स्मशान वैराग्य भाग २

Submitted by श्रीमत् on 11 March, 2012 - 10:40

स्मशान वैराग्य भाग १
http://www.maayboli.com/node/33314

मसाला डोश्याचे पैसे चुकते केले आणि निघता-निघता कॉऊंटरवरची मुठभर बडीसौफ तोंडात बुचकली आणि हॉटेलच्या बाहेर आलो. तेव्हा लक्षात आलं कि अण्णांनी काही पैसे आणण्यास सांगितले होते. अर्थात हा मेसेज त्यांनी मगाशीच माझ्या बायकोमार्फत दिला होता. मी तसाच शेजारच्या ATM मध्ये गेलो.

माझ्या आधी दोघेजन तिथे प्रतीक्षेत होते. मीही दातात अडकलेली बडीसौफ, जीभेनेच तोंड वेडेवाकडे करुन काढण्याचा प्रयत्न करत होतो.(माझ्याकडे कोणांच लक्ष्य नाहीये अस बघुन) आणि माझ्या पुढचे आत गेलेल्या पोरीला शिव्या घालत होते. ,"काय साला, टाईम-पास आहे. किती वेळ्...वैगरे..वैगरे..तसा हा अनुभव प्रत्येक एटीमच्या बाहेरचा. बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आत गेलेली व्यक्ती ही टाईमपास करत आहे असच वाटंणार. आता माझा नंबर होता (शिव्या खाण्याचा) मी आत गेलो गडबडीत कार्ड मशीन मध्ये टाकल. पिन टाकला आणि withdrwal amt हजार रु. टाकली. परत आतुन आवाज. अरे वेड्या तिथे प्रेत झालय. सगळे सोपस्कार करायला पैसे लागणार. त्यात अण्णा रिटायर्ड माणुस, ते थोडी ना सतत पैश्यासाठी तुझ्याकडे हात पसरणार आहेत . तुझ तुलाच नाही का बघावं लागणार. काय लागेल काय नाही ते. एक...... हजार-एक, जरा जास्त बरोबर घेतलेस तर काही बिघडणार आहे का? नाही तर एरवी मित्रांबरोबर पियाला बसलास की आपसुकच तुझे डेबिट्/क्रेडिट कार्ड बाहेर पडतात. हातातली रिसिप्ट चुरगळत मी "हजारच" घेऊन बाहेर पडलो.

प्लॅटफॉर्मवर १.२८ ची पनवेल लोकल लागली होती. ट्रेन यायला अजुन ८-१० मिनिटांचा अवकाश होता. खिश्यात परत कंपण होऊ लागलं. वाटल अण्णांचा फोन असेल म्हणुन गडबडीत बाहेर काढला तर डिस्प्लेवर राकेशच नांव. मी फोन कट केला. आयला आता ह्याला काय सांगु? सकाळपासुनच्या गडबडीत सारं विसरलोच मी. एक काम करुया ह्यांना पुढे जायला सांगुया. नाहीतर उगाच बिच्यार्यांना वाईट वाटेल. अस कसं झालं अचानक? तेही आत्ताच आणि आजच्या दिवशीच घडायच होतं.

अर्थात त्यांना माझ्या आज्जीशी काही घेणं-देणं नव्हते. आज होळी आणि उद्द्या रंगपंचमीची सुट्टी असल्यामुळे आम्ही सर्व मित्रांनी बाहेर रिसॉर्टवर जाण्याचे प्लॅनिंग केले होते. (दोन किलो बिर्याणी, बियरचा क्रेट, एक टिचर्सचा खंबा, ऊसनवार हुक्का, एक किलो सुका चिकण, अशी जंगी तयारी केली होती) थोडक्यात काय तर उद्द्याचा दिवस आमच्यासाठी स्वर्गसुखाचा होता. गेले दहा-बारा दिवस आम्ही मित्र रोज रात्री भेटुन या आनंदोत्सवाची वाट बघत होतो. पण्.....ते आता शक्य नव्हते. "साला आज्जीला पण आजच मरायच होतं" आधीच गेल्यावेळी माझ्या बायकोची तब्येत ठीक नसल्यामुळे एक पिकनिक कॅन्सल झाली होती. मी लगेच राकेश ला फोन केला. आणि झाला प्रकार सांगितला. वरुन त्याला हेहि म्हटले की तुम्ही पुढे जावा. मी सर्व आटपुन आ़ज रात्री किंवा उद्द्या सकाळी तुम्हाला जॉईन करेन त्यात उद्या जर हॅंग ओव्हर झालाच तर आज्जीच Valid reason आहेच. रजा घ्यायला. यावर त्याने काही प्रतीक्रिया न देताच फोन ठेवला.

मलाही फोन ठेवल्यानंतर जरा guilty फिल झालं. पनवेल ट्रेन रमत-गमत प्लॅटफॉर्मवर लागत होती. दुपारची वेळ असल्यामुळे गाडी रिकामीच होती. मी विंडो सीट पकडली आणि खिडकीतुन बाहेर बघत बसलो. मला अजुन पाऊन एक-तास काहीच काम नव्हतं. ना आज्जी गेल्याच सोयरं सुतक. आता टाईमपास काय म्हणुन मी खिशातला मोबाईल बाहेर काढला आणि मुख-पुस्तिका (Face - भुक) ओपन केलं. विचार आला आज्जी वरुन एखादा चांगला Status टाकुया. भरपुर लाईक्स आणि "मुलींची" सहानभुती मिळेल. चार ओळी मनात आल्या सुद्धा

थोरली आऊ,
मायेची साऊ,
कणखर माऊ, .............आज्जी माझी.

"आज्जी का?.... का सोडुन गेलीस आम्हाला?.....तुझ्या आठवनीने कंठ दाटुन येतो गं..........!

परत अंर्तमनाचा आवाज....अरे काहीतरी शरम कर. तिकडे ती माय मरुन पडलीये. अरे म्हातारी असली म्हणुन काय झालं ती होती म्हणुन अण्णा, आणि अण्णांमुळे तु आहेस हे त्रिकालबाधीत सत्य आहे. मान्य आहे एखाद्या व्यक्तीचा आपल्याला सहवास नसेल तर तितकीशी आत्मीयता आपल्याला वाटत नाही. अरे पण मानुस म्हणुन आपलीही काहीतरी नैतिक जबाबदारी असते. आणि ती अशी सोशल साईटसवर मांडुन तिचा " सोशल" बाऊ करण्यापेक्षा ति अंगावर घेऊन नैतिकतेने पार पाडणं केव्हाही उत्तम. अरे मदर तेरेसा, बाबा आमटे आणि अशी कितीतरी लोक आहेत जी लाईम्-लाईट मध्ये आलीच नाहीत. त्यांनी निरपेक्षपणे लोकांची सेवा केली. त्यावेळी कुठे होत्या या "सोशल" साईटस. का उगाच आपल काही आवडल की करा "SHARE" . त्यापेक्षा शेअर करा नात्यांमधल निखळ प्रेम. तुमच्या "Friend List" मध्ये किती मित्र आहेत याच्या पेक्षा तुमच्या अडल्या नडल्यात. गरजेला किती मित्र उभे राहतात हे महत्वाचे. अर्थात याहीवेळेला मी स्टेटस अपलोड करुन मोबाईल परत आत ठेवला. एव्हाना गाडी कुर्ला स्टेशनला आली होती.

गाडी थांबताच एक जर्जर झालेली म्हातारी आत शिरली. तिची एकुन अवस्था पाहुन तिच वय साठ्-पासष्ट च्या आसपास असावं पण उपासमारीमुळे पोट एकदम खपाटीला लागल होतं. गालफाट संपुर्ण आत गेलेली. हाता पायांच्या काड्या आणि फाटकी, मळकी ठिगळं लावलेली साडी. यामुळे ती जरा जास्तच म्हातारी दिसत होती. ती भीक मागत मागत हळु-हळु माझ्या दिशेने सरकत होती. काही लोकांनी तिला पैसे दिलेहि तर माझ्यासारखेच कोटगे झालेले काहिजण तिला हाकलवत होते. आता ती माझ्यासमोर उभी होती. लेकराssssssरा. ए लेकरा...! दे वाईच कायतरी. कालपासुन आनाचा एक कण नाय पोटात. मी ऐकुन न ऐकल्यासारखे केले. तिने परत माझ्या पायाला हात लावला. ए दादा...दे कायतरी गरीबाला! आत्ता मात्र तिने तिचे घाणेरडे हात मला (माझ्या स्वछ कपड्यांना) लावले म्हणुन मी एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला आणि हलकेच ओरडलो. माफ कर बोललो ना. समजत नाही. यावेळेस मात्र ती गुपचुप निघुन गेली आणि पुढचेच स्टेशन टिळक नगरला उतरली. दोन एक मिनिटे झाली तरी ट्रेन हलण्याचे नाव नाही. म्हणुन खिडकीतुन बाहेर बघितले. लाल सिग्नल लागला होता. तेवढ्यात सहज लक्ष बाजुच्या कॅन्टीन वर गेले तर मगाचीच म्हातारी. आता तिच्या हातात एक क्रुश बांध्याचा लहान पोरगा होता जेमतेम ७-८ वर्षांचा. बहुतेक तिचा नातुच असावा. उन्हाने रापलेला. अंगात फक्त हाफ स्लीवचा पांढरा मळलेला शर्ट, बसक-गळतं नाक, पिंजरलेले केसं. एकंदर अवतारावरुन भरपुर दिवस तरी आंघोळ केली नसावी असच वाटत होतं. म्हातारीने जमलेल्या पैशातुन एक कटींग चहा घेतली आणि त्याच्यासाठी समोसा पाव. त्याने तो हातात पडताच एकदम अधाशीपणे तोंडाला लावला . ती मात्र तो चहा पित त्याच्या डोक्यावरुन समाधानाने हात फिरवत होती. तिने एकावेळच्या जेवणाचे(वडा-पावचे) पैसे वाचवले होते. न जानो त्याला परत कधी भुक लागली तर.....! एवढ्यात पिवळा सिग्नल पडला. आणि गाडी सुरु झाली..

आता माझ्या विचारांची गाडी सुरु झाली होती. कोण ती कुठली म्हातारी आज या वयात सुद्धा पोटासाठी वण-वण भटकत आहे. स्वताच्याच नाहीतर आपल्याबरोबरील त्या जिवाच्याही. माझ्याकडे तिला पाच-एक रुपये देवुन गमावण्यासारख काहीच नव्हतं परंतु कमावण्यासाठी भरपुर काही होतं त्या दोन भुकेल्या जिवांचा आशीर्वाद........! जो मी गमावला होता. नाहीतर कित्येक सुखवस्तु घरातील बायकांना मी पाहीलय. कमरेचे घेर हे वाढलेले. एकदा बसल की ऊठताना पंचाईत. सर्व प्रकारचे ऐशो-आराम पायाशी लोळन घालत असतात. तरीही दु:खी? यांना स्वताच्या नात्यांपेक्षा मालिकेतील नात्यांमध्ये जास्त रस. अगदी कोन कुठल्या सिरयल मधली ती "बा" वारली तेव्हा आमच्या बाजुच्या घोरपडे काकी दोन दिवस सुतकी चेहरा करुन बसल्या होत्या. याऊलट ही माऊली तिला कुठे दुखंल खुपंल तर कुणाला सांगायच? कोणाजवळ आपल मनं मो़कळ करायच? विचारांच्या गर्तेतच मानखुर्द स्टेशन आलं आणि मी खाली उतरलो.

क्रमशः

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ऑफिसला जाऊन येणे.. मसाला डोसा खाऊन घेणे... आजी ही जवळची अशी नसल्याने या गोष्टी एखादा करू शकतो हे पटले... पण अश्यावेळीही मित्रांना दुसर्या दिवशी पिकनिकला येतो हे सांगणे, फेसबूकवर स्टेटस अपडेट करणे.. हे काही रुचले नाही... नाही, अशी लोक असूच शकत नाही असे नाही.. पण त्या दरम्यान मनात येणारे विचार पाहता, जो माणूस असे संतुलित विचार करू शकतो तो असे वागू शकतो हे विसंगत वाटले...

असो, आपण कथेत मांडलेल्या विचारांशी किंचित असहमत आहे.. पण लिखाणशैली छान आहे.. त्यामुळे वाचत आहे.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. Happy

पण त्या दरम्यान मनात येणारे विचार पाहता, जो माणूस असे संतुलित विचार करू शकतो तो असे वागू शकतो हे विसंगत वाटले...
>>>>>>> अगदी.

वाचताना हाच विचार येतो कि लेखकाला वारंवार आतल मन काहीतरी सांगत असत पण दरवेळी त्याकडे दुर्लक्ष केल जात. मग कोडगेपणा म्हणावं तर असे संतुलित विचार तरी मनात कसे येतात.

तरी पण लेखनशैली छान आहे. पुलेशु

अभिषेक आणि आबासाहेब तुमच्या समीक्षणाबद्दल मनापासुन आभार!:)
तुम्हाला व्ररील दोन भाग वाचताना लक्षात आलच असेल की कथेत कथन करणार्‍याचे नाव कुठेही नाही आहे. कारण तो "मी" आहे. जो प्रत्येक व्यक्तीत कमी- अधीक प्रमाणात असतो. आणि बर्‍याचदा दैनंदिन आयुष्यात आपण सभोवताली काही गोष्टी होताना पाहात असतो. कधी-कधी काही गोष्टी फारच चुकिच्या असतात आणि आपल अंतर्मन आपल्याला त्याची जाणीव करुनही देतं. पण आजु-बाजुच्या झग-मगाटात एक तर आपल्याला ते ऐकु येत नाही. वा जाणीवपुर्वक आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
सारांश काय तर कळतय पण वळत नाही.

>> पण अश्यावेळीही मित्रांना दुसर्या दिवशी पिकनिकला येतो हे सांगणे, फेसबूकवर स्टेटस अपडेट करणे.. हे काही रुचले नाही... नाही, अशी लोक असूच शकत नाही असे नाही.
@अभिषेक:- माझ्याच एका जवळच्या मैत्रीनिने तिचे वडिल वारले त्याच्या दुसर्‍याच दिवशी दादा गेले असा स्टेटस (फेसबुक वर) टाकला होता. कदाचित त्या संदर्भातच वरील भाग कथेत आला असावा.

पिकनिक विषयी विचाराल तर.

मी सर्व आटपुन आ़ज रात्री किंवा उद्द्या सकाळी तुम्हाला जॉईन करेन त्यात उद्या जर हॅंग ओव्हर झालाच तर आज्जीच Valid reason आहेच. रजा घ्यायला. यावर त्याने काही प्रतीक्रिया न देताच फोन ठेवला.

फेसबूकवर स्टेटस अपडेट करणे.. हे काही रुचले नाही... नाही, अशी लोक असूच शकत नाही असे नाही.. >> मला पण.

तरीही हे पण खरय की तुमची कथा छान पकड घेतेय.
पुढचा भाग लवकरच येउ द्या Happy

तो जोक आठवला
आजचा युवक

रस्त्यात विचारत नाही कुत्र
आणि फेसबुकवर १०० मित्र

तो जोक आठवला
आजचा युवक

रस्त्यात विचारत नाही कुत्र
आणि फेसबुकवर १०० मित्र

@ निलिमा सुपरलाईक. Happy

या जोकच्या निर्मात्याला दाद द्यायला हवी. पण कधी कधी विनोदाला कारुण्याची झालर असते.. कदाचित फेबुवरही त्याला मित्र मिळाले नसतील