर्डर?"
Actually जेव्हा तिने चित्र काढले, ते रंगवले, तेव्हा आम्हाला त्या चित्रात काहीच अस वावगं दिसले नाही. पण नंतर खूप हसलो.
ड्रॉईंग- पेंटींगचं मला
ड्रॉईंग- पेंटींगचं मला जबरदस्त आकर्षण; ड्रॉईंग कांहीसं जमायचं पण पेंटींगच्या नावानं बोंबच. मग मीं चांगल्या कलाकारांची प्रदर्शनं बघण्यावरच समाधान मानूं लागलों. पण खूप उशीरां मधेंच कधींतरी पेंटींगची उर्मी उफाळून आली व मी पेंटींग सुरूं केलं. एक दिवस ऑफिसमधून घरीं आलों तर बायकोने हळूंच खुणेनेच त्यावेळीं ९वी-१०वीत असलेली आमची मुलगी माझ्यावर जाम भडकली असल्याचं कळवलं. इतक्यांत पोरगी आलीच फणफणत बाहेर. " बाबा, तुम्हाला काय पेंटींग करायचंय तें करा ना, पण तीं 'सो कॉल्ड' पेंटींग्ज सगळीकडे पेरून कां ठेवतां ? आज त्यातलं एक चुकून माझ्या पुस्तकांतून शाळेत नेलं मी आणि वर्गात खालीं पडलं तें. 'अय्या, तुला एवढा लहान भाऊ आहे हें बोलली नाहीस कधीं; असं रंगांत खेळायला पण देतां तुम्ही त्याला ?', असं म्हणून हैराण केलं मैत्रीणीनी मला आज.! "
मुलगी लग्न होऊन गेल्यावरच मीं पुन्हा ब्रश हातात घेतला; कुत्र्याचं शेपूट..... !!!
चित्रकला , हे नक्की काय असतं
चित्रकला , हे नक्की काय असतं ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला चित्रकलाही जमली नाही आणि अक्षर म्हणजे कुत्र्याचे मांजराला आणि मांजराचे पाय कुत्र्याला असा प्रकार.
दिवाणखान्यातलं फर्निचर वगैरे
दिवाणखान्यातलं फर्निचर वगैरे इत्यादि जिन्नस अल्ट्राव्हायोलेट रंगात रंगवायचं ठरलं (म्हंजे ते दिसणारच नाहीत!). >>>
या प्रकारे मी सगळी चित्रंच अल्ट्राव्हायोलेट रंगात रंगवली असती !!
अरारा! चित्रकला अवघडच! मी
अरारा! चित्रकला अवघडच!
मी काढलेल्या एक चित्रावर मास्तरीण बाईंनी लाल रंगाच्या पेनाने गाढव काढले होते.
बरीच प्रगती केली मी नंतर
चित्रकला ह्या (एकाच) विषयात
चित्रकला ह्या (एकाच) विषयात आम्हाला गती होती/आहे.
आमचे चित्रकलेचे सर महातिरसट होते.
माझे किस्से नाही पण माझ्या मित्राचा किस्सा आहे. हा चित्रकला कशाशी खातात असा होता.
एकदा मैत्री ह्या विषयावर चित्र काधायचे सांगितले, सरांनी त्यांच्या तिरसट का मिश्किल पद्धतीने सांगितले,
तुझ्या गळा माझ्या गळा, गुम्फू मोत्याच्या माळा अशी मैत्री दिसली पाहिजे चित्रात.
झालं, हा मित्रा माझा बेंचमेट होता. एका बेंचवर मुलगा-मुलगी असे.
त्याने काय करावे एक गोळाकार माणसाचा आकार काढला व दुसरा गोळाकार. प्रत्येक गोळ्याला वर दोन काड्या(हात) व खाली दोन काड्या(पाय). व मधूनेक मोत्याच्या माळा(हि सगळ्यात सोपी कारण सगळे छोटे गोळे आढून जोडून) एका कडून दुसर्याकडे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
'अय्या, तुला एवढा लहान भाऊ
'अय्या, तुला एवढा लहान भाऊ आहे हें बोलली नाहीस कधीं; असं रंगांत खेळायला पण देतां तुम्ही त्याला ?',>>>
भाऊ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
काय जबरी किस्से आहेत एकेक.
काय जबरी किस्से आहेत एकेक.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पुढे इंजिनियरिंगला ड्रॉईंग होतं ते ठीक जमायचं.>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते ड्राफ्तर मुळे. तरिही लाइनवर्क गचाळच असायचं. कन्स्ट्रक्शन जिओमेट्री आणि मेन आक्रुती ह्यात फरक शोधावा लागायचा.
कदाचित माझे इतर विषयातले मार्क माहिती असल्याने मास्तर मला इतर मुलांच्या ड्राइन्ग शीट्स दाखवुन म्हणायचा अस हवं लाइन वर्क.
पुढे इंजिनियरिंगला ड्रॉईंग
पुढे इंजिनियरिंगला ड्रॉईंग होतं ते ठीक जमायचं.>>> तेव्हा पण जीटी चा पर्याय होताच की
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझी चित्रकला चांगली होती.
माझी चित्रकला चांगली होती. म्हण्जे स्केचिंग, मुक्तहस्त वै. चांगलं जमायचं पण ते रंगांचं नि माझच जमत नव्हतं बहुतेक. अगदी काटेकोर नियमाने मी पिवळ्या शेजारी जांभळा, हिरवा, लाल चांगला दिसतो अशा पद्धतीने रंगकाम केलं तरी ते वाईट्टच दिसायचं.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
त्यात आमचे विश्वे सर भयानक चित्र सांगायचे. एकदा काय बाजाराचं चित्र काढा म्हणाले, एकदा तर युध्दाचं चित्र काढायला लावलं! इत्की माणसं काढायला कोणाला डोंबल्याचं येतय!!!
एकतर माणुस काढायचा सर्वात अवघड. मला तर अजुनही माणसाची बोटं, नाक, हात वै. प्रपोर्शनमधे काढता येत नाहीत. आणि मुख्य म्हणजे पाय्...! अगदी आपल्याकडे म्हणजे समोर पहाणारा माणुस काढला तर त्याचे पाय/ तळवा कुठल्या दिशेने काढतात?
आमचे चित्रकलेचे पेटकर सर
आमचे चित्रकलेचे पेटकर सर झर्रझर्र चित्र काढायचे. मुक्तहस्तचित्रात ते प्रत्येक मुलिला (वर्गात निदान ६० तरी मुली होत्याच) तिच्या वहितल्या पानाचे दोन भाग (मुडपुन) अर्ध्याभागावर मुक्तहस्तचित्र काढून द्यायचे. अस होऊन आम्ही ते उरलेलं अर्ध काढण्यात उरलेला सगळा तास घालवायचो. उरलेली अर्धी बाजू खोडरबरने खोडून खोडून काळी व्हायची किंवा फाटायची सुद्धा. एकदा मी दुसर्यांदा चित्र काढून द्या म्हणून विनंती करायला गेले तर सरांनी माझी वही दुसर्या टोकाला भिरकाटून दिली होती.
वस्तूचित्राची तर बोंबाबोंब असायची.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Pages